रातराणी.... (भाग ७)

  • 13.8k
  • 4k

विनयला सगळं आठवतं होते. दोन महिने झाले ना आज. आपण हॉस्पिटल मधेच आहोत. सगळे येतात चौकशी करायला. हे चौघे येतात अधूनमधून .... अव्या रोज येतो डब्बा घेऊन दुपारचा. दिक्षा, मी सकाळी जागे होण्याआधी रातराणीची फुलं घेऊन येते. अनुजा फार कमी वेळेस येते. हेमंत तर येतोच , दर २ दिवसांनी... सुरुवातीला खूप विचित्र होता ना... पण नंतर चांगला बोलायला लागला. नेहमी कसा राग राग करायचा माझा. तशीच एक भेट आठवली त्याला. त्यादिवशी, विनय ऑफिसच्या आवारात असलेल्या बागेत काही करत होता. चंदन आणि अव्या होता तिथेच. हेमंत आला गेटमधून. विनयला बघितलं त्याने. मुद्दाम हसला त्याला बघून. " हेच होणार होते... सारखा पुढे