बिनशर्त प्रेम..- २
आलोक बोलायला एकदम हुशार… त्यांनी आभा च्या आई बाबांना आभा चे विचार पटवून दिले… लग्न साधेपणानी करण्याच नक्की झाल... दिवस ठरला... आणि लग्न झाल अगदी आभा ला हव तस साधेपणानी! लग्नात मोजकीच लोकं होती. उगाच पैश्याची उधळण झाली न्हवती. ठरल्याप्रमाणे दोघांनी लग्नातून वाचलेले पैसे दोघांनी सत्कारणी लावले. आभा आलोक बरोबर एकदम खूप होती. एकमेकांची मन जपत दोघांचा सुखी संसार चालू झाला.. एकमेकांना समजून घेत दोघ आनंदात राहत होते.
“आभा, आज रविवार! आज मी बनवतो जेवण… तू घे एक दिवस विश्रांती!” एका रविवारी आलोक उत्साहानी आभाला म्हणाला..
“माय गॉड आलोक.. आज तू जेवण करणार? आणि मी कशाला दमेन? सगळ्या कामाला माणस आहेत.. मी काहीच करत नाही... रविवारी काहीतरी बनवल कि मला पण चेंज होतो एक दिवस… मला पण आवडत तुझ्यासाठी काही केल की. आणि तू आवडीनी खातोस तेव्हा मला खूप मस्त वाटत. मला तशी स्वयपाक करायची फार आवड नाही. म्हणजे मी रोज रोज नाही करू शकत सकाळी सकाळी उठून स्वयंपाक.”
“आय नो रिया!! तुला कधी कोण म्हणताय तू स्वयपाक कर? आणि आलंय मला आज मस्त मूड... मस्त स्वयपाक करतो आणि तुला खायला घालतो... आज मी जेवण करणार! मी विचारात नाहीये सो नसती चर्चा नको. आणि तू वाद करू नकोस! तू बोल काय बनवू?”
“हाहा.… नाही घालत वाद. आज मी पण मस्त आराम करते जो नेहमीच करत असते. काहीच नवीन नाही. मी मस्त रेसिपी वाचली होती काल तिच आज ट्राय करणार होते पण आज शेफ आलोक स्वयपाक करणार आहेत. वाह.. तुला काय काय येत सांग! मग मी त्यातून सेलेक्ट करून सांगेन ह... गम्मत करतीये!! तसही मला सगळच आवडत...तू काहीही बनव! बघू नवऱ्याच्या हातच जेवण कस लागत! हाहा! तुला काही मदत करू?”
“नको नको...मी करतो सगळ! तुला माहित नाहीये.. मी सुंदर जेवण बनवतो! म्हणजे ह्या आधी कधी वेळ नाही आली मी स्वयपाक करायची. मी लाहनपणी सुद्धा आईला मदत करायचो.. मी खर तर शेफ व्हायला हव होत.. हो की नाही? हाहा.... आणि आज तुला आवडत ते मराठी पद्धतीच जेवण करतो.. ओके? आता तू जा रूम मध्ये… आराम कर.. जेवण बनवून झाल कि बोलावतो!”
“ओके..मस्त! आणि थॅंक्यू!! तू वेगवेगळ्या पद्धतीनी मला खुश करत असतोस...” आलोक च इतक प्रेम पाहून आभा खूप खुश झाली... आलोक चा हळुवारपणा आणि समजूतदारपणा प्रत्येकक्षणी आभा अनुभवत होती! आलोक तिच्या आयुष्यात आल्यानी तीच जीवन बदलून गेलेलं... ती तिचा भूतकाळ सहजपणे विसरून गेली होती! आलोक नी मस्त स्वयपाक केला आणि आभा ला जेवायला बोलावलं. त्यानी टेबल मस्त सजवलं होत. आणि ते पाहून आभा हरखूनच गेली. तिने आलोक नी केलेल्या पदार्थांवर नजर फिरवली आणि आभा एकदम खूप खुश झाली. ती टेबल वर बसली. आणि दोघ जेवायला लागले. प्रत्येक घास खातांना आलोकचा हळुवार स्पर्श तिच्या मनाला होत होता. मस्त गप्पा गोष्टी करत दोघांनी जेवण केल. आलोक चा प्लान एकदम मस्त पार पडला. आभा त्याच्या आयुष्यात किती महत्वाची आहे हेच अलोक सतत दाखवायचा आणि आभा सुद्धा खुश होत होती. आलोक साठी नाती खूप महत्वाची होती. आणि रविवार मस्त पार पडला... एकमेकांबरोबर दोघांच आयुष्य आनंदात जात होत..आलोक आभा च्या आयुष्यात आनंद भरत होता.
अनुजा कुलकर्णी.