बिनशर्त प्रेम..४ शेवटचा भाग Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

बिनशर्त प्रेम..४ शेवटचा भाग

बिनशर्त प्रेम..४

शेवटचा भाग

“आलोक, आज भेटतोय आम्ही! नील ला इतके दिवसांनी भेटून मला काय वाटेल माहित नाही... माझ्याबरोबर तू येतोस माझ्याबरोबर नील ला भेटायला?”

“आधी तू भेट.. माझी गरज लागली तर मी हि नक्की मदत करेन त्याला..”

“आलोक, माझा भावनांवर कंट्रोल राहिला नाही आणि मी त्याच्यात परत गुंतायला लागले तर? तुला भीती नाही वाटत?”

“नो नो... मी अनसेक्युअर्ड कधीच फील करत नाही... आणि यु नो,मी कोणतीही नाती लादत नाही... अगदी कोणावरही! मुख्य म्हणजे,माझा तुझ्यावर विश्वास आहे... तू जे करशील ते योग्य करशील..माझा विश्वास आहे”

“आधी कधीही न पाहिलेला आलोक पहातीये आज मी… आज तू मला वेगळाच वाटतो आहेस... खूप जास्त समजूतदार आणि आधीपेक्षा अधिक जवळचा.... चल मी जाऊन भेटून येते नील ला... मी परत आले कि बोलूच आणि काहीतरी मस्त प्लॅन करू संध्याकाळचा...”

“ओके... नील ला माझी मदत हवी असेल तर सांग! ठीके?”

“येस....” इतक बोलून आभा घरातून निघाली! नील ला भेटायचं तिला दडपण आलेल.. पण ते तिनी चेहऱ्यावर दाखवल नाही.. आभा आणि नील भेटले!

“आभा.. हाय! थॅंक्स आलीस भेटायला!”

“हाय.. मी येणार न्हवते पण आलोक माझा नवरा म्हणाला जाऊन भेट म्हणून आले भेटायला! इतके वर्षांनी आठवण कशी आली? काही प्रोब्लेम आहे का? मला माहितीये काही प्रॉब्लेम आल्याशिवाय तुला माझी आठवण येणारच नाही. तुला चांगलच ओळखते मी.” आभा च्या बोलण्यातून नील ला कोरडेपणा जाणवला..

“ओह..तू लग्न केलस.. गुड! आणि इतकी कोरडी का झालीस ग? आधी सारखी मनमोकळी बोलत नाहीयेस...”

“तू राहिलास का आधीसारखा? नाही ना मग माझ्याकडून का अपेक्षा करतोस? ते जाऊ देत… काय काम आहे बोल.. काय सांगायचं? काय मोठा प्रश्न उभा राहिलंय तुझ्यासमोर की तुला माझी आठवण परत आली.” आभा जास्ती खोलात न जाता मुद्द्याच बोलायला लागली..”

“सॉरी.. सारख टोचून नको बोलूस ग.. तुला माहिती आहे ना माझ लग्न झालेलं... त्या मुलीनी मला वापरून झाल्यावर सोडून दिल.. आमचा डीवोर्स झाला.. डिवोर्स नंतर मला पुरत कंगाल केल तिनी. माझाकडून सगळंच गेल. एकाकी झालोय झालोय. आता मी पूर्णपणे एकटा पडलो आहे!! मला कोणाच्या साथीची गरज आहे! मला वाटल न्हवत,ती अशी वागेल! तेव्हा मी तुझ्याशी लग्न केल असत तर सुखी झालो असतो पण तस झाल नाही... मला ती मुलगी भेटल्यावर मी तुझ्याशी नीट वागलो नाही... तरीही निर्लज्यासारखा तुझ्याकडेच मदत मागायला आलो... मला मदत कर ह्या सगळ्यामधून बाहेर यायला... मला खरच खूप त्रास होतोय....”

“ओह.. सॉरी टू हिअर दॅट.. आणि मला आता भूतकाळाबद्दल बोलायचं नाहीये सो त्याबद्दल नको बोलूस... तू सांग काय मदत करू?” नील च्या बोलण्याचा काहीही परिणाम होऊन न देता आभा बोलली

“ओके भूतकाळाबद्दल नाही बोलत पण सांग, तुझ माझ्यावर खूप प्रेम होत ना? आता आपल्यात परत काही होऊ शकेल का? तुझ्याशिवाय मला जगता येत नाहीये...तू आणि मी लग्न करायचं?”

“नील..." आभाच आवाज चढला... ती नेहमीपेक्षा उच्च स्वरात आभा बोलली, "आर यु आउट ऑफ युअर माईन्ड?" आभा तिची लग्नाची अंगठी दाखवत बोलली, "माझ लग्न झाल आहे.. आणि मी आलोक बरोबर खूप आनंदात आहे... आलोक तुझ्यासारखा कधी न्हवताच.... त्यानी नेहमीच माझ मन जपल... मला कधी त्रास होऊन दिला नाही.. त्यानी प्रेम केल कोणत्याही अटींशिवाय... बिनशर्त प्रेम आहे त्याच माझ्यावर... मला वाटलेलं माझ तुझ्यावर प्रेम होत पण ते प्रेम कधीच न्हवत! ते फक्त आकर्षण होत! प्रेम असत तर मला आज सुद्द्धा तुझ्याविषयी काहीतरी वाटल असत!!"

"आर यु शुअर आभा?" नील आभाच बोलण ऐकून निर्लज्जपणे म्हणाला..त्याच बोलण ऐकून आभा वैतागली.

