तीन झुंजार सुना. - भाग 34 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तीन झुंजार सुना. - भाग 34

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.           

भाग ३४             

भाग ३३ वरून पुढे वाचा .................

“एवढं सगळं समजावून सांगितल्यावर त्याला पटलं. फक्त मी त्याला निक्षून सांगितलं की मध्येच शेती वापस मागता येणार नाही, म्हणून. हे बघा करार पत्र पण करून आणलं आहे.” निशांतनी करार पत्र समोर ठेवलं. “म्हणून अख्खा दिवस मोडला त्यांच्यात. आणि हो, त्याला मी हे ही सांगितलं की “आमचे नवीन प्रयोग चालू आहेत म्हणून safety साठी आम्ही सर्व शेतीला कुंपण घालणार आहोत. अर्थात तुमची शेती बघायला तुम्ही केंव्हाही येऊ शकता.” निशांतनी सविस्तर सांगितलं.

“वा वा, निशांत मस्त डील केलं. We are all proud of you two.” सरितानी अभिप्राय दिला. आता आपल्याला नीट प्लॅनिंग करावं लागेल, कारण ५५ एकरांची योजना बनवावी लागणार आहे. माझ्या मते प्रत्येक जण यांचा विचार करा. आपण यावर उद्या डीटेल मधे बोलून सर्व योजना फायनल करू. मीटिंग संपली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळी मंडळी जमली. सरिता म्हणाली “ बोला काय काय ठरवलंय तुम्ही लोकांनी ऐकू दे की जरा.”

“वहिनी,” विशाल बोलला. “तुम्हीच सांगा तुमचे काय प्लॅन्स आहेत ते.”

“ठीक आहे. सर्व प्रथम सर्व शेताला कुंपण घालणे. आता निशांतला काही सांगण्याची जरूर नाही तो ही जबाबदारी समर्थपणे उचलेल. काय निशांत?”

“हो वहिनी. नो प्रॉब्लेम.” निशांत म्हणाला.

“चला ठीक आहे. आता दुसरं म्हणजे शिवराम काकांच्या शेताची बरीच जमीन बरड आहे ना, तर त्या बरड जमिनीवर आपला गोठा हलवा. आपल्या  मिलचे शेड आहे, तिथून उचलून बरड जमिनीवर उभं करा. विशाल हे तुला जमेल ना?”

“ वेळ लागेल पण जमेल. काही अवघड नाहीये. पण वहिनी, हे कशा करता?” – विशाल.

“मोकळी झालेली जमीन सुपीक असेल, ती आपण लागवडी खाली आणू.”- सरिता.

“हूं,” बाबा म्हणाले “ एकदम बरोबर विचार केलास.”

“आता ही जी २५ एकर जमीन आहे याला पाणी पुरवठा कसा करणार यांचा विचार करायला पाहिजे. त्यात drip irrigation पण करायचं आहे. कुंपण, पाइप लाइन आणि ड्रीप लाइन, वगैरे या सर्वांना किती खर्च येणार आहे, त्याचं एस्टिमेट काढावं लागणार आहे, त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे?” – सरिता.

“आमच्या शिवाय कोण? मी आणि विशाल दोघं मिळून बघतो याकडे.. वहिनी, गोठा आणि शेड हलवण्याचं काम नंतर करू आधी एस्टिमेट घेऊ, म्हणजे पुढची प्रोसेस सुरू करायला तुम्हाला अडचण जाणार नाही. चालेल का?” निशांत म्हणाला.

“तसं करा. ही सगळी कामं तुम्हालाच करायची आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनी, आणि तुमच्या हिशोबाने करा, फक्त लवकर करा.” – सरिता.

थोडा वेळ मग कोणीच बोललं नाही. मग वर्षा म्हणाली की “वहिनी, मंजुळाला मी शिकवते आहे आणि ती पण भराभर आत्मसात करते आहे. पण आपलं काम वाढतं आहे आणि ते अजून वाढणार आहे त्यामुळे तिच्या बरोबर अजून एकाची मला गरज लागेल. मला सध्या खूप त्रास होतो आहे म्हणून सलग कामाला बसता येणार नाही.”

