समर्थ आणि भुते - भाग 2 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्थ आणि भुते - भाग 2

लेखक: जयेश झोमटे 
निशाचर ही रात त्यांची आहे 
    भाग 2. 

मुंबई : गोल्डहेवन सोसायटी  

  उघड्या गेटमधून धवलने दोन्ही हातांनी गाडीची स्टेरिंग पकडून गाडीला धक्का देत सोसायटी एरीयेत प्रवेश दिला ..!  

        धवल पुन्हा जागीच थांबला , गाडीच स्टेंन्ड़ लावल, व मागच गेट पुन्हा लावून घेतल. 

   हळकेच समोर वळला , वळताच ईतका वेळ जी गोष्ट त्याच्या नजरेस पडली नव्हती, जी गोष्ट ध्यानी आली नव्हती , त्या सर्व गोष्टीची जाणीव त्याला झाली. 

        धवलच्या मागे गेटच्या सळ्यांमधून त्याची पाठमोरी आकृती उभी दिसत होती - 

        आणी त्याच्या पाच फुट आकृतीच्या पुढे 
ती तीस मजली अंधारात बुडालेली बिल्डींग दिसत होती.  

      तीस मजल्याच्या त्या बिल्डींगमध्ये एका ही फ्लैटची लाईट न पेटलेली पाहून , धवलला फारच आश्चर्य वाटलं होत !   

        खरतर ही गोष्टी न पटणा-यांमधलीच होती ! कारण शहरात लोक तीन- चार वाजेपर्यंत जागी असतात !  

        त्याने तसं पाहिलही होत ! पन आज? ही बिल्डींग -ह्या बिल्डींगमधला एक नी एक फ्लैट कालोखाच्या नदीत बुडाला होता .  

      त्या सोसायटींमधल्या फ्लैटना असलेल्या पारदर्शक काचेंकडे पाहता अस भास होई , की काचेंना गढुळ काळशार शेवाळ थापली आहे ! 

    
      " लाईट तर गेली नाही ना?" धवलने मनोमन विचार केला , पन कस शक्य आहे ? सोसायटीचा खालचा एरिया -खाली ते विजेचे खांब पेटले होते , त्या विजेच्या खांबांचा प्रकाश चारही दिशेना पडला होता. 

    खालची त्रिकोणी आकाराची वेगवेगळ्या रंगांची ब्लॉकची लादी स्पष्ट दिसत होती. 

   त्यासहितच हिरव्यागार गार्डनमध्ये सूद्धा विजेचे खांब जळत होते.   

           अचानक एक थंड हवेची झुळुक न जाणे कोठून आली असावी? की ईथल वातावरणच थंड झालं असाव ? कारण धवलच्या सर्व शरीराला गारठा जाणवत होता.  
  ईतका की थंडीने दात वाजायची बाकी होती. त्यासहितच अवतिभवती एक विळक्षण स्मशान शुकशुकाट शांतता जाणवत होती.  

        " बापरे ! ही बिल्डींग नक्की मी राहतो तिच आहे का ? की कोण्या दुस-या बिल्डींगमध्ये घुसलोय ? कसली डेंजर शांतता आहे ही ? आणी एकही रुमची लाईट का नाही पेटलीये ? नक्की -नक्की काय चालू आहे ईथे आज ? " धवलला खात्री होती ही आपण राहतो तीच सोसायटी आहे , पण नजरेला जे दृष्य आज दिसत होत , ते फारच विचीत्र - आविश्वसनिय होत.   

           " औह नो यार , मरु देत ! ईथे काही भुताचा लोचा झाला असेल तर ! नाही , नाही ! धवल बेटा आताच्या आता रुममध्ये सटक , नाहीतरी मी काही विक्राल गबराल मधला विक्राल नाही , जो भुतांना पकडतो ! चल धवल - चल लवकर..!" धवलने गाडीकडे पाहिल , भीतिने त्याची चांगलीच बोबडी वळली होती. अवतीभवतीची भीतीदायक वातावरण 
निर्मिती मनावर भीतिची छाया सोडून गेली होती. 
 शेवटी त्याने आपली टू- व्हीलर सुद्धा गेटबाजुलाच जरा दुर पार्क केली." गाडी ईथेच ठेवतो , नाहीतरी मी जिवंत राहिलो तरच चालवायला भेटेल !" धवल स्वत:शीच म्हंटला.  

