Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 39

स्थळ : मुंबई  ठिकाण  : भारत सिनेप्लेक्स  थीटर       रात्री   12:30 am            समोरुन पाहता एक भलीमोठ्ठी  निळ्या रंगाच पेंट दिलेली  उंचीने पंधरा फुट - लांबीने सत्तर फुट अशी एक भिंत दिसत होती.          भिंतीच्या मधोमध अकराफुटांवर तपकीरी रंगाच्या लहान बल्बसचा वापर करुन -   त्याच लाईटमार्फत  मराठी अक्षरांत एक  नाव लिहिल होत ..( भारत सिनेप्लेक्स थीटर )   त्या नावात लाईटबल्बसचा वापर गेला होता- ज्याने  अवतीभवती खाली तपकीरी रंगाचा प्रकाश पडला होता. त्या नावाखाली   दोन झापांचा काळ्या रंगाचा  काचेचा बंद दरवाजा दिसत होता .         दरवाज्याच्या उजव्याबाजुला तिकिट बॉक्सची बंद  खिडकी होती ! ( ह्याचा अर्थ नक्कीच थीटर मध्ये सुरु असलेला पिक्चर हा शेवटचा शो होता.)        तसंच झाल सूद्धा !      काळ्या रंगाचा तो  बंद झापांचा दरवाजा उघड़ला  गेला , आणी एक तरुण व तरुणी चर्चा करतच बाहेर आले.         " वाव खुप छान मुवी होती  नाही ड्रेक्युला.. चाप्टर 1 !" तो तरुण आपल्या बाजुला असलेल्या तरुणीकडे पाहत म्हंटला.       "हो ना , खुप मज्जा आली!" ती तरुणी त्या तरुणाच्या वाक्याला प्रोत्साहन देत म्हंणाली.        " तू ती हिरोइन  पाहिलीस ईशा , काय मस्त एक्टींग केलीये तिने , नाही?" त्याच्या चेह-यावर हे बोलतांना एक वेगळंच आनंद झळकत होत.               " हो ना ! पुर्णत  मुवीभर तू फक्त तिलाच पाहत होतास ना ? म्हंणूनच तुला तो ड्रेक्युला सुद्धा दिसला नाही !" ईशाच्या वाक्यावर त्या तरुणाच्या चेह-यावर चोरी पकडल्यासारखे भाव पसरले , त्याच हसू झटकन विरल गेल , व जरासा गांगरल्यासारख करत तो म्हंणाला .       " व..व..व्हॉट..! अ..अ...अस काहीच नाहीये, तो ड्रेक्युला सुद्धा खुप डेंजरस होता. !" बोलतांना त्याची जरा बोबडीच वळाली होती.        " ओ मिस्टर धवल, तुमची ही नाटक माझ्या समोर नाही चालणार हं !" तीने हाताचा एक पंजा त्याच्या चेह-यासमोर धरला व ठसक्यात म्हंणाली.         तस ईशाला राग येण साहजिकच होत -   कारण धवल बोरे वय वर्ष ( 25 ), ईशा ईनामदार वय वर्ष (24  ) दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध जे होते -  गेल्या आठवड्यातच  धवलला एका कंपनित  नोकरी लागली होती, पगार चांगला तीसच्या आसपास  होता..        ज्याने ईशाचे वडील धवलला लेकीचा हात द्यायला तैयार झाले होते. - प्रेमाचा नात लवकरच नवरा -बायकोत बदलणार होत.         पण ईशाला सुद्धा डॉक्टर  व्हायचं असल्याने- सध्या तिच शिक्षण सुरु असल्याने लग्नगाठ जरा दूर ढकल्ली गेली होती.  आणी  ईश्याच्या ह्या निर्णयाला धवलसहित त्याच्या कुटूंबियांचाही बिल्कुल विरोध नव्हता.!         बर त्यांच खासगी आयुष्याच प्रवचन पुरे आता !पुढे पाहूयात.     तर आज  शनिवार असल्याने  दोघांनाही उद्या रविवारची सुट्टी होती - म्हंणूनच दोघेही लास्ट शो मुवी पहायला आले होते.          आणी आताला मुवी पाहून दोघेही पुन्हा घरी जायला निघालेही होते.         परंतू मध्येच ते रुसण- फुगण्याची केमिस्ट्री सुरु झाली होती.           ईशाचा राग तसा लटका होता ,  धवल नेहमीचंच तिला राग आला की गोड गोड बोलत मनवायला जायचा , ज्याने तिला रागवायला रुसायला फार आवडायचं  - सांगायचं झालं तर हेच , जर मनवणारा असेल , तर रुसायलाही आवडत !         आजही तसंच झालं!       " ए ईशा , अंग काय तू पण! यार ती फिल्म आहे ना !  "          " हो ना , ती फिल्मच आहे , मग जा त्या हिरोईनकडेच , माझ्याकडे नको येऊस ..!"   ईशाने हाताची घडी घातली- गाल फुगवले.         " ए ईशा , तिच्याकडे कस जाऊ ? " धवलने डोक चोळल ." ती तर स्क्रीनमध्ये राहते ना ? आणी तसंही माझी खरी हिरोईन तर तू आहेस  ! मला एक किस हव असेल तर  ती थोडी ना देईल..! "  धवलने तिचा एक हात धरला - व एका झटक्यात ईशाला आपल्या बाहूपाषात ओढल.          त्याच्या ह्या कृतीने तीच सर्व अंग शहारल,अंगावर सर्रकन काटा आला , पण हा काटा भीतीचा नव्हता , हे काहीतरी वेगळंच होत - रोमांटीक सेंस सारख!        धवलच्या एका कृतीने तिच्या  गाळांवर लाळी जमली होती, राग धुळीवर फुंकर मारावा तसा झटकन पळून गेला होता.      त्याची ती एकटक तिच्या ओठांकडे पाहणारी तहानलेली नजर तीने ओळखली होती.          " धवल , आजूबाजुला लोक आहेत !"         " हो मग  असुदेत ना  !" ( धवलने ईशाच्या कपाळावर आलेल्या केसांची बट हळकेच एक बोटाने दूर सारली " तसंही  मी काही त्यांची बायको-गर्लफ्रेंड माझ्या मिठीत घेतली नाहीये , माझ हक्क आहे तुझ्यावर - आणी माझ्या हक्काची आहेस तू ! "        " धवल..!"  तीने प्रथम धवलच्या मीठीतून स्वत:ला सोडवल. " हे बघ धवल , मी तुझीच आहे -  पण माझी अट तुला ठावूक आहे  ना ? जो पर्यंत मी डॉक्टर होत नाही तो पर्यंत लग्न करणार नाही ! आणी नाही तसं काही..!"            " ईशा, मला माहीतीये ! आणि मी तो पर्यंत थांबायला ही तैयार आहे !" धवल नेकमनाने म्हंटला.         त्याच्या त्या प्रांजळ स्वरात  कसलाही खोटेपणा जाणवत नव्हता ,व ते सत्य ही होत.     " अच्छा , तू थांबू शकतोस? मग हे काय होत !" तीने डोळे जरासे लहान केले.         " हे , ते तर मी अस्ंच  - तू गाल फुगवून बेडकीसारखी उंम्म करुन बसली होतीस . मग तुला मनवण्यासाठी केल मी." ( त्याने गाल फुगवून तिला चिडवल)          " अं व्हॉट! मी बेडकी?"         " हह्ह्ह्ह्ह्ह हो ..हो , येस बेडकी बट क्यूट..वाली.. !" धवल तिला  चिडवत  पुढे पुढे धावू लागला ..आणी  त्याला मारण्यासाठी ईशा त्याच्या मागे मागे धावू लागली.        मध्यरात्रीची वेळ झाली होती , आकाशात चांगलच पौर्णिमेचा चंद्र उगवलेला दिसत होता. नाईट वॉचमनसारखी रातकिड्यांची  किरकिर गुणगुणत होती...                मुंबईतल्या सुनसान रस्त्यावरुन  ती के:टी:एम धावत होती .  के:टी:एमच्या ड्राईव्हसीटवर धवल बसला होता, दोन्ही हात स्टेरिंगवर - आणी डोक्यावर हेल्मेट होत !         गाडीची चंदेरी हेडलाईट पेटली होती ..आणी ट्रेन्ड़ म्हंणून की काय दोन्ही बाजुच्या भगव्या साईड लाईटज टिम - टिम करत पेटत होत्या.      स्पीडोमीटर मध्ये  (100) अंक दिसत होत. ह्याच अर्थ गाडी  हवेला कापत  जात होती.         " ईशा गच्च धरुन ठेव !" जरा मोठ्यानेच धवल उच्चारला.          तसा  ईशाने दोन्ही हातांनी धवलच्या  शरीराला गच्च पकडून धरल.         " एवढी फ़ास्ट चालवायची काही गरज आहे का ? रेस थोडी लागली आहे ईथे !" मागून ईशा म्हंणाली.         " येस डियर असंच  समज की रेसच लागलीये   !कारण आपल्याला लवकर घरी पोहचायचं, खुप वेळ झालीये ना !"          " हो ते तर आहेच !" मग काहीतरी लक्षात आल्यासारख ईशा खोडकर स्वरात म्हंणाली. " नक्की वेळच झालीये ना , की त्या झोमटे क्रीएशनच्या स्टोरीजमधल्या भुतांची भीती वाटतीये..!" ईशा दात काढत हसली.   धवलच्या मात्र थोबाडावर चांगलेच बारा वाजले होते.                    तोच के:टी: एम रस्त्याबाजुला असलेल्या एका बंगल्याच्या फाटकापाशी थांबली.     गाडी थांबताच ईशा खाली उतरली.               " धवल , तुझी सर्व फैमिली आठवड्यासाठी  नेहमीप्रमाणे गावाला गेलीये ना ? मग आज वेळही जास्त झालीये सो  तू आमच्या ईथेच का नाही स्टे करत..!" ईशा काळजीयुक्त स्वरात म्हंटली.        " औह नो नो , जो पर्यंत आपल लग्न होत नाही ना ,  तो पर्यंत मी तुमच्या घरी  झोपू नाही शकत  !"        " का ?"  ईशाने न समजून विचारल.        " कारण, मी असतांना तुला कंट्रौल नाही होणार ,हिहिहिहिही!"  धवल खिखिखिखी करत हसू लागला..         त्याच्या त्या वाक्यावर ईशाला पुन्हा  राग आला..  ती पून्हा त्याला मारायला जाणार तोच त्याने क्ल्च सोडल... व गाडी वेगान तिथून निघुन गेली..        ईशा त्याच्या गाडीला पुढे पुढे जातांना पाहत होती -तिच्या चेह-यावर एक मंद स्मित हास्य होत , मग तीने नाही- नाही अशी स्वत:शीच मान होकारार्थी  हळवली..        व फाटक उघडून आत निघुन गेली.   xxxxxxxxxxxxxx          तीस मजल्याची  उंच बिल्डींग दिसत होती.  बिल्डींगच्या भिंतीना पिवळसर रंग दिला होता.        रात्रीची वेळ असल्याने बिल्डींगमधल्या सर्व रुमच्या लाईटस ऑफ होत्या ! नक्की रात्र असल्यानेच ऑफ होत्या ? की आणखी काही झ्ंजाट होत ?  नाही म्हंणजे शहरातली लोक लवकर झोपत नाहीत ना ! बरोबर ना ?       त्या तीस मजली बिल्डींगला  चारही बाजुंनी सुरक्षेखातर दहा फुट उंचीच भक्कम बांधणीच कंपाउंड होत.           कंपाउंड मधोमध एक दोन झापांच भलमोठ्ठ बंद  गेट दिसत होत -         गेटपासून पुढे दहा पावलांवर डांबरी रस्ता होता , त्याच रस्त्यावरुन एक के:टी: एम आली,  पुढच्या हेडलाईटचा चंदेरी प्रकाश  काळ्याशार गेटला चांदीसारखा चमकवून गेला..         धवल ह्याच बिल्डींगमध्ये राहत होता - त्याची गाडी गेटबाहेर थांबली होती.        'पि..पिं...पिप..!' धवलने दोन तीन वेळा हॉर्न वाजवल .         एनवेळेस एका हॉर्नने वॉचमन धावत गेट उघडायला यायचा , पण आज मात्र तीनदा हॉर्न वाजवून सुद्धा , वॉचमन काही आला नव्हता.          " ए बाबू..? ए बाबूराव?" धवलने वॉचमनच नाव घेत त्याला हाक दिली.          " कुठे  गेला हा  बाबू? " धवलने गेटमधून आत पाहिल , गेटबाजुला बाबू बसायचा ती लाल रंगाची रिकामी खुर्ची तिथेच होती.          " खुर्ची तर ईथेच आहे , नक्कीच हा बेवडा बाबू  आज पण बागेत दारु ढोसत बसला असेल! असो  मी तरी कुठे अंबानीचा जावई आहे , एक दिवस गेट उघड़ल  तर माझी काही पंचाईत होणार नाही ! चलो धवलभाई गेट उघडो..!"  धवल.स्वत:शीच म्हंटला .. गाडीवरुन उतरला..    गेटपाशी आला..!           गेट सळ्यांच होत , त्याचा पातळसर हात जाईल ईतकी  फट नक्कीच होती.. !         गेटच्या सळ्यांमधून  आत हात घालत त्याने , गेटची कडी उघडली - व हळूच  गेट गाडी आत जाईल तेवढच उघड़ल..          गेट उघडून धवल पुन्हा गाडीपाशी आला, की स्टार्ट वरुन गाडी स्टार्ट केली ..!         पण हे काय? गाडी स्टार्ट होतीये कुठे ?         " शट! आता या गाडीला काय झालं ? हे देवा नक्की कसली परिक्षा घेतोयस माझी!  आधी हा बाबू? आता ही गाडी.? ठिक आहे , कीक मारतो..!"         धवलने अस म्हंणतच उजव्या पायाने गाडीची कीक मारली , पण नशीबाने साथ सोडली होती. गाडीच इंजिन काही केल्या सुरु होत नव्हत !          कारण   नियतीच्या मनात काहीतरी वेगळ होत ! काहीतरी विचीत्र, कृल्पती, वाईट  घडण्याच्या मार्गावर होत , त्याची सुरुवात ही झाली होती !    फक्त सावज अजाण होते - होय धवल पुढे घडणा-या घटनेपासून पुर्णत अजाण, अनभिज्ञ - होता.        मुंबई : गोल्डहेवन सोसायटी    उघड्या गेटमधून  धवलने दोन्ही हातांनी गाडीची स्टेरिंग पकडून गाडीला धक्का देत  सोसायटी एरीयेत प्रवेश दिला ..!          धवल पुन्हा  जागीच थांबला , गाडीच स्टेंन्ड़ लावल, व मागच गेट पुन्हा लावून घेतल.    हळकेच समोर वळला ,  वळताच ईतका वेळ जी गोष्ट त्याच्या नजरेस पडली नव्हती, जी गोष्ट ध्यानी आली नव्हती ,  त्या सर्व गोष्टीची जाणीव त्याला झाली.         धवलच्या मागे गेटच्या सळ्यांमधून त्याची पाठमोरी आकृती उभी दिसत होती -         आणी त्याच्या पाच फुट आकृतीच्या पुढे ती तीस मजली अंधारात बुडालेली बिल्डींग दिसत होती.        तीस मजल्याच्या त्या  बिल्डींगमध्ये एका ही फ्लैटची लाईट न पेटलेली पाहून , धवलला फारच आश्चर्य वाटलं होत !           खरतर ही गोष्टी न पटणा-यांमधलीच होती ! कारण शहरात लोक तीन- चार वाजेपर्यंत जागी असतात !          त्याने तसं पाहिलही होत ! पन आज? ही बिल्डींग -ह्या बिल्डींगमधला एक नी एक फ्लैट कालोखाच्या नदीत बुडाला होता .        त्या सोसायटींमधल्या फ्लैटना असलेल्या पारदर्शक काचेंकडे पाहता अस भास होई , की काचेंना गढुळ काळशार शेवाळ थापली आहे !           " लाईट तर गेली नाही ना?" धवलने मनोमन विचार केला , पन कस शक्य आहे ? सोसायटीचा खालचा एरिया -खाली ते विजेचे खांब पेटले होते , त्या विजेच्या खांबांचा प्रकाश चारही दिशेना पडला होता.     खालची  त्रिकोणी आकाराची वेगवेगळ्या रंगांची ब्लॉकची लादी स्पष्ट दिसत होती.    त्यासहितच हिरव्यागार गार्डनमध्ये सूद्धा विजेचे खांब जळत होते.              अचानक एक थंड हवेची झुळुक न जाणे कोठून आली असावी? की ईथल वातावरणच थंड झालं असाव ?  कारण धवलच्या सर्व शरीराला गारठा जाणवत होता.    ईतका की  थंडीने  दात वाजायची बाकी होती. त्यासहितच अवतिभवती एक  विळक्षण स्मशान शुकशुकाट शांतता जाणवत होती.          " बापरे ! ही बिल्डींग नक्की मी राहतो तिच आहे का ? की कोण्या दुस-या बिल्डींगमध्ये घुसलोय ?  कसली डेंजर शांतता आहे ही ? आणी एकही रुमची लाईट का नाही पेटलीये ? नक्की -नक्की काय चालू आहे ईथे आज ? " धवलला खात्री होती ही आपण राहतो तीच सोसायटी  आहे , पण नजरेला जे दृष्य आज दिसत होत , ते फारच विचीत्र - आविश्वसनिय होत.              " औह नो यार  , मरु देत ! ईथे काही भुताचा लोचा झाला असेल तर ! नाही , नाही !  धवल बेटा  आताच्या आता रुममध्ये सटक , नाहीतरी मी काही विक्राल गबराल मधला विक्राल नाही , जो भुतांना पकडतो ! चल धवल - चल लवकर..!" धवलने गाडीकडे पाहिल , भीतिने त्याची चांगलीच बोबडी वळली होती.  अवतीभवतीची भीतीदायक वातावरण निर्मिती मनावर भीतिची छाया सोडून गेली होती.  शेवटी त्याने आपली टू- व्हीलर सुद्धा गेटबाजुलाच जरा दुर पार्क केली." गाडी ईथेच ठेवतो , नाहीतरी मी जिवंत राहिलो तरच चालवायला भेटेल !"  धवल स्वत:शीच म्हंटला.          घाबरत - घाबरत बिल्डींगच्या दिशेने जाऊ लागला..!         पन्नास मीटर अंतरावर अंधारात बुडालेली विंग होती , जिन्याबाजुला लिफ्ट होती - लिफ्टच्या लाल रंगाच्या पावाएवढी बटन अंधारात , पिशाच्छासारखी लालसम - जळजळाटीत नजरेसहित चकाकत - चमकत होती.            ती लिफ्ट होती म्हंणून बरच झालं ! नाहीतर त्या अंधारात बुडालेल्या जिन्यातून तो चालत जाऊ शकला असता  का ?  त्या अंधारात काहीतरी वावरत असताना ? छे  विचारच करवत नाही!         घाबरत - घाबरत धवलची पावल बिल्डींगच्या दिशेने पडत होती - तोच त्या स्मशान शांततेत मध्येच तो आवाज आला.          " उंम...उंम...उंम..!"  