जीवनसाथी...️️ - 35 Bhavana Sawant द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

जीवनसाथी...️️ - 35

आज पुण्याला जायचे म्हणून अजय आणि सुशांती 2 लाच उठून तयारी करत होते...कारण त्यांची 4:30 ची flight होती म्हणून ते लवकर उठले होते...दोघ तयार होऊन खाली आले...ते जाणार म्हणून आई बाबा पण लवकरच उठले होते...आई ला बरं वाटलं अजय सुशांती सोबत जात आहे...

"माझ्या मुलीची नीट काळजी घे हा अजय...नाहीतर तुला आल्या नंतर बघून घेईन"अजयची आई हसत बोलते...

"वा आई तू फक्त तिची काळजी घ्यायला सांग...इथे माझी तर कोणाला किंमत च नाही😏"अजय नाराज होत बोलतो...

"अहो राजे तुमच्या सोबत सुशांती बेटा आहे तर आम्हाला काही काळजी नाही बर का😊" अजय चे बाबा

"हा ते तर आहे...सुशांती सोबत असेल तर मी कुठे ही फिरायला जाऊ शकतो😅"अजय थोडस हसतच बोलतो...

"अजय अजिबात त्रास द्यायचा नाही हा माझ्या मुलीला... थोडेफार पुणे पण फिरवून आण बघ जमले तर😊..."अजयची आई

"फिरवतो ग आई...अजून काही बाकी आहे का?"अजय

"काही नाही...चला हॅपी जर्नी💐"अजय चे बाबा हसत त्यांना निरोप देतात...अजय आणि सुशांती दोघांच्या पाया पडून निघून जातात....एक तासाचा प्रवास करून ते एअरपोर्ट वर पोहचतात...पाहतात तर सानिका,सुरेश, पल्लवी,प्रदिप हे चौघे त्यांना निरोप देण्यासाठी एअरपोर्ट वर आलेले असतात...सुशांती ला तर खूप आनंद होतो त्यांना पाहून...ती लगेच जाऊन सानिका आणि पल्लवी ला मिठी मारते...

"हम्म सुशांती आमच्यासोबत मस्करी करतेस का?" सानिका तिला बाजूला करत बोलते...सुशांती हसत च कान पकडून त्यांना "सॉरी" बोलते...

"चल माफ केलं...आम्हांला एवढे माहीत आहे की तू अजय शिवाय कुठेच जाऊ शकत नाही😜...गेली तरी अजय तुला शोधून तिथे पोहोचेल" सुरेश मस्करीत बोलतो... तस ती अजय कडे एकदा पाहते...तो पण डोळा मारून बरोबर आहे म्हणतो...

"चला बाय आमच्या बहिणाबाई😊"प्रदिप...सुशांती सगळयांना बाय करते...तेवढ्यात flight ची अन्नोउन्समेंट होते...तस अजय पण प्रदिप सुरेश ला मिठी मारतो... नंतर अजय सुशांती च्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ करतो आणि तस च ते दोघे बॅग घेऊन flight च्या दिशेने निघून जातात...मग बाकीचे पण तिथून निघून जातात... अजय सुशांती विमानात शेजारी शेजारीच बसतात... अजय स्वतः खिडकी च्या दिशेने बसतो... सुशांती त्याच्या बाजूला बसते...सुशांती च्या बाजूला एक माणूस बसतो त्याची नजर सारखी सारखी सुशांती वर असते... अजय चा लक्ष त्या माणसाकडे जातो...पण तो माणूस सारखा सारखा तिलाच पाहत असतो...अजय ला राग येतो त्याचा😠...पण भान ठेवून वागावे...म्हणून तो स्वतः च्या जागेवरून उठतो...

"पिल्लू एक काम कर तू उठ इथून आणि माझ्या सीट वर बस...बघ खाली काय मस्त नजारा आहे ना म्हणून" अजय थोडंस हसत बोलतो...तशी सुशांती उठते आणि अजयच्या सीट वर जाऊन बसते...अजय तिच्या सीट वर बसतो आणि तिला जवळ घेतो आणि त्या माणसाकडे एकदा लक्ष घालतो...तस तो माणूस नजर फिरवून बसतो...(काही नाही ओ थोडीशी जेलसी😜...)

