नकळत सारे घडले...?? - 11 Bhavana Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नकळत सारे घडले...?? - 11

मागील भागात:-

प्रिया अर्जुनचे बोलणे ऐकून जागीच थांबली...तशीच ती घरात न जाता...रस्त्याने गेटच्या बाहेर जाऊ लागली... तिला समजत नव्हते ती कुठे जात आहे...पण वाट मिळेल त्या दिशेला ती जात होती...कारण आज अर्जुन ने तिच्यासोबत असलेलं मैत्रीचे नात पण तोडले होते... आता तर ती पूर्णपणे एकटी झाली होती...अर्जुनच एक होता जो तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत होता... पण प्रियाने नाही त्याला समजून घेतले...उलट त्याला तिने नको ते बोलल्यामुळे अर्जुन भरपूर हर्ट झाला होता...त्याने तिला भरपूर समजून घेतले पण तिने त्याला नाही...म्हणून ती आज पूर्णपणे एकटी झाली होती...कोणीच नव्हते तिच्या आसपास आता तिला सांभाळून घेणारे...तिच्या पूर्ण वाटा बंद झाल्या होत्या...

आता पुढे:-

प्रिया तशी रस्त्यावर चालत जात असते...कुठे जात आहे हे तिला कळत नसते...अचानक ती चक्कर येऊन खाली पडते...अर्जुनचा बंगला शहरापासून थोडा दूर असल्याने दूर दूर पर्यंत कोणाचीची चाहूल नव्हती...एक गाडी तिच्या दिशेने येते...त्या माणसाला प्रिया पडलेली दिसते...म्हणून तो खाली उतरतो आणि तसच तिला उचलून गाडीत टाकतो...त्याला तिला अस पाहून काळजी वाटत होती...त्याने गाडी स्वतः च्या घरी घेतली आणि तिला उचलून तो घरात घेऊन गेला...त्याने तिला एकदम हळुवार पणे बेडवर ठेवले...व्यवस्थित तिच्या अंगावर पांघरूण टाकली आणि कोणाला तरी कॉल केला...कॉल करून झाल्यावर तो तिच्या बाजूला बसला...

"प्रियु नाही ग मी तुझ्यापासून दूर जाऊ शकत😢...प्रेम करतो ना मी तुझ्यावर...पण तुलाच नाही कळत आहे... तुला समजूनच घ्यायचे नाही आहे मला...झाली ग माझ्याकडून चूक पण त्याची एवढी मोठी शिक्षा का देत आहेस तू?...तुला जसे दुःख आहे तस मला पण आहे ग...पण मी मुलगा आहे ना...त्यामुळे नाही मांडू शकत मी कोणासमोरही...तू जशी स्वतः चे दुःख मांडुन झाली तसे नाही ग मला व्यक्त होता येत...तुला होणारा त्रास पण मला सहन होत नाही...म्हणून सगळयांपासून तुला दूर आणले मी...मला वाटलं तू तरी मला प्रेम करशील पण तू देखील मला ती गोष्ट देत नाही आहे...जाऊ दे तुला नक्कीच कळेल एक दिवस माझ्या प्रेमाची किंमत...त्यावेळी तू येशील माझ्याजवळ पण मी दूर निघून गेलेला असेन तुझ्या पासून😢"तो व्यक्ती मनातच स्वतः शी प्रियाला पाहत बोलत असतो...तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात... तस तो तिथून उठून बाजूला थांबतो...डॉक्टर प्रियाला चेक करतात आणि त्या व्यक्तीकडे येतात...

"मिस्टर अर्जुन त्यांनी सकाळी काही खाल्ले नाही त्यामुळे त्यांना चक्कर आली...काळजी करण्याचे काही कारण नाही...त्या उठल्या की त्यांना खाऊ घाला आणि मी देते त्या मेडिसिन द्या...😊"डॉक्टर थोडस हसत बोलतात...

