तू अशीच जवळ रहावी... - 15 Bhavana Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

तू अशीच जवळ रहावी... - 15

मागील भागात:- भावना आणि मृत्युंजय पंजाब ला जातात...

आजच्या भागात:-

पंजाब मध्ये जाऊन तेजोधराच्या हळदीच्या रस्म करून भावना आणि मृत्युंजय तिथून निघून जातात...मृत्युंजय तिला जेटने घेऊन जातो पण कुठे जायचे हे अजिबात तो तिला सांगत नाही...मॅडम गाढ झोपलेल्या असतात त्यामुळे तोच तिला उचलून घेतो आणि तिथून बॉडी गार्ड सकट एका ठिकाणी तिला घेऊन जातो...

"हेय प्रिन्सेस उठ की बघ आपण आलो..."तो तिला हातात घेऊन बोलतो...तरीही ती त्याच्या आवाजाने उठत नाही...उलट त्याला पकडून झोपी जाते...तीच अस वागणं पाहून तो गालात हसतो...ती काही उठणार नाही हे त्याला कळते म्हणून तो तिला आतमध्ये घेऊन जातो आणि मोठया अश्या बेडवर व्यवस्थित झोपवतो...हसून तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवून तो फ्रेश होयला निघून जातो...मस्त असा फ्रेश होऊन तो तिच्याजवळ येतो आणि तिला कुशीत घेतो...तीच ते झोपेतील सौंदर्य पाहून त्याला स्वतःचा हेवा वाटतो...कमनीय बांधा,गोरी गोमटी,नाजूक असे गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ...कोरीव डोळे आणि नाक...भांगेत त्याच्या नावच सिंदूर तिने लावलं होत तर हातात लाल बांगड्या...गळ्यात एक काळ्या मण्यांचं, डायमंड च अस  मंगळसूत्र होत...तीच ते सौंदर्य पाहून त्याचे कानशील गरम झाले...त्याचे हार्ट बिट्स देखील वाढले गेले होते...आपोआप तो थोडस तिच्यावर झुकला आणि तिच्या गळ्यावर स्वतःचे ओठ टेकवत होता... हळूहळू तो तिच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ फिरवत होता...त्याच्या अश्या करण्याने तिला जाग आली...त्याचे गरम श्वास तिला स्वतःच्या मानेकडे जाणवू लागले...तसे तिने त्याला घट्ट धरले...तिच्या अश्या करण्याने तो भानावर आला...

"सॉरी प्रिन्सेस..."तो अस म्हणून तिच्यापासून दूर होतो आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला झोपी जातो...त्याला स्वतःच्या वागण्याचा राग येत होता....मान्य आहे त्याला ती त्याची आहे पण तिला हे आवडेल का नाही हे न जाणताच तो अस करत होता...आधीच दोघांनी खूप काही सहन केले होते...त्यात त्याने अशी चूक केल्याने त्याला कसतरी वाटत होते...तिला ते जाणवलं...तिने एक सुस्कारा सोडला आणि त्याच्या बाजूला सरकली...मनात असलेल्या भीतीला थोडस तिने बाजूला ठेवले आणि मागूनच त्याच्या उघड्या शरीरावर स्वतःच्या हातांचा विळखा घातला...हळुच त्याच्या पाठीवर स्वतःचे नाजूक ओठ टेकवले...तिच्या अश्या वागण्याने त्याने डोळे बंद केले...ती उठली आणि त्याच्या समोर जाऊन त्याच्या कुशीत शिरली...

"एवढा का विचार करता तुम्ही??"ती त्याच्या गळ्यावर स्वतःचे ओठ टेकवत त्याला विचारते...

"सॉरी प्रिन्सेस तुला वाईट वाटेल म्हणून..."तो तिला कुरवाळत बोलतो...

"मिस्टर मृत्युंजय तुम्ही माझे मिस्टर आहात सध्या... त्यामुळे नका विचार करू...मला फक्त तुम्हीच पाहिजे आणि कायमची तुमचं व्हायचं आहे..."ती अस म्हणून हसून त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवते...तिच्या अश्या वागण्याने त्याची तिच्यावरची पकड घट्ट होते...तो देखील तिला हळूहळू प्रतिसाद देतो...दोघांचे श्वास जड पडतात तस तो बाजूला होतो आणि तिला स्वतःच्या मिठीत घेतो...

