बिनशर्त प्रेम…१ Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

बिनशर्त प्रेम…१

बिनशर्त प्रेम…१

"फायनली.. तू हो म्हणलीस आभा! आता अजुन फक्त काही दिवस.. मग आपल लग्न..." ....उत्साहात आलोक बोलला

"येस आलोक.. आधी मी वेळ हेत्ला मग तू... तुला बरेच दिवस विचारायचं होत,आपली जेव्हा मैत्री झालेली तेव्हा तर तुला कोणताही बंधन नको होत ना? अस तूच म्हणला होतास....मला ते चांगल आठवतंय!!! तुझ मतपरिवर्तन कस काय झाल?” हसू आवरत आभा बोलली....

“हो अग..मला कोणत्याही बंधनात अडकायला आवडतच न्हवत… मुक्त हिंडायचं.. मुक्त वागायचं.. कधीच कोणताही अडकायचं नाही हे मी मनाशी पक्का ठरवलेलं.. नाती खरी नसतातच. दिखाऊपणा नुसता. अस वाटायचं म्हणजे मला. पण तू भेटलीस आणि आयुष्याकडे पाहायचा माझा दृष्टीकोनच बदलला... तू काय जादू केलीस मला नाही माहित! तुला भेटलो आणि परत परत तुला भेटायची ओढच लागली मला… तुला अधिकाधिक जाणून घ्यावस वाटायला लागल...तुझ्या सतत बरोबर रहावस वाटायला लागल… तुला भेटल्यावर मी आधीचा आलोक राहिलोच नाही! शेवटी एक दिवस माझ तुझ्यावर प्रेम आहे हे जाणवल. म्हणजे आधी मी प्रेम करेन ह्यावर माझा विश्वासच न्हवता.... पण माझी खात्री पटली मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय! मला तू माझ्या आयुष्यात हवी होतीस...त्यासाठी मी बरेच प्रयत्नही केले आणि शेवटी मला यश आलच!”

“यु मिन, तुला अस वाटत होत कि तू कधीच कोणावर प्रेम करणार नाहीस? आणि इनडायरेक्टली मी तुझ मतपरिवर्तन केल? ऐकायला मस्त वाटत. पण यु मिन मी भारी आहे इतकी? ओह माय गॉड! मी इतकी कोणी भारी नाहीये रे...तुझा भ्रमनिरास होईल नंतर..मी साधी सरळ वागणारी एक सामान्य मुलगी आहे!”

“हो तू भारी आहेसच!! कोणासाठी असशील का मला नाही माहित पण माझ्यासाठी तू भारीच आहेस! आणि डोंट वरी..तू आहेस तशीच मला आवडतेस...स्वत:ला बदलायचा प्रयत्नही करू नकोस!!”

“थॅंक्स आलोक... आणि लग्नाच म्हणशील तर मी एक सांगते! हे माझे विचार आहेत....तुला पटतायत ना बघ! आपण लग्न सगळे विधी वगैरे नी करू पण लग्न साधेपणानी करायच.... साधेपणानी म्हणजे फक्त खूप जवळचे लोक असतील आपल्या लग्नात !.. तुला चालेल ना? 1 दिवसासाठी किती पैसे उधळायचे? बरोबर नाही वाटत ..ज्यांची पोट भरलेली आहेत त्यांनाच देऊन काय उपयोग… आपण गरजू लोकांना किंवा एखाद्या संस्थेला देऊ ते पैसे...पटताय ना?" आभा बोलली..बोलतांना तिचे डोळे चमकत होते..

"100% पटतय मला.... तू फक्त स्वत:पुरता विचार करत नाहीस... म्हणूनच मला तू इतकी आवडतेस आभा!! मला पटलय पण आपल्या आई बाबांना कोण पटवून देणार हे? ते म्हणतील मदत करूच पण लग्न धुमधडक्यात झाल पाहिजे....आपण दोघही एकुलते एक...आपल्या आई बाबांची काही स्वप्न असतीलच की? "

"डोण्ट वरी! तू तुझ बोल...तुला पटतंय ना? तुझ्या आई बाबांशी मी आधीच बोललीये...दोघांचे विचार बुरसटलेले नाहीयेत... त्यांनाही माझी मत पटली आहेत....पण तुझ्याकडे एक काम आहे, तुला माझ्या आई बाबांना पटवाव लागणारे...आई लगेच तयार होईल पण बाबांना जरा पटवून द्याव लागेल... आय नो,तुला ते जमेलच आणि जावयाचा शब्द खाली पडून देणार नाहीत बाबा...जावयाच फार कौतुक आहे त्यांना... जावई मुलीपेक्षा प्रिय झालाय त्यांना... हाहा!"

