मी सामाजिक श्रेणीत लिखाण करणारी एक सामान्य लेखिका आहे. अनुभव, स्त्री - विशेष, सामाजिक श्रेणीत लिखाण. स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: प्राधान्यास असेल "मौन" तर, तुम्ही नसाल कधीच कोणासाठी "गौण". माणूस म्हणून जगताना, संघर्ष ही देणगी समजली तर, यश तुमच्यापासून लांब न जाता तुम्हाला आपलंसं करून आयुष्यभराची साथ देईल.

Khushi Dhoke..️️️ मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धार्मिक
4 आठवडा पूर्वी

शब्दांकुर परिवाराचे पहिले पाऊल

★शब्दवेल इ-बुक★


लिंक 👇🏻


https://www.paperturn-view.com/vaibhav/-2?pid=MTg185478

जर लिंक उघडताना काही इश्यू येत असेल तर, माझ्या @2196_khushinsta या इंस्टा हॅण्डल वर भेट नक्की द्या. ✌️

हिंदी वाचकों के लिए :

हमारी इ-बुक अब आप बिना शुल्क पढ पाओगे..😍

लिंक पर क्लिक कर...✌️

लिंक ना खुले तो @2196_khushinsta इस इन्स्टा हॅण्डल को भेट दे. लिंक बायो में मिल जाएगी.

धन्यवाद..✌️

अजून वाचा

💕💕
खुशी ढोके.🌹

बारिश में भीगते हुए उन्होंने एक दिन दिल की बात छेड़ी थीं मुझसे। कहां था, बहुत पसंद करती हुं तुम्हें। लेकिन हमारें नसीब में शायद मिलना ही न थां! ऐसा होता तो बारिश बन ना आती वों।

@khushinsta

अजून वाचा

कठीण असं काही नसतं...


कठीण असं काही नसतं...!


सुरूवात नवी म्हणून, गळून पडायचं नसतं
सतत प्रयत्नाने हवं ते मिळवायचं असतं
यशोमार्गातील अडथळ्यांना धैर्याने गिरवायचं असतं
सतत येणाऱ्या अडचणींना  मागे हटायचं नसतं
लोकांच्या नजरेत पडण्याच्या भीतीने खचून जायचं नसतं
इतर करतात म्हणून, स्वतःही तसच करायचं नसतं
ध्येय पुढे ठेऊन, प्रयत्नरत रहायचं असतं
वाटेत लागला दगड म्हणून, लगेच पडायचं नसतं
हात दिला कोणी म्हणून, आधार घ्यायचं नसतं
स्वतः उठून, परत मार्ग गाठायचं असतं
थकलो म्हणून कोलमडून पडायचं नसतं
इतरांच्या व्यंगाला लगेच उत्तरायचं नसतं
योग्य वेळी संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचं असतं
अपयश आलं म्हणून, रडत बसायचं नसतं
उठून परत ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गावर चालायचं असतं
यशस्वी होऊनी परत सतत प्रयत्नरत रहायचं असतं
कारण, प्रयत्नातूनचं सर्व काही मिळवायचं असतं
आणि त्याच पराकाष्ठेमुळे कठीण असं काही नसतं..!


✍️ खुशी ढोके

अजून वाचा

तू नसता.....💔

गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी
जेव्हा नकळत तुझ्या स्पर्शाने
मन प्रसन्न व्हायचे

का इतका हवा होतास तू
न कळले मनी कधी
भेट होता आपुली
बोलके व्हायचे डोळे आधी
प्रेमळ स्पर्श तुझा हृदयी उर्मी देई
तुझ्या डोळ्यां समोर बसुनी
हळूच डोळे अबोल होई

प्रवास हा कधीच संपला
मनी दुःखाचा डोंगर ठाकला
आठवणींची नेहमी सोबत होती
जरी नसला तू सोबती

पुर्ण करेल इच्छा मी तुझी
इच्छा होती जी माझी नी तुझी
इतरांना जावे लागू नये दूर
जिवलग राहोत ते नेहमी सोबती
तुझे हे स्वप्न न होतील क्षणभंगुर
बनेल मी त्यांना ऊर्जा देणारी
त्यांची विचारांकुर...💕💔😇❣️ .....सहज सुचलेले काही.....❣️😇

💕 खुशी ढोके 💕

अजून वाचा

थोडा वेळ देऊन पहावे....!💔
प्रेमात पडण्यासाठी
स्वप्नांत हरवून जाण्यासाठी
स्वप्नातच जगण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...