कोणीतरी तोंड दाबून ठेवाव आणी तो बचावात्मक हाक देतांना , जस घशातून श्ब्दांची साथ नसलेला ध्वनी स्वर बाहेर पडावा तसा हा आवाज होता.          धवलच्या कानांनी तो आवाज स्पष्ट ऐकला होता. त्याची पावले जागेवर थांबली होती , कान आवाजाच शोध घेत होते , नजर अवतीभवती फिरत होती.          तोच आवाजाची दिशा कळाली! आवाज सोसायटीच्या बागेतून येत होता.बाग तशी जास्त मोठी  नव्हती- पण झाडे जास्त असल्याने घनगर्द झाडांची होती .          त्याच बागेत कोणालातरी मदत हवी होती. तो बाबू वॉचमन ? तोच तर नसेल ? धवलच्या मनात प्रश्ण आला.    पावलांचा बिल्कुल आवाज न होऊ देता चोर पावलांनी धवल बागेत शिरला..!         नुसत्या वीस- पंचवीस पावलांनीच त्याच्या अवतीभवती मोठ-मोठ्या झाडांची गर्दी जमली होती ..त्याच झाडांजवळून हळकासा सफेद रंगाचा  धुका वाहत पुढे जात होता.         अंगाला जाणवणारी थंडी  आता अधिक पटीने जाणवत होती.  ही विषारी जहरी थंडी काहीतरी वेगळीच होती , मांसातून ,स्नायूत , मग थेट हाड गोठवत होती..         जस की ह्या थंडीत मानव नाही, तर मेलेली प्रेतफिरत आहेत!             एका झाडाजवळून धवल पुढे चालत निघाला होता - तोच कानांवर तो आवाज आला.        " ए सोडा मला, सोडा ! कशाला पकडलं आहे मला?"          आवाज ओळखीचा होता , त्याआवाजासहितचधवल सावध झाला , बाजुच्या झाडापाशी लपून बसला  - झाडाच्या खोडाआडून त्याने चोर नजरेने समोर पाहिल..!            धवलपासून  चाळीस मीटर अंतरावर  - हिरव्यागार गवतावर एक  चार फुट उंच - व सहा फुट रुंद त्रिकोनी आकाराचा टेबल ठेवला होता.         त्या टेबलाला नीट पाहिल  तर तो एक ईल्यूमिनातीचा डोळा दिसत होता.         त्याच टेबलावर  वॉचमन बाबूला हात- पाय बांधून झोपावल होत.          आणी त्या बाबूच्या अवतीभवती एकूण पाचमानवी  आकृत्या उपस्थीत होत्या.         त्याच पाचमानवी आकृत्यांमधल्या - चार आकृत्यांच्या अंगावर एक सफेद रंगाचा त्रिकोणी टोपी असलेला झगा होता , ज्याने त्यांचे चेहरे दिसत नव्हते.शेवटला जी  पाचवा  आकृती होती , नक्कीच त्यांचा लीडर असावा ? कारण त्याचे कपडे वेगळे होते. अंगावर एक लाल रंगाचा जबबा होता .         त्या जबब्याला एक ताठ कॉलर होती - चेहरा झाकण्यासाठी  त्रिकोणी टोपी नसून लाल रंगाने - नक्कीच ताज्या रक्ताने चेहरा रंगवला होता.          " ओह सोडाना  मला , कशाला पकडल आहे मला , बोला की..?"  पुन्हा बाबूचा भ्यायलेला आवाज आला.         धवल आपला गप उभ राहून तमाशा पाहत होता.         " तुला सोडायलाच आणल आहे , फक्त दोन मिनिटे थांब ! मग कायमची सुटकाच आहे! " तो लाल रंगाचा जब्बा घातलेला माणूस म्हंटला. त्याचा आवाज ईतका थंड होता , की  अगदी हळुवारपणे स्वर उच्चारत असावा.             "अहो आताच सोडा की , मला तुमची भीती वाटती हाई बाबा , म्या गरीब माणुस हाई , माझ बुर वाईट करुन काय भेटणार तूम्हास्नी..!"   बाबूच्या स्वरात भीती होती ..- त्याच सर्व शरीर भीतीने ग्रासल होत.        " मालक करुयात सुरुवात ! आता तर हा पुर्ण घाबरलाच आहे ? आणी भीतीमुळे ह्याच मांस चविष्ट झालं आहे..! हंमम्म..!"  एका स्त्रीचा आवाज आला.. त्यानंतर नाकातून एक मोठा श्वास घेतल्याचा आवाज ऐकू आला होता.         " होय , भ्यालेल सावज उत्तम मेजवानी..! कोंबरे गोळा ह्याच्या तोंडात, आवाज नको करायला जास्त..!"  त्या चार आकृत्यांमधल्या एकाने कापडाचा गोळा बाबूच्या तोंडात कोंबला..         एक- एक-  करत चारही जणांनी  आप-आपल्या डोक्यावरची  टोपी उतरवली - व चेहरे बाहेर काढले..व ते चेहरे पाहताच  धवलच्या पायाखालची जामिन आश्चर्यकारक झटका बसल्यागत सरकली गेली..तोंडाचा - डोळ्यांचा आकार मोठा झाला.. मनाला एकावर एक हादरे बसले. कारण समोर धवलचा गावी गेलेला पुर्णत  परिवार तिथे  उपस्थीत होता. पण ह्या अश्या अवस्थेत ? ह्या अश्या कपड्यांमध्ये ? का कश्यासाठी? त्या काल्या चार आकृतींमध्ये  एक त्याची आई सुलक्षणाबाई होत्या, दुसरी व तिसरी आकृती वहिनी अर्पिता- दादा सोहम आणी चौथी शेवटची आकृती त्याची नुकतीच वयात आलेली बहिण रेखा होती.            हा धक्का पचवण मनाला जरा विळक्षण जात होत !  धवलला कळून चुकल होत ! हे प्रकरण काहीतरी वेगळं आपल्या समजेपलीकडच असमंजस आहे ! जर ते समजून घ्यायचं असेल तर ईथेच जागेवरच थांबून पुढे जे काही घडेल  ते पाहायलाच लागेल.     वॉचमन बाबू तोंडात कोंबलेल्या गोळ्यामुळे  बक-यासारखा म्याहा , म्याहा करत चिरकत होता     मदतीला कोणीतरी याव अस त्याला वाटत होत.पण त्याची नशीबाने साथ सोडली होती. मृत्यूची तिकिट रेडी होती.          धवल एकटक पुढे जे काही घडत आहे - ते चोरुन पाहत होता. आणी पुढे आता जे काही घडत गेल , विळक्षण मतीबधीर करणा-यांमधल होत. तो लाल रंगाचा जब्बा घातलेला मानवी आकार  त्याने आपले दोन्ही हात वर केले , व मानवी , घोग-या , खर्जातल्या तीन मिश्रिंत आवाजांत बोलू लागला.        " हे महामहिम अंधकारराज , दरवर्षीप्रमाणे आजही मी तुम्हाला बळी चढवत आहे , कृपा करुण त्याचा मानपान घ्या , आणि उरलेल्या नैवेद्याच भोग घ्यायची आम्हाला परवानगी द्या !"          हा आवाज ? हा आवाज ! धवलच्या  ओळखीचा होता ! का नाही असणार ? लहानपणापासून ज्यांनी त्याला बापाची छाया दिला , त्याच छायेचा हा आवाज होता ना ? हे धवलचे वडील - रामोनाथराव त्याचे बाबा होते ! आणि त्यांचा   आवाज  भले तो कस विसरु शकतो ?                  " बाबा..?" धवलला पुन्हा एक विळक्षण धक्का बसला .         तोच आकाशात एक बिन आवाजाची फेसाळती विषारी,जहरीली- विंचवाच्या डंकासारखी विज कडाडली , सैतानाने नैवेद्य स्विकारला होता.      ह्याचा तो ईशारा होता , की पुढे सुरवात करावी!     त्याच विजेच्या चंदेरी प्रकाशात धवलचा तो एकावर एक आविश्वसनिय धक्के बसलेला - तोंडाचा आ वासलेला , डोळे चेंडू ईतके वटारलेला भयमिश्रित - आश्चर्यकारक,अविश्वसनिय,नवल सर्व मिश्रित भाव चिटकलेला चेहरा ऊजळून निघाला होता..        पण ही तर सुरुवात होती , अजुन तर खरा थरार बाकी होता , अजुन काही राझ बाहेर पडणार होते ,जे पाहताच - ऐकताच धवलच्या मनाचा चकनाचूर झाला  होता ..        तोच आकाशात एक बिन आवाजाची फेसाळती विषारी,जहरीली- विंचवाच्या डंकासारखी विज कडाडली , सैतानाने नैवेद्य स्विकारला होता..      त्याच विजेच्या चंदेरी प्रकाशात धवलचा तो एकावर एक आविश्वसनिय धक्के बसलेला - तोंडाचा आ वासलेला , डोळे चेंडू ईतके वटारलेला भयमिश्रित - आश्चर्यकारक,अविश्वसनिय,नवल सर्व मिश्रित भाव चिटकलेला चेहरा ऊजळून निघाला होता..        पण ही तर सुरुवात होती , अजुन तर खरा थरार बाकी होता , काही राझ बाहेर पडणार होते ,जे पाहताच - ऐकताच धवलच्या मनाचा चकनाचूर होणार होता ..         विज कडाडताच त्या विजेचा प्रकाश त्या पाचही जणांच्या अंगावर पडला  !         त्याचक्षणाला त्या चौघांचही शरीर हिरवट जहरील्या प्रकाश किरणाने चमकून उठल,!          त्या किरणांसहितच त्यांच्या देहात अपरिचित बदलाव होऊ लागले - चेह-यावरची कातडी प्रेताड बुरशी चढल्यासारखी पांढरी फट्ट चुनापोतल्यासारखी झाली ..         मग भुवयागर्द  जाड काळशार झाल्या  !