काहीवेळाने त्यांची flight पुण्याला पोहचते...अजय कार बुकिंग करतो...काही मिनिटांत त्यांची कार एअरपोर्ट वर येते...ते दोघे कार मध्ये बसतात...एक ते दोन तासात कार एका मस्त अश्या फार्म हाऊस कडे थांबते...अजय कारचे पैसे देतो...सुशांती बाहेर येऊन त्या हाऊस कडे भान हरपून पाहत रहाते...

"पिल्लू आपलं च आहे फार्म हाऊस बाळा😊"अजय मागून येऊन तिला बोलतो...

"मस्त आहे...एकदम भारी आहे"सुशांती तिच्या भाषेत अजय ला सांगते...

"चल जाऊया ना आपण आत"अजय...ती मानेनेच "हो" म्हणते...लगेच ते दोघे एकमेकांचा हात पकडून त्या हाऊस मध्ये प्रवेश करतात...

"जा पिल्लू जाऊन तू वरती आराम कर मग मी येतो... आपल्याला site वर जायचे आहे ना नंतर म्हणून तू आराम कर जा"अजय...सुशांती खूप थकलेली असते...कारण ती सकाळी च लवकर उठलेली असते... ती लगेच रूम मध्ये जाऊन झोपते...अजय काहीवेळाने तिच्या शेजारी जाऊन झोपतो...
*******************

एका खोलीत 50 ते 60 लोक एकत्र जमले होते... प्रत्येकाच्या हातात कोणते ना कोणते तरी हत्यारे होते... एक माणूस खुर्चीत मस्तपैकी टेबल वर पाय पसरून बसला होता...त्याच्या हातात गन होती... बहुतेक वाटतं तो सगळयांचा बॉस होता... त्याच्या पुढे एक 35 ते 40 वर्षाचा एक माणूस बसला होता...त्याचे काहीतरी काम होते त्या पुढील बसलेल्या व्यक्ती कडे...

"बोल बे क्या काम है तेरा?"हातात गन असलेला माणूस बोलतो...

"एक लडकी का काम खत्म करना मुन्ना भाई...इसलीये आपके पास आया हु" त्याच्यापुढे बसलेला माणूस बोलतो...

"कोन से लडकी का काम तमाम कर ना हैं? फोटो वगैरा लाया है क्या तू?"मुन्ना भाई...तसा तो पुढील व्यक्ती त्याच्या समोर एक फोटो ठेवतो आणि बाजूला पैसे ठेवतो...

"इतना सारा पैसा एक लडकी को मारणे के लिए? नाम क्या है बे इस लडकी का?" मुन्ना भाई

"हा ये लडकी किसीं भी हालत में जिंदा नहीं बचनी चाहीए...इस लडकी का नाम सुशांती अजय परांजपे है अभि उसकी शादी हुई है" तो व्यक्ती...

"IPS ऑफिसर अजय परांजपे के बिबी है क्या ये?"मुन्ना भाई उठत बोलतो...

"हा उसकी ही बिबी है"तो व्यक्ती...

"हम्म इसकी सुपारी हम नहीं ले सकते...क्यूकी ये अजय भाई की बिबी है...हमे उनसे दुष्मनी नही लेनी हैं... और तू भी इस लडकी का ख्याल छोड दे..."मुन्ना भाई

"मैं तुम्है इतना पैसा दे रहा हु...फिर भी तुम हमारा काम कर क्यू नहीं रहे हो😠"तो व्यक्ती रागात बोलतो...

"ऐ तेरा गुस्सा तेरे पास रखं...मैं ही नहीं ये देश का कोनसा भी माफिया अजय भाई के बीबी को मारने की सुपारी नही लेगा...ये तू भी सून ले...ये लडकी उनकी जान हैं... तुझे और तेरे साथ के लोंगो को अपनी जान प्यारी है तो ये लडकी का ख्याल तू छोड दे😤"मुन्ना भाई...

"ऐसा कोन है रे वो IPS अजय एक छोटासा पुलिस वाला हैं...😡किसी ने भी उस्के बिवी को नहीं मारा तो हमारे बॉस खुद्द उस्को मार डालेंगे...फिर देखते है ये ऑफिसर अजय क्या करता हैं"तो व्यक्ती थोडस रागात बोलतो...

