Hey, I am on Matrubharti!


Ashish तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 महिना पूर्वी

।। जवान ।।

आई-बापाच्या कुशीत सुख उपभोगण्यापेक्षा...!
सुखाचा त्याग करून वाघासारखं जगायला शिक।।

मित्रांत मैत्री जपत बसण्यापेक्षा...!
मृत्यूशी मैत्री करणारा बाजीगर होऊन बग।।

आपापसात भांडत बसण्यापेक्षा...!
देशासाठी दुष्मणाचा जीव घेऊन महायोद्धा होऊन बग।।

ठेच लागता औषधोपचारात करण्यापेक्षा...!
अभिमानाने रक्त सांडणारा वीरपुत्र होऊन बग।।

जन्मलो फक्त जीवन जगण्यासाठी...!
मृत्युंशी झुंजनारा असा एक वीर जवान होऊन बग।।

-आशिष लबाजे

अजून वाचा