"ओ माय गॉड....तू माझ्या आई बाबांशी कधी बोललीस? आणि आई च्या बोलण्यातून काहीच कस नाही आल? आय टोल्ड यु,तसा मला काही प्रोब्लेम नाही...मला तुझ्याशी लग्न करण इम्पॉर्टन्ट आहे! बाकी कस लग्न ह्यानी मला फार फरक नाही पडणार!"

"तुला माझे विचार पटले... ग्रेट!! आणि अरे, आई म्हणल्या होत्या मला, तुझ्या कानावर घालते सगळ पण मीच म्हणाले तुम्ही काही बोलू नका,मी बोलेन आलोकशी .... म्हणून त्या तुला काहीच बोलल्या नाहीत.... तू माझ्या आई बाबांचा आवडता जावई आहेस पण यु सी, मीही आवडती सून आहे.... हाहा! आई,बाबा दोघहि माझे विचार मोडून काढणार नाहीत... आणि तू महत्वाच काम विसरू नकोस....तू माझ्या बाबांना पटवायचाय....मी सांगितलेलं त्यांना..पण त्यांना ते मनापासून पटलेलं दिसत न्हवत...त्यांना मी कल्पना दिली होती आधी पण ते खूप हॅपी वाटले न्हवते वाटले माझ्या या निर्णयामुळे...सो नाउ यु हॅंडल हिम..ओके?"

"वा वा..लग्नाआधीच माझ्या आई बाबांना सामील करून घेतलस..... आणि मला एकट पाडलं तुम्ही तिघांनी... हाहा! माझ काय होणारे आपल लग्न झाल्यावर गॉड नोज..आणि तुझ्या आई बाबांना पटवायच मी पाहतो...डोण्ट वरी! पटवून देईन मी तुझ्या बाबांना.....ते खूपच सोप्पा आहे! तुला पटावल ते जास्ती अवघड होत... मला जाणवलं तू माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहेस पण तेव्हा तू तुझा विचार बदलला होतास. तुझा होकार यायला किती दिवस वाट पहिली होती मी.......हो म्हणायला किती दिवस काढलेस...."

“हसतोयस काय रे आलोक... लग्न म्हणजे काय गम्मत आहे का? तू कसा आहेस, तुझा स्वभाव कसा आहे कळायला नको का? उगाच मनात आल आणि लग्न केल इतक सोप्पा असत का? मी आधीच एकदा चुकीच्या माणसावर विश्वास ठेऊन दुखावले गेले होते..मग परत तीच चूक कशी करेन?” थोड हिरमुसून आभा म्हणाली..

“सॉरी सॉरी ...गम्मत करत होतो...मी तुला दुखावलं नाही ना? मी तुला बरेच दिवस ओळखतोय..पण तू कश्यानी दुखावली जाशील त्याचा पत्ताच लागत नाही! ओह येस, मला आठवतंय तू सांगितलं होतास मला, मी तुला भेटायच्या आधी तुझा एक खूप खास मित्र होता...त्यानी तुला खूप दुखावलं होत! तू बऱ्याच वेळा प्रयत्न केला होतास मला सांगायचा पण मी काही ऐकून घेत न्हवतो!! खरच सांगतो, मला तुझ्या भूतकाळामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये... मी आज मध्ये जगतो.. आज तू माझ्याबरोबर आहेस... ते महत्वाच! तुझ्या भूतकाळाने मला फरक पडणार नाही! आणि तुझ्या भूतकाळाने माझ्या प्रेमामध्ये काही कमी येणार नाहीये... तू फुलासारखी गोड आहेस...तुला दुखवायचा माझा हेतू न्हवता! आणि पुढे तुला कधी दुखावणार सुद्धा नाही..”