"लगता है तुझे और तेरे बॉस को खुद्द की जान प्यारी नहीं है...अजय भाई ऐसा शेर है अगर वो जाग गया ना तुम्हे कोई नहीं बचा सकता उनसे...राम ने सीता के वक्त लंका दहन किया था ना वैसे ही तुमने अगर अजय भाई के बिबी को मारने की कोशिश की तो तुम्हारे परिवार का कोई जिंदा नही मिलेगा...मैने तो तुम्हे सलाह देने का काम किया...आगे तुम्हारी मर्जी...और ये तुम्हारे पैसे उठाव यहा से" मुन्ना भाई मोठ्याने हसत बोलतो...

"देख लेंगे कोन कैसा है वो...आने वाला वक्त ही बतायेगा "तो व्यक्ती असं बोलत पैसे घेऊन निघून जातो...
************************

"ये पिल्लू उठ लवकर...site वर जायचे आहे ना तुला?"अजय झोपलेल्या सुशांती ला उठवण्यासाठी बोलतो...

"हम्म☺️"सुशांती थोडीशी smile करतच उठते...आणि लगेच फ्रेश व्हायला जाते...

सुशांती मस्त अशी तयार होऊन बाहेर येते...अजय फोन मध्ये busy असतो म्हणून त्याचे तिच्याकडे अजिबात लक्ष नसते...ती थोडीशी पुढे सरकते आणि स्वतः च्या बांगड्या वाजवत असते...तसं अजय चा तिच्याकडे लक्ष जातो...तो भान हरपून तिला पहातच राहतो...

सुशांती जांभळ्या कलरची सिम्पल साडी नेसलेली, गळ्यात छोटं डायमंडच मंगळसूत्र, कानात झुमके जे अजय ला नेहमी आवडतात म्हणून ती घालायची,एका हातात घड्याळ आणि एका हातात डायमंड ब्रेसिलेट,ओठांना थोडीशी लिपस्टिक...चेहऱ्यावर तिच्या नेहेमी ची गोड अशी smile होती...एकदम हिरोईन दिसत होती ती...साडीत तिचे सौंदर्य नेहमी वेड लावणारे असायचे...म्हणून अजय ला तिचे वेड लागायचे ना😁...अजयचे लक्ष तिच्यावर आहे पाहून ती समोर येऊन त्याच्या दंडाला पकडून हलवते तसा तो भानावर येतो...

"काय झाले पिल्लु यार?कशाला डिस्टर्ब केलंस तू मला?"अजय वैतागत बोलतो...

"असले कोणते काम करत होतात तुम्ही?आणि सध्या मी तुमची बायको झाली आहे अजय😅तरीही तुम्ही मला पाहत राहतात"सुशांती तिच्या भाषेत अजय ला सांगते...
तस अजय तिला जवळ घेतो...

"बायको असली म्हणून काय झाले पिल्लू मी तर रोज च तुझ्या प्रेमात पडत असतो...😊तुझ्या प्रत्येक रुपात मी हरवून जातो...आपल्या ला मुलं झाली तरी मी तुझ्यावर असच प्रेम करत राहील"अजय तिच्या गालावर किस करत बोलतो...मुलाचं नाव काढतात सुशांती लाजत असते...तिचा चेहरा गुलाबी होतो...तशी ती अजून अजय ला बिलगते...

"एवढं गोड नको ना लाजू यार पिल्लु मग मला कसं तरी होत"अजय खट्याळ पणे हसत बोलतो...सुशांती लगेच मिठी सोडून बाजूला होते आणि अजय ला site वर जाण्याची आठवण करून देते...

"चला राणीसरकार"अजय बोलत बोलत च तिला गाडीत बसवतो...स्वतः ड्राईव्ह करायला बसतो...

काहीवेळात ते त्या site वर पोहचतात...सुशांती site वरील लोकांच्या कामाकडे स्वतः हुन लक्ष घालत असते...अजय पण तेथील लोकांना काम समजवत असतो...IPS ऑफिसर असून सुद्धा तो चांगल्या प्रकारे business मध्ये वडिलांना मदत करत असे...सुशांती चा अकॅसिकडेंट झाल्यापासून तो पण तिला business मध्ये मदत करत होता...दोघ विरुद्ध बाजूला राहून स्वतः ची काम करत होती...