        घाबरत - घाबरत बिल्डींगच्या दिशेने जाऊ लागला..! 

        पन्नास मीटर अंतरावर अंधारात बुडालेली विंग होती , जिन्याबाजुला लिफ्ट होती - लिफ्टच्या लाल रंगाच्या पावाएवढी बटन अंधारात , पिशाच्छासारखी लालसम - जळजळाटीत नजरेसहित चकाकत - चमकत होती.    

        ती लिफ्ट होती म्हंणून बरच झालं ! नाहीतर त्या अंधारात बुडालेल्या जिन्यातून तो चालत जाऊ शकला असता का ? त्या अंधारात काहीतरी वावरत असताना ? छे विचारच करवत नाही! 

        घाबरत - घाबरत धवलची पावल बिल्डींगच्या दिशेने पडत होती - तोच त्या स्मशान शांततेत मध्येच तो आवाज आला.  

        " उंम...उंम...उंम..!" कोणीतरी तोंड दाबून ठेवाव आणी तो बचावात्मक हाक देतांना , जस घशातून श्ब्दांची साथ नसलेला ध्वनी स्वर बाहेर पडावा तसा हा आवाज होता.  

        धवलच्या कानांनी तो आवाज स्पष्ट ऐकला होता. त्याची पावले जागेवर थांबली होती , कान आवाजाच शोध घेत होते , नजर अवतीभवती फिरत होती.  

        तोच आवाजाची दिशा कळाली! 
आवाज सोसायटीच्या बागेतून येत होता.
बाग तशी जास्त मोठी नव्हती- पण झाडे जास्त असल्याने घनगर्द झाडांची होती .  

        त्याच बागेत कोणालातरी मदत हवी होती. तो बाबू वॉचमन ? तोच तर नसेल ? धवलच्या मनात प्रश्ण आला. 
   पावलांचा बिल्कुल आवाज न होऊ देता चोर पावलांनी धवल बागेत शिरला..!  

       नुसत्या वीस- पंचवीस पावलांनीच त्याच्या अवतीभवती मोठ-मोठ्या झाडांची गर्दी जमली होती ..
त्याच झाडांजवळून हळकासा सफेद रंगाचा धुका वाहत पुढे जात होता. 

        अंगाला जाणवणारी थंडी आता अधिक पटीने जाणवत होती. ही विषारी जहरी थंडी काहीतरी वेगळीच होती , मांसातून ,स्नायूत , मग थेट हाड गोठवत होती.. 

        जस की ह्या थंडीत मानव नाही, तर मेलेली प्रेत
फिरत आहेत!   

          एका झाडाजवळून धवल पुढे चालत निघाला होता - तोच कानांवर तो आवाज आला.

        " ए सोडा मला, सोडा ! कशाला पकडलं आहे मला?"  

        आवाज ओळखीचा होता , त्याआवाजासहितच
धवल सावध झाला , बाजुच्या झाडापाशी लपून बसला - झाडाच्या खोडाआडून त्याने चोर नजरेने समोर पाहिल..!   

         धवलपासून चाळीस मीटर अंतरावर - हिरव्यागार गवतावर एक चार फुट उंच - व सहा फुट रुंद त्रिकोनी आकाराचा टेबल ठेवला होता. 

        त्या टेबलाला नीट पाहिल तर तो एक ईल्यूमिनातीचा डोळा दिसत होता. 

        त्याच टेबलावर वॉचमन बाबूला हात- पाय बांधून झोपावल होत.  

        आणी त्या बाबूच्या अवतीभवती एकूण पाचमानवी आकृत्या उपस्थीत होत्या. 