डोळ्यांखाली काळीशार वर्तुळे उमटली- बुभळांच्याआतील मानवी डोळे बदल्ले -  दुधाळ झाले, त्यात लालसर मणीएवढ़ा ठिपका होता..         नाक बसक, वटवाघळासारख झाल - जणू नाकाच हाडच कापल असाव, कारण नाकाजागी फक्त दोन मोठाले होल होते.          उघड्या जबड्यातून धार - धार सुळ्यांचे चार- चार दात बाहेर लोंबत होते - कान सश्यासारखे मोठे झाले होते..         हाता -पायांची नख मोठी पौलादी धार - धार झाली होती.         धवल लांबून हे सर्व भीतीदायक , आश्चर्यविदारक दृष्य पाहत होता.- भीतिने त्याची बोबडी वळली होती.          ईतकी वर्ष जो त्या परिवारासोबत राहत होता - ते हे ? असले सैतानी सोंगडे होते ? त्याचे आई- वडील , बहिण, भौ - वहिनी त्यांच रुप किती अभद्र झाल होत , कोण म्हंणेल ही माणस आहेत ?  ही तर चालती फिरती सैतान होती.        ईतक्या लांबून त्यांच रुप पाहून  सूद्धा धवलची वाचा बसली होती - हात पाय थरथर कापत होते.     मग त्या पाचही जणांच्या तावडीत सापडलेल्या  बिचा-या बाबूची हाळत काय झाली अशणार ? विचारच अंगावर सर्रकन काटा आणुन देणार होता !      धवलच्या सैतानी निशाचारी बापाने हालचाल केली.        उजव्या हाताचा पंज्या वर आणला.     धवलला दिसल त्या हाताच बोट लांबसडक होत - त्या  हाताला एक पाच इंच लांबीच धार - धार सुळ्याच्या पातीच नख होत..         सुलक्षणाबाई धवलच्या आईने हालचाल केली-     बाबूच्या छातीवरचा शर्ट अलगद टराटरा फाडून टाकला..         त्याची काळ्या केसांची, सेकंदा सेकंदाला वर खाली होणारी छाती उघडी- नागडी पडली..         " मालक कापा , कापा मालक हिहिहिहिह!"           सुलक्षणाबाई येड्यासारख्या टाळ्या पिटू लागल्या - जणू त्या निशाचरी ध्यानांना गंमत वाटत होती.           धवलच्या मनात प्रश्ण आला ? ही आपली आई? कस शक्य आहे ! ही तर चेटकीणीची बहिणच वाटतीये!  किती तो फरक ?         जिथे त्याची आई  साडी नेसून - टाप टीप रहायची, तिथे हे असल ध्यान कस काय असू शकत ? पण खरच हे सत्य होत ! त्याच्या सर्व परिवारातले सदस्य मानवी रुपाची चादर ओढुन ईतकी वर्ष  ह्या दुनियेच्या, धवलच्या डोळ्यांत धुळ फेकून राहत होते .        परंतू आज त्या चादरीखालच रुप धवलला पहायला मिळाल होत.       धवलच्या निशाचर वडीलांनी  रामोनाथरावांनी जास्तवेळ न घालवता , अलगद पाण्यावरुन हात फिरवावा तसा छातीवरुन तो धारधार नख अडवा फिरवला ..     किती ती धार ?      एका सेकंदात चामडी फाटली- रक्ताची आत दबून राहिलेली लाट- पिचकारी- फव्वा-यासारखी वेगान बाहेर पडली , खालच्या हिरवगार  गवतावर, झाडांवर सर्व दिशेला  रक्ताचा सडा उडाला..                   रक्ताच्या वासाने निशाचर उत्तेजित झाले.त्या पाचही जणांनी - बाबूजवळ आपल तळ ठोकल .   जस मानव डायनिंग टेबलसमोर खायला बसतात आणी टेबलावर वेगवेगळ्या डिशेज ठेवलेल्या असतात .         तसंच ईथे जरा वेगळ होत - ईथे निशाचरांच ब्रेकफास्ट सुरु होत. आणी डिश म्हंणून काय होत बर ?  तर पुर्णत जिवंत हाडामांसापासून बनलेला माणुस !          त्या पाचही आकृत्या बाबूच्या शरीरावर झुकल्या  हात -पाय , नरडी, पोट- छाती सर्व दिशेने प्रत्येकाने जबड्यातले दात घुसवून एक- एक करत बाबूच्या रक्ताला लुचाईला - चोखायला सुरुवात केली..!     बाबू अक्षरक्ष विजेच्या धक्के दिल्यासारखा जागेवर धडा धडा थडपडत हळत होता.         पण हात -पाय गच्च बांधले होते ! सुटणार तरी कस ?          गट- गट पाणी पिल्यासारखा रक्त पिण्याचा तो हिंस्त्र आवाज धवलच्या कानांवर पडत होता.       पाच मिनिटांनी सर्वजन बाबूपासून बाजूला झाले तस धवलला त्या त्रिकोणी टेबलावर बेडकासारखा फुगलेला  बाबू - आता एका चवलीच्या शेंगेसारखा सपाट झाल्यासारखा दिसला , त्याच्या शरीरातला रक्त नी रक्त शोषून पिऊन टाकल गेल होत .        त्या सर्वाँच्या तोंडाला - गालांना लाल- लाल रंगाच ताज रक्त लागल होत.          कोणी जिभेने चाटत होत- तर कोणी हाताने बोट  माखवून तोंडात घालत चघलत  होत.         धवलला ओकारी आली होती - पोटात भयंकर मळमलत होत. - पण  मरणाच्या भीती पुढे त्याने सर्वकाही दाबून ठेवल होत.        " पिता ..! त्या धवलला कधी मारायचं? मला त्याच्या रक्ताला चाखायचं आहे-आता मला अजुन थांबवत नाही.." धवलची लाडकी बहिण रेखा म्हंणाली.      तीच हे बोल ऐकून धवलला झटका बसला , कानसूळे गरम झाली.         " नाही ईतक्यात नाही ! " धवलच्या वडीलांचा आवाज.            " पन का पिता ?   गेली पंचवीस वर्ष त्याला पाळल आहे - आता तर तो एक जवान मानव आहे , त्याच शरीर रक्ताने भरल आहे - मग अजुन का थांबायचं, तसंही तुम्ही त्याच्या आई- वडीलांना लहानपणीच संपवल आहे ना?"  धवलचा मोठा भौ सोहम म्हंटला.         त्याच्या ह्या वाक्यावर धवलला ईतक मात्र कळाल,  की गेली पंचवीस वर्ष आपण ज्या छायेखाली पितृ- माता छायाखाली वाढलो , ते आपले कोणीच नव्हते - त्यांनी फक्त एक आसुरी ईच्छेखाली आपल्याला लहाणापासून मोठ केल होत ! आणी ते काय बर ? तर आपल्याला मारुन खायचं !        एक बकरी  वर्षभर निगराणी खाली पाळायची, तिला खायला घालायचं! तीच्यावर लक्ष ठेवायचं आणी मोठी झाली की ती सुरीने मान  कापून हळाल करुन मारुन कापून खायची-         असंच काहीस धवल सोबत होत होत !            "  पंचवीस वर्ष वाट पाहिलं आहे आपण! आता अजुन थोडी वाट पाहूयात ! कारण एकदा का धवलच लग्न त्या ईशासोबत झालं की मग  एका- सोबत , एक बकरी फ्री भेटेल हिहिहिहिहिही! समजल..!" रामोनाथराव कडवट हसले..          त्यांना दुजोरा म्हंणून बाकीची ती चारजन सुद्धा वाकुळ्या  दाखवत - जागेवर उड्या मारत खिखिखी करत हसू लागली..         " औह माय गॉड..! म्हंणजे ही सैतान माझ्या आणी ईशाच्या लग्नासाठी थांबलीयेत तर ? म्हंणजे ह्यांना ईशाला सुद्धा मारुन खायचं  आहे तर ? नाही नाही मी अस होऊन देणार नाही- आधीच ह्या हरामखोर दलिंद-यांनी माझ्या आई-वडीलांना मारुन माझ आयुष्य बर्बाद केल आहे !पन मी माझ्या ईशासोबत अस होऊ देणार नाही.! मी आताच तिच्या घरी जातो आणी तिला ह्या सर्व हकीकती बद्दल सांगतो..!"  धवल स्वत:शीच म्हंटला.         मनात दृढनिश्चय करुन तो माघारी वळणार तोच..         " टिंग टिंग  , टना ना ना , टिंग टिंग टना ना टिंग!"  एक छान पैकी रिंग वाजु लागली. कोणाचातरी फोन आला होता !        व तो दुसरा तिसरा कोणी नसून , खुद्द धवलचाच होता.         अचानक वाजलेल्या रिंगने - त्याचसर्व अंग शहारल ..! पटकन हात पेंटच्या खिशात गेला ,  त्याने पटकन खिशातून हात बाहेर काढल : स्क्रीनवर ईशाचच कॉल आलेल दिसत होत.             " हा आवाज ? हा आवाज ? कोण आहे तिथे ? कोण आहे तिथे..! जा बघा लवकर , जा...!" धवलचा निशाचारी सावत्र बाप - मोठ्याने खेकसला..     त्याचा आवाज ईतका तीव्र - स्वरातला होता !की         धवलने कॉल उचलण्या ऐवजी फोन स्वीचऑफ केल..मिळेल ती वाट पकडली.- तो जिवाच्या आकांताने धावत सोसायटी ग्राउंडवर आला.. !         मग न थांबता , तसाच पुढे धावत जात , विंगमध्ये घुसला !   जिन्याच्या बाजूलाच  लिफ्ट होती.      त्याच   नशीबबलवत्तर की आणखी काही म्हंणा?एका बटणातच लिफ्टचा दरवाजा उघड़ला , पटकन घाई-घाईतच तो लिफ्ट मध्ये शिरला..       