"ओके डॉक्टर"अर्जुन बोलतो आणि त्या डॉक्टर ला निरोप देतो...पुन्हा तो रूममध्ये येऊन प्रियाच्या बाजूलाच सोफ्यावर लॅपटॉप घेऊन काम करत बसतो...प्रियाला थोडी थोडी शुद्ध येत असते...ती तशीच "पाणी पाणी" करत हळूहळू शुद्धी वर येण्याचा प्रयत्न करत असते...तिचा आवाज ऐकून अर्जुन लॅपटॉप सोडून तिच्याजवळ येतो आणि टेबल वर ठेवलेला जग उचलतो...त्यातील थोडस पाणी तो ग्लास मध्ये ओततो...तसाच तो ग्लास घेऊन प्रियाला एका हाताने उठवत जवळ घेत तोंडाला लावतो...प्रिया डोळे खोलते आणि हळूहळू पाणी पिते...नंतर तिचे लक्ष अर्जुनकडे जाते...तशी ती त्याला पाहतच राहते...त्याने तिला जवळ केल्याने त्याचा परफुमचा वास तिला वेड लावत होता...ती त्याच्या जवळ पाहतच पाणी पीत होती... अर्जुन पण काही मिनिटं तिच्यात गुंतला होता...पुन्हा प्रियाने बोललेले शब्द आठवले तस त्याने तिच्या हातात ग्लास दिला आणि तिच्यापासून दूर झाला...ते पाहून प्रिया पण भानावर आली...

अर्जुनने रूम मधील लॅपटॉप उचलला आणि तो तसाच प्रियाला न बोलता बाहेरच्या दुसऱ्या रूममध्ये निघून गेला...प्रियाला ते पाहून वाईट वाटले...पण तिला ही समजले त्याचे वागणे...म्हणून ती पण गप्प बसली... काहीवेळाने एक बाई प्रियाच्या रुममध्ये आली...प्रियाला विचारून तिने रूममध्ये प्रवेश केला...

"प्रिया मॅडम तुमच्यासाठी जेवण पाठवले आहे...चला लवकर खा बर"ती बाई जेवणाच्या प्लेट्स तिच्या समोर ठेवत बोलली...

"मला नाही खायचे आहे जेवण😏...तुम्ही घेऊन जा"प्रिया थोडीशी वैतागत च बोलते...

"मॅडम सरांनी सांगितले तुम्ही जर जेवण नाही केले तर ते मला कामावरून काढून टाकतील"ती बाई काकुळतीला येत बोलते...तिचे ते बोलणे ऐकून प्रियाला वाईट वाटते म्हणून ती हात धुवून जेवण करायला बसणार तर तिला अर्जुन आठवतो...लगेच ती उठून त्याला बोलवायला जाणार तर अर्जुनने बोललेले शब्द तिला आठवतात... म्हणून ती गप्प बसून त्या जेवणाकडे पाहत राहते...नंतर थोडस अन्न खाते...

"तुमचं नाव काय बर?आणि तुम्ही कधीपासून राहतात इथे?"प्रिया त्या बाईला विचारते...

"माझे नाव वासंती आहे...मी या घरात खूप आधीपासूनच राहते...तुम्ही खूप छान आहात मॅडम...😊आमच्या सरांना चांगल्या प्रकारे सांभाळून घेशाल" वासंती थोडीशी हसत बोलते...

"तुमचे सर एक नंबर चे सगळ्यात वाईट माणूस आहेत ते😏...कसे वागावे हे पण त्यांना समजत नाही त्यामुळे मी तर त्यांना कधीच सांभाळून घेणार नाही"प्रिया थोडीशी चिडत बोलते...

"मॅडम माफ करा पण जे दिसत तस नसत...तुम्हाला सरांबद्द्ल गैरसमज झाला आहे..सरांसारखा चांगला माणूस या जगात नाही आहे"वासंती हळू आवाजात प्रियाला बोलते...

"बरोबर त्यांच्यासारखा गर्विष्ठ माणूस कुठेच नाही मिळणार ना...😏नुसता पैशाचा माज करत असतात.... म्हणून कितीतरी मुलींना फिरवत असतील सोबत गर्लफ्रेंड बनवून...या बंगल्यावर पण कितीतरी मुली आणल्या असतील ना त्यांच्या फायद्यासाठी"प्रिया चिडतच बोलते...

"स्टॉप it प्रिया जाधव😡"अर्जुन रूममध्ये येत बोलतो...

