Sanjay Yerne लिखित कादंबरी बयरी | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी बयरी - कादंबरी कादंबरी बयरी - कादंबरी Sanjay Yerne द्वारा मराठी कादंबरी भाग (31) 11.4k 1.9k एक ग्रामीण कादंबरी बयरी लेखक संजय वि.येरणे जीवनाचं माळरान फुलविण्यास आपुलकीची जिव्हाळयाची साथ मिळावी पण सारं व्यर्थ ठरतं, मन उदास होत जातं, तरीपण असच जगावं जीवनाशी झुंज देत, बयरीसारखं........ ...अजून वाचा मनोगत : ‘बयरी’ ही माझी दुसरी कादंबरी होय. यापुर्वी ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ ही कादंबरी महाराष्ट्रभर गाजली. त्याला कारणही तसंच होतं. कारण सदर संत तेली जातीतील असून या संतावर आजतागायत कुणीही कादंबरी लिहीली नव्हती किंवा दहा वीस पानांच्या पलीकडे त्यांचं चरित्र उपलब्ध नव्हतं. मात्र मी यावर सारासार विचार कमी वाचा पूर्ण कथा वाचा Listen मोबाईल वर डाऊनलोड करा ‘बयरी’ कादंबरी - भाग १ (4) 2.8k 164 एक ग्रामीण कादंबरी बयरी लेखक संजय वि.येरणे जीवनाचं माळरान फुलविण्यास आपुलकीची जिव्हाळयाची साथ मिळावी पण सारं व्यर्थ ठरतं, मन उदास होत जातं, तरीपण असच जगावं जीवनाशी झुंज देत, बयरीसारखं........ ...अजून वाचा मनोगत : ‘बयरी’ ही माझी दुसरी कादंबरी होय. यापुर्वी ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ ही कादंबरी महाराष्ट्रभर गाजली. त्याला कारणही तसंच होतं. कारण सदर संत तेली जातीतील असून या संतावर आजतागायत कुणीही कादंबरी लिहीली नव्हती किंवा दहा वीस पानांच्या पलीकडे त्यांचं चरित्र उपलब्ध नव्हतं. मात्र मी यावर सारासार विचार कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 2 (5) 1.2k 223 "बयरी" कादंबरी भाग 2 बनी किती सुंदर नाव ? नावाप्रमाणं तिचं वागणं बोलणं. गवताच्या मऊमऊ पात्याप्रमाणं, कोमल किरणाच्या तेजाप्रमाणं मनात ठसणारं सौंदर्य, खेड्यातील काबाडकष्टानं ढेकलाप्रमाणं झालं होतं. स्वतःच्या अस्तित्वाची पर्वा नसतांना दिवसभर राबराब राबून कावळ्या प्रमाणं काव-काव ...अजून वाचाउदर भरण्याच्या नादातच मंगऱ्यासोबत ती जगत राहिली. बनीला प्रेमाची भूक की नशीबाचं सुखही मिळत नव्हतं. नवऱ्यासोबत मिरवून थोडसं अल्याडपल्याड हसणं... आणखी राबराब राबणं. दारिद्र्यानं तिला माखलं होतं. थोडंफार मंगऱ्या कमवायचा तोही जुगार व बिडीत नष्ट करायचा. मंगऱ्या राबराब राबून यायचा. बनीसोबत लग्न झाल्यावर धट्टाकट्टा असलेला मंगऱ्या सगळा काडीप्रमाणं वाकासारखा दिसू लागला. बनीची कूस भरून पहावी या तळमळीनं जगतच राहिला. कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 3 (3) 936 156 "बयरी" कादंबरी भाग ३ गावातील शाळेजवळील मोकळी जागा, त्या शाळेला लागून वट्टा होता. तिथचं रात्रोला लोक जमायचे. त्यापासून तीन चार घर आड एक पडकी झोपडी होती. गवताने शेकारलेल्या झोपडीत जी स्त्री राहायची ती ‘बनी’ होती. समधं गाव ...अजून वाचा‘बयरी’ म्हणायचे. त्या गावाने तिला आधार दिलं होतं. पण तिच नाव तिलाच खटकायचं, सगळे बयराबाई म्हणून आवाज द्यायचे. पूर्वी बयरीचं कौलारू घर होतं. ते वादळानं पडल्याने आबानी तिच्याकरीता ही झोपडी बांधुन दिली. बयरी फारशी कुणासोबत बोलत नव्हती. काही लोक तिची थट्टा करायचे. समधं ऐकुण ती फक्त हसायची. तिचं हसणं लोकांना आवडायचं, बयरी पस्तीशीत गेली होती. तारूंण्यात तिच्या फक्त स्मित कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 4 (3) 868 165 "बयरी" कादंबरी भाग 4 रात्र झाली. रातकिड्याचा किरकिर आवाज वाढत चालला होता. आबादीचं लोक जेवण-खावण आटोपून बसली होती. लहान मुलंबाळं झोपी गेले होते. आबाचंही नुकतच जेवण आटोपलं होतं. तालुक्यावरून आबा सायंकाळीच परतला होता. झोप डोळ्यात दाटत ...