समोर असलेल्या एसीच्या नंबर बॉक्समधले - 2 मग 0 असे बटण टिक टिक आवाज करत दाबले..         " पट  पट बंद हो, बंद हो..ए बाबा ..! "   हळू हळू  लिफ्टचा दरवाजा बंद होत ,होता..!       मनात फक्त एकच विचार येत होता ! की  दरवाज्यात कोणीही हात घालू नये! नाहीतर ? नाहीतरी वाट लागणार होती ! रक्ताचा सडा पडणार होता. जर ते आले तर ? हा विचार करुनच मनाला भीतिचा विळखा घातला जात होता.          ' टंग..!' दरवाजा बंद होताच आवाज झाला..   सर सर करत लिफ्ट वर जाऊ लागली- नंबर एक एक करत बदलू लागले..         मजल्यावर मजले लिफ्ट वर चढु लागली.         ईकडे बागेतून त्या पाचही निशाचारी आकृत्या बंद दरवाज्याच्या लिफ्टकडेच पाहत होते..         त्या सर्वाँच्या पूढे दहा -पावलांवर धवलची पार्क केलेली गाडी होती.         " पिता, आता काय करायचं? धवलला तर सर्व समजलं आहे  ? "  धवलची वहिनी अर्पिता म्हंटली.. बोलतांना तिच्या तोंडातून सुळे बाहेर डोकावत होते .दुधाळ बुभळ व त्यातला तो लालसर ठिपक लेझरसारखा  चमकत होता.       "  एका अर्थी बरच झालं समजल ते  ! कारण  आता आजची रात्र त्याची शेवटची रात्र ठरणार आहे  ! चला अजुन रात्र बाकी आहे तोवर अजुन एक  शिकार करुन घेऊयात. कारण ही रात्र  निशाचरांची आहे ..!" निशाचर रामोनाथरावांच्यां वाक्यासहितच  ती पाचही निशाचर हैवान बिल्डींगच्या दिशेने चालत जाऊ लागली.... समोर एक बंद दरवाज्याची लिफ्ट दिसत होती.  लिफ्टच्या डाव्या आणी उजव्याबाजुला खाली सफेद फरशीवर दोन  कूंड्या ठेवलेल्या दिसत होत्या.        तर लिफ्टच्या  डाव्या हाताला  एक उघडी चौकट होती, ज्या चौकटीतून विंगच्या जिन्याच्या पाय-या  खाली- खाली जात अंधारात बुडालेल्या दिसत होत्या.     ' टंग ' घंटी वाजल्यासारखा  आवाज झाला .          लिफ्टचे चंदेरी रंगाचे दोन्ही दरवाजे विरुद्ध दिशेला जात उघड़ले , आणी त्या उघड्या लिफ्टच्या दरवाज्यातून धवल बाहेर पडला.      बाहेर येताच  प्रथम त्याने डाव्या हाताला असलेल्या चौकटीतून विंगमध्ये एक भीतीदायक कटाक्ष टाकला -        रोज उजेडात असणारी  विंग आज चक्क घुप्प अंधारात बुडाली होती.  त्याच विंगमधून धप धप अस पाय-यांवर  एकाचक्षणी  चार - पाच जण धावत वर यावी असा आवाज कानांना ऐकू येत होता.         " औह शट!! "  धवलच्या तोंडून भीतीने उद्दार बाहेर पडला.               ती हैवान निशाचर , वेगान- धावत धावत वर वर येत होती. धवलचा आज सोक्षमोक्ष लावून टाकायचं  अस मनी त्या सर्वानी चंगच बांधला होता.    धवलच घर लिफ्टपासून समोद दहा- पंधरा पावळांवरच होत .       धवल कोरिड़ॉर मधून धावतच ,   त्याच्या घराच्या बंद दरवाज्या दिशेने निघाला , मनोमन त्याला अस वाटलं  की हे पंधरा पावळांच अंतर आज पंधराकिलोमीटरच न होवो ?  कारण तो ऐकूण होता , की पिशाच्छांकडे काळ्या मायावी शक्ति असतात !        पण  त्याच नशीब ह्याक्षणी जोरावर निघालं , चावी दरवाज्याला लावून -मग दरवाजा उघडून तो घरात सुखरुपरीत्या पोहचेपर्यंत काहीच घडलं नव्हत.      दरवाज्याला पाठ टेकवून धवल मोठ-मोठ्याने श्वास घेत उभा होता ..        छातीचा भाता क्षणा-क्षणाला फुग्यासारखा फुगून  पुन्हा  नॉर्मल  होत होता.         भीती कणा, कणाने शरीरात संचारली जात होती.मनात विचारांच वादळ घोंघावत  होत.         " म्हंणजे दरवर्षी ही लोक गावायला जायचं  सांगून हे असले अघोरी कांड करत होते.! " धवलने दोन्ही हातांनी डोक्यावरचे केस गच्च पकडले -          फक्त अर्ध्यातासामध्ये अश्या काही अचंबित करणा-या घटना घडल्या होत्या , की त्या घटनेंनी धवलच आयुष्यच बदलून टाकल होत.         अचानक त्याला काहीतरी आठवल .        " ईशाला सांगायला हव , ईशाला ह्या प्रकरणाची माहिती द्यायला हवी !"   डोक्यावरचे केस सोडत त्याने खिशात हात घातल. खिशात फोन चाफू लागला , पण हे काय? फोन कुठे आहे ? खिशात फोन का सापडत नव्हता ? पटपट त्याने मागचा-  पुढचा , दोन्ही बाजूचे खिसे तपासून पाहिले , फोन मात्र जवळ नव्हता !          तोच काहीवेळा अगोदरची फुटेज डोळ्यांना दिसली- धवलने ईशाच कॉल कट केल , धावता धावताच फोन जिन्सच्या खिशात घालण्या ऐवजी, चुकून तो फोन खिशाच्या बाहेरुन स्लीप होत थेट गवतावर पडला होता.         हिरव्या गवतावर धवलचा फोन पडलेला दिसत होता , आणी त्या फोन पासून पुढे धवलची धावत जाणारी आकृती दिसत होती.        धवलला हे आठवून दुष्काळात तेरावा महिना लागल्याच जाणवल - आता तो ह्याक्षणाला एकटाच ईथे ह्या चार भिंतींच्या घरात कैद झाला होता !         होय कैदच ! कारण ह्या बिल्डींगमधून , ह्या घरातून- आता सुटका होणे शक्य नव्हती.     बाहेर पाऊल ठेवन हा विचारच मूर्खपणाचा , थेट सापाच्या तोंडात हात घालण्यासारखा होता.    धवलला आता कळून चुकलं होत , प्रत्येक गोष्टीच अर्थ कळून येत होत !  की त्यांच्या घरात सर्वजन नास्तिक का होते  ! घरात देवाची एकही मुर्ती का नव्हती !  कारण अधर्म , पापी- वामपंथी स्वभावाची ही साक्षात सैतान मानवी देहात वावरत होती..ना ?         " ओह नो ! आता काय करु मी, माझ्या मदतीला कोण येईल आता , ईथे तर देव पन नाहीयेत , जे एव्हीलपासून माझ रक्षण करतील-  !" धवल स्वत : शी म्हंटला !     व तोच त्याची थकलेली नजर खाली गेली- त्याच्या दोन पायांमागे दरवाज्याची खालची फट होती , त्याच फटीतून   सफेद रंगाची हिम वाफ मंदगतीने आत येत होती ..     धवलची विस्फारलेली नजर त्या वाफेला  आत येतांना पाहत होती .ड्रेक्युला मुवी मध्ये त्याने पाहिल होत ! पिशाच्छ आपल्या शरीराला हिरव्या रंगाच्या धुळीकणांमध्ये बदलू शकतात.        जर तेच ह्या सफेद वाफेने आत येत असतील ?    मृत्युच्याभयाने धवलची आत्मा करंट लागल्यासारखी  जागीच गोठली.        बस्स आता मेलोच , मेलोच आता  सर्वकाही संपल - हाच अंत आहे . अस मानून    मनाने हार पत्कारली.        "धवलsssss..!" अचानक दरवाज्याबाहेरुन   धवलच्या आईच्या आवाजातली प्रेम स्वरातली हाक ऐकू आली..         जी ऐकून धवल लागलीच दरवाज्यापासून दूर झाला.         टपो-या डोळ्यांनी दरवाज्याकडे पाहत, सुकलेल्या गळ्यात त्याने आवंढ़ा गिळण्याचा निष्फळ प्रयत्न केला.           पण भीतीने गळा सुकला होता - त्याला पाण्याची गरज होती ,पण सदर वेळच अशी होती , की पाणि पिण्याचही धाडस होत नव्हत.         " धवल बाळ दार उघड़तोस ना ? आम्ही गावावरुन परत आलोय!" धवलच्या आईचा आवाज आला. त्याची आई , खोटी आई- सर्वकाही खोट बोलत होती , हे धवलला ठावूक होत.         " अरे धवल दादा दरवाजा उघड़णा,प्रवासात मी खुप दमलिये रे ! मला ना जरा तहान लागलिये प्लीज दरवाजा उघड़ना रे !" ह्यावेळेस आवाज आला तो त्याच्या लहान बहिनीचा , जी काहीवेळा अगोदर धवलच्या रक्ताचा भोग घ्यायच बोलत होती.     धवलने जर आता दरवाजा उघड़ला असता तर नक्कीच तिने पिसाळलेल्या मांजरीसारखी त्याच्या अंगावर झेप घेतली असती, निशाचरी दातांनी मनगट फाडून रक्त प्राशन केल असत!           " तुम्ही सर्व थांबा हो, धवल माझा मुलगा आहे , त्याच्या बाबांच तो नक्की ऐकेल , हो की नाही धवल? चल दरवाजा उघड पाहू बाळ- शहाण बाळ आहे ना माझ!" धवलच्या बाबांचा प्रेमळ आवाज आला.. परंतू धवल मात्र दरवाज्याकडे पुतळा बनून पाहत उभा होता , मन त्यांच्या त्या प्रेमळ- आज्ञा , हाकेना बिल्कुल भुळणा-यांमधल नव्हत !           