"मावशी तुम्ही जाऊ शकतात...इथे काही गरज नाही कोणाला समजून सांगण्याची"अर्जुन वासंती मावशीला बोलतो...तश्या त्या प्लेट्स उचलून घाबरतच घेऊन जातात...अर्जुन रूमचा दरवाजा बंद करतो आणि प्रियाजवळ जात असतो...तो प्रियाला भिंतीला टेकवतो आणि तिच्या दोन्ही हाताचे मनगट घट्ट पकडतो...

"काय बोलली तू मी इथे मुलींना माझ्या फायद्यासाठी आणतो😡...तस असत ना प्रिया जाधव तू 2 महिने माझ्या रूममध्ये राहत होतीस...तू एवढी गाढ झोपायची ना तर त्याचा मी फायदा घेऊन कधीच तुझे आयुष्य संपवले असते...पण माझे संस्कार आहेत ना मुलींचा आदर करण्याचे म्हणून मी तुला काहीच केले नाही...तस करून देखील मी तुला आपले बनवले असते...पण मला नाही जमले करायला...कारण खरं प्रेम करतो मी तुझ्यावर त्यामुळे मी तुला काहीच करत नाही...खूप मुली पाहिल्या मी पण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे म्हणून मी तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतो...पण तू मला समजून घेतच नाही आहे...नको समजून घेऊ मला तू😡...तुला जर माझ्या आयुष्याबद्दल माहिती नाही ना मग बोलायचे पण नाही तू मला..."अर्जुन रागातच तिचा हात घट्ट दाबत बोलतो...

"अहो friend मिस्टर माझा हात सोडा ना😢..."प्रिया थोडीशी दुःखी होऊन बोलते...अर्जुनने तिचे हात दाबल्या मुळे तिला दुखले आणि तिच्या डोळ्यांत लगेच पाणी भरले...ते पाहून त्याने तिचे हात सोडले...तो तसाच रागात रूमच्या बाहेर निघून जातो...

प्रिया पण तिथेच हात धरून जागी बसून अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत होती...

"खरंच मी जास्त बोलली का त्यांना😢...माझ्याकडून चूक तर होत नाही ना?...ते बोलले ते पण खरं आहे...मी दोन महिने त्यांच्या रूम मध्ये होती...पण त्यांनी कधीच माझा गैरफायदा घेतला नाही...😒माझ्याहातून मोठी चूक तर होत नाही ना?देवी आई तूच दाखव ना ग मला मार्ग काय तो?मला नाही कळत आहे काही😟...त्यांचे वागणे कसे आहे ते?"प्रिया मनातच विचार करत तिथेच बसते आणि तशीच ती झोपून जाते...
*****************

अर्जुन स्वतः च्या रूम मध्ये येतो आणि सगळ्या रूमच्या वस्तू रागातच फोडू लागतो...प्रिया आज त्याला खूप जास्तच बोलली होती म्हणून तो सगळा राग त्या वस्तूवर काढत होता...तो तसाच गॅलरीत जात होता तर चालताना त्याच्या पायाला काच लागली...पण याचे त्याला भान नव्हते...😢एवढा तो हर्ट झाला होता...

"का प्रिया का म्हणून तू मला एवढं वाईट बोलत असते...😢का असे माझ्यावर असे वाईट आरोप करत असते...मी कसा तुला समजावू ना हे मला कळत नाही आहे...नाही आहे ग मी एवढा वाईट...मी तुझ्याशिवाय नाही केलं कोणत्या मुलीवर प्रेम...विधीला देखील नाही कधीच मी प्रेम दिलं... विधीबद्दल कधीच माझ्या मनात फिलिंग नव्हती प्रेमाची...मोठी काकीने विधी बद्दल माझ्या मनात भरवलं...म्हणून मी तुझ्यासोबत तसा वागत होतो...पण ती विधी फक्त माझा पैसा पाहून प्रेम करत होती😡...प्रेम म्हणजे काय असते हे तुझ्याकडे पाहून मी शिकलो...पण तू मला नाहीच समजून घेत...जाऊ दे मला नाही पडायचे आता या प्रेम गोष्टीत...खूप त्रास देत हे प्रेम..."अर्जुन गॅलरीत दुःखी होऊन स्वतःशीच बोलतो...

तसा च तो काहीवेळाने रूममध्ये येतो आणि फ्रेश होऊन झोपून जातो...प्रिया सहज म्हणून त्याच्या रूममध्ये जाते...पाहते तर पूर्ण रूम अस्थावस्त अवस्थेत असते...ते पाहून ती वासंती ला बोलावते आणि आवरायला सांगते...तिचा सहज म्हणून अर्जुनकडे लक्ष जातो...तर ती काहीवेळ झोपलेल्या अर्जुन कडे पाहतच राहते...