"लव्ह you जय...🙈"ती लाजून चेहऱ्यावर स्वतःचे हात ठेवत बोलते...त्याला तिला अस करताना पाहून हसू येत... मोठी झाली होती पण अजूनही अतरंगी पणा तिने सोडला नव्हता...त्याने तो जपला होता...तिला ओरडला तरीही तरीही त्याला तिचे वागणे आवडायचे...खूप कमी प्रमाणात त्याला हे तीन शब्द तिच्याकडून ऐकायला मिळायचे...

"खूपच प्रेम ओतू जात आहे माझ्या प्रिन्सेसच..."तो हसून तिचे दोन्ही हात बाजुला काढून विचारतो...

"ना😌"ती...

"ना काय हा...झोप नाही आली आता???"तो...

"ना..."ती त्याच्या कुशीत शिरून बोलते...तीच बोलणं ऐकून त्याला हसायला येत...तिनेच तर त्या माणसाला हसायला शिकवलं होतो...अतरंगीपणा सोडला नव्हता तिने...

"शोना चल झोप आता...रात्रीचे 12 वाजले..."तो प्रेमाने तिला गोंजारत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती बाजूला होऊन गाल फुगवून दुसरीकडे तोंड करून झोपी जाते...

"अरे बापरे मांजर फुगली माझी..."तो हसून तिला मागून मिठीत घेत बोलतो...

"मी मांजर नाही आहे...😒"ती बोलत असते की क्षणात तिच्या साडीचा पदर खाली गळून पडतो...तिच्या ब्लॉउजची नॉट सुटली जाते...त्याचे गरम श्वास तिला पाठीवर जाणवतात...तशी ती गप्प राहून सरळ झोपते...तो हसून तिचे हात स्वतःच्या दोन्ही हातात गुंफवतो...एक वार तिच्याकडे पाहतो...त्याचे नशिले डोळे आणि तिच्या डोळ्यात असलेल त्याच्या प्रतीच प्रेम पाहून दोघांना बर वाटत...हेच तर ते दोघे एकमेकांत शोधत होते...आज त्याला ते मिळालं होतं म्हणून समाधाने तो थोडस खाली झुकून तिच्या कपाळावर,डोळ्यावर,गालावर स्वतःचे ओठ टेकवतो...शेवटी तो तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिला आपलंसं करतो...हळुहळु तिच्या कपड्यांचे अडसर तो दूर करतो आणि तिच्यावर प्रेम वर्षाव करायला लागतो...ती देखील स्वतःला त्याच्या प्रेमात भिजू देते...दोघांचे श्वास चांगले वाढले होते...दोघांनि प्रणय क्रीडेचा परमोच्च बिंदू गाठला होता...पूर्ण जगाचे भान विसरून ते दोघे आपल्याच जगात रममाण झाले होते...मध्यरात्री कधितरी ती झोपते त्याच्या कुशीत सरकून तसा तो तिला सोडतो आणि स्वतःच्या कुशीत घेतो...त्याचा डोळा लागतच असतो की त्याला कसलीतरी चाहूल लागते...तसा तो हळूच तिला बाजूला करतो आणि व्यवस्थित स्वतःच शर्ट आणून तिला घालून व्यवस्थित पांघरूण ओढून झोपू देतो...

"प्रिन्सेस मी तुला काहीच होऊ देणार नाही...पण त्या आधी काही लोकांचा समाचार घ्यावा लागेल..."तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून बोलतो...अंगावर शर्ट चढवून तो व्यवस्थित रूम लॉक करून तिथून बाहेर पडतो...जिन्यावरून खाली येत असतो की मागून कोणीतरी त्याला मारायला धावून येत...तसा तो त्या व्यक्तीचा हात पकडून मुरगळतो...

"मृत्युंजय सरदेशमुख आहे मी....😡बोल का आला आहे तिच्या आजूबाजूला फिरण्याचे प्रयत्न पण करू नको..."तो हात मुरगळत बोलतो...त्याच नाव ऐकून तो व्यक्ती घाबरतो...मृत्युंजय त्याला काही कळायच्या आत एक पंच देतो...तसा तो व्यक्ती जिन्यावरून खाली पडतो...जय रागातच खाली येतो...तो खाली येऊन एक जळजळीत कटाक्ष हॉलवर टाकतो...कारण हॉलमध्ये 30 ते 40 लोक जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले असतात...त्यांच्यासोबत काळ्या कोर्ट वाले तकडे असे बॉडी गार्ड उभे असतात...