"आलोक,आज तूच विषय काढलास म्हणून गुड...तू ऐकशील का मला सांगायचं ते? प्लीज ऐक....खरच सांगायच सगळ....पण आधी तू बोलूनच दिल नाहीस...आता आपण नवीन नात्याच्या उंबरठ्यावर आहोत.. आणि मला माझा भूतकाळ सांगण गरजेच वाटत... चुकून माझा भूतकाळ माझ्यासमोर उभा ठेपला तर मला तुझ्या आधाराची गरज असेल.... तेव्हा तुझा आधार मिळाला नाही तर मात्र मी कोलमडून पडेन! आणि मी आज बोलले नाही तर आयुष्यभर मला त्रास होत राहील... तुला माझ्या भूतकाळाशी काहीही करायचं नसल तरी मला त्या बंधनातून मुक्त व्हायच आहे.. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार!! मनात कोणतीही सल ठेऊन मला नवीन आयुष्य चालू करायचं नाहीये. आणि यु नो, बोलले की मी पण मोकळ फील करेन.... नाहीतर आयुष्यभर मनात खदखदत राहील माझ्या... आपल्या सुंदर नात्यात भविष्यामध्ये दुरावा यायला नको... म्हणूनच खर सगळ सांगून आपल्या नात्याची चांगली सुरवात करायचीये मला..."आभा एकदम सेंटी झाली...

"सेंटी होऊ नकोस आभा..प्लीज! आणि मी नाही म्हणलो तरी तू आज बोलणारच मला माहिती आहे! तुला सांगायचच आहे सो तू बोल,मी ऐकतोय....पण विश्वास आहे न तुझा माझ्यावर?” आलोक म्हणाला....

“तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तर इतक मोकळेपणानी बोलते. नाहीतर बोलले असते का इतक मोकळ होऊन?"

"हो हो.. आय नो!!"

"ओके ऐक, मधेच बोलू नकोस! मला आधी बोलू दे.."

"हो हो आभा!" आलोक बोलला,

"माझा एक खूप खास मित्र होता नील.... खूप म्हणजे खूप खास!! तो आधी एकदम बुजरा होता.… पण आम्ही बोलायला लागलो आणि तो हळू हळू मोकळा व्हायला लागला... त्याला गरज असली कि मी मदत करायचे आणि मला गरज असली कि तो! आम्ही मनानी कधी जवळ आलो आम्हालाही कळल न्हवत...तुला कधीच एकट सोडणार नाही हे जोरात सांगायचा...एकदा मी माझा आणि माझ्या मामे भावाचा फोटो त्याला दाखवला होता तेव्हा तर तो इतका चिडला होता..मी दुसऱ्या मुलाबरोबर उभी हे त्याला पहावल सुद्धा न्हवत...तेव्हा त्यानी काही दिवस बोलण बंद केलेलं....काही दिवसानंतर तो एक दिवस मला म्हणला,माझ तुझ्यावर प्रेम आहे! तेव्हा माझ्या मनातही तस काही न्हवत.... तो माझा फक्त खूप चांगला आणि जवळचा मित्र होता! बाकी काही विचार मी केला न्हवता! पण मग नंतर मलाही वाटायला लागल कि माझ त्याच्यावर प्रेम आहे.... ते प्रेम होत का मला माहित नाही पण मला ते प्रेम वाटल होत हे निश्चित!! मी त्याच्यात गुंतायला लागले. आणि शेवटी इतकी गुंतले... त्याने मला अधिकाधिक अडकवून घेतलं...पण एक दिवस तो एकदमच बदलला... त्यानी बोलण हळू हळू कमी केल... फोन ला,मेल ला उत्तर द्यायचा नाही...मला सरळ सरळ इग्नोर करत होता तो! तेव्हा मला खूप त्रास झाला होता.. आधी बुजरा असणारा तो एकदम बोल्ड झाला.. आणि तेव्हा त्याला माझी गरज न्हवती.... त्याला खूप नवीन मैत्रिणी मिळाल्या...त्याला गरज होती तेव्हा सारखा बोलायचा...पण नंतर माझी गरज संपली आणि तो निघून गेला..... त्याच्या नवीन मैत्रिणींपैकी त्यानी कोणीतरी वेगळी मुलगी शोधली आणि आता त्यानी तिच्याशी लग्न सुद्धा केल आहे.. त्यानी मला त्याच्या आयुष्यातून सहजरीत्या बाहेर काढल... पण मला त्याला माझ्या आयुष्यातून त्याला काढण इतक सोप्पा न्हवत... त्याक्षणी मला वाटलेलं,प्रेम बिम सगळ झूठ! त्यानी नाटक केल होत का मला वापरून घेतलं माहित नाही! पण मी दुखावले गेले... हळू हळू आमचा संवाद पूर्ण बंद झाला.... तेव्हा मी अक्षरशः कोलमडून पडले होते.. सगळ अनपेक्षित होत... पण तेव्हा तू आलास माझ्या आयुष्यात.... आणि मी हळू हळू नॉर्मल ह्यायला लागले.... एक सांग, तू असा सोडून जाणार नाहीस ना मला?” आभा चे डोळे पाणावलेले आणि आभा बोलली...