"काय क्युट चेहरा आहे ना 😍...फक्त तो रागच खूप आहे ह्यांना😏...जरा अस चांगलं वागता येत नाही...प्रेम नाकारलं म्हणून यांनी मैत्री पण नाकारली...अस कोण करत यार😞...आता मला आईस्क्रीम,चॉकोलेट कोण देणार ना?मी यांचे विधिसोबत लग्न जुळवले तर हे खुश होतील ना😒...मग माझ्यासोबत करतील ना मैत्री?हे बोलले नाही तर एकदम अस खाली खाली वाटतं😣...अब "हिटलर मिस्टर weds विधी मिशन"👍करते म्हणजे यांना बरे वाटेल... त्यासाठी विधीला बोलावले पाहिजे...मग यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल...😊friendship मध्ये तर मी माझ्या friend साठी करूच शकते..."प्रिया मनातच स्वतःशी बोलत विचार करत असते...

सहजच तिचा लक्ष अर्जुनच्या पायाकडे जातो...त्याच्या पायात काच लागलेली असते आणि त्यातून रक्त बाहेर येत असते...ते पाहून तिला कसतरी वाटत...म्हणून ती फर्स्ट एड बॉक्स आणते आणि त्याच्या पायाला पट्टी करत असते...तशी त्याला जाग येते...

"तू इथे काय करत आहे😡...तुला तुझी रूम दिली आहे ना मग जा तिकडे आणि काही गरज नाही मला पट्टी करायची" अर्जुन रागातच तिला बोलतो...

"सॉरी friend मिस्टर ना😧...ती झाली ना चूक...मी लहान आहे ना मग मला तुम्ही माफ केले पाहिजे😞"प्रिया पप्पी फेस करत बोलते...

"माफ आणि तुला मी कधीच करणार नाही...आधी जखमा द्यायच्या आणि मग माफी मागायची😏...काही माफ वगैरे करणार नाही"अर्जुन उठत बोलतो...

"ओके माफ नका करू पण माझं मंगळसूत्र तरी द्याना😖...तुम्हांला नाही माहिती ते नसलं की मला सगळेजण बोलतील...नंतर 6 महिने पूर्ण झाले की मी काढून देईन पण आता द्याना😟"प्रिया

"मी आधीच सांगितले प्रिया ते मंगळसूत्र तुला मी देणार नाही😠...तरीही तू हट्ट का करत आहेस...ते माझ्या बायकोसाठी आहे...पण तू माझी बायको नाही आहेस" अर्जुन रागात बोलतो...

"हा ना नाही ना मी बायको☹️...पण लोकांसाठी तर मी तुमची बायको आहे ना...म्हणून तरी द्या ना😕...मंगळसूत्र नसले माझ्या गळयात तर लोक वाईट नजरेने मला पाहतील...मग त्यातील काही लोक kidnap करून पण नेतील...😟ते तुम्हांला चालत असेल तर सांगा..."प्रिया इमोशनल होण्याच नाटक करत बोलते...

"ते तुझं तू बघून घे...मी नाही म्हटले ना तर नाही मिळणार" अर्जुन स्वतःच्या मतावर ठाम होत बोलतो...

"तुम्ही नाही देणार ना मंगळसूत्र😕...नका देऊ मी चालली तुमच्या घरातून...तुमच्या आयुष्यातून कायमची😔...पण मी तुमच्यासारखी selfish होऊन नाही जाणार काही...मी तुमचं लग्न विधीसोबत लावून जाणार आहे...हा यासाठी अजिबात thank you म्हणायचे नाही...प्रिया जाधव तिच्या friend साठी काहीही करू शकते...म्हणून मी करत आहे तुमच्यासाठी...मग तुम्ही मला माफ कराल ना🤔"प्रिया अर्जुन कडे पाहत बोलते...अर्जुन तर तिचे बोलणे ऐकुन सुन्न होतो...