"अलेक्झांडर गन..."मृत्युंजय त्याच्या बॉडी गार्डच्या में हेड ला बोलतो...तसा अलेक्झांडर त्याला गन देतो...मृत्युंजय खाली उतरून ती गन घेतो...

"ज्याने तुम्हाला पाठवलं बहुतेक त्याला खबर नाही मृत्युंजय सरदेशमुख काय चीझ आहे ते...😡माझ्या wife च्या केसाला पण मी कोणाला हात लावू देणार नाही..."मृत्युंजय अस म्हणून त्या समोर असलेल्या माणसाच्या कपाळावर गन चालवतो...त्याने गन चालवल्यामुळे त्या माणसाचे रक्त सगळीकडे पडते...तो काही क्षणात खाली पडतो...

"अलेक्झांडर सगळं साफ कर...भावना ला काहीच कळलं नाही पाहिजे...😡या लोकांचा कायमचा बंदोबस्त कर..."मृत्युंजय प्रचंड रागात बोलतो...तो ऑर्डर देऊन जातच असतो की तेवढ्यात तिथं असलेल्या एका माणसाचा फोन वाजतो...तसा जय त्याच्याकडे जातो आणि त्याचा मोबाईल घेतो...

📲"हॅलो मिळाली का ती?घेऊन ये तिला आपल्या अड्ड्यावर..."पलीकडून एक माणूस बोलतो...

📲"हात लावायचा विचार सोडून दे तू....😡ती भावना सावंत नाही राहिली....ती मिसेस मृत्युंजय सरदेशमुख झाली आहे...मी जिवंत असे पर्यंत तिला काहीच होऊ देणार नाही..."मृत्युंजय रागात बोलतो...त्याचा आवाज ऐकून पलीकडचा घाबरून फोन कट करतो...मृत्युंजय रागात फोन फेकून देतो...त्याच्या बॉडी गार्डला मृत्युंजयचा राग माहिती असल्याने ते गप्प राहतात...

"अलेक्झांडर भावनाच्या फॅमिलीला आपल्याकडून प्रोटेक्शन दे...हे सगळं 10 मिनिटात साफ करा..." मृत्युंजय ऑर्डर देत बोलतो...त्याची ऑर्डर येताच सगळे जण बरोबर 10 मिनिटात गुंडाचा खेळ खल्लास करून घर होत तस साफ करून ठेवतात...ते पाहून मृत्युंजय रूममध्ये निघून जातो...तो बेडवर येऊन झोपलेल्या भावनाला जवळ घेतो...

"झोपा ना तुम्ही...😣"भावना झोपेतच त्याच्या गळ्यात हात घालून बोलते...तिच्या अश्या करण्याने तो गालात हसतो आणि तिला स्वतःच्या अंगावर घेऊन घट्ट मिठी मारून विचार करतो...

"काहीच होऊ देणार नाही मी तुला...एकदा तुला गमवताना खूप काही सुटून चाललं अस वाटलं...पण तू जेव्हा अशी जवळ आली ना माझ्या...तेव्हा जगातील सगळ्यात मोठी गोष्ट मला मिळाली अस वाटलं...तुझं हसन,लाजण पाहून एक वेगळीच एनर्जी मिळते...मग अश्या माझ्या प्रिन्सेस ला मी कोणालाच हात लावू देणार नाही...लव्ह you too माय प्रिन्सेस..."मृत्युंजय तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवत बोलतो...तो एकदम घट्ट मिठी मारून अंगावर पांघरूण ओढून झोपी जातो...

लहानपणापासूनच प्रेम होतं त्याच तिच्यावर असच थोडी तो कोणालाही तिला घेऊन जायला देणार होता...जेव्हा तो  तिच्या प्रेमात रंगत होता...तेव्हाच त्याला त्याच्या बंगल्यावर चढून येणाऱ्या लोकांची जाणीव हातातील watch च्या कॅमेऱ्यातून झाली होती...त्याने तिला बाजूला करून watch मध्ये असलेले बटन दाबून त्याच्या गार्डला सिगनल दिला...तसे गार्डने सगळयांना धुवून काढले...इकडे जय गुढपणे हसून तिच्या प्रेमात रंगत गेला...तिला झोपवून तो बाहेर आला आणि त्या गुंडाचा समाचार घेतला...ती मात्र या सर्वांपासून अज्ञान होऊन एकदम शांतपणे झोपली होती....तिचा आनंद त्याला तसाच राखून ठेवायचा होता म्हणून तो गप्प होता...