“तुझ बोलून झाल? तुला रडायचं असेल तर रडून घे आभा... पाहिलं आणि शेवटच रडून घे! नंतर मी तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही सहन करू शकणार नाही! आणि आता माझ ऐक..शांतपणे! तो तुझ्या आयुष्यात आलेला आणि आत्ता तो नाहीये! आत्ता तो नाहीये म्हणजे नाहीये! आत्ता मी आहे.. मी आलोक! भूतकाळाला काही अर्थ असतो का? जे गेल ते गेल.. गेलेल्या गोष्टीत किती अडकणार? तो आयुष्यात होता त्याला काही अर्थ असतो का? काहीच नाही! आता आपण आपल नवीन आयुष्य चालू करणार आहोत! तेव्हा आता परत तुझ्या त्या मित्राचा विचारही करू नकोस... ह्यानंतर तुझ्या डोळ्यात परत अश्रू आलेलं मला खपणार नाहीत! यु नो,आय मिन इट...आणि मी तुला कधीच सोडून जाणार नाही. चुकूनही असा विचार करू नकोस.. माझ वचन आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही!! तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुझ्याशी मोकळेपणानी बोललो आहेच....आपण लग्न करणार म्हणजे मी सांगेन तसच वागाल पाहिजे असा हट्ट मी कधीही करणार नाही.. तुला जस योग्य वाटेल तस वागायला तू मोकळी आहेस! फक्त नात्यात मोकळेपणा महत्वाचा आहे.... काय वाटेल ते एकमेकांसमोर बसून बोलल पाहिजे...नात्यातला मोकळेपणा हरवू द्यायचा नाही.... नात्यातला मोकळेपणा गेला कि नाती कोलमडून पडतात... जे वाटेल ते मोकळेपणानी बोलण गरजेच असत...त्यानी नाती टवटवीत राहतात.... तू तुझा भूतकाळ सांगितलास बर केलस....आता बंद करून टाक तो विषय!! ओके?? आज बोललीस बर झाल..तुझ्यामनावरच ओझ गेल असेल! आता फिलिंग बेटर?”

“येस... आय अॅम फिलिंग बेटर!! थॅंक्स आलोक... खरच तू एकदम वेगळा आहेस!! माझ बोलण ऐकून घेतलस आणि मला समजून घेतलस! म्हणजे यु अग्री, सगळ्यांनाच भूतकाळ असतो! आणि तू माझ्यावर विश्वास दाखवलास!”

“वेगळा? ओह हो! वेगळा म्हणजे चांगला अर्थानी कि वाईट अर्थानी? हाहा! ए,तुला आठवतंय का आपण कसे भेटलेलो?” आभा खूप सेंटी झाली होती आणि आलोक ला तिचा मूड बदलायचा होता! आभा चा मूड बदलायला आलोक बोलला!

“हाहा..तुला काय वाटतंय?” डोळे मोठे करत आभा बोलली.. “ओबवियसली चांगल्या अर्थानी!!! येस येस...आठवतंय ना आपण कसे भेटलो! ते कस विसरेन रे? मला एका पक्ष्याबद्दल माहिती हवी होती आणि माझ्या मित्राकडून तुझा इमेल मिळालेला... तुझे पक्ष्यांचे फोटो पाहिले फेसबुक वर.. पण तुझा फोटो कुठेच न्हवता... तुझे पक्ष्यांचे फोटो इतके सुंदर होते...मी त्या फोटोंच्या प्रेमातच पडले होते! नोट द पोइंट.. तुझ्या फोटोच्या प्रेमात होते.. तेव्हा मला वाटलेलं... तू खूप अनुभवी आणि मोठा म्हणजे ४०+ वर्षाचा टकलू कोणीतरी असशील! तुझ्याशी बोलायची सुद्धा हिम्मत होत न्हवती.. पण तेव्हा पक्ष्याच नाव मिळण महत्वाच होत... मी घाबरत घाबरतच तुला मेल केलेलं...तू लगेच उत्तरही दिलास आणि तू पक्ष्याच नाव सांगितलस... तेव्हा बाकी काही बोलण मी टाळलेल... पण एक दिवस मी करेज गोळा करून विचारलेल... तुझ वय काय? मोठा आणि अनुभवी आहेस ना? आणि गम्मत म्हणजे तू हि तेव्हा मी ४२ वर्षाचा आहे हे सांगून मोकळा झालेलास... हाहा! आपण भेटायचा योग लवकरच जुळून आला...आणि मी तुला पाहिलं त्याक्षणी तू मला आवडला होतास...राजबिंडा तरुण होतास तू!! ”

