माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 8 Pradnya Chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 8

★*  🩷 अनपेक्षित भेट भाग 2 🩷 ★*

मीरा अभ्यासात व्यस्त होती...  काही वेळा नंतर ती  
जेवायला खाली जाते..... जेवण झाल्यावर ती जरा वेळ पुस्तक वाचायला बसली होती इतक्यात तिच्या आईचा कॉल आला....

आई : hello mira... 

मीरा: हा बोल ना आई ... का फोन केला आहेस...

आई : मीरा आज रविवार आहे ना.... माझं hospital मधल काम झालय आपण शॉपींगला जाऊया ....

मीरा : ok... मी रेडी होते , तू ये पटकन आपण जाऊ या...

आई : ठीक आहे... ठेवते फोन...

मीरा खुश होऊन तिचं आवरायला जाते....
कोणता ड्रेस घालू हे तिला कळत नसत, बाहेर जायचं म्हटल की समोर उद्भवणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे  बाहेर जाताना काय घालू .... तिने कपाटातून स्कर्ट आणि टी-शर्ट काढला आणि तो घातला त्यात ते खूप दिसत होती....                                                
          ती तिचं आवरून खाली हॉल मध्ये तिच्या आईची वाट पाहत असते ... इतक्यात तिची आई घरात येते....          
आई : पाच मिनिट थांब मी फ्रेश होवून आले... मग आपण बाहेर जाऊ ....

मीरा : ओके... तू जा फ्रेश होवून ये...

थोड्या वेळात तिची आई फ्रेश होवून कपडे change येते .... 

आई : मीरा चल जाऊया आपण .... मी तयार होऊन आले आहे....

मीरा : आई अग  hospital मधून आली आहेस.... थोड काही तरी खाऊन घे ना मग आपण जाऊ...

आई : मी खाऊन आले आहे हॉस्पिटलच्या कॅन्टीन मधून लांचब्रेक मध्ये ... आपण बाहेर शॉपिंग करू आणि तिथे भूक लागली तर तिथेच काही तरी खाऊ...

मीरा : मग ठीक आहे चल जाऊया....

मीराची आई ड्रायव्हरला गाडी पुण्यातील एका मॉल मध्ये घ्यायला सांगते .... त्या दोघी खूप दिवसांनी शॉपिंग साठी एकत्र जात होत्या.... मीरा खूप आनंदात होती , तिच्या आई आणि बाबांना हॉस्पीटल मुळे तिच्यासाठी जास्त वेळ मिळत नव्हता.... तिला ही हे कळत होत की ते डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांच्याकडे फॅमिली साठी वेळ नसतो...

       

YC Mall , Pune....
वेळ - दुपारी दोन वाजता 

" झाली का तुमची खरेदी ???? किती वेळ लावता यार तुम्ही मुली.... आमची खरेदी झाली सुद्धा आणि तुम्ही अजून फक्त ड्रेस पाहताय.... 

प्रीतम जरा वैतागत प्रिया आणि ऐश्वर्या यांना बोलला...

प्रिया : अरे तू मुलगा आहेस, तुझ काय पँट शर्ट घेतला की झाल.... आमचं तस्स नसत.... मुलींच्या कपड्यात किती वराईटी असते... कोणता ड्रेस घेऊ हेच कळत नाही.... तुला काय कळणार .... तू मुलगा आहेस....

प्रीतम : बर बाई... करा काय करायचं ते मी आणि दादा काही तरी खातो तो पर्यंत ... मला खूप भूक लागली आहे सकाळी ११ वाजता breakfast केला होता मी .... त्यानंतर आपण इकडे आलो.... आता पोटात कावळे कावकाव करत आहेत.... 

अनुराग : हो रे... मला ही भूक लागली आहे प्रिया आणि ऐश्वर्या अर्ध्या तासात आवराच ह तुमचं .... इतका वेळ लागतो का शॉपिंग करायला.... आम्ही काही तरी खाऊन येतो .... तेवढ्यात तुमची शॉपिंग व्हायला हवी....
( तो जरा  ओरडलाच त्यांच्या वर )

ऐश्वर्या: तुम्ही या ना काही तरी खाऊन तो पर्यंत आम्ही खरेदी करतो....

अनुराग : okay....

(प्रीतम आणि अनुराग तेथून निघून जातात....)

इकडे मीरा आणि तिची आई मॉल मध्ये पोहचतात....