दुसऱ्या दिवशी तिला लवकरच जाग येते...ती डोळे किलकिले करून पाहते तर जय जवळ दिसतो...त्याला स्वतःच्या जवळ पाहून तिला कालची रात्र आठवते...तशी ती गोड लाजते...झोपेत असलेल्या त्याला पाहून तिला खूप भारी वाटत...खूप क्युट आणि हॅन्डसम तो दिसत होता...ती हळूच स्वतःचे नाजूक हात त्याच्या केसांवर प्रेमाने फिरवते....हळूहळू ती त्याच्या चेहऱ्यावर येते...तिच्या अश्या वागण्याने त्याला जाग येते...त्याची तिच्यावरची पकड घट्ट होते...

"कालची नशा उतरली नाही का???"तो खट्याळपणे तिला विचारतो...तशी ती लाजून मान हलवत नाही बोलते...तसा तो तिला स्वतःच्या अंगावरून बाजूला करतो...

"मला पण हवी असते तू....पण आता नको प्रिन्सेस... त्याने तुला त्रास होईल...आता कुठ तू बरी झाली आहे..."तो तिच्या डोळ्यांत आरपार पाहून तिला बोलतो...

"एवढी काळजी माझी"ती त्याच्या गळ्यात हात गुंफवत विचारते....

"प्रिन्सेस मी तुझ्यावर प्रेम केलं तुझं सौंदर्य पाहून नाही...तुझ्यात स्पेशल आहे काहीतरी म्हणून मला तू आवडते..."जय तिला प्रेमाने समजावत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून तिला खूप भारी वाटते...ती पटकन त्याच्या मिठीत शिरते...

"थॅंक्यु..."ती...

"चल झोप आता 4 वाजले प्रिन्सेस...बाहेर थंडी आहे..." तो...

"पण डायरी नाही वाचणार का😕??"ती...

"शोना मला खरच झोप आली आहे...प्लीज झोप ना...खूप दिवस आहेत आपल्याकडे तेव्हा वाचू...आता झोप...थंडी वाजत आहे ना तर तू कपडे बदल जा..."जय तिला उठवत बोलतो...तशी ती पुन्हा बेडवर झोपते...

"तुम्ही झोपा ना मला कुशीत घेऊन...मग थंडी नाही वाजत..."ती लहानमुलीसारखं हट्ट करत बोलते...तिचे बोलणे ऐकून तो हसतो आणि बेडवर पडून तिला जवळ घेतो...ती पिल्लासारखी त्याच्या उबदार मिठीत शिरून गप्प पडते...तो हसूनच तिला घट्ट मिठीत घेतो...तिच्या गोबऱ्या गालावर तो चावतो...तशी ती त्याच्यापासून दूर होऊन गाल चोळते...

"अहो नका ना अस करू😣"ती...

"मला कोणी बाईट केले😄...त्याची परतफेड..."तो तिच्याजवळ जाऊन तिला गुदगुल्या करत विचारतो...तशी ती खुदुखुदु हसू लागते...

"जय नका ना त्रास देऊ मला..."ती हसून बोलते...तसा तो थांबतो आणि तिच्या बाजूला पडतो...

"किती प्रेम करायची तरीही त्रास देत होतीस ना मला..."तो तिला जवळ घेऊन विचारतो...

"शॉरि...."ती...

"मी जर तुझ्यावर प्रेम करत नसलो असतो...म्हणजे जर माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग नसल्या असत्या तर तू काय केलं असत..."तो शांतपणे तिला विचारतो...त्याच्या अश्या प्रश्नांने ती वरती नजर करते...

"जर अस नसलं असत तर तुमचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिला तुम्हाला भेटवण्यासाठी आणि तुमचं प्रेम कळण्यासाठी प्रयत्न केले असते...कारण प्रेमात त्याग ,विरह या गोष्टी होत असतात...80%लव्हस्टोरी मध्ये हेच पाहायला मिळत...प्रेम हे निस्वार्थी असावे...आपलं प्रेम जर आनंदी राहत असेल इतरांसोबत तर त्यात आपण खुशी मानून पुढे जावं..."ती डोळ्यात पाणी साठवून बोलते...तिच्या आवाजाची जरब पण कमी झाली होती...तीच बोलणं ऐकून त्याला पण कसतरी वाटत...