“हाहा..मिश्कील वागायला मजा येते...किती टेन्शन घेत जगायचं!! थोडी चेष्टा हवीच... आणि तुझा पण फोटो न्हवताच कि ग...पण तुझ्या बोलण्यावरून तूझा चेहरा आलेला माझ्यासमोर!!! तुला भेटलो तेव्हा मला वाटेलल अगदी तशीच होतीस....नाजूक,गोड! तुझे सुंदर आकर्षक डोळे...मी पण तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू मला आवडली होतीस..पण मी लगेच मनातल बोलत नाही..जेव्हा एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसतो तेव्हा मात्र मी त्या व्यक्तीपासून काहीही लपवत नाही.....माझा तुझ्यावर विश्वास बसला आणि मी मोकळेपणानी बोलायला लागलो... आणि तुला मी आवडलो होतो तरी लगेच हो कुठे म्हणालीस? मी मला जेव्हा जाणवलं माझ तुझ्यावर प्रेम आहे तेव्हाच मी स्पष्टपणे तुला सांगितलं माझ तुझ्यावर प्रेम आहे पण तू किती वेळ लावलेला हो म्हणायला!”

“गुड टू नो,यु ट्रस्ट मी!! आय अग्री...लगेच विश्वास ठेऊन नंतर पश्चाताप करून त्रासच होतो... आधी एक चूक करून फसलेले... मग परत तीच चूक करेन का? पण हे मला आधी का नाही कळल गॉड नोज...मी लोकांबरोबर वाहवत जायचे... आता मला माझी चूक कळलीये आणि ती चूक मी पुन्हा करणार नाही हे नक्की! जे झाल ते एका अर्थानी चांगलच झाल... होत ते चांगल्यासाठीच! आपण भेटलो लकीली आणि आज मला माझा परफेक्ट जोडीदार मिळालाय.....”

“आभा तू कधी कधी इतकी समजूतदार कशी होतेस ग? हेहे! आणि हो हो! आपण भेटणार होतो म्हणूनच भेटलो!” हसत आलोक म्हणाला....

“हाहा..लगेच फ्लर्ट करायला लागा तुम्ही...” हसू आवरत आभा म्हणाली...

“हाहा… तुला पाहिलं कि फ्लर्ट करावास वाटत त्याला काय करू?”

“पुरे आता.. रात्र झाली.. मी जाते घरी! रविवार संपला! आता उद्यापासून परत बिझी वीक... माझ्या आई बाबांशी लवकर बोलून त्यांना पटवून दे..मग लवकरच लग्न करू!!” स्मित हास्य करत आभा बोलली..

“जातेस? थांब कि थोड्या वेळ… जरा अजून गप्पा मारू! पुढच प्लानिंग करू...” आलोक एकदम नॉटी मूड मध्ये गेलेला...

“हो? थांबू? मग उद्या ऑफीस ला कोण जाणार? नाऊ हॅव टू गो..ओके?”

“ओके...तू थांबत नाहीस...तुझ्या आठवणीतच रात्र काढतो मग.. भेटू लवकरच… गुड नाईट!”

“गुड… गुड नाईट… भेटू लवकरच..”

अनुजा कुलकर्णी.

रेट करा आणि टिप्पणी द्या

Rajan Bhagat

Rajan Bhagat 1 वर्ष पूर्वी

Nitin Pawar

Nitin Pawar 1 वर्ष पूर्वी

Arati

Arati 1 वर्ष पूर्वी

स्वाती जगताप

स्वाती जगताप 2 वर्ष पूर्वी

माधुरी

माधुरी 2 वर्ष पूर्वी