मला स्पेस हवी पर्व २ भाग ६मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाकडे जाण्याचं निश्चित करतो. या भागात बघू काय होईल?सकाळी उठल्यावर रमणला काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्यांची तहानभूक नेहाने हिराऊन घेतली होती. त्यांच्या दोन मनामध्ये वाद सुरू झाला.त्याला दुसरं मन म्हणायला लागलं.“घे भोग आपल्या कर्माची फळं.”“.मी काय केलं? कोण बोलतय?”“मी तुझं दुसरं मन. का मला ओळखलं नाही?”“कसं वाटतंय आता तुझ्या प्रेमाला नेहा प्रतिसाद देत नाही तर?”“वाईट वाटतंय.”“ज्या बायकांच्या प्रेमाला तू झिडकारले त्यांनाही असच वाईट वाटलं असेल नं?”“मी काय करू शकतो त्याला?”“अच्छा म्हणजे तू दुसऱ्यांचं मन मोडलस त्यात तुझा दोष नाही आणि नेहाने तुझं मन मोडलं तर तुला राग