प्रेमात पुढच्याला
सर्वस्व बहाल करण्यासाठी
त्याच्याकडून प्रेम मिळवण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...

अपेक्षापूर्ती करण्यासाठी
नेहमी सुखात ठेवण्यासाठी
हवं ते करण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...

निःस्वार्थ भावाने
सर्वकाही केल्यावर
भ्रमनिरास झालाच तर
एकट्यात रडून परत उठण्यासाठी
थोडा वेळ देऊन पहावे...


📌 खुशी ढोके

अजून वाचा

खूप काही सांगून जातं....?!
त्या एकांत राती
तुझं अपेक्षा नसता
प्रेमानं बोलणं
खूप काही सांगून जातं...

एकटं असणं
मी मान्य करता
तुझं ते नाकारणं
खूप काही सांगून जातं...

सतत काळजी,
भरभरून मैत्रीपूर्ण प्रेम
तुझं ते हळूच बघणं
खूप काही सांगून जातं...

अनुभव हे प्रेमळ
फक्त हक्काचे माझ्या
कोणा दुसऱ्याचं मधी येणं
खूप काही सांगून जातं...

दुसरा मधी येताच
तुझं बदलणं
माझं हळूच नाहीसं होणं
खूप काही सांगून जातं...

हळू - हळू तुझं टाळत जाणं
माझं स्वतःच्या मनाला मारणं
तुझं ते वचन मोडणं
खूप काही सांगून जातं...

किती तरी दिवसांनी
तुझ्या भेटीसाठी येता
तुझं ते दुसऱ्याच्या बाहुपाशात असणं
खूप काही सांगून जातं...📌 खुशी ढोके

अजून वाचा

कधीतरी कंटाळा येतो......🥴


हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
काय मग सगळं बंद
जगणं होतं मंद...

हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
माणूस आहे मी
मग राग तर येईलच की...

हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
त्या बडबडीचा
नको ती हडबडीचा....

हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
कोणाकडून सततची स्तुती
आपल्याविरोधी इतरांची युती...

हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
इतरांना खुश करणे
त्यांच्यापुढे कारण नसता हरणे...

हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
नेहमी ठरवून आपल्यालाच चूक
इतरांच्या चुकांवर आपलंही राहूनी मूक...

हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
करून अभ्यासपूर्ण वार
योग्य मुद्द्यांसाठी होती हद्दपार...

हो येतो ना
नेहमीच येतो कंटाळा!
कोणी नाहीच आपलं हे माहीत आहे म्हणणारे
दोन शब्द चांगले ऐकून सर्वस्व बहाल करणारे...

ह्या आणि अशा वागणुकीचा येतो मज कंटाळा!📌 खुशी ढोके

अजून वाचा

सहन केलं होतं.....!


त्या दुराव्यात
तुझं न दिसणं
कधी न हसणं
मी सहन केलं होतं...

तुझी आठवण,
तुझ्या विचारांमुळे
रात्रीचं जागरण
मी सहन केलं होतं...

वर्षे गेली असतील
त्या निराश दिवसांत
हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख
मी सहन केलं होतं...

तुच माझा सखा
म्हणण्याच्या धाडसामुळे
घरच्यांचं ते रागात बघणं
मी सहन केलं होतं...

आपलं प्रेम फुलावं
त्या फुलण्यासाठी
स्वतः मन मारून जळणं
मी सहन केलं होतं...

जळल्यावर राख बनून
त्या राखेच्या निर्मितीवर
तुझं काळीज हेलावणारं बोलणं
मी सहन केलं होतं...

त्या निर्मितीला
परत जाळण्यासाठीचं
तुझं क्रूर वागणं
मी सहन केलं होतं...

त्या तुझ्या क्रूर वागणुकीवर
अंतःकरण तुटण्याचा आवाज न ऐकताच
तुझ्याकडून मातृत्व हक्क हिरावून घेणं
मी सहन केलं होतं...

इतकं सहन करून
परत शरीराच्या चिंध्या
मन मारून करू देणं
मी सहन केलं होतं....📌 खुशी ढोके

अजून वाचा