ना कळले कधी Season 2 - Part 17 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 17

'किती spicy खातेय त्रास नाही होत तुला?','नाही रे सगळे तुझ्या सारखे नसतात',तिने लगेचच जीभ चावली. हल्ली फार जिभेवरचा कंट्रोल सुटतोय!ती हळूच म्हणाली. सिद्धांत ला राग आला खर तर तिच्या ह्या बोलण्याचा पण त्याने दाखवला नाही. 'sorry मला अस नव्हतं म्हणायचं' ती म्हणाली. नेहमीच तुला अस नसत बोलायच आर्या तुला सांगितलं ना एकदा बोलून गेल्यावर सावरण्याचा प्रयत्न करत जाऊ नको जमत नाही तुला!तो म्हणाला. आर्याने चुपचाप ऐकून घेतल, चुकी आपलीच आहे म्हणा उगाच बोलले त्याला. ती मनातच म्हणाली. दोघांनीही आपल आटपले आणि निघाले. त्याने ice cream parlour गाडी थांबवली चल आर्या खायच ना ice cream? तो म्हणाला. विषय आहे का? ती म्हणाली. 'आर्या' तू कूकिंग केल्याचा फायदा झाला आज'. 'तो कसा मला नाही कळाल'? तिचा प्रतिप्रश्न. मग इतकं सगळं तुझ्या आवडीच जेवायला मिळाल, वरून ice cream. असच रोज करत जा!तो म्हणाला. नको नको आज झाल ते पुरे ह्यानंतर तुझ्या परवानगी शिवाय नाही, आर्या म्हणाली.आणि ते दोघेही हसले.
दोघेही घरी आले आर्याला काही झोप येत नव्हती ती तिच्या लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसली. तिची पुस्तकांची आवड पाहून सिद्धांत ने तिला लग्नानंतर दिलेल पहिल गिफ्ट होत ते आणि त्यात सगळ्या प्रकारची पुस्तके. अरे ही आर्या गेली कुठे अजून कशी नाही आली सिद्धांत तिची वाट पाहत होता. आर्या हॉरर स्टोरी वाचण्यात गुंग झाली होती.खर तर तिलाही आता भिती वाटत होती पण तिला स्टोरी पूर्ण झाल्याशिवाय उठण्याची ईच्छा नव्हती होत, हा सिद्धांत नक्की झोपला असणार इतक्या वेळ कसला जगतो तो घरात कुणी नाही आपली बायको एकटी जागी आहे, अंधार आहे तिला भीती वाटेल हे थोड जागी रहावं एवढही कळत नाही ह्याला! मी पण कुणाकडून अपेक्षा ठेवतीये. जाऊ दे तिने फक्त टेबल लॅम्प चालू ठेवला होता त्यामुळे तिला आणखीन च भीती वाटत होती. इतक्यात सिद्धांत किचन मध्ये पाणी पिण्यासाठी आला आणि त्याच्या हातातून नेमका ग्लास पडला. आर्या त्या आवाजाने एकदम घाबरली. किचन मध्ये कुणी तरी आहे! ती लगेचच त्या आवाजाने किचन मध्ये आली अंधारामुळे तिला काहीही दिसत नव्हतं काय करू लाईटस ऑन करू का? नको चोर असेल तर. तो सावध होईल. ती प्रचंड घाबरली. सिद्धांत ला तिच्या हालचालीनवरूनच कळाल ती घाबरलेली आहे तरीही तो सामोर आलाच नाही. बघू काय करतात मॅडम आता! तो मनातच म्हणाला आणि तिची मजा बघत तिला दिसणार नाही असा उभा राहिला. काय करू तिने सिद्धांत ला आवाज द्यायला सुरुवात केली, तो काही आला नाही अशी कोणती झोप लागली ह्याला काय माहिती इथे परिस्थिती काय आणि हा झोपू कसा शकतो. त्याने परत पावलांचा आवाज केला आता ती मागे हटली कुणी तरी नक्की आहे. सिद्धांतला उठवू का नको मला तर वर जाण्याचीही भीती वाटतेय! सिद्धांत ये ना रे ! ती काळकुतिला येऊन म्हणाली.