"तुला वाटलाच कस आता मी तुझ्याबरोबर येईन? जेव्हा मला तुझी गरज होती... जेव्हा मी तुझ्यात अडकले होते तेव्हा तू थांबलास का माझ्यासाठी? नाही ना? तेव्हा तू मला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर निघून गेलास... मला तेव्हा तुज्याशी बोलायचं होत पण... तेव्हा तुला माझी गरजही वाटत न्हवती.. मग तू कशाला बोलशील माझ्याशी? अर्थात हे सगळ कळायला मला खूप वेळ लागला. पण आता मी तुला नीट ओळखते. तुझ काम झाल, तुझ्याशी मुली बोलायला लागल्या तेव्हा तू मी केलेली मदत विसरून गेलास आणि आपल्यातली मैत्री सुद्धा तोडलीस. तेव्हा मी खचले होते. त्याच काळात मला आलोक सारखा मित्र मिळाला. आणि टू बी फ्रँक आता मला तुझी गरज वाटत नाहीये...मी तुला भेटणार पण न्हवते. पण आलोक म्हणाला गरज आहे मग भेटून तुला मदत कर. तू स्वार्थी होतास आणि आलोकनी माझ्यावर खर प्रेम केल. त्याला आजही वाटल मी तुझी मदत करावी. त्यानी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला. बाकी काही मदत हवी असेल तर सांग... नाहीतर मी जाते!” खंबीरपणे आभा बोलली.. नील ऐकत होता.. त्याला त्याच्या वागण्याचा पशात्ताप झाल्याच आभाला जाणवलं...

“मला वाटल तुझ माझ्यावर प्रेम आहे... सो मला वाटल आजही तू माझ्याबरोबर येशील! मला वाटल होत मी अडचणीत आहे हे बघून तू माझ्या बरोबर नक्की येशील! पण सॉरी!! मी आधी चुकलो होतो! आणि आत्ताही चुकलोच! मला त्याची जाणीव आहे.. माझ्या चुकीची शिक्षा भोगेन मी! आणि तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी.. बाय...आता परत कधी तुझ्यासमोर येऊन तुला त्रास देणार नाही! आणि मी सुद्धा माझा स्वार्थीपणा बाजूला ठेऊन आयुष्य जगायचं नक्की प्रयत्न करेन.” आपल्या वागण्याबद्दल ओशाळून नील म्हणाला..

“ओके...टेक केअर आणि बाकी काही मदत लागली तर सांग...पण बाकी काही अपेक्षा ठेऊ नकोस!” इतक बोलून आभा तिथून जायला निघाली... आभा नंतर नील शी बोलायला थांबली पण नाही.... आणि घरी आली! आभा मधे खूप सकारात्मक उर्जा आली...ती एकदम मोकळी झाली..

***

“भेटला नील? काय म्हणाला?”

“काही नाही अरे...फार काही महत्वाच न्हवत! बर झाल मी त्याला भेटले... आता एकदम ओपन झाल्यासारखं वाटतंय... थॅंक्यू आलोक... तुझ्यामुळे मी माझ्या सो कॉल्ड पहिल्या प्रेमिला फेस करू शकले! मी तर घाबरते होते.. पुन्हा त्याच्याच्त अडकते का? पण माझ्यावर विश्वास दाखवलास!! बाय द वे, तुला भीती नाही वाटली मी त्याच्यात परत अडकले असते तर? मी तुला सांगितलं होत माझी त्याच्यासाठी असलेली फिलिंग्स किती स्ट्रॉंग होती. तरी?"

"मला माहिती आहे जे होत ते बरोबरच असत. आणि मला माझ्या प्रेमावर खात्री होती. माझी आभा मला सोडून कुठेच जाणार नाही ह्यावर माझा विश्वास होता. मग मी कशाला घाबरू?"

"आलोक, तू कसा रे इतका भारी? तू कधीच कोणतीही अट घातली नाहीस मला... मला माझ्या मनाप्रमाणे जगू दिलस.. तू बिनशर्त प्रेम केलास माझ्यावर!!! थॅंक्स!! आणि लव यु!! संध्याकाळी मस्त हॉटेल मध्ये जाऊन येऊ! तुझ्याशी खूप बोलायचय...”

“ग्रेट आभा.. आयुष्य तुझ आहे आभा. तुला कोणत्या अटी घालणारा मी कोण आहे? आणि ऐक न, आज तू एकदम वेगळीच वाटती आहेस.. अजूनच सुंदर, खूप आकर्षक!! तुझा आत्मविश्वास वाढलाय. लव यु टू!!! संध्याकाळी पक्षी पाहू आणि मग तुझ्या आवडत्या हॉटेल मध्ये जाऊ आणि तुझ आवडत थाई फूड खाऊ...”

“मस्त....” इतक बोलून आभा आलोक कडे एकटक बघत राहिली....आणि तिनी धावत जाऊन अलोक ला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले. आभा परत आलोक च्या प्रेमात आकंठ बुडाली!!!

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

रेट करा आणि टिप्पणी द्या

Anjali Shinde

Anjali Shinde 9 महिना पूर्वी

👌🏻

Smita Mulik

Smita Mulik 10 महिना पूर्वी

Nalini

Nalini 1 वर्ष पूर्वी

Arati

Arati 1 वर्ष पूर्वी

Bapurao Surse

Bapurao Surse 1 वर्ष पूर्वी