“कोणी आहे का तुझ्या मनात, नाही तर मी आहेच.” – निशांत.

यावर विदिशा म्हणाली की “निशांत बाहेरची कामं तुम्ही एवढी, व्यवस्थित करता आहात, की त्यात तू इकडे आलास तर ती बाजू लंगडी पडेल, आणि आम्हाला गरजेच्या वस्तु जर वेळेवर मिळाल्या नाहीत तर फार मोठं नुकसान होईल. अकाऊंटस काय, थोडे लेट झाले तरी उत्पादनात फरक पडणार नाही. नको, जी घडी तुम्ही व्यवस्थित बसवली आहे त्यात खिळ नको घालू.” मग थोडं थांबून म्हणाली की “ सुरेशचं लग्न झालं आहे आणि त्यांची बायको पण १२ वी झालेली आहे. ती शिकेल. मी तिच्याशी बोलले आणि मला ती हुशार वाटली. बाकी वर्षा तिच्याशी बोलेल आणि मगच ठरवू.”

“मी बोलते तिच्याशी. बरी वाटली तर घेईन.” वर्षा म्हणाली.

“वहिनी,” निशांत बोलला,” आता आपल्या शेतीची व्याप्ती वाढली आहे त्यामुळे आपल्याला जास्त मजुरांची गरज लागणार आहे, आपण त्याबद्दल सुद्धा विचार करावा असं मला वाटतं.”

“बरोबर आहे तुझं म्हणण निशांत, पण मी वेगळाच विचार करते आहे.” सरिता म्हणाली “मला असं वाटतं की मजुरांच्या ऐवजी आता मशीनरी मधे वाढ करावी. अजून एक ट्रॅक्टर आणि अजून दोन टिलर घ्यावेत, कारण मजुरांची संख्या वाढली तरी कामं पण तेवढ्याच गुणवत्तेची आणि गतीने होतील यांची खात्री देता येत नाही. मशीनचं तसं नसतं आपल्याला ते केंव्हाही बदलता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे मशीनची सवय झाली की कामं लवकर होतील आणि आउटपुट पण जास्त मिळेल.”

“पण वहिनी,” आता विदिशानी आपलं मत सांगितलं. “आता ५०-५५ एकरात मुसळी लावायची आहे आणि रोवणी करायला आणि transplanting करायला माणसच लागतात. ते काम टिलरनी होत नाही.”

“करेक्ट आहे. त्या करता आपण आपल्या मजुरांच्या बायकांना तयार करायचं. त्यांनाही चार पैसे जास्त मिळतील. आणखी एक गोष्ट माझ्या डोक्यात आहे, ती अशी की बाहेरची कामं करण्या साठी, निशांत च्या मदती साठी दोन नवीन, शिकलेली माणसं घ्यायची आणि विशालला त्यातून मोकळं करायचं.” सरितानी आपलं म्हणण सांगितलं.

“त्यापेक्षा विशालच्या मदतीला माणसं द्या आणि मला मोकळं करा मी वर्षाला मदत करतो.” निशांतनी पुन्हा आपलं घोडं पुढे दामटलं. सगळेच हसले त्याच्या बोलण्याला. यामुनाबाई तर म्हणाल्या सुद्धा,” काय रे निशांत, एवढा प्रेमाचा उमाळा अचानक कसा  आला?” अर्थात निशांतनी काही उत्तर दिलं नाही.