काहीक्षण शांतता पसरली - दरवाज्यामागून कसलाच, कोणाचाही आवाज आला नाही-          जणू ती सर्व निशाचर दरवाजा उघड़ण्याची वाट पाहत असावी ? पण धवल काही मूर्ख थोडी होता ? जो स्वत:हा मृत्यूच्या मुखात सुर घेईल.?         शेवटी जरावेळाने त्यांच मनस्ताप झाला- ते सर्व एकाचक्षणी डिवचले गेले , त्यांचा क्रोध उफाळुन वर आला -         सर्वाँनी धवलला शिव्या शाप द्यायला सुरुवात केली- दरवाज्यावर धाड धाड करत हात -पाय मारायला सुरुवात केली.     धवल घाबरुन दोन पावळे मागे झाला.        " दरवाजा उघडणा ये हरामखोर, उघड़ दरवाजा? लहानपणापासून पाळलय तुला , कशाला ते ? खायलाच  ना ? तुझ्या रक्ताचा घोट घेण्यासाठी तुला हे जिवन दिलंय आम्ही" ' धाड,धड़,करत दरवाजा ठोठवला गेला " उघड़ दरवाजा ,उघड़ !"  बाहेरुन ओरडण्याचे धमकावण्याचे आवाज येत होते.         पण धवलला कळून चुकल होत , हा दरवाजा त्या हैवानाना रोकत आहे !         आपण सद्या सुखरुप आहोत -पण पुढे काय  ? ईथून बाहेर पडण्याच मार्ग शोधायल तर हव ना !    तो दरवाजा तुटल तर , ती सर्व आत येतील आणी मग शरीर बाबूसारख - बिन रक्ताच , काठीसारख होऊन जाईल.            बाहेर कोणी दिसत का ,  जो कोणी दिसेल त्याला आवाज देऊन मदत मागू !  ह्या  हेतून  धवल हॉलमध्ये असलेल्या - पंधरा पावलांवर समोरच्या  काचेच्या खिडकीपाशी आला...        खिडकी बंद होती , तिची झाप अनलॉक करुन , त्याने सर्रकन  उघड़ली- व एक कटाक्ष खाली सोसायटी  ग्राऊंड वर टाकला , सर्व दिशेना जशीच्या तशीच सामसूम होती.        पण  तेवढ्यात  सोसायटीच्या मेन गेटसमोर एक स्कुटी येऊन उभी राहिली , धवलने डोळे बारीक करुन त्या स्कुटीकडे पाहिल..         तसे त्याच्या तोंडून त्या व्यक्तिच नाव निघाल..        " ईशा..!"  होय सोसायटी मेन गेटवर ईशाची स्कुटी उभी होती !           तिला पाहताच धवलला सुटकेचा एक दूवा दिसला.!         त्याने तिला आवाज देण्यासाठी शरीरात उर्जासाठवली.. व मोठ्याने तिच नाव घेत ओरडला..        रिपीट सीन         तिला पाहताच धवलला सुटकेची एक भावना जाणवली.!          व  त्याने तिला आवाज देण्यासाठी शरीरात होती नाही तेवढी  उर्जासाठवली.. व मोठ्याने तिच नाव घेत ओरडणार..         तोच मागचा खोलिचा दरवाजा धाडकन  तुटला , जामिन दोस्त झाला..-           धवलने पोटात गोळा आल्यागत झटकन मागेवळून पाहिल..        उघड्या चौकटीतून ती निशाचार , थव्या - थव्याने  धावत आत घुसली,  धवलच्या दिशेनेच येऊ लागली.        धवलने त्याक्षणालाही मदतीच्या उद्देश्यानेखिडकीकडे पाहिल..व मोठ्याने ओरडत ईशाला आवाज दिला..        " ईssssssशssss !" शेवटच्या श ह्या शब्दावर त्याच्या तोंडावर एक प्रेताड हाताची, धार धार नखांची मुठ येऊन आदळली..         ज्या हाताने धवलच तोंड़ दाबून धरल- व सर्रकन त्याला फरफटत खिडकीतून दूर घेऊन निघुन गेल..        उंम..उंम..उंम..  '  धवलच्या घशातून आवाज नाही , फक्त उसासे बाहेर  पडत होते..    कारण  त्याच्या तोंडावर   निशाचर सोहम - जो की धवलचा मोठा भाऊ होता , त्याने धवलच तोंड आपल्या हाताने दाबून धरल होत.         धवलच्या मागे त्याचा भाऊ - सोहम होता ज्याने त्याच तोंड दाबल होत, व  डाव्या बाजुला वहिनी अर्पिता, आई - सुलक्षणाबाई , आणी उजव्या बाजुला बहिण रेखा उभी होती.          ती साडेचार फुट उंचीची रेखा , हवरटल्यासारखी दातांवरुन जिभ फिरवफ धवलकडेच पाहत होती.         ह्या सर्वाँपासून पुढे खिडकीजवळ, धवलचे निशाचारी पिता  रामोनाथराव उभे होते.         त्यांच्या चेह-यावर कमालीच आनंद झळकत होता - कारण त्यांच्या नजरेला खाली गार्डनमध्ये उभी ईशा दिसत होती.         " वा,  ..वा .. माझ्या महामहिम वा, काय खेळी आहे तुमची , हिहिहिहिहिही- बघ धवल बघ , तुझी ईशा , तुझी ईशा वर येतीये , हिहिहिहि त्या बिचारीला हे ठावूक सुद्धा नसेल , की ईथे तिचा मृत्यु तिची वाट   पाहत आहे हिहिहिही! "          " म्हंणजे पिता !" रेखा बोलू लागली." आताच ह्या धवलचा आणी ईशाचा काटा काढ़ायचा का ?" तिच्या शब्दात- तिच्या प्रश्नात एक आसुरी आनंद लपला होता.रक्तासाठी हवरटलेली लालसा होती.        " नक्कीच- नक्कीच  ,माझ्या प्रिये, आज तुझी ईतक्या वर्षाची इच्छा तू पुर्णच करुन टाक- ह्या धवलच्या रक्ताचा घोट आधी तूच घे बस्स !"   रामोनाथरावांच्या वाक्यावर  रेखा येड्यासारकबी जागेवर उड्या मारत , दोन्ही हातांच्या टाळ्या पिटू लागली.        न जाने त्या ध्यानाला , ह्या आसुरी कार्यात कसली मजा मिळायची कोणास ठावूक?         " उम ऊम ऊम ऊम..!"       धवल पून्हा बोलण्याचा प्रयत्न करु लागला.        " सोहम  नीट तोंड बंद कर त्या बक-याच ,  नाहीतर त्याच्या मागे मागे आलेली शेळी ,सावध होऊन पळून जायची !"         रामोनाथरावांच्या वाक्यावर - सोहम ने होकारार्थी मान हळवली.       आपल्या बलदंड बाहूच्या पंज्याची पकड अजुनच घट्ट केली.         रामोनाथरावांनी दरवाज्याकडे पाहिल- दरवाजा तूटून खाली पडला होता - त्याच दरवाज्याकडे पाहत   , रामोनाथरावांनी डोळे बंद केले - तोंडातून मायावी मंत्राचा उच्चार सुरु केला..  मग ओठांची हालचाल थांबवून झपकन डोळ्यांच्या पापण्या उघड़ल्या , मंत्रांच्या शक्तिसहित डोळ्यांच्या कडांचा रंग बदल्ला -निळसर कचकड्यासारखा झाला , आणी त्या निळसर कचकड्यातल्या बाहुलीचा काळ्या ठिपकेचा रंग रक्ताच्या थेंबासारखा लालसर होता.         रामोनाथरावांनी डोळ्यांचा आकार मोठा केला -  डोळे वटारुन ते त्या निर्जीव तुटलेल्या दरवाज्याच्या फळीकडे पाहू लागले , तोच त्या निर्जीव फळीला हादरा बसला ,         ती फळी भूकंप  आल्यासारखी जागेवर थरथर करत हादरु लागली-          श्वास कोंडलेल्या रोग्याप्रमाणे आचके देऊ लागली-          व पुढच्याक्षणाला तो दरवाजा बिन आधारानेनैसर्गिक नियमांना मोडत , खाडकन  जमिनीवरुन उठला जात जागेवर सरळ उभा राहिला , मग धाडकन चौकटीवर आपटला -         आजुबाजुला उडालेले जे काही नट ,खिळे,बिजाग-या  होत्या - ते लवचिंबकसारखे दरवाज्याच्या दिशेने उडून आले - ज्या  ज्या खणात फिट होते- पुन्हा तिथेच बसले..      फक्त अर्ध्यासेकंदातच  तुटलेला दरवाजा बसून झाला होता.    धवल  अचंबित,नवळ,आविश्वसनिय, आश्चर्यकारक  नजरेने  हे दृष्य पाहत होता.         नक्की डोळ्यांसमोर आता जे काय घडल ते खर होत का ? हे मन मानू पाहत नव्हत ! पण खरच हे सत्य घडल होत.                काहीक्षण अवतीभवतीत  कमालीची शांतता पसरली,  सर्वजन ईशाच्या येण्याची वाट पाहत होते.तोच  त्या गडद शांततेत..          '  टंग ' असा घंटा वाजल्याचा आवाज झाला.         " ती आली , ती आली..!" रेखा उत्साहाने म्हंटली .तीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.      तोच बंद दरवाज्याजवर  धप - धप असा धाप पडल्याचा आवाज झाला.         " जा रेखा , जा घेऊन ये तिला जा हिहिहिहिही !"  रामोनाथराव  म्हंटले.           