Hey, I am reading on Matrubharti!

Aaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी मॉर्निंग माझा
4 दिवस पूर्वी

स्वप्न अलवार

पहाटवारा गार

झाडाच्या फांदीवर

हलकीशी पुकार

जीव छोटासा

हट्ट घरकुलाचा

पायातल्या गवताने

वाऱ्यावर उडण्याचा

घरटं सजेल

सृजन वसेलचिमण्या चोचीत

आनंद भरेल

अजून वाचा
Aaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ संध्या
6 दिवस पूर्वी

माझा भारत आपला भारत
सफरचंदी गालांचा
सरोवरातील होड्यांचा
उगवत्या सूर्याच्या लालिम्याचा
दऱ्या खोऱ्या शिखराचा
देवीच्या घट दीपकाचा
हत्ती डुलत्या मंदिराचा
ढोल ताशांच्या ठेक्याचा
मोरयाच्या गजराचा
नद्यांच्या उगमाचा
अभय दिलेल्या प्राण्यांचा
साखरेत मुरलेल्या भाषेचा
फुलांच्या गच्च गजऱ्याचा
सुंदर साजिऱ्या स्वप्नांचा
भारत अपुला सर्वांचा

अजून वाचा

श्रावणातले दिवस कोवळे
ऊन साजिरे पडे
भिजल्या पानालाही आता
पडले थोडे कोडे
मनभावन ऋतू बरवा
पसरला अंतरी
अजूनही माझी मऊ पाकळी
का होई कावरी बावरी

अजून वाचा

सुंदर सकाळ
उगवली
चंद्राला बिलगून चांदणी म्हणाली
आता होऊ अदृश्य
घेऊ निरोप सगळ्यांचा
पण हात आपण गुंफलेला
कधी ना सुटायचा

अजून वाचा

भिजली होती झाडं
भिजल्या होत्या वेली
रात्रही भिजली चिंब
आणि झाली काजळ ओली!!
अंगावरचा शालू
तोही होता काळा
होती त्याच्या पदरावर
पाऊसखडी विणलेली!
रात्र झाली काजळ ओली!!
चंद्र भाळीच्या तिचा
झाला होता फिका
पण गाली मात्र श्रावण सरींची
बट थेंबांची रुळली !
रात्र झाली काजळ ओली!!
पंचमीचा सण दारात ठाकला
रातीने तळव्याला मेंदी रेखली माखली
पहिल्या किरणात नक्षी केशरी रंगली
रात्र झाली काजळ ओली!
आर्या

अजून वाचा
Aaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
4 आठवडा पूर्वी

मातृभारती आणि नुक्कड कॅफे आयोजित काव्यमैफल #पुणे #एक भिगीसी नजम

आषाढातली प्रसन्न सकाळ असते
कधीतरी आकाशालाही वाटतं की झुगारुन द्यावं या काळ्या ढगांना
किती झेलावेत मी यांचे विभ्रम....
मग ते होतं हळूहळू निळंशार
पांढुरके तान्हुले ढग ठेवतं सोबतीला चार
सूर्याची कोवळी किरणं पसरतात
आणि एक अनामिक आनंद दाटून येतो मनात
वाटतं.. वाटतं की या क्षणालाच पंख फुटावेत
आणि तू आणि मी या निळ्या आकाशाला कवेत घ्यावं
मनमुराद लुटावं त्याच्या निळेपणाला
कोवळ्या तेजाला आणि अनामिक प्रसन्नतेला
पण काय करू?
तुझ्या डोळ्यातनं झिरपणारं चांदणं पहायलाही आसुसते मी
तर निळ्याशार अभाळात फिरण्याची माझी हौस
कशी होणार सुफळ संपूर्ण??

अजून वाचा
Aaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ संध्या
1 महिना पूर्वी

पुरे झाला आता नजरांचा खेळ
किती वेळा सोसावी कासावीस कातरवेळ
कधी तरी द्यावं मोल अक्षरांना शब्दांना
कधीतरी वाट द्यावी ओथंबलेल्या पापण्यांना

अजून वाचा
Aaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ संध्या
1 महिना पूर्वी

पावसाने हाक दिली
मनाने प्रतिसाद दिला
भिजूया पावसाच्या सरीत
ओलंचिंब होऊया!
पावसाचे थेंब पडतील अंगावर
कारूण्य सारं पडेल ओघळून धरेवरःः
प्रसन्न मनाने पाऊसगाणं गाऊया
ओलंचिंब होऊया!
पाऊस पडत होता बाहेर
पण तू आत कोरडाच
मी मात्र चिंब भिजले
पाऊसपाऊल उमटलं रस्त्यात!
त्याच पावलावर पाऊल ठेवून
वाटलं यावं पुढे पुढे
जिथे तू होतास आणि
अस्तित्व तुझं मला सापडे
पण थांबलं माझं पाऊल
ओला ठसा उमटवलेलं
मनातल्या तुझ्या रूपाला
मी मनानेच भिजवलं!

अजून वाचा

पाऊस ढगात थांबून राहिला
त्याच्या सोबतीने ढगही भिजला
वाट पहातसे धरा आतुर आतुर
तिला पाहताना मन कातर कातर
वारा आता करील एकच इशारा
थेंबथेंबांनी घमघमेल अत्तराचा गाभारा
वारा- पाऊस- धरेचे असे हळुवार नाते
त्रिकूटाच्या मैफलीला मी दुरून पहाते!

अजून वाचा