बिनशर्त प्रेम..३
आभा च्या आयुष्यातून आणि आठवणीतूनही नील पुसला गेलेला..पण अनपेक्षितपणे एक दिवस तो तिच्या समोर आला.… दोघांची नजरा नजर झाली... ज्याला तिनी बऱ्याच प्रयत्नांनी तिच्या आयुष्यातून बाहेर काढलेलं तो परत एकदा समोर आलेला पाहून आभा अस्वस्थ झाली.. तेव्हा काय पद्धतीनी वागायचं हे आभा ला कळत नव्हत. पण मनावर सय्यम ठेवत ती नील ला ओळखही न दाखवता तिथून निघून गेली...
त्याच रात्री तिला नील च मेल आल.... “हाय आभा..तू मला विसरलीस का? आज आपली भेटलेलो पण तू काही न बोलताच निघून का गेलीस? मला तुझ्याशी महत्वाच बोलायचं आहे.. तुला कधी वेळ आहे?”
आभा नी नील च मेल पाहिलं.. कैक वर्षांनी नील च मेल पाहून आभा ला भरून आल. तिला जुने दिवस आठवले. दोघांनी एकमेकांबरोबर घालवलेल्या वेळेची क्षणचित्रे आली. पण आता तिचा निर्णय पक्का होता. तिला परत एकदा नील मध्ये अडकायचं न्हवत...म्हणून त्याला उत्तर देण तिनी टाळल... पण ती नील च मेल डिलीट करू शकली न्हवती! किती तरी दिवस नील रोज आभा ला मेल पाठवत राहिला... पण त्याला काहीच उत्तर मिळत न्हवत.... नील नी परत आभा ला पत्र लिहील,
“आभा, का टाळती आहेस मला? तुझा फोन नंबर पण बदललास.. प्लीज मेल ला उत्तर दे.. आय नीड यु!”
आधी फार महत्वाच नसेल म्हणून आभा सोडून दिलेलं पण त्या दिवशीच नीलच मेल वाचून आभा ला चिंता वाटायला लागली... काही झाल तरी काही वर्षांपूर्वी आभा नील च्या आकंठ प्रेमात बुडली होती. त्यामुळे आभा नील ला उत्तर देणार हे अगदी नक्की होत. पण त्या आधी तिला आलोकशी सगळ बोलावस वाटल. आभा आलोक शी नेहमीच मोकळेपणानी बोलायची तशीच त्यादिवशीही बोलली.....
“आलोक, मी तुला सांगितलेलं ना...काही दिवसांपूर्वी नील दिसला होता.... त्यानी बोलायचय प्रयत्न केलेला पण मी अनोळखी असल्यासारखं काही न बोलता तिथून निघून गेलेले.... आता नील सारखी मेल्स लिहितोय... आज त्यानी लिहीलय आय नीड यु! त्याला मला भेटायचं... मी काय करु? आता मला माझ्या आयुष्यात तो नकोय... खरच! तू बोलतोस का त्याच्याशी फोनवर? आणि त्याला सांग,आता प्लीज त्रास देऊ नकोस”
“ओह.. तुझा भूतकाळ परत तुझ्यासमोर आला... काय म्हणतोय नील? त्याला का भेटायचय? काही सांगितलं असेल ना?” शांत राहत आलोक बोलला..
“त्याला भेटायचं मला....काहीतरी महत्वाच बोलायचं म्हणत होता... पण मला आता खरच त्याला भेटण्यात काही इंटरेस्ट नाहीये... तो न सांगता निघून गेलेला तेव्हा माझी अवस्था काय झाली होती त्याचा कुठे विचार केलेला त्यानी?”
“अस नसत ग आभा... मित्रांना अस विसरता येत नाही.. त्याला तुझी गरज आहे मग तू त्याला मदत केली पाहिजेस... गरज असतांना कोणालाही एकट सोडायचं नाही.. कधीतरी त्यानीही तुला मदत केली असेलच ना?”
“आलोक, तूच तर म्हणाला होतास, आता त्याचा विचारही करू नकोस. आणि आता तू म्हणतोयस भेट?” आश्चर्यचकित होऊन आभा म्हणाली.. तिला वाटत होत, आलोक सांगेल भेटण सोड त्याच्या मेल ला उत्तरही देऊ नको.. मी काय ते पाहतो पण आलोक तस काहीही बोलला नाही… आलोक चा वेगळाच पैलू तिला दिसत होता..
“आभा, तेव्हा त्यानी तुला दुखावलं होत म्हणून मी म्हणलेलो परत त्याचा विचार करून दु:खी होऊ नकोस...पण आता जेव्हा त्याला तुझी गरज आहे तेव्हा तू त्याला मदत केली पाहिजेस.. त्यानीही कधीतरी तुला मदत केली होतीच की.... मग आता फक्त स्वत:पुरता विचार का करायचा...? काही असेल पण तो तुज्या आयुष्याचा भाग तर होताच. ठीके, तो आता भूतकाळ आहे पण तरी.. मी असतो तर मी सुद्धा मदत केलीच असती. आपण मदत नाही केली तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक राहील..बघ, पटतंय न..”
“बरोबर आहे तुझ म्हणण… त्याला माझी गरज आहे म्हणूनच तो परत बोलायला लागला... कामाशिवाय तो बोलणारच नाही! पण कोणाची मदत केली तर आनंदच मिळतो... मी आत्ताच त्याला उत्तर देते आणि भेटायचं ठरवते.. तू खरच खूप वेगळा आहेस! फक्त स्वतःचा विचार कधीच करत नाहीस! कोणाला गरज लागली तर तू मदत करतोसच!!! आणि तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थॅंक्स आलोक...”
" थॅंक्स? त्याची गरज आहे आपल्या नात्यात?" आलोक बोलत होता पण त्यानी भुवया उंचावल्या आणि थोड विचार केला, "नो नो.. मी माझे विचार बदलले ग आभा!! नाऊ.. आय हॅव्ह अ रूल. तू एकदा थॅंक्स म्हणलीस की मला एक भारी पदार्थ करून खायला घालायचास… भरपूर थॅंक्स म्हण मग बघ तुला कस कामाला लावतो. ठीके ना?" इतक बोलला आणि आलोक हसायला लागला.
आभाला सुद्धा हसू आल आणि ती मनापासून हसली. आणि आभा नी नील ला उत्तर दिल आणि भेटायचं ठरवलं.. तो काय बोलणार आहे त्याची कल्पनाही न्हवती आभा ला… नील काय बोलेल अश्या विचारात गढून गेली आणि तिला झोप लागली
अनुजा कुलकर्णी.