अजयला कोणाचा तरी कॉल येतो म्हणून तो लोकांपासून दूर राहून कॉल वर बोलत असतो...सुशांती चा लक्ष जातो तर तिला अजय त्याजागी दिसत नाही म्हणून ती इकडे तिकडे पाहते तर अजय तिला थोडं दूर कॉल वर बोलताना दिसतो...तशी ती रिलॅक्स होऊन जाते...अचानक तीच लक्ष अजयच्या वरती सुरू असलेल्या construction वर जाते...तिथे site चे कामगार काम करत असतात...त्यात मोठे मोठे पिलर च काम चालू असते...एक पिलर थोडासा हलत असतो...त्याला उभारण्यासाठी बांधण्यात आलेली दोरी थोडी थोडी करून तुटत असते...बरोबर त्या पिलरच्या खालीच अजय मोबाईल वर बोलत असतो...

ते दृश्य पाहून सुशांती चा जीव घाबरा घुबरा होतो...ती तिथे पोहचायला पण वेळ लागणार असतो...तिने आवाज दिला तर त्याला ऐकू गेला असता पण तिला बोलता येत नव्हते म्हणून ती स्वतः ला कोसत होती... तिला काय करू आणि काय नको हे समजत नव्हते म्हणून ती तशीच चालत धावत त्याच्या कडे जात असते...त्या पिलरची दोरी आता अजून तुटणार होती आणि अजय वर पडणार असे वाटत होते...

"प्लीज देवा माझ्या अजय ला काही होऊ देऊ नको... मला त्यांना वाचवायला पाहिजे...पण मी रेस्टलेस होत आहे रे😭...प्लीज नको रे त्यांना काही होऊ देऊ नको देऊ...त्यांच्या शिवाय मी नाही राहू शकत...मी पण मरून जाईन ते नसले तर...अहो अजय व्हा ना तिथून बाजूला ऐका ना माझे ते पडेल वो तुमच्यावर😭"सुशांती रडतच मनात बोलत असते...

आता फक्त शेवटचं जवळजवळ ती दोरी तुटत होती... तरी अजय फोन मध्ये बोलण्यात busy होता...तशी ती त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करते...पण आवाज काही बाहेर येत नाही...त्या पिलरची दोरी आता पूर्णपणे तुटली होती आणि तो पिलर अजय वर पडणार तशी सुशांती जोरात प्रयत्न करून ओरडते...

"अजय$$$$"सुशांती... तो पिलर जोरात खाली येऊन पडतो...तशी सुशांती चक्कर येऊन जागीच पडते...

अजयला तिचा आवाज येतो तसा तो तिथून बाजुला होतो...त्यामुळे तो पिलर त्याच्या वर पडणार त्याच्या आधीच तो तिथून बाजूला होतो...त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचते...सगळे लोक तिथे जमा होतात... अजय ला काही कळत नसते...तो धावतच स्वतः चा विचार न करता सुशांती कडे धावत जातो...पाहतो तर सुशांती चक्कर येऊन पडलेली असते...

"ऐ पिल्लू उठ ना यार...काय झाले तुला😢?माझेच चुकलं मी तुला एकटीला सोडून गेलो ते...प्लीज उठणं बाळा"अजय थोडंस काळजीने बोलतो...तरीही ती काही बोलत नसते म्हणून तो तसच तिला स्वतः च्या दोन्ही मजबूत हातात उचलतो आणि गाडीत ठेवतो...
एकदम फास्ट मध्ये गाडी चालवतच तो फार्म हाऊस वर घेतो आणि लगेच डॉक्टर ला  कॉल करतो...तो लगेच तिला स्वतः च्या रूम मध्ये आणून बेड वर ठेवतो आणि तसाच एक हात तिचा स्वतः च्या हातात घेऊन तिच्या बाजूला बसतो...त्याला पण आता सुशांती ची खूप काळजी वाटतं असते...डॉक्टर येतात तस तो बाजूला थांबतो आणि तिला चेक करायला सांगतो...डॉक्टर पण लगेच तिला चेक करतात...

"काय झाले डॉक्टर तिला?"अजय काळजीने विचारतो...

"काही काळजी करण्यासारखे कारण नाही मिस्टर... त्यांना कसला तरी धक्का बसला...म्हणून त्यांना चक्कर आली...मी त्यांना इजेकॅशन दिलं येतील त्या शुद्धीवर"डॉक्टर

"Thank you डॉक्टर"अजय...