"तू खरंच वेडी आहेस का?🤔...लहानपणी चुकून कुठे दगडावर तर नाही ना पडली?तू काय बोलतेस तुला तरी समजते ना?अग वेडी मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कोणावरही नाही हे समजून घे ना 😣...मी विधीशी का बरं लग्न करू?"अर्जुन तिच्याजवळ जात विचारतो...

"विधी बहुतेक तुमच्यावर चिडली असणार...त्यामुळे तुम्ही असा पसारा केला ना🙄...कारण लोक गर्लफ्रेंड सोबत भांडून आल्यावरच अस वागतात ना म्हणून मी विचार केला...तुमचं लग्न तुमच्या गर्लफ्रेंड सोबत लावायचा"प्रिया खाली मान घालून बोलते...तिचे बोलणे ऐकून तर अर्जुन कपाळावरच हात मारतो🤦...(अर्जुन बाबा तुला तर खरंच सांभाळून राहावे लागेल😂)

"ऐ तुला मंगळसूत्र हवे ना घे बाई...घेऊन जा पण प्लीज हे असले फालुतू विचार नको करू...😣माझं लग्न एकदाच झाले आहे...मी पुन्हा लग्न नाही करणार एवढं तू या डोक्यात घालून ठेव"अर्जुन तिच्या डोळयांत पाहत मंगळसूत्र देत बोलतो...प्रिया खुश होत मंगळसूत्र घेऊन जात असते...तिला काहीतरी आठवते तशी ती मागे येते...

"मी तुमच्याशी पुन्हा मैत्री करू शकते का🤔"प्रिया क्युट फेस करत विचारते...

"तुला तर मी नको होतो ना मग?"अर्जुन थोडासा चिडत बोलतो...

"मी प्रेमासाठी नाही बोललं मैत्रीसाठी नाही बोलली नव्हती😑"प्रिया जवळ येत बोलते...

"मी तुझ्यापेक्षा मोठा आहे मग मी तुझ्याशी का बरं मैत्री करू..."अर्जुन

"अशीच करा ना...आपण असच friend बनून राहू ना"प्रिया...

"तू माझ्यासोबत भांडण करते...मला वाईट बोलते...मग तरीही करू का मी तुझ्यासोबत मैत्री?"अर्जुन हाताची घडी घालत तिच्याशी बोलतो...

"माझ्यासोबत मैत्री केल्यावर मी नाही भांडणार तुमच्यासोबत आणि तुम्हाला वाईट पण बोलणार नाही... मग तर झाले ना"प्रिया त्याला समजावत बोलते...

"बघ हा मी खूप हट्टी वाला friend बनणार...चालेल का तुला?"अर्जुन थोडस हसत बोलतो...या वाक्यावर मात्र प्रिया खळखळून हसते...😂कारण अर्जुन तेच बोलत होता...जे प्रियाने त्याच्यासोबत मैत्री करताना बोलली होती...अर्जुन देखील तिच्यासोबत हसतो...

"अहो friend मिस्टर मी नाही हट्ट पूर्ण करणार तुमचे...ते तर  तुम्हीच करायचे माझे हा"प्रिया हसू कंट्रोल करत बोलते...

"हा हा चालेल चल आता जाऊया का घरी😅"अर्जुन

"हम्म जाऊया ना आधी जखमेला बँडेज करूया मग जाऊ" प्रिया त्याच्या पायाजवळ पाहत बोलते...तस अर्जुन सोफ्यावर जाऊन बसतो...प्रिया काळजीने हळूहळू त्याला बँडेज करते...बँडेज झाल्यावर ते घरी निघून जातात...मस्त असे आनंदात राहतात...

प्रिया अशी अल्लड होती...थोडीशी बालिश होती...पटकन ती अर्जुनला बोलून मोकळी झाली...पण स्वतःची चूक झाल्यावर मात्र ती माफी मागायला आली...नाहीतर ती चूक नसताना कोणाकडेही माफी मागायला जात नव्हती... तिच्यामुळे कोणी हर्ट झालेलं तिला पाहवत नव्हते आणि अर्जुन तर तिचा मित्र होता म्हणून ती तशी वागली... अर्जुनला पण तिचे वागणे कळले नव्हते...अर्जुन ने तिला कधीच माफ केले होते...पण थोडस नाटक तो तिच्यापुढे करत होता...खरच प्रिया त्या साठी वागली का आणखीन काही होते...ते तीच तिलाच माहिती...😂
****************