त्यांचा जबडा वासला - त्यातून ते सुळ्यासारखे दात बाहेर आले.         " आज तो दावत होगी, दावत ..!" रामोनाथरावांचा हळकासा आवाज.        रेखा दरवाज्याजवळ आली - मग तीने आपले दोन्ही दात प्रथम आत लपवले - पण ओठांवर त्यांचा उभार दिसत होता.. - रेखाने हात वाढवत   दरवाजा उघड़ला..!      तसे तिला आपल्या समोर ईशा दिसली- पन तिच्यासोबतच आणखी एक आकृती होती , त्या आकृतीने आपल्या अंगावर चारहीबाजुंनी चादर गुंडाळली होती - व चेहरा सुद्धा चादरेनेच झाकला होता.          " रेखा ? तू ? तुम्ही तर गावाला गेला होतात ना ?  आणी हे काय घातलं आहे  ,कुठे फेंन्सी ड्रेस पार्टी होती का ?" ईशा जरा हसत म्हंणाली.      तोच रेखाने हो करत मान हळवली व म्हंणाली.        " हो ना , हे बघ दात पण  लावलेत!" ह्या..करत  रेखाने जबडा विचकला - आत दडलेले दात झटकन बाहेर आले..!         जे पाहून ईशा घाबरली- दोन पावळ मागे सरली  तोच रेखाने आपला धारधार नख्यांचा हात वाढवून - ईशाचा हात पकडला..         झटकन तिला खोलीत खेचल, व आपल्यामागे दरवाजा लावून घेतला.          " रेखा - रेखा ? काय करतेस हे सोड माझा हात !" ईशा कळवलून म्हंटली .     तिच्या हाताला रेखाची धारधार नख टोचत होती.त्या टोचणा-या नखांमधून चामडी फाटली जात , थेंब थेंब रक्त फरशीवर पडल जात होत.     एक एक करत सर्व निशाचारी परिवारीक सदस्य अंधारातून बाहेर आला.-  ईशाकडे पाहून सर्वजण दात काढत मोठमोठ्याने हसू लागले..         धवलमात्र मळूल चेह-याने ईशाकडेच पाहत होता. आपल्यामुळे ईशाचेही प्राण संकटात सापडले ही गोष्ट त्याला फार सळत होती.         "आई एम सॉरी ईशा , माझ्यामुळे तू सुद्धा  संकटात सापडलीस. !  मला माफ कर  , मला सुद्धा माहिती नव्हत , की माझा परिवार माझा नाहीच आहे..! उलट  ही सर्व तर उठती जागती हैवान आहेत! आणी ह्या जन्मी नाही पन पुढच्या जन्मी तू नक्कीच माझी होशील! ."  धवलने अस म्हंणतच खाली मान घातली -         तोच ईशा म्हंणाली.        " नाही धवल - तू स्वत:ला दोष देऊ नकोस !   आणी हो पुढच्या जन्माच माहिती नाही, पन ह्या जन्मीच तुझी आणी माझी दोर नक्की बांधली जाईल, कारण मी ईथे काही खाली हात आली नाहीये..!"  -ईशाने मंद स्मितहास्य करत बंद दरवाज्याकडे पाहिल..        त्या निशाचारांच्या नजरा सुद्धा बंद दरवाज्याकडे वळाल्या..       तस ईशाने हाक दिली...              "  या तुम्ही....!"     होकार मिळताच.      खाडकन दरवाजा उघड़ला ,  धाड आवाज करत भिंतीवर आदळला.         त्या उघड्या दरवाज्यात  - अंगावर चादर लपेटुन तिच आकृती उभी होती.        " ह ह ह ह ह ह ! हा भिकारी ? हा भिकारी काय करणारे आमच ? हं? ह्याला तर मी सोडून दिल होत ! म्हंटल खायचे वांदे असतील?." रेखा उद्धट स्वरात म्हंटली.       तिच्या वाक्याला दुजोरा न देता - ती आकृती दरवाज्यातून  चालत आत आली-         " ए भिका-या जातोस का आता ? की देऊ एक ठेवून ?'" ह्यावेळेस सोहम म्हंटला.        तस ती आकृती वळाली -चालत दरवाज्याच्या दिशेने गेली -         त्या पिशाच्छांना वाटल की तो म्हातारा घाबरला . त्याच्या ह्या पळताभुई थोडीवर ती पाचही जण वेड्यासारखी हसू लागली..        तोंडातून विचीत्र आवाज काढु लागली.पण तोच कडी लावल्याचा आवाज झाला - सर्वाँच्या चेह-यावरच हसू ओसरल,  नजरा - दरवाज्याच्या दिशेने वळाल्या - ती आकृती बाहेर गेली नव्हती, तीने दरवाजा लावून घेतला होता.         जे पाहून सोहमचा अहंकार डिवचला.       " ए म्हाता-या थेरड्या ! थांब तुझे दिवस भरवतो !" अस म्हंणतच !  सोहमने धवलला सोडून त्या म्हाता-याच्या दिशेने धाव घेतली.           " म्हाता -या !" हवेत हात हळवत , जबड्यातून पिशाच्छी दात बाहेर काढत सोहम त्या आकृतीपाशी पोहचला , तोच त्या आकृतीने आपल्या चादरीतून - उजवा हात बाहेर काढला..         त्या हातात एक रुद्राक्षांचा कडा होता - त्या कड्यामध्ये एकूण पाच रुद्राक्ष होते.        निशाचारी सोहम धावत पुढे आला आणी त्या आकृतीने आपला रुद्राक्ष कडा असलेला हात - पुढून वेगान धावत येणा-या निशाचारी सोहमच्या छातीवर अलगद ठेवला , तसे त्याचक्षणी हातात असलेल्या कड्यातले पाचही रुद्राक्ष - काळ्या झालेल्या विस्तवाला फुंकर मारुन पुन्हा निखा-याच रुप मिळाव तसे झटकन, सेकंदाच्या काट्यागणिक, कार्यरत होत..      विस्तवासारखे चमकून उठले - व चिखलात पाय रुतावा  तसा ,  चबक असा चिपचिपीत आवाज होत, तो रुद्राक्षकड्यांचा हात त्या निशाचारी सोहमची छाती फाडत - पुढून मागे जात थेट बाहेर आला -  सोहमच्या छाताडाला मोठ होल पडल होत , आणी त्या होलमध्ये आत धडधडणार काळ ह्दय , त्या आकृतीच्या पाचही बोटांच्या पंज्यात पकडलेल होते..-        जे की त्या आकृतीने क्षणात पिठासारख कुस्करल - व ते धडधडत ह्दय कुस्कारताच -  सोहमच्या तोंडातून काळ्याशार रक्ताची लाळ बाहेर पडली व  क्षणार्धात त्याच सर्वशरीर काळ्या राखेत बदल्ल- मग फुटल - जमिनीवर त्याच्या देहच्या  काळ्या राखेच ढिग साचल होत..         " बंधू...बंधू...!" रेखाचा आवाज.        " नाथ..!" अर्पिताचा आवाज आला.        " पुत्रा..पुत्रा..!"  सुलक्षणाबाईंचा आवाज आला.त्या सर्व निशाचारी परिवाराचा संताप वर उफाळून आला होता.      धवल - ईशा दोघेही मात्र हसून आनंदीत  होत हा चमत्कार पाहत होते.       ती सर्व निशाचार चवताळून उठली-  तोंडातले पिशाच्छी दात दाखवत , त्या आकृतीला घाबरवू लागली- पन ती आकृती मात्र न घाबरता ताठ उभी होती          अर्पिता ,सुलक्षणाबाई -रेखा तिघिही निशाचारी स्त्रीया बदल्याच्या भावनेने एकत्र येऊन झुंड करुन उभ्या राहिल्या.        " सोडू नका हरामखोराला , जा मारुन टाका..  जा!"  मागून धवलच्या निशाचारी पित्याने हुकूम सोडला...         तसे त्या तिघि जणी  त्या आकृतीच्या दिशेने धावल्या तोच - त्या आक्रुतीने हातातला रुद्राक्षकडा काढला , व भिंगरीसारखा हवेत फेकला -  गर्रगर्र आवाज करत त्या रुद्राक्षाने हवेत आग्निचक्राच रुप घेतल..   काहीवेळ   हवेतून वेडेवाकडे वळण घेत तो कडा खाली आला - त्या तिन्ही निशाचारी स्त्रीयांच्या छातीतून , पोटातून- सप, सप करत  आरपार  होत पुन्हा त्या आकृतीच्याच हातात आला..         व पुढच्याक्षणाला त्या तिन्ही निशाचारी स्त्रीयांचे शरीर राखेत रुपांतरीत  होत -अंत पावळ..!      त्यांच सुद्धा सोहमप्रमाणे जमिनीवर राखेच डोंगर साचल होत.           " ए ? कोण आहेस तू ? का आमच्या वाईटावर उठलायेस ?"रामोनाथराव खेकसला.       त्या आकृतीची  नजर धवलच्या निशाचारी बापावर रामोनाथरावांवर पडली.                " मी कोण आहे ?" अस म्हंणतच त्या आकृतीने अंगावरची  चादर दूर फेकली..         तस त्या आकृतीच रुप समोर आल-  उंचीने पाच फुट , अंगावरएक फिकट भगव्या रंगाच्या फुल बाह्यांचा कृर्ता,खाली शिवलेली सफेंद पेंट होती. बारीकसे चार इंचाच कपाळ, डोक्यावर काळे केस- ज्यांच डाव्या बाजुला भांग पडला होता.  टोकदार नाक आणि खालच्या ओठांवर एक मंद स्मित हास्य तरळत होत ..         आणी ह्यांच नाव आहे समर्थ कृणाल , जे ह्या कलियुगात भुतांचा नाश करायचे , आपण त्यांना एक घोस्टबस्टर्स समजूयात.     