Jaaved Kulkarni

Jaaved Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
11 महिना पूर्वी

बसमध्ये मला एक मुलगी दिसली 


बसमध्ये मला एक मुलगी दिसली 

बघून मला खुदकन हसली 

शेजारी माझ्या येऊन बसली 

पाहताच क्षणी मनात बसली 


बसमध्ये रोजच भेटू लागली 

थोड्याच दिवसांत आमची गट्टी जमली 

फोन, व्हाट्सअँप वर चॅटिंग होऊ लागली 

जेवताना आज अचानक मला उचकी लागली 

मला वाटले तिने माझी आठवण काढली 


झोपताना रात्री स्वप्नात ती आली 

लग्नाच्या जोड्यात मला दिसली 

हार गळ्यात घालण्याआधीच हाक आईची आली 

स्वप्नातून माझ्या जाग मला आली 


बस स्टॉप वर माझी बस होती आली

स्वप्नातले तिला सांगायची घाई मला होती झाली

सगळीकडे मी तिला शोधली  

पण आज मात्र ती कोठेच नाही दिसली 

खूप दिवस गेले पण ती नाही आली


एके दिवशी मात्र ती मला दिसली 

नेहमी प्रमाणे ती माझ्या शेजारी येऊन बसली 

पण आज ती काहीच नाही बोलली 

जाताना हातात लग्नाची पत्रिका तिने ठेवली 


कशी नशिबाने माझी गुगली केली 

स्वप्ने माझी सगळी हवेतच विरली 

देवाला मी विचारले तिची आणि माझी भेटच का घडवली 

परत प्रेमात न पाडण्याची शपथ मी खाल्ली 


घरी गेलो तर जेवणाची इच्छा होती मेली 

कळलेच नाही संपूर्ण रात्र

विचारात कशी गेली 

आईच्या हाकेने लक्षात आले

सकाळ होती झाली 


स्टॉप वर आलो तर रोजच्याप्रमाणे बस होती लागली 

बसमध्ये चढून सीट कडे माझ्या नजर मी टाकली 

आज तिथे होती बसली एक नवीन मुलगी  

बघून मला खुद्कन हसली 

बसमध्ये मला एक मुलगी दिसली

अजून वाचा
Jaaved Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

कवितेवर माझ्या माझं प्रेम आहे

जस ब्रेड वर लावले गोड जॅम आहे

आयुष्यात करण्यासारखं

हे एकाच माझ्याकडे काम आहे

तुझ्या प्रेमात जिंकणंच तर

अवघड गेम आहे

जिंकलो तर फेम आहे

आणि हरलो तर शेम आहे

मनावर तुझ्या माझंच नेम आहे

तुझंपण फक्त माझ्यावरच प्रेम आहे

तुझ्या आणि माझ्यात

खूप काही सेम आहे

मनाच्या जखमांवर

तूच तर एक जालीम मलम आहे

न बोलताच तुझ्या भावनांना समजणे

काय कम आहे ?

आयुष्यभर न उतरणारी

प्रेमाची तू रम आहे

- जावेद कुलकर्णी

अजून वाचा
Jaaved Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

अरे निष्ठुरांनो मला पण जगु द्या
मुलगी म्हणून अभिमानाने जन्म घेऊ द्या

आई ची सखी, भावाची बहिण आणी
पतीची अर्धान्गिनी होऊ द्या

माझ्याशिवाय तुमचा वंश कसा वाढणार?
भावाच्या हातावर राखी कोण बांधणार?

अन्यायच्या विरुद्ध लढणारी राणी लक्ष्मीबाई मला होऊ द्या
पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणारी
किरण बेदी मला होऊ द्या

कल्पना चावला सारखी आकाशात उंच भरारी मला घेऊ द्या
लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आणून तुमच्या घरात मला नांदू द्या

सरस्वतिच्या रुपाने सर्वाना ज्ञानाची शिकवण शिकऊ द्या
वेळ पडली तर चन्डिके प्रमाणे असुर विचारांचा नाश करु द्या

कुबट विचारांची जळमटे झटकून
मला ही मोकळा श्वास घेऊ द्या

चला सारे एक होऊया
स्त्री-भ्रुण हत्येला आळा घालुया

मुला प्रमाणे मुलीला ही
मायेने आणी गर्वाने वाढऊया

- जावेद कुलकर्णी

अजून वाचा