डॉक्टर अजय चा निरोप घेऊन निघून जातात...अजय पुन्हा सुशांती कडे येतो तिच्या कपाळावर हात फिरवतो आणि बाजूला बसून रहातो...

"मला सुशांती ने आवाज दिला होता...माझा भास होता का? खरंच तिने मला आवाज दिला होता...पण तिला बोलता येत नव्हते मग ती कशी मला आवाज देऊ शकते ना?...तिने आवाज दिला आणि तिचा आवाज खरंच वापस आला तर मला खूप आनंद होईल याचा...तिला पण खूप बरं वाटेल कारण तिला खूप आवडतो आवाज ना तिचा...जर खरं असेल तर एवढ्या दिवसाने मला तिचा आवाज ऐकायला मिळेल...खूप प्रतीक्षा केली मी तिच्या आवाजाची..."अजय मनात च स्वतः शी बोलत असतो...

"ऐ पिल्लू उठ ना ग राणी😢...बघ ना तुझ्या अजयला त्रास होत आहे ना...प्लीज उठ ना"अजय थोडंस जड आवाजात बोलतो...तशी सुशांती उठते...

"अहो अजय तुम्हांला कुठे लागले तर नाही ना?कुठे जखम वगैरे तर नाही ना?डोक्याला वगैरे?अजय कुठे दुखत तर नाही ना?😭"सुशांती रडत च अजय ला चेक करत बोलते...अजयला तिचा आवाज ऐकून खूप आनंद झालेला असतो...पण सुशांती च रडणं बघून त्याला काही समजत नसते...

"ऐ पिल्लू रिलॅक्स हो...बघ मला कुठे काहीच झालं नाही...मी ठीक आहे ना"अजय तिला जवळ करत बोलतो...

"खरंच अजय ना तुम्हांला काही झाले नाही ना?😢मला भिती वाटली होती"सुशांती मुसमुसत च बोलते...

"पिल्लू शांत हो आता...बघ ना ग तुझा आवाज वापस आला राणी...तरी तुझं लक्ष नाही आणि तू पहिल माझं च नाव घेतले"अजय तिला जवळ घेत कवटाळत बोलतो...तस तिच्या लक्षात येते आणि ती बाजूला होऊन स्वतः च्या गळ्याला बाहेरून हात लावते...

"अजय माझा आवाज वापस आला...म्हणजे मी आता बोलू शकते😕"सुशांती

"हो ग बाळा तू आता बोलू शकतेस ना...पुन्हा तूला आवडतात तशी गाणे म्हणू शकतेस... तुला हवं ते तू आता बोलून माझ्याकडे मागू शकते"अजय आनंदात बोलत असतो...

"अजय अजय मला ना खूप आनंद झाला माझा आवाज मला मिळाला म्हणून...आता मी पुन्हा सतावणार हा बोलून बोलून😆"सुशांती हसत बोलते

"तुला हवं ते कर मला चालेल तू त्रास दिलेला...फक्त दूर नको जाऊ सोडून"अजय जड आवाजात बोलतो...

"नको ना अजय तुम्ही इमोशनल होऊ...माझा आवाज परत आला ना हे आनंदाची गोष्ट आहे"सुशांती

"हम्म खूप खूप आनंदाची गोष्ट आहे...I Am so happy Pillu😙...बघ देवाने माझी प्रार्थना ऐकली...आज मी खूप खुश आहे सांग तुला काय हवे बालिके"अजय

"हम्म मला ना काहीच नको मला फक्त तुम्ही च पाहिजे" सुशांती क्युट फेस मध्ये बोलते....तस अजय तिच्याजवळ जाऊन तिच्या मानेत स्वतः चा चेहरा घालून स्वतः ओठ तिच्या मानेवर फिरवतो... तस तिच्या अंगावर गोड शहारे येत असतात...किस करत च तो तिला बेड वर झोपवतो आणि मनसोक्त किस करत असतो...नंतर चेहऱ्यावर कडे येऊन तिच्या गालावर,कपाळावर,डोळ्यावर स्वतः चे ओठ टेकवून मनसोक्त किस करत असतो...नंतर ती अजय च्या शर्ट चे 2 बटन्स काढते...तस अजय भानावर येत बाजुला होतो आणि तसाच गॅलरीत जातो...तिला तर काही समजत च नसते...ती स्वतः ला नीट करते आणि अजयकडे जाते...