"प्रिन्सेस सॉरी ना बाबा...पुन्हा कधीच नाही सोडून जाणार..."जय तिला जवळ घेऊन बोलतो...

"तुम्ही तर त्यादिवशी गेला होतात जय...माझं काहीही ऐकून न घेता...😢जेव्हा प्रेमाची कबुली द्यायची वेळ आली माझ्यावर तेव्हा तुम्ही नव्हता माझ्याकडे...15 दिवस ते वर्षासारखे वाटत होते मला...आयुष्य बनला होतात तेव्हा तुम्ही माझे आणि तुम्ही..."ती रडत रडत बोलते...त्याला तिचे ते बोलणे टोचते...तो पटकन तिला जवळ घेतो...

"शु$$$$$ सॉरी ना बाळा...आता अजिबात तुला सोडून जाणार नाही..."तो प्रेमाने तिला समजावत बोलतो...

"नक्की नाही जाणार ना...??"ती त्याच्या कुशीतून बाहेर येऊन विचारते...

"कधीच नाही...प्रॉमिस..."तो तिच्या कपाळावर स्वतःच कपाळ घासत बोलतो...

"आता नको ना रडू...मला त्रास होतो..."तो तिचे डोळे पुसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती रडता रडता हसते...

"चला झोपा आता..."ती त्याच्या कुशीत शिरून त्याला पकडून बोलते...

"हो झोपतोय मी...तुझ्याजवळच राहणार मी नेहमी...तुझाच आहे..."तो तिला बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती शांत झोपी जातो...तो मात्र तिला पाहत असतो...

"तुला मी अजिबात त्याग,विरह या गोष्टी करायला देणार नाही...आपल्या लव्हस्टोरीत अस काहीच होणार नाही...तू फक्त माझीच आहे..."तो तिला पाहून बोलतो...तो विचार करत असतो तेवढ्यात त्याचा फोन vibrate होतो...तसा तो टेबलवरचा फोन उचलतो...

📱"हॅलो दादा,तू सांगितलेल काम झालं आहे..." पलीकडून एक आवाज येतो...

📱"कोण आहे ती व्यक्ती???मानसी असेल तर तिला संपव...😡माझ्या संसारात पुन्हा ते नाव नाही पाहिजे..."मृत्युंजय रागात बोलतो...

📱"दादा ती फक्त एक प्यादा आहे...असली राजा राणी वेगळी आहेत...आम्ही लवकरच शोधून काढू..."तो

📱"प्रेम मला लवकरात लवकर हवं आहे सगळं...मानसी चा बंदोबस्त करून टाक...मी भावना नाही आहे माफ करायला...मृत्युंजय आहे..."मृत्युंजय

📱"आम्ही नाही शोधल तरीही तू काढशीलच ना...बर ते जाऊदे वहिनी कशी आहे..."प्रेम...

📱"बरी आहे...खूप प्रमाणिक,प्रेमळ आहे रे ती म्हणून तिला जपावे लागत आहे..."मृत्युंजय भावनाकडे पाहून बोलतो...

📱"हो दादा चांगल्या आहेत त्या म्हणून या गोष्टी पासून दूर ठेवले ना आपण...वेळ आली की सांगू त्यांना... तोपर्यंत दोघे एन्जॉय करा..."प्रेम थोडस हसून बोलतो...

📱"हुं... चल ठेवतो...."मृत्युंजय अस बोलून फोन कट करतो...तो watch मध्ये टाईम पाहतो आणि उठतो...तो तीला व्यवस्थित झोपवून फ्रेश होऊन खाली निघून जातो...

"जय बाबा तुम्ही इथे...??आमचं काही आवडत नाही का??"मृत्युंजयला किचनमध्ये पाहून एक सर्वेन्ट त्याच्या जवळ येत बोलते...

"आंटी तुम्ही सगळेजण जावा माझी बायको पहिल्यांदा तिच्या घरी आली आहे...तर मी करेन तिच्यासाठी... पंजाबी आणि साऊथ चे पदार्थ आवडीचे आहेत आमच्या मॅडमचे...😊"मृत्युंजय थोडस हसून अप्रोन अंगावर घालत बोलतो...त्याला तस करताना पाहून सगळे शॉक होतात...कारण तो सहसा किचनमध्ये कधी जायचा नाही...पण आज भावनासाठी तो स्पेशल आला होता... कारण त्याला तिच्या आवडी निवडी लहानपणापासून माहिती होत्या...