त्या एका  शॉप मध्ये जातात.... ते शॉप कसलं एक कपड्यांची भरपूर  वरायटी असणारा एक मॉलचं होता...
           



इथे वेगवेगळ्या टाईप चे कपडे होते

तिची आई आणि ती दोघी ही मीरा साठी स्वेट शर्ट पाहत असतात.... इतक्यात मागून आवाज येतो -

"मीरा तू इथे !!! How present surprise ☺️☺️

"प्रिया तू इथे कशी काय ??? कोणासोबत आली आहेस ???

"मी माझ्या दादांसोबत , ते अनु दादाला ऑफिस वेअर पाहिजे होते.... उद्या त्याचा पहिला दिवस आहे ऑफिसचा तो म्हणाला , तू पण ये माझ्या सोबत एकत्र कपडे घेऊ.... 
म्हणून आम्ही चौघे ही कपडे खरेदी करायला आलो आहोत....

" हा हा... चल आता मला शॉपिंग करायला मदत कर...

मीरा अग कुणाशी बोलतीयेस .....

आई जरा इकडे ये ना , 

"प्रिया तू पण शॉपिंग करायला आली आहेस इथे.... आई कुठे आहे, कुणासोबत आली आहेस????

"अँटी मी म्हणजे माझ्या कजन्स सोबत आले आहे.... ऐशू दी कुठे आहेस इकडे ये ना .... 

ती ड्रेसेस फायनल करून त्याच्या वर सूट होणारी ॲक्सेसरीज पहात होती...

" आले प्रिया, काय झालं ???

" अग काही नाही माझी बेस्ट फ्रेंड आणि तिची आई शॉपिंग करायला आल्या आहेत, त्यांची भेट करून देते तुला.... अँटी ही माझी  मामेबहीण ऐश्वर्या , दादाची पार्टी होती त्यासाठी आली होती उद्या जाणार आहे ती कोल्हापूरला परत .....

" ही कोल्हापूरची आहे , माझे माहेर पण कोल्हापूर आहे ....

" Nice to meet you aunty and mira ....☺️☺️☺️

" Nice to meet you बेटा 


" मीरा माझी शॉपिंग झाली आहे हा ड्रेस काउंटर वर ठेऊन आले मग तुला मी मदत करते हा.... 

" ओके जा... मी तो पर्यंत ह्यातलं काही आवडत की नाही ते पाहते....

" ओके....

( ती जीन्स टॉप पाहत असते.... तोच एक ओळखीचा आवाज आला आणि हृदय जोरात धडधड करायला लागलं.... )


" झाली का शॉपिंग प्रिया , किती वेळ झालाय .... अडीच - तीन  इथेच झाले... या पुण्याच्या ट्रॅफिक मधून घरी जायला चार वाजतील.... 

" तर काय , वेळेची पण एक लिमिट असते.... 
आईचा फोन आला होता, अजून किती वेळ लागणार आहे विचारत होती....  

" चला आवरा पटकन आपण लवकर घरी जाऊया.... बास हा आता खूप वेळ दिला तुम्हाला शॉपिंग साठी ....
तुमचे कपडे ठेवा काउंटर वर मी बिल पे करतो....

( अनुराग बिल पे करतो )

इकडे मीरा त्याला कपड्यांच्या आडून त्याला पाहत असते...  अचानक तिच्या कडून हातातली कपडे धपकन खाली पडतात... आणि त्याच लक्ष तिच्याकडे जातं....

" मीरा तू इथे !!! व्हॉट अ को इन्सिडेंत .... आपण काल ही भेटलो आणि आज ही .... .

" कोणासोबत आली आहेस ????

" मी माझ्या आई सोबत ....

" मीरा कोण ग हा ?? तू कशी ओळख ते याला....

" आई हा अनुराग .... प्रीयाचा भाऊ आहे, पार्टी मधे ओळख झाली होती , त्यानंतर काल मी बुक्स घ्यायला गेले होते तिथे ही आमची भेट झाली....

" ओके.... हाय,अनुराग .... काँग्रुलेशन फॉर युवर न्यू जॉब.... यू आर वेरी टॅलेंटेड ....

" Thank You ☺️ 

" मीरा सॉरी यार .... मी तुझी हेल्प करू शकत नाही, दादाला खूप लेट झालाय आधीच .... आम्हाला आता घरी जावं लागेल ग.... आपण कधी तरी दोघी येऊ shopping साठी तेव्हा मी तुझी हेल्प करेन....

" ओके जा मी तर असच म्हणाले, आई आहे ना माझ्या सोबत तू जा घरी .....