"अहो अजय माझं काही चुकलं का😢?सॉरी मी...मी... नाही करणार अस यापुढे... मला माफ करा"सुशांती

"पिल्लू यार सॉरी माझंच चुकलं मी अस नाही करायला हवे तुझ्या मर्जीशिवाय"अजय

"अहो तुम्ही आता माझे पतीदेव आहात 😄"सुशांती हसत बोलते...

"तू काय बोलली पिल्लू?"अजय प्रश्नार्थक नजरेने विचारतो...

"पतीदेव ना🙄"सुशांती

"नाही त्या आधी"अजय

"हम्म अहो बोलली ना😙"सुशांती

"हे कधीपासून झाले?म्हणजे कोणी शिकवले तुला?" अजय

"ते हो ते सिरीयल मध्ये सगळ्या मुली आपल्या नवऱ्याला अहो च म्हणतात ना...म्हणून बोलली😆...काय भारी वाटते ना"सुशांती

"नाही...नाही भारी वाटत ते...तू आधीपासून मला अहो जावो करतेस च ना...ते बरं होते अहो अजय पण एकवेळ ठीक आहे पण नुसतं अहो अजिबात म्हणयायचे नाही ना...मला नाही आवडत ते😏"अजय त्रासिक पणे बोलतो...

"आता तर मी तुम्हाला अहो च बोलणार😆"सुशांती अस म्हणत रूम मध्ये पळून जाते...

"ऐ पिल्लू थांब तुला बघतोच मी"अजय...तो पण तिच्या मागे पळतो...ती एक एक उशी उचलून अजय ला फेकून मारत असते आणि पळत असते...शेवटी अजय तिला पकडतो...

"आता कुठे पळशील पिल्लू?"अजय हसतच च बोलतो...

"अहो सोडा ना मला😣"सुशांती

"जो पर्यंत तू सरळ माझ्याशी बोलणार नाही तो पर्यंत सोडणार नाही मी"अजय मस्करी करत बोलतो...

"सॉरी ना अजय नाही बोलणार मी तुम्हांला ते"सुशांती विनवणीच्या स्वरात बोलते...तस तो तिला सोडतो आणि सरळ करून स्वतः च्या मिठीत घेतो...ती पण स्वतः ची मिठी घट्ट करते...आजच्या अजयच्या मिठीत तिला आनंद, प्रेम,विश्वास सगळं जाणवत होते...कारण किती तरी दिवसानंतर त्यांनी एकमेकांशी बोलून संवाद साधला होते...तीच मस्करी,मज्जा करणे हे आज अजय अनुभवत होता...ती चा आवाज गेल्या पासून ती दुःखी राहत होती...पण आज ती मनमुराद अजय सोबत बोलत होती...म्हणून अजय आतून खूप सुखावला होता... अजयने मिठी सोडवली आणि तसच तिला उचलून घेतले...तिने पण हसत अजयच्या गळ्यात स्वतः चे दोन्ही हात गुंतले...त्याने पण तिला smile दिली आणि बेड वर ठेवले...स्वतः तिच्या बाजूला जाऊन पडला...

"अजय तुम्हांला कसे कळले मला marriage करायचे होते ते?"सुशांती अचानक पणे तिच्या मनाला पडलेला प्रश्न विचारतो...अजय ला पण अपेक्षित होते...ती कधी ना कधी हा प्रश्न विचारणार...म्हणून तो कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता उत्तर द्यायला सुरुवात करतो...