"आंटी जावा तुम्ही करतो मी...😊"तो अस बोलून कामाला लागतो...सर्वेन्ट लोक तिथून निघून जातात...जय मात्र आपलं आपलं काम करत असतो...

खूप वेळा नंतर भावनाला जाग येते तशी ती उठते आणि फ्रेश होते...ती जयचाच एखादा शर्ट घालते...केस असे वरती कल्चर मध्ये बांधून आळस देत खाली येते...ती आजूबाजूला पाहते तर भलमोठं घर असते...ते पाहून ती घाबरते आणि तिथुनच पळत असते की तिला जयची हाक येते....

"प्रिन्सेस तुझ्या माझ्या शिवाय इथे कोणीच नाही...त्यामुळे ये तू..."जय हसून तिला बोलावतो...कारण जयच शर्ट जे तिला ढोपरा पर्यंत येत होतं तेच तिने घातलं होत...म्हणून ती थोडीशी घाबरत होती...जय तिचे खांदे पकडून तिला घेऊन जातो आणि डायनींग टेबलच्या चेअरवर बसवतो...

"Welcome to सरदेशमुख विल्हा मिसेस मृत्युंजय..." मृत्युंजय हसून बोलतो...त्याचे तसे बोलणे ऐकून ती घाबरते आणि आसपास पूर्ण घरावर एक नजर टाकते...

”जय ना हा...अस नका बोलू हा....😰जे मी समजते तेच आहे हे खरं आहे अस नका बोलू..."ती थोडीशी घाबरत हळू आवाजात बोलते...

"तू जे समजतेच तेच आहे मिसेस मृत्युंजय..."जय हसून तिला भरवत बोलतो...

"व्हॉट😱 नो नो हे अस कस शक्य आहे...मी इथे कशी..."ती चेअरवरुन उठत बोलते...

"प्रिन्सेस कशाला घाबरते...मी आणलं काल तुला...आई बाबांना सांगून..."तो...

"एवढ्या दूर आणलं तरीही मला कस कळलं नाही...??" ती...

"मांजर झोपली होती तू...😝एव्हढ्याश्या मेंदूला का त्रास देते...चल बसून खा..."जय हसून तिला बसवत बोलतो...

ये वाव माझे फेवरेट मेदूवडे ..."ती समोर पाहत बोलते...तिला ते पाहून खूप आनंद होतो...तशी ती पटकन  प्लेट मधील एक उचलते...ती एक बाईट हातात घेऊन खाते आणि कसतरी करते...🤢पण आसपास जयला पाहून ती गपचूप खाऊ लागते...

"कस झालं ते सांग की शोना..."तो excite होऊन विचारतो...त्याने विचारल्यामुळे ती त्याच्याकडे पाहते...

"हा हा मस्त...खूप भारी...मला हे सगळं आवडलं म्हणून मी एकटीच खाणार...😅सॉरी जय...यावेळी नाही नेक्स्ट टाईम देते हा खायला..."ती सगळं स्वतःकडे घेऊन कसनुसपणे हसून बोलते...जयला तर तीच वागणं अजीब वाटत पण इकडे ती सगळं खायला लागते...

"प्रिन्सेस तू हे खा...मी दुसरे आणतो माझ्यासाठी..."तो अस बोलून किचनमध्ये जात असतो की ती त्याचा हात पकडते...

"अहो अहो नको खाऊ...तुम्ही तुमचे हेल्दी फूड खावा ना डायट वाले...मी हे खाते..."ती त्याला अडवत बोलते...

''प्रिन्सेस काय झालं तुला??खरच चांगलं आहे का हे???" तो अस म्हणून नकळत तिची नजर नसताना मेदुवडा उचलून खातो...ती घाबरून डोकं धरते...😐
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः

          ©®भावना सावंत(भूवि❤️)
          

---------------------------------

आजचा भाग कसा वाटला कंमेंट द्वारे नक्की कळवा...😊भेटू पुढील भागात लवकरच...😝


रेट करा आणि टिप्पणी द्या

Kale Kalyani

Kale Kalyani 2 महिना पूर्वी

sanjana kadam

sanjana kadam 3 महिना पूर्वी

Swati Jagtap

Swati Jagtap 3 महिना पूर्वी

टिना

टिना 3 महिना पूर्वी

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 महिना पूर्वी