Pathlag book and story is written by Aniket Samudra in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Pathlag is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पाठलाग - कादंबरी
Aniket Samudra
द्वारा
मराठी फिक्शन कथा
जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर आला. रस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्या
जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...अजून वाचारस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्या
“ऑर्डर ऑर्डर…!!” न्यायमुर्तींनी टेबलावर आपला लाकडी हाथोडा आपटला आणि पुन्हा एकवार न्यायालयात शांतता पसरली. न्यायालयात केस उभी राहिल्यापासून असलेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला होता. खर तर निकाल काय लागणार आहे हे स्पष्टच होते, पण तरीही निकाल ऐकायला लोकांनी गर्दी ...अजून वाचाहोती. “पब्लीक प्रॉस्येक्युटर.. यु मे कंन्टीन्यु…”… आणि केसच्या शेवटच्या दिवसाचे न्यायालयीन कामकाज सुरु झाले. आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या दिपकचे मन मात्र अजुनही भूतकाळातच घुटमळत होते.———————————————————————————————— “जेनी.. वेक अप जेनी… कमऑन जेनी..डोन्ट गिव्ह अप ऑन मी..”, निस्तेज पडलेल्या जेनीला हलवत दिपक जिवाच्या आकांताने ओरडत होता. पोलिसांच्या दोन जिप सायरन वाजवत घटनास्थळी येऊन थबकल्या. मुंग्याच्या वारुळातुन जश्या मुंग्या बाहेर पडतात तसे पटापट
दिपकला झोप लागली असली तरी त्याच्या संवेदना जागृत होत्या. सैनिकी प्रशिक्षणाचा परीणाम म्हणा किंवा त्याचा सिक्स्थ सेन्स म्हणा परंतु दिपकला अचानक जाग आली. आपल्याला अशी अचानक जाग का आली असावी ह्याचा विचार करत तो जागेवरच पडुन आजुबाजुला घडणार्या घटनांचा ...अजून वाचाघेउ लागला. काही क्षण शांततेत गेल्यावर त्याला लॉकअपच्या बाहेर हलकीशी हालचाल जाणवली. किमान ३-४ व्यक्ती हलक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजत होत्या. दिपक कानोसा घेत पडुन राहीला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्याच्या लॉकअपचे दार हळुच उघडले गेल आणि बाहेर थांबलेल्या त्या व्यक्ती आतमध्ये आल्या. दिपक अजुनही स्तब्ध पडुन होता. हळु हळु त्या व्यक्ती दिपकच्या भोवती जमा झाल्या. त्यांच्यातील एक व्यक्ती दिपकच्या अगदी
दिपक आपल्या कोठडीत परतला खरा, पण तो विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता.काय आहे ६ दिवसांनी? कोण आहे तो कैदी? तो आपल्याला का मदत करत आहे? ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना? कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल? ...अजून वाचामला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील? चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का? अनेक प्रश्न दिपकच्या डोक्यात जमा झाले होते. पण त्यामुळे निदान त्याला काही काळापुरता का होईना जुन्या दुःखद गोष्टींचा विसर पडला होता. सुस्त झालेला त्याचा मेंदु विचार करु लागला होता आणि नकळतच ‘ह्या कैद्याच्या साथीने इथुन पळुन जाता
“ठिक आहे तर, मी सांगतो तसं कर. थोड्यावेळाने मला मारायला सुरुवात कर. इतकं मार की रक्त निघालं पाहीजे. अर्थात तुलाही थोडा मार खावा लागेलच, पण..” “अरे पण का? कश्यासाठी”, दिपक मध्येच म्हणाला.“सांगतोय.. ऐक आधी.. ते एवढ्यासाठी की एकदा का ...अजून वाचाकोठडीत गेलो की परत बाहेर येणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणालातरी कोठडीच्या बाहेर रहाणे आवश्यक आहे. तुरुंगाची मला जास्ती माहीती आहे त्यामुळे मी बाहेर राहीलो तर तुमची सुटका करु शकेन. आपल्या मारामारीत मी जखमी झाल्यावर मला येथीलच एका छोट्या दवाखान्यात भरती करतील मलम-पट्टीसाठी. तेथुन बाहेर पडणे ह्या कोठडीपेक्षा नक्कीच सोपे आहे. तेथुन बाहेर पडलो की इथल्या चाव्या मी मिळवेन..