"पिल्लु जेव्हा अवि चे लग्न होते तेव्हा तू आणि रिया बोलत होतात...रिया ने तुला विचारले होते ना तुला तू आणि अजय कधी लग्न करणार?काही ठरवले का नाही दोघांनी अस?तेव्हा तू आतून नाराज झाली होती... कारण आपल्या दोघां मध्ये लग्नाविषयी काहीच बोलणे झाले नव्हते...मनाने आपण मानत होतो एकमेकांना नवरा-बायको पण मला तुला ऑफिशल्ली बायको बनवायचे होते म्हणून मी तेव्हाच निर्णय घेतला होता की तुझ्या सोबत लग्न करायचे लवकरात लवकर...त्यासाठी मी तयारी ला पण लागलो होतो ग...तुझ्या अकॅसिकडेंट च्या दिवशी मी तुझ्या सोबत इंगजमेंट करणार होतो आपल्या लोकांना च मी बोलावले होते त्यासाठी...तुला अस बाहेरची लोक नाही आवडायची आणि जास्त गर्दी वगैरे पण आवडत नाही ना म्हणून मी घरगुती पध्दतीने करणार होतो...त्यासाठी सानिका,सुरेश,राघव,रिया आणि बाकी सगळे एकत्र जमले होते...तुला surprised द्यायायचे होते...कारण तुझ्या चेहऱ्यावर चा आनंद मला पाहायचा होता...म्हणून मी आशेने तुझ्या येण्याची वाट पाहत होतो ग😢...पण बघ ना तूच मला काय मोठं surprised दिले...माझ्या पासून दूर निघून जात होतीस तू...मला त्याक्षणी अस वाटलं माझं आयुष्य संपत चाललंय अस...त्यात तू एक सांगत होतीस काळजी घ्या म्हणून...मी नेहमी राहील तुमच्या सोबत😢...सुशांती यार तुझ्या शिवाय अजय अपूर्ण आहे ग तू मला नेहमी सोबत हवी..माझ्या पूर्ण आयुष्यात मी फक्त तुझ्यावर च प्रेम केले आहे...तुझ्याशिवाय कोणाचाच विचार केला नव्हता...म्हणून काळजी वाटते मला तुझ्याबद्दल...मी मग त्या अकॅसिकडेंट मुळे लग्नाचा निर्णय पुढे ढकलला आणि बघ ना आता आपलं लग्न पण झालं...सॉरी तुझ्या इच्छा काही पूर्ण करता नाही आल्या लग्नाबद्दल च्या पण माझ्याकडे पर्याय नव्हता😢"अजय थोडस जड आवाजात बोलतो...हे ऐकून तिच्या पण डोळयांत पाणी येते ते ती पुसते...

अजयचे बोलणे संपते तस ती अजय कडे पाहते अजयच्या डोळयातून पाणी येत असते...ती अजय कडे सरकते... अजय चा चेहरा स्वतः च्या नाजूक ओंजळीत धरते...अजयच्या गालावर किस करते मग डोळ्यांवर पण स्वतः चे ओठ टेकवते...अजयच्या पूर्ण चेहऱ्यावर ती किस करत असते...अस केल्याने अजय च्या अंगावर रोमांच उठत होते...अजय ने तसंच तिच्या कंबरेत हात घातला आणि तिला तसं च स्वतः च्या अंगावरून बाजूला केले आणि स्वतः तिच्या अंगावर पडून त्याने तिच्या नाजूक ओठांना स्वतः च्या ताब्यात घेतले...ती पण त्याला प्रतिसाद देत होती..त्याने तिच्या वरच्या ओठाला मनसोक्त किस केले आणि नंतर खालच्या ओठाला भरपूर वेळ किस केला...तिच्या पूर्ण अंगावर गोड शहारे येत होते...तिने हळूहळू अजयच्या शर्टची बटन काढायला लागली...अजयने पण स्वतः चा शर्ट लगेच काढून टाकला...ती त्याची बॉडी पाहून तर हरवून गेली होती... त्याने तिच्या मानेत चेहरा घालून तिला भरपूर वेळ किस केलं आणि तसच तो खाली येऊन तिचा साडीचा पदर पिन मधून काढत होता...तस त्याने एकदा तिच्या कडे पाहिले...ती चा चेहरा पूर्ण लाजेने गुलाबी झाला होता... तस त्याने पुन्हा तिचा पदरच्या पिनावर लक्ष केंद्रित केलं आणि लगेच त्यानें तिचा पिन काढून साडीचा पदर तिच्या शरीरापासून वेगळा केला...तिने लाजून अजय ला मिठी मारली...आणि तसच अजय च्या मानेवर किस करत होती...किस करता करता अजय ला काही ठिकाणी चावली पण...अजयला काहीच फरक पडत नव्हता कारण त्याला कुठेच दुखत नव्हते...

"झालं पिल्लू तुझं चावून😄?का बाकी आहे?"अजय खट्याळ पणे बोलतो...तशी ती त्याच्या कडे पाहते...

