×

फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा ...अजून वाचा

अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सावित्री. बरेच दिवस मूलबाळ होईना. सावित्रीने पुष्कळ व्रते-वैकल्ये केली, नवस-सायास केले. ती निराश झाली परंतु आता मूल होणार नाही, असे वाटल्यावर तिला मुलगा झाला. नक्षत्रासारखा मुलगा होता. ...अजून वाचा

शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रु थांबत ना. ‘करुणे, किती रडशील! जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पुढे मी तुला नेईन. सुखी करीन.’ ‘पुढे काय होईल, कोणास माहीत? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची ...अजून वाचा

‘हेमा येतेस ना ?’ आदित्यनारायणांनी विचारले. ‘मी नाही येत !’ ती म्हणाली. ‘सा-या राज्यातील तरुण येथे जमले आहेत. तुला कोणता पसंत पडतो बघ. हेमा, तू आमची एकुलती एक मुलगी, तुझे सुख ते आमचे. तू नेहमी लग्न नको असे का ...अजून वाचा

शिरीष व हेमा ह्यांचे लग्न लागले. शिरीष आता प्रधान झाला होता. राहायला मोठा राजवाडा होता. सुखाला तोटा नव्हता. परंतु शिरीष सुखी होता का? आपला पती दुःखी आहे, ही गोष्ट हेमाच्या लक्षात आल्यावाचून राहीली नाही. प्रेमाला ताबडतोब सारे कळते. प्रमाचे ...अजून वाचा

शिरीष गेल्यावर करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे, ती घरचे सारे काम करी. सासूसार-यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे. करुणा एकटी मळ्यात काम करी   परंतु तिच्याने कितीसे काम ...अजून वाचा

दुष्काळ संपला. देवाला करुणा आली. आकाश भरभरुन आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली. राजा यशोधराने दुस-या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बीयाणे पुरविले. पृथ्वी हिरवी ...अजून वाचा

शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती. दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली. राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला. अधिकारी असावेत तर असे असावेत, राजा म्हणाला.  आदित्यनारायण आता वृद्ध झाले होते. त्यांनी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले. एके दिवशी ते राजाकडे गेले ...अजून वाचा

एके दिवशी सकाळी करुणा त्या समाध्यांजवळ गेली होती. हात जोडून, डोळे मिटून ती तेथे बसली होती. मधून मधून तिच्या डोळ्यांतून अश्रू घळघळत होते. प्रेमानंद तेथे येऊन उभा होता. ते पवित्र व प्रेमळ, करुणगंभीर दृश्य तो पाहात होता. करुणेने डोळे ...अजून वाचा

करुणा प्रातःकाळी उठे. शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी. नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओवरीत एकतारीवर भजन करीत बसे. घटकाभर दिवस वर आला, म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे. तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार ? तिची गोड भजने ऐकून लोक ...अजून वाचा

शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, ‘ही बघ माझी तसबीर!’ ‘कोठून आणलीस, शिरीष?’ तिने विचारले. ‘एका भिकारणीची चोरली, पळवून आणली. आज मी चोर झालो.’ ‘शिरीष, असे करु नये?’ ‘परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का ...अजून वाचा

शिरीषने राजा यशोधरास सर्व वार्ता निवेदिली. करुणेची कथा ऐकून राजा कृतार्थ झाला. तो म्हणाला, ‘शिरीष, तुम्ही धन्य आहात. भूमातेची जिच्यावर कृपा, अशी पत्नी तुम्हास मिळाली आहे. कसे कर्तव्यपालन, किती निश्चय, कसे पातिव्रत्य ! शिरीष, करुणादेवीचा मी सत्कार करीन. माझ्या ...अजून वाचा

‘शिरीष, सासूबाई व मामंजी ह्यांच्या समाध्यांना फुले वहायला केव्हा जायचे ?’ हेमाने विचारले. ‘प्रेमानंदानेही बोलावले आहे. जन्मभूमीला विसरु नकोस, असा त्याचा संदेश आहे,’ करुणा म्हणाली. ‘करुणे, मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो ! मी महान पातकी आहे !’ शिरीष दुःखाने म्हणाला. ‘परंतु ...अजून वाचा