१ तास भुताचा - भाग 30 - अंतिम भाग

  • 4.1k
  • 1.5k

भाग 30भयानक ट्रक 4 आंतिम भाग भयानक अशी अमावास्याची काळरात्र झाली होती, आणि अमावास्याची रात्र असल्याने आकाशात चंद्र काळ्या ढगांआड लपून बसला होता, पृथ्वीवर चंद्राची तिरिप पडत नसल्याने, सर्वीकडे मिट्ट, काळोख पसरला होता , समोरच काडिमात्रही दिसुन येत नव्हत, त्यातच अमावास्याच्या ह्या भयान रात्री , राम्या आणि रघ्या त्या चेटक्याच्या जंगलात वाट मिळेल तिकडे काट्या कूट्यातुन धावत सुटलेले , झाडावर बसलेल्या त्या घुबडाला ह्या वेळेस सुद्धा पुढे काय घडेल ह्याची उत्कंठा लागुन राहीली होती, आपल्या भेदक नजरेने ते घुबड राम्या आणि रघ्या कडे पाहत होते, रघ्या आणि राम्या दोघेही एका झुडुपाचा आधार घेत लपून बसले होते, 20- 25 मिनीट धावल्याने