"पिल्ला नाही दुखत मला तू चावली तरी😅...एवढी बॉडी करतो ना मी म्हणून...पण आता तुला याची शिक्षा मिळेल"अजय मिश्किल पणे हसत बोलतो आणि तिच्या पोटावर स्वतः चे ओठ टेकवतो...तस तिचा रोम रोम रोमांचित होतो...ती हलण्याचा प्रयत्न करते...अजय तसच वर जातो आणि तिचे ओठ स्वतः च्या ताब्यात घेतो...तस च ती त्याला प्रतिसाद देते...दोघांचे हात एकमेकांच्या शरीरावर फिरत असतात...अजय तिच्या मानेला चावतो...

"अजय नको ना चावू😣...मी नाजूक आहे ना मग"सुशांती वैतागत बोलते...

"पिल्ला आता समजलं कस होत ते आणि तू मला चावली ते"अजय

"ते हो ते माझ्या अजय ला कोणत्या मुलीने पाहू नये म्हणून चावली😅"सुशांती हसत च बोलते...

"तुझ्याशिवाय कोणीही एवढ्या जवळ नाही येणार पिल्लु😆...मी फक्त तुझ्याच जवळ एवढा येतो...पण तू सांग ना तू का मॉर्डन कपडे घालत नाही ते?"अजय

"हा ते ना माझ्या अजय शिवाय मला कोणी पाहू नये ना म्हणून😕...मला कोणी नाही पाहिजे तुमच्याशिवाय... माझे अजय च एवढे भारी आहे ना म्हणून"सुशांती त्याच्या   गळ्यात हात घालत बोलते...

"मी तुझाच आहे ना पिल्लू पर्मनंट"अजय हसत बोलतो आणि तिच्या दोन्ही हाताच्या बोटांत स्वतः ची बोटे गुंफून तो तिच्या मध्ये पुन्हा गुंततो...तिच्या कपड्यांचे अडसर पण तो दूर करतो...तसच दोघ एकमेकांना मध्ये गुंतत जातात... अजय तिच्या वर स्वतः च्या प्रेमाचा वर्षाव करत होता आणि ती तो झेलत होती...मध्यरात्री कधी सुशांती ला झोप लागते... तो बाजूला होऊन तिला स्वतः चे शर्ट घालतो आणि तिला स्वतः च्या कुशीत घेतो...

"माहीत नाही ग पिल्लु पुढे काय काय होईल ते...पण एक प्रॉमिस मी करू शकतो कशीही परिस्थिती असली तरी तुझी साथ मी सोडणार नाही...कारण मला एवढं माहीत आहे की जग खोटं असू शकेल...पण तू कधीच नाही... तुझ्या शिवाय मी कोणत्याही मुलीचा विचार करत नाही ग कधी...पण तुझं insecure होणं माझ्यासाठी काळजी च कारण बनत ग☹️...तू एवढी निरागस आहे ना कोणी काही ही बोलले की तू जास्त च विचार करते ग...तू का नाही माणसं ओळखायला शिकत...पटकन कोणावरही विश्वास ठेवते... याने तुलाच धोका निर्माण होईल ग...मी तुला नेहमी साथ देईल तू पण मला नेहमी देतेस पण तुझ्या जीवाला धोका आहे ग हे मी तुला कस सांगू😕...हे समजत नाही मला...आता तुझा आवाज आला ना तर मला काही टेन्शन नाही कारण तू माझ्याशी आता सगळं शेअर करू शकशील ते...thank you देवा तिचा आवाज परत दिल्याबद्दल...तिला आजसारखं च आनंदी ठेव हीच इच्छा आहे माझी तुझ्याकडे..."अजय मनातच बोलत असतो... सुशांती कडे तो एक नजर करून पाहतो...तर ती एकदम शांत,समाधानाने झोपलेली असते...

आज दोघ आतून सुखावले होते...कारण ते आज पूर्णपणे एकमेकांचे झाले होते...आता त्यांचे नाते एकदम घट्ट झाले होते...त्या नात्याला आता एक वेगळी ओळख मिळाली होती...खऱ्या अर्थाने ते आता पूर्ण झाले होते...
.
.
.
.
.
.
क्रमशः
*********************

रेट करा आणि टिप्पणी द्या

Jayashri

Jayashri 2 दिवस पूर्वी

Priya Gavali

Priya Gavali 1 महिना पूर्वी

SAMRADNYI

SAMRADNYI 1 महिना पूर्वी

madhuri devarde

madhuri devarde 1 महिना पूर्वी

Megha

Megha 2 महिना पूर्वी