रामोनाथरावांनी  समर्थ कृनाल यांच्याकडे पाहिल-         तसे त्या निशाचारी हैवानाला समर्थांच्या   चेह-यावर एक दैवी तेज दिसल..     जे पाहून निशाचार रामोनाथ पून्हा म्हंणाले.       "   दैवी तेज विरहीत चेहरा ? कोण आहेस तू! सांग कोण आहेस, काय नाव आहे तुझ ?" आवाजात जराशी भीती होती.        " मी आहे समर्थ कृणाल!  ह्या कलियुगात जिथे तुझ्यासारख्या पापी , नीच हैवानांच बस्तान आहे , तिथे ह्या पापभीरु - मानवी लोकांच्या मदतीसाठी त्या ईश्वराने मनाला नेमल आहे.! "         " हो अच्छा ! म्हंणजे तू मला रोखायला आला आहेस तर ? मग ठिक आहे , मी सुद्धा माझ्या परिवाराच्या मरणाचा बदला घेऊन , तुझ्यासहित ह्या दोघांचही म्हढ पाडेल..!" रामोनाथरावांनी रागातच धवल व ईशाकडे पाहत जबडा विचकला..       व त्यांच्या डोळ्यांतल्या कवड्या आसुरी चमकेने चकाकल्या , ज्या पाहून ईशा धवल भीतीपोटी दोन पावलं मागे सरली.        समर्थ व  निशाचारी रामोनाथ दोघांनीही एकमेकांवर आघात करायला सुरुवात केली.       समर्थांनी आपल्या उजव्या हाताचा एक बुक्का निशाचारी रामोनाथरावांच्या जबड्यावर बसवला - वार  ईतका शक्तिशाली होता , की रामोनाथरावांच तोंड वाकड झाल , त्यातून काळ्याशार रक्ताची धार बाहेर पडली जात ते थेट जमिनीवर कोसळले..        जमिनीवर कोसळताच  त्यांनी नेत्रशक्तीचा वापर  करण्याच्या हेतूने समर्थांकडे पाहिल.. !         त्या विस्फारलेल्या वटारलेल्या नजरेच्या बुभळांच्या कडा पुन्हा निळ्याशार रंगाने - कचकड्यात बदलल्या.- व डोळ्यांच्या ठिपक्यांमध्ये,  बाहुल्यांमध्ये - हिरवट रंगाचा घातकी शक्तिप्रवाह साठू लागला..        ' सूss..!" स्पेसशिप साउंडप्रमाणे आवाज होत - ती हिरवट रंगाची शक्तिकिरणे समर्थांवर आघात  करण्यासाठी पोहचली, व  वेगाने त्यांच्या छातीवर           आदळली..!         त्या किरणांच्या शक्तिने समर्थ थेट चार फुट मागे     जाऊन भिंतीवर आदळले..         " सस्स आह्ह्ह..!" समर्थांच्या पाठीला मार बसला होता.. त्यातच ते विव्हळले..    हिच संधी साधून   निशाचार रामोनाथ जागेवरुन उठला..-  त्याने आपला मोर्चा धवल ईशाकडे वळवला.        " सटवे मेले ,  तुझ्या..! तुझ्या मुळे माझ्या परिवाराचा अंत झाला , आता मी बदला घेणार - तुमच्या दोघांच्या रक्त थेंबाने माझ राग शांत करीन ..मी!" ह्याय्या... अस म्हंणतच रामोनाथरावांनी  जबडा विचकला ... निशाचार राम्याने त्या दोघांच्याही दिशेने  त्यांना मृत्यूच डंख मारण्यासाठी धाव घेतली..       रामोनाथरावांच्या रुपातल्या सैतानात त्या दोघांनाही  आपला क्रूर मृत्यू दिसला , दोघांनिही एकमेकांना मिठी मारुन डोळे बंद केले..      रामोनाथ त्या दोघांपासून फक्त पाच पावळांवर येऊन ठेपले होते - तोच त्यांच्या सर्वशरीराला एक हादरा बसला - जस की काहीतरी त्यांच्या देहातून आर-पार झाल असाव?          रामोनाथरावांच्या डोळ्यांतील हिरवट छटा झटकन नाहीशी झाली - जबड्यातले दात हळूच आत घुसले - व चेह-यावर एक वेदना पसरली, त्याच वेदनेत त्यांनी हळुच खाली पाहिल..         त्यांच्या छाताडाला एक गोलसर होल पडला होता - त्या होलमधून धडधडत काळ ह्दय व मागची भिंतीपाशी पाठ टेकून खाली बसलेली,  उंचावलेला हात  समोर धरलेली समर्थांची आकृती दिसत होती...-         तोच रामोनाथरावांच्या कानांना सप - सप असा वेगान हेलिकॉप्टरची धार धार पात फिरल्यासारखा आवाज ऐकू आला , आणी नजर आता हळूच समोर वळाली..        तसे त्यांना आपल्यापासून चार फुट उंच जरा पुढे तो रुद्राक्ष कडा भिंगतांना दिसला , आणी पुढे काय घडणार होत ? ह्याची निशाचार रामोनाथरावांना कल्पना आलीच होती..         समर्थांनी पुढे केलेला हात - त्या हाताची जाणिव त्यांना झाली!          व पुढच्याक्षणाला वर हवेत भिंगणारा कडा आला तसाच मागे फिरला -  थेट वेगान त्या रुद्राक्ष कड्यांच्या तप्त झालेल्या रूद्राक्षांनीत्या काळ ह्दयाचा चुराडा केला..         व गोल गोल भिंगत  मागे जात तो रुद्राक्षाकडा समर्थांच्या पंज्यात आला.          रामोनाथरावांच सर्व शरीर तपकीरी रंगाने चकाकून - उठल , ईतक की ईशा - धवल दोघांच्याही बंद डोळ्यांआड सुर्यासारखा प्रखर तेज पसरला..       एक फटाका फुटल्यासारखा आवाज झाला -निशाचार रामोनाथरावांच सर्व शरीर काळ्या  चमचमत्या धुळीकणांच्या राखेत रुपांतरी झाल..        " घनआत्मशोषक प्रगटम..!"    समर्थांच्या मंत्रासरशी त्यांच्या हाताच्या तळव्यावर घनकाराचा क्यूब अवतरला , त्या क्यूबमधून निळसर रंगाचा प्रकाश झोत बाहेर पडत होता.            ती हवेत भिरभिरणारी  काळी चमचमती धूलीकण वेगान वाकडीतिकडी भिंगत घनआत्मशोषकाच्या दिशेने येत त्यात सामावली..     समर्थांनी  निशाचारी रामोनाथरावांना घनआत्मशोषकात कैद केल होत.           समर्थ जागेवरुन उठले -  धवल ईशा दोघांपाशी चालत आले -         "तुम्ही ठिक आहात मुलांनो?"        " होय समर्थ , आम्ही ठिक आहोत !" ईशा हसत म्हंणाली.         " धन्यवाद समर्थ ! आज तुमच्या मुळे माझे आणी माझ्या ईशाचे प्राण वाचले ..!"    धवलने समर्थांना दोन्ही हात जोडले.          " धन्यवाद मला नाही धवल ह्या ईशाला म्हंण जर तिने अगदी वेळेवर मला ह्या निशाचारांची माहीती दिली नसती , मला बोलावल नसत तर मी तुझी मदत करुच शकलो नसतो !" मग समर्थ जरा थांबून पुढे म्हंणाले.        " चला माझी निघण्याची वेळ झाली !मला अजुन बरीच काम आहेत.!" समर्थांनी  अस म्हंणतच त्या दोघांकडे स्मितहास्यासहित पाहिल व उघड्या दरवाज्यातून चालत निघुन गेले..      ह्या भागाचा आंतिम क्षण  :       धवल ईशाकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होता .त्याला अस आपल्याकडे डोळे वटारुन पाहत असलेल पाहून ती म्हंणाली.        " काय झालं ? अस का पाहतोयस ?"                 " ईशा हे फारच आश्चर्यकारक आहे , की तुला  माझ्या सोबत हे सर्व घडत आहे, मी संकटात आहे हे कस कळाल ? कारण  मी तुला काहीच सांगितल नाही , आणी सांगणार होतोच पण माझा फोन तर , बागेतच कोठेतरी पडला ,  मग तुला कस कळल की ?"         " अरे हो हो किती प्रश्ण करतोस - सांगते सांगते ऐक !  हे बघ जस की तू म्हंणालास की तुझा फोन बागेत पडला बरोबर ! " धवलने फक्त हो करत मान हळवली ." धवल तुला आठवत मी तुला व्हिडीओ कॉल केला होता ! आणी मला वाटत जेव्हा तू धावत असतांना खिशात फोन  ठेवायला गेलास-  तेव्हा तो स्लिप होऊन खाली पडला आणी तेव्हाच गवतावर फोन पडताच फोनवर आलेला व्हिडिओ कॉलचा रिसिव्हर नक्कीच कसतरी  टच होत उचल्ला गेला अशणार ! कारण जेव्हा फोन उचल्ला गेला तेव्हा मला स्क्रीनवर तुझी ही निशाचारी फैमीलि ह्या अश्या भीतिदायक अवतारात दिसली, आणी मग माझ्या बाबांच्या ओळखीत हे समर्थ होते - मी लागलीच त्यांना कॉल करुन ह्या सर्वाची माहिती  दिली तसे पुढे आता जे काही घडलं ते तू पाहतच आहेस..!" ईशाने न थांबता आपल वाक्य पुर्ण केल , व एक मोठा श्वास घेऊन तोच तोंडावाटे बाहेर सोडला..धवलने दोन्ही हात जोडले  वर पाहिल..व पुन्हा समर्थांचे आभार मानत म्हंटला.                "  थँक्यू समर्थ , जो पर्यंत तुम्ही आहात तो पर्यंत कोणतीच वाईट शक्ति आमच काहीच वाकड करु शकत नाही!"    समाप्त :