dhanashrikaje164@gmail.com हाय आय एम ब्लॉगर

Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
3 महिना पूर्वी

स्वप्नांची या पहाट फुलावी
भविष्याची चिंता नसावी
आयुष्याला नवी दिशा मिळून
स्वप्ने सारी पूर्ण व्हावी

स्वप्नांची या पहाट फुलावी
आशेच्या उगवत्या सूर्याला
तेजाच्या किरणांची मग
साथ मिळावी

स्वप्नांची या पहाट फुलावी
अंधारलेल्या जीवनात
आनंदाची एक लाट उसळावी
दिशाहीन आयुष्याला मग
प्रकाशाची वाट मिळावी

आनंदाने फुलावे आयुष्य
नसाव्या कुठल्याही कटकटी
भेदरलेल्या डोळ्यांना मग
मुक्ततेची आस मिळावी

@Dhanashrikaje

अजून वाचा
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
5 महिना पूर्वी

'मा' इस एक शब्द मै सारे जहाँ का प्यार छुपा है.
इसलीये तो भगवान ने सबसे पहले मा को बनाया है
@dhanashri

Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कथा
5 महिना पूर्वी
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English ब्लॉग
10 महिना पूर्वी
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English ब्लॉग
10 महिना पूर्वी
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

नाती सोन्या सारखी असतात,
त्यांना प्रेमाची गुंफण असते,
नाती वादळात डगमगणारी नसतात,
ती विश्वासाच्या धाग्याने बांधली गेलेली असतात,
त्यात असत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,
म्हणूनच तर नाती खरी असतात,
नात्यांची ही ठेव आयुष्यभर जपावी,
नात्यांची गुंफण अशीच गुंफावी,

अजून वाचा
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

आकाश होईल धुसर
नभ येईल भरून
पाणावलेल्या डोळ्यांना
मिळेल स्वप्नांची वाट
पिवळी पाने हिरवी होतील
जमिनीतुन निघतील माणिक - मोती
नभ येईल भरून
आकाश होईल धुसर
आकाशातील सरी जमिनीवर येतील
चिंब भिजवून मनाला
डोळ्यांतील स्वप्ने साकार करतील

अजून वाचा
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

आयुष्यात माझ्या कधी येशील का अव्यक्त मनातील बोल कधी बोलशील का वाट पाहतो मी तुझी त्या किनारी माझ्या आयुष्याची नाव बनुन तु येशील का माझ्या मनातील भाव जाणतेस तु तरीही कधी मला ओळखशील का मी तुझाच आहे तु माझी होशील का आयुष्यात माझ्या कधी येशील का

अजून वाचा
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

आज स्वतःला शोधण्या निघालो
स्वतःच स्वतःला भेट देण्या निघालो
रस्ता जरासा खडतर आहे
तरी ही मी त्यावर चालणार आहे
काटे असतातच मार्गावर
त्या काट्यांना दुर करत निघालो
आज स्वतःला शोधण्या निघालो

अजून वाचा
Dhanshri Kaje तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
1 वर्ष पूर्वी

कधी तरी असे घडावे
जणु आयुष्यात हळुच कुणीतरी यावे
कधी तरी असे घडावे
मी सारे काही विसरावे
कधी तरी असे घडावे
मी त्याची वाट पहावी
आणि अलगद त्याने आयुष्यात यावे

अजून वाचा