दुसऱ्या दिवशी प्रिया नेहमी प्रमाणे उठली सगळं आवरुन तयार झाली...रोजचे तिचे घरातील काम तीने आवरुन घेतले...अर्जुनला पण कॉफी वगैरे देऊन ती अभ्यास करत बसली...अर्जुन तिच्यासोबत बोलून सगळं आवरुन ऑफिसला निघून गेला...संध्याकाळी अर्जुन घरी आला फ्रेश होऊन तो प्रियाला नजर टाकून पूर्ण घरभर शोधत होता...पण त्याला ती दिसली नाही...न राहून त्याने आईला विचारले...

"आई प्रिया कुठे गेली ग?"अर्जुन आई जवळ जात विचारतो...

"प्रिया माहेरी गेली आहे 15 दिवसांसाठी राहायला"आई थोडीशी हसत बोलते...ते ऐकून अर्जुनचा चेहराच पडतो...
तो तसाच आईच न ऐकता रूममध्ये निघून जातो...नंतर त्याला समजते तिचा मंगळसूत्रासाठी चाललेला खटाटोप...

"ओ शीट आपल्याला कस लक्षात आले नाही😣....ती तुझ्यासोबत मैत्री चा बहाणा करून मंगळसूत्र घ्यायला आली होती...ओ गॉड म्हणजे या मुलीने मला वेड केले😫.. ओ शीट अर्जुन तू खरच वेडा आहे...असा कसा तिच्यावर विश्वास ठेवला यार...माहेरी तिला तिचे आईवडील मंगळसूत्र बद्द्ल विचारतील म्हणून ती असा खटाटोप करत होती...आता ना मी हिचा बदला घेणार"अर्जुन मनातच स्वतःशी बोलत ठरवतो...

काल अर्जुन प्रियाला बोलून गेल्यावर...प्रियाला तिच्या आईचा फोन आला होता...आईने तिला घरी राहण्यासाठी बोलावले होते...पण आता ती सून आहे म्हणून तिला सुनेसारखं तयार होऊन यायला सांगितले होते...मंगळसूत्र घालून घरी यायचे नाहीतर तिचे बाबा तिला घरी घेणार नाही अशी धमकी आईने तिला दिली...😛तिला पण आईची आणि तिच्या लहान भावाची आठवण येत होती...म्हणून ती काहीतरी मनात ठरवून अर्जुनकडे गेली...तसच तिने तिचा अर्जुनकडून मंगळसूत्र घेण्यासाठी प्लॅन बनवला आणि तो तिचा successful पण झाला...म्हणून ती आनंदातच अर्जुन ऑफिस ला गेल्यावर बॅग भरून माहेरी गेली...😝

नाहीतर प्रिया एवढ्या सहजासहजी अर्जुन पुढे झुकली नसती...फक्त मंगळसूत्रासाठी तिने तो खटाटोप केला... माहेरी पहिल्यांदा जाणार होती ती आणि त्यात तिला कोणत्याही गोष्टी वरून वाद नको म्हणून अस केलं तिने...
.
.
.
.
.
.
क्रमशः

        ©®भावना सावंत(भूवि❤️)
******************
आजचा भाग कसा होता नक्की कळवा हा...😉बघू आता अर्जुन काय करतो ते पुढील भागात...😅सॉरी हा काय आहे ना ही स्टोरी खूप वेगळी असल्याने थोडा उशीर होतो पार्ट्स ला याच्या...थोडस समजून घ्या हा...😅यांच्यात प्रेम दाखवायला थोडा उशीर होईल...दोघेही खूप वेगळ्या विचारांचे असल्याने अस होते...😣प्रिया त्यात अल्लड आहे...त्यामुळे यांचे नाते हळूहळू फुलवायचे आहे ना...😊म्हणून थोडासा उशीर लागत आहे...😅काही चुकले तर माफ करा...🙏🙏


रेट करा आणि टिप्पणी द्या

Priti

Priti 2 महिना पूर्वी

Anjali Shinde

Anjali Shinde 3 महिना पूर्वी

Neeta Sasane

Neeta Sasane 5 महिना पूर्वी

Mansi Gaikwad

Mansi Gaikwad 5 महिना पूर्वी

Devyani Nemade

Devyani Nemade 6 महिना पूर्वी