त्याने मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला ती एकदम दचकली, तिने डोळे मिटून घेतले. "सिद्धांत"ती जोरात ओरडली. ऐ हळू, ओरडायला काय झाल. इथेच आहे मी ! तो म्हणाला. तरीही तिने काही डोळे उघडले च नाही अग आर्या तुझ्या समोर आहे मी त्याला तिच्या कडे पाहून हसणं कंट्रोलच झालं नाही. तिने त्याच्या कडे पाहिलं आणि त्याला घट्ट मिठी मारली "सिद्धांत",ती अजूनही घाबरलेली च होती. आर्या काहीच नाही झाल इतकी का घाबरली! 'तू नको जाऊ इथून कुठेच, आणि मला एकटीला सोडून तर अजिबात नाही'ती म्हणाली. हो मी इथेच आहे, तो तिला दूर करत म्हणाला, तशी तिने मिठी आणखीनच घट्ट केली . नाही जाणार ना तू? ती म्हणाली नाही जाणार आणि काय ग एवढी का घाबरलीस? कुणीच तर नव्हतं मीच होतो. काय! ती दूर होत म्हणाली तूच होतास तू घाबरवत होता मला मुद्दामून! ती म्हणाली. ऐ मी काही घाबरवत नव्हतो हा तू उगाचच घाबरली. मजा वाटली असेल ना मला अस बघून? किती दुष्ट आहेस रे तू! आणि मी मूर्ख च आहे तुला मदतीसाठी बोलवत होते. आणि ती रागाने निघून गेली तिथून. आर्या अग आर्या ऐक तो लगेच तिच्या मागे गेला. चिडली यार ही तर! बर आर्या तुला अंधाराची इतकी भिती वाटते तर मग खाली काय करत होती ग? त्याने विचारल.तुला काय करायच ? अस घाबरवत का कुणी?मी का बोलतीये पण तुला आणि हो तू पण मला अजिबात बोलायचच नाही ह! ती रागाने म्हणाली. आर्या अग चिल इतकी का चिडतीये? तो म्हणाला. हे तू बोलतोय? आर्या म्हणाली. हो तस मला चिडण्यावरून बोलण्याचा अधिकार नाही च आहे पण मग, ते सोड तू खाली काय करत होती ?' मी Dracula वाचत होते'.आर्या तुला झेपत नाही अश्या गोष्टी का करते ग? आपल्याला माहीत आहे की आपण घाबरतो मग रात्री का वाचायच्या अश्या stories. तो म्हणाला. तुला काय करायचं मी काहीही करेल, ती अजूनही रागातच होती.अग मला तेच म्हणायच आहे जर आपल्याला झेपत नाही तर मग इथे येऊन वाचत बसायचं न! तो म्हणाला. हे बघ, एकतर तुझ्यामुळे मला बुक अर्धवट सोडावं लागलं आणि वर तूच मला उपदेशाचे डोस देतोय वा! ती म्हणाली. हे बघ हा आर्या माझी काहीही चूक नाही आहे तू स्वतःच विनाकारण घाबरली आणि उगाच माझ्यावर चिडतेय काहीही झालेलच नव्हतं हा ! त्याला आर्या कडे पाहून अजूनही हसायला येत होत. अरे तू हसतोय काय तुला काही guilt वाटतच नाही आहे का, ती म्हणाली. सॉरी, पण मला अजूनही तुझा चेहरा आठवतोय! आणि परत तो हसला.जाऊदे मी का बोलतीये?तू अशीच मजा घेतो माझी पुढच्या वेळेस पासून मी अजिबात घाबरणार नाही.मी झोपतीये ! आणि ती झोपायला जाणार इतक्यात त्याने लाईटस ऑफ केले ती परत ओरडली. "सिद्धांत"! ऐ आर्या काहीच नाही झालं ग, 'बघ साधे लाईट्स ऑफ केले तरीही तू घाबरली, आणि आता काय बोलत होती आता मी नाही घाबरणार अन ऑल'! तू ना मुळात आहेच घबराट जाऊ दे ! तो म्हणाला. मी च झोपतो तू काही मान्य करणार नाही!. कसा आहे हा ! एकतर स्वतःच चुकीचा वागतो वर मलाच बोलतो. ती त्याच्या कडे पाहून म्हणाली.
क्रमशः
©Neha R Dhole