“निशांत माझ्या डोक्यात काय आयडिया आहे ते सांगते, म्हणजे माझं म्हणण तुला पण पटेल.” सरिता थांबली आणि पुढे म्हणाली “आपल्याला manual labour कमी करायचं  आहे. विशाल इंजीनियर आहे, माझी अशी इच्छा आहे की, त्यांनी टिलरला अशी attachments बनवावी, की जेणे  करून माती भुसभुशीत झाल्यावर टिलर फिरवून त्यांचे एक फुट उंचीचे वाफे तयार झाले पाहिजेत. दुसरी गोष्ट माझ्या मनात आहे ती ही की टिलरला एक मोठा जाळीदार ट्रे असा बसवायचा की तो माती उकरून मुसळी मुळासकट उपटून काढेल आणि जाळी असल्याने माती खाली पडून फक्त मुसळीच्या फक्त काड्या आणि मुळं ट्रे मधे राहतील. असं जर करता आलं तर मुसळी उपटण्यामधे जो वेळ आणि कष्ट ओतावे लागतात ते वाचतील. याच्या साठी आपण एक छोटं वर्कशॉप  बांधायला हवं. विशालनी ट्रॅक्टर आणि टिलरचं दुरूस्तीचं काम पण शिकून घ्यावं. विशाल जर नव नवीन प्रयोग करत राहिला तर ते आपल्या साठी फायद्याचंच असेल. विशाल हुशार आहे, आणि त्यांनी मनापासून यात लक्ष घातलं तर तो स्वत:च्या बुद्धीने, आश्चर्यकारक आणि परिणामकारक नव नवीन attachments बनवू शकतो, यात मला तिळमात्रही संशय नाहीये.” सरिताने आपलं बोलणं, बोलण कसलं भाषणच म्हणा, संपवलं.  

थोडा वेळ कोणी बोललं नाही. सगळे सरिताच्या बोलण्यावर विचार करत होते. सर्वांचं लक्ष विशालकडे लागलं होतं. त्याची काय प्रतिक्रिया आहे हेच सर्वांना पहायचं होतं. विशालची तर विकेटच उडाली होती. तो खरं तर विसरूनच गेला होता की तो मेकॅनिकल इंजीनियर आहे म्हणून. सरितानी त्याच्यावर विश्वास दाखवून एक मोठीच जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती.

“वहिनी, तुला खरंच असं वाटतं?”  विशाल भांबावून म्हणाला.

“ऑफकोर्स, मला नुसतं वाटत नाहीये तर शंभर टक्के खात्री आहे. तू हुशार आहेस यात वाद नाहीये पण आळस तुझा खूप चांगला मित्र आहे. त्याला झटकून टाक मग बघ तूच, कशी प्रगती करतोस ते. सुरू तर कर. तुला वर्क शॉप साठी काय लागेल ते बघ आणि शुरू हो जा.” सरिता अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाली. बाकी सगळ्यांनी त्याला thumbs up केलं.

“बरं. कामाची बोलणी झाली असतील तर जरा फॅमिली मॅटर वर बोलू का?” – सरिता.

सगळे जणं सरिताकडे बघू लागले.

“निशांत आणि विशालची लग्नं होऊनही जवळ जवळ चार वर्ष झालीत. ही दोघं कुठे फिरायला गेलेच नाहीत. आता वर्षा तर जाऊ शकत नाहीये, पण विशाल आणि विदिशा नक्कीच जाऊ शकतील.” – सरिता.

“अग वहिनी, इतकी कामं पडली आहेत, आणि तू हे काय सांगते आहेस?” – विशाल.

“हो वहिनी आत्ताच तर मुसळीवर सगळ्यात जास्त काम असतं. आम्ही प्रवासाला गेलो तर इथे कामाची खोटी होईल.” – विदिशा.

“काही कोटी होणार नाही. मी बघेन सगळं. तुम्ही आता प्लॅन  करा. वर्षानी नंबर लावला आहे आता तुमची वाट आहे.” – सरिता.

सरिता इतकी डायरेक्ट बोलेल अशी कोणीच कल्पना केली नव्हती. विदिशा तर लाजून चूर झाली.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com    धन्यवाद.