        त्याच पाचमानवी आकृत्यांमधल्या - चार आकृत्यांच्या अंगावर एक सफेद रंगाचा त्रिकोणी टोपी असलेला झगा होता , ज्याने त्यांचे चेहरे दिसत नव्हते.
शेवटला जी पाचवा आकृती होती , नक्कीच त्यांचा लीडर असावा ? कारण त्याचे कपडे वेगळे होते. 
अंगावर एक लाल रंगाचा जबबा होता . 

        त्या जबब्याला एक ताठ कॉलर होती - चेहरा झाकण्यासाठी त्रिकोणी टोपी नसून लाल रंगाने - नक्कीच ताज्या रक्ताने चेहरा रंगवला होता.  

        " ओह सोडाना मला , कशाला पकडल आहे मला , बोला की..?" पुन्हा बाबूचा भ्यायलेला आवाज आला. 

        धवल आपला गप उभ राहून तमाशा पाहत होता.

         " तुला सोडायलाच आणल आहे , फक्त दोन मिनिटे थांब ! मग कायमची सुटकाच आहे! " 
तो लाल रंगाचा जब्बा घातलेला माणूस म्हंटला.
 त्याचा आवाज ईतका थंड होता , की अगदी हळुवारपणे स्वर उच्चारत असावा.

        
     "अहो आताच सोडा की , मला तुमची भीती वाटती हाई बाबा , म्या गरीब माणुस हाई , माझ बुर वाईट करुन काय भेटणार तूम्हास्नी..!" बाबूच्या स्वरात भीती होती ..- त्याच सर्व शरीर भीतीने ग्रासल होत.

        " मालक करुयात सुरुवात ! आता तर हा पुर्ण घाबरलाच आहे ? आणी भीतीमुळे ह्याच मांस चविष्ट झालं आहे..! हंमम्म..!" एका स्त्रीचा आवाज आला.. 
त्यानंतर नाकातून एक मोठा श्वास घेतल्याचा आवाज ऐकू आला होता. 

        " होय , भ्यालेल सावज उत्तम मेजवानी..! कोंबरे गोळा ह्याच्या तोंडात, आवाज नको करायला जास्त..!" त्या चार आकृत्यांमधल्या एकाने कापडाचा गोळा बाबूच्या तोंडात कोंबला.. 

        एक- एक- करत चारही जणांनी आप-आपल्या डोक्यावरची टोपी उतरवली - व चेहरे बाहेर काढले..
व ते चेहरे पाहताच धवलच्या पायाखालची जामिन आश्चर्यकारक झटका बसल्यागत सरकली गेली..
तोंडाचा - डोळ्यांचा आकार मोठा झाला.. 
मनाला एकावर एक हादरे बसले. 
कारण समोर धवलचा गावी गेलेला पुर्णत परिवार तिथे उपस्थीत होता. पण ह्या अश्या अवस्थेत ? 
ह्या अश्या कपड्यांमध्ये ? का कश्यासाठी? त्या काल्या चार आकृतींमध्ये एक त्याची आई सुलक्षणाबाई होत्या, दुसरी व तिसरी आकृती वहिनी अर्पिता- दादा सोहम आणी चौथी शेवटची आकृती त्याची नुकतीच वयात आलेली बहिण रेखा होती.      

      हा धक्का पचवण मनाला जरा विळक्षण जात होत ! धवलला कळून चुकल होत ! हे प्रकरण काहीतरी वेगळं आपल्या समजेपलीकडच असमंजस आहे ! जर ते समजून घ्यायचं असेल तर ईथेच जागेवरच थांबून पुढे जे काही घडेल ते पाहायलाच लागेल.  
   वॉचमन बाबू तोंडात कोंबलेल्या गोळ्यामुळे बक-यासारखा म्याहा , म्याहा करत चिरकत होता

     मदतीला कोणीतरी याव अस त्याला वाटत होत.
पण त्याची नशीबाने साथ सोडली होती. मृत्यूची तिकिट रेडी होती.   

क्रमश: 

पुढील भाग लवकरच ..