×

तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. तूं सेवादलाची लहानशी का होईना शाखा सुरू केलीस, हें वाचून किती तरी आनंद झाला ! तुझ्या पत्राची मी वाटच पहात होतों. परंतु कांही तरी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केल्याशिवाय उगीच कशाला लिहा पत्र, असें जें तूं मनांत ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद तुझें पत्र नाही म्हणून काळजी वाटतें. पुन्हां आजारी तर नाहींना पडलास? तुझ्या वैनीची प्रकृतीहि बरी नव्हती. ती अधिक नाहींना बिघडली? तुला घरांत अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना साडेआठ वाजतांच कामावर जायचें. तुला ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मी मागें एकदां एका खेडेगांवात गेलों होतों. रात्रीची वेळ होती. गांवांतील लोक कसली तरी पोथी वाचीत होते. मी त्यांना नम्रपणें म्हटलें, 'आज काँग्रेसची पोथी वाचावयास मी आलों आहें. आजच्या दिवस तुमची पोथी राहूं दे. आज माझी ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. दत्तु नांवाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलांत आला हें वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवाईत करून संघातील मुलांचीं शरीरें दणकट होतील, ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सायंकाळी आकाशांत बीजेची चंद्रकोर दिसत होती. लहानपणीं आम्ही द्वितीयेची ही  चंद्रकोर पाहण्यासाठी  धडपड करीत असूं. आणि दिसली कीं, ती एकमेकांस दाखवीत असूं. सुताचा धागा त्या चंद्राला वाहून जुनें घे, नवें दे, असें नमस्कार करुन म्हणत ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज खूपच थंडी आहे. बाहेरच्या गुलाबावरच्या कळया नीट फुलल्या नाहींत. सूर्याची ऊब मिळेल तेव्हां त्या फुलतील. प्रेमाची ऊब सर्वांना हवी. सूर्याचे प्रसन्न व प्रेमळ असे हात लागतांच या कळया खुदकन् हंसतील. वसंता, आज पहाटें एक मांजर ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सकाळी मी अंगणात फिरत होतों. एक लहानसें फुलपाखरूं पडलें होते ! फारच चिमुकले होतें तें. मी हातांत घेतलें. तें मेलेलें होतें. तरीहि त्याचे ते चिमणें पंख किती तजेलदार दिसत होते. चिवरेबावरें असे ते पंख सौंदर्यानें ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. हिंदुस्थानचा प्रश्न मोठा बिकट आहे. कुटिल ब्रिटिश मुस्तद्यांनी तो अधिकच बिकट करून ठेवला आहे. हिंदी संस्थानिकांची एक धोंड स्वराज्याच्या मार्गात सदैव उभी असते. हिंदुस्थानांतील हे बहुतेक संस्थानिक म्हणजे जगांतील एक अजब चीज आहे ! त्यांच्या लीला ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज तुला निराळयाच गोष्टीविषयीं लिहिणार आहे. राष्ट्रभाषेविषयीं आज थोंडें सांगणार आहे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी त्याप्रमाणें स्वतंत्र होऊ पाहणा-या हिंदुस्थानला सर्व राष्ट्राची अशी एक भाषा असणें जरूर आहे. त्या त्या प्रांतांतून प्रांतीय भाषा असतीलच, परंतु ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. माझीं पत्रें तुला व तुझ्या सेवा दलांतील मित्रांना आवडतात. हें वाचून मला बरें वाटलें. मला माझी मर्यादा माहीत आहे. सांगोपांग ज्ञान मला नाहीं. परंतु समर्थांनी सांगितलें आहे कीं, जें जें आपणांस माहीत असेल तें तें द्यावें. ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागील पत्रांतून तुला यंत्रवाद, गांधीवाद, समाजवाद, साम्राज्यवाद, फॅसिझम वगैरेंविषयी थोडें थोडें लिहिलें होतें. गांधीवाद व समाजवाद यांतील साम्य व विरोध मी दाखवीत होतों. गांधीवादी लोकांची जीं तीन तत्वें तीं समाजवादानेंहि कशीं साधलीं जातात तें मी मांडले ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद, तू मला परवाच्या पत्रात अचानक एक नवीनच प्रश्र केलास. ठीक केलेंस. राष्ट्रांतील सर्व प्रश्नांची माहिती हवी. भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटलें आहे, 'तें खरें शिक्षण जें या क्षणापर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सम्यक् ज्ञान देतें. जास्तीत जास्त ...अजून वाचा

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागे तूं वर्धा योजनेविषयी विचारलेस. आज पुन्हा तूं असाच एक प्रश्न विचारला आहेस. आजकाल साहित्य व जीवन यांची चर्चा फार होत असते. हाच प्रश्न निराळया दृष्टिने मांडला तर कला व जीवन असा मांडावा लागेल. कारण साहित्य ...अजून वाचा