" बर बाय.... घरी गेल्यावर खरेदी केलेले कपड्यांचे फोटो पाठवते तू ही पाठव .... 

" हो... पाठवेन मी ☺️

(ते चौघे जण बाय करून तिथून निघून जातात... मीरा मात्र कुठं तरी हरवून जाते)

"मीरा चल ना तुझ्या साठी मी एक ड्रेस सिलेक्ट केलाय... जा चेंजिंग रूम मध्ये जाऊन ड्रेस घालून ये तो ....
तो ड्रेस व्हाइट कलरचा एक फ्रॉक होता .....

ती तो फ्रॉक घालून घालून आली.... 
      




" मीरा तू या ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसत आहेस... आपण तुला हा ड्रेस घेऊ या....

" हो ... मला पण हा ड्रेस खूप आवडला आहे आई.... 

मीरा आणि तिची आई या शॉपिंग करण्यात बिझी होतात.... मीरा ची आई स्वतः साठी व  मीरा तसचं तीच्या बाबांसाठी कपडे खरेदी करते.....


तिकडे मृगजळ 
वेळ : दुपारी साडे चार 

अनुराग , प्रिया , प्रीतम आणि ऐश्वर्या शॉपिंग करून घरी पोहचतात.... 
अनुराग  आणि प्रीतम व ऐश्वर्या  लगेच आपल्या रूम मध्ये निघून जातात....

प्रिया मात्र घरात आल्या आल्या ती तिच्या आईला , अनुरागच्या आईला  हाक मारून खाली हॉल मध्ये बोलावते....

" आलीस तू शॉपिंग करून काय काय खरेदी केलं दाखव लवकर.....

(प्रिया ची आई म्हणाली )

" हो ग आई म्हणून तर तुम्हाला हाक मारून बोलवलं , काकी आणि मामी कुठे आहेत ???

" त्या दोघी इथल्या जवळच्या मंदिरात गेल्या आहेत....

" तू मला आधी दाखव मग त्या आल्या की त्यांना नंतर दाखव....

" बर... ती एक - एक करून आपण काय झालं शॉपिंग केलेली कपडे तिच्या आईला आनंदाने दाखवते 


संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान त्या दोघी shopping करून घरी पोहचतात....


स्थळ : कृष्णकुंज 

वेदांत रविवार असल्यामुळे संध्याकाळी सहा वाजता घरी येतात....  पण तरी मीरा आणि तिची आई रमा अजून हि घरी आल्या नव्हत्या..... वेदांत वंदना काकूंना कॉफी करायला सांगतात आणि सोफ्यावर बसतात.... इतक्यात गेट उघडल्याचा आणि गाडी आत येण्याचा आवाज ऐकू येतो....

वेदांत पटकन दार उघडून बाहेर जातात.... 
तर समोर मीरा व रमा यांच्या हातात खूप साऱ्या शॉपिंग बॅग्स असतात.... 


" वर्षभराची एकदम  शॉपिंग केली आहे की काय!!!!

" काय अहो, अस का बोलत आहात.... हे फक्त माझे आणि मीराचे कपडे नाहीयेत , तुमचे ही आहेत.... मला जरा मदत करा.....

वेदांत काही बॅग्स हातात घेऊन आत आणतात....
वंदना काकू मीरा आणि तिच्या आईला पाणी देतात....
त्यानंतर मीरा एक एक करून सर्व कपडे वेदांत यांना दाखवते....  ते ही उत्साहीत पणे पाहतात....


त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी तिच्या रूम मध्ये येईन तिच्या बाथरूम मध्ये जाऊन तिचे तोंड धुताना डोळे बंद केल्यावर अनुरागचा हसरा चेहरा सारखा डोळ्या समोर येत होता.... 

" हे काय होतंय मला काही कळत नाहीये, त्याचा चेहरा का येतोय माझ्या डोळ्या समोर काय माहीत ..... त्याचा नुसता आवाज जरी ऐकला तरी हृदयाची गती वाढते.... धडधड धडधड आवाज येतो जोरात.....

ती बाथरूम मधून बाहेर येते. आणि गूगल वर सर्च करते ते काय ते आपण पुढच्या भागात पाहू.....


पुढे काय होणार हे पाहण्यासाठी वाचत रहा, माझिया प्रियाला प्रीत कळेना ❤️❤️❤️


.


.




Bye bye stay tuned ❤️ ❤️ ❤️ ❤️