अजून वाचाआज वट्ट्याकडे जाण्याची इच्छासुद्धा नव्हती. अंथरूणावर अंग झोकून आबा निजला होता. चारचौघं गावातील मंडळी वट्ट्यावर जमली होती. शेती, पीक पाण्याच्या गोष्टी सुरू होत्या. वट्ट्याच्या तीन-चार घर आड बयरीचं घर होतं. बयरी घरी नव्हती. तिच्या घरी दिवाही पेटला नव्हता. ढोकाची बायको धन्याची वाट पाहून थकली. आज खूप उशीर झाला होता. चटणीभाकर केली होती. ढोकाची लहान मुलं जेवण करून झोपी कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 5 (1) 750 80 "बयरी" कादंबरी भाग 5 आबादी शांत होती. ढोक मेल्यापासून आबा सारखा विचार करीत असायचा. बयरीनं का मारलं असेल ? आबा घरीच थांबला होता. वरांड्यातल्या पाळण्यावर बसून हवेच्या झोकात तरंगत होता. गावातलं दुःख जणू त्याचच दुःख होतं. आबाची मुलगी ...अजून वाचाखेळत होती. एका वर्षाची झाली असेल. खेळण्याशी खेळतांना रांगत-रांगत येत होती. आबाला क्षणभर हसू आलं. आबा एकसारखे सुरेखाकडे पाहातच राहिले. वर्हाड्यातल्या पायऱ्याजवळ गेली. वारंवार उभं राहायच्या प्रयत्नात होती. आबाची नजर चुकली. आबा आपल्याच विचारात मग्न झाला. सुरेखा उभी झाली. एकाएकी तोल जावून पायऱ्यावरून पडली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकूण आबा घाबरला. आबाने धावत जावून तिला उचललं. तिची पाठ थोपटली पण कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 6 (2) 667 213 "बयरी" कादंबरी भाग 6 आबादीवर काळ्या-काळ्या ढगांची सावली पडू लागली. आबादीच्या नजरा वरच्या दिशेने लागल्या. मागील वर्षी सगळं पीक-पाणी बराबर झालं होतं. आबादीची नदी आपली कूस केव्हा भरणार ह्याच नादात असावी. आठपंधरा दिवसात दोन-तिनदा पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. ...अजून वाचाआग शांत झाली होती. जमिनीने स्वतःला भेगा पाडून आपल्यातच वैर केलं असावं पण ते वैर नष्ट झालं होतं. भेगा मिटल्या. आबादीची नांगरं, वखरं काळ्या ढेकलांना फोडीत होती. पेरणी सुरू झाली होती. कुणालाही क्षणभराची उसंत नव्हती. आबादीचं शिवार हिरवंगार दिसू लागलं. उन्हाळ्या च्या आगीने कमजोर झालेली गायीवासरं हिरव्यागार गवतानं फुलून दिसू लागले. आबादीजवळ असलेलं डोंगर हिरवंगार पानाफुलांनी बहरलं होतं. करकांना कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 7 (1) 624 109 "बयरी" कादंबरी भाग 7 आबादीचं सगळं पीक गेलं होतं. थोडंफार जे काही उरलं त्यावरच आबादी समाधानाने एक एक दिवस पुढे ढकलायची. रोजगार करून कुटुंबाची खळगी भरणं तसच सुरू राहिलं. आबादीला आबाच्या स्वरूपाची ओळख झाली होती. राम्याला आबाने खूप मारलं ...अजून वाचाबयरीला कुणीही चिडवित नव्हते. चारपाच दिवस राम्या खाटेवर तसाच पडून राहिला. गावातली गायढोरं रानात नेणं सोडलं होतं. सकाळी ‘गाय सोडा’ आवाज नवीन भासायचा. आबादी झालं गेलं विसरून आपल्या कामात गुंग राहायची. त्या दिवसापासून महाग्याही आबाकडे गेला नव्हता. राम्याच्या मनात आबाविषयी चिड निर्माण झाली. राम्याच्या मनात सैतान पेटून उठला होता. आबासोबत बंड करण्यासाठी, आबाशी झुंज देण्यासाठी..... आबा गावाकडे विशेष लक्ष कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 8 (1) 555 107 "बयरी" कादंबरी भाग 8 ‘ज्याचं करावं भलं तो म्हणे माझच खरं.’ याची प्रचिती आबाला आली. आबाचं आबादीवरणं दुर्लक्ष झालं. आबा एकलकोंडे बनले होते. चारपाच दिवसापासून वट्ट्यावर काय खामद्यातही गेला नव्हता. कुणाच्या घराकडे जाणं तर दुरच राहिलं. स्वतःचं कामकाज ...अजून वाचास्वतःचं कुटुंब ह्या तच आपलं हित समजू लागला. एकएक दिवस कसा जात होता हे आबालाच कळलं नाही. राम्याने केलेल्या संघर्षाला आबा विसरला. आबाने फारसं मनावरही घेतलं नाही. सुरेखा क्षणाक्षणाने मोठी होवू लागली. पाटलीनबाई सर्व कामकाज करू लागली. बयरीच्यानं काम करणं जमत नव्हतं. बयरीशी सुरेखा अंगाखांद्या वर खेळू लागली. बयरीचा दिवस सुरेखाला खेळवण्यातच जायचा. सुरेखा बयरीची भाची होती. बयरी केव्हा केव्हा कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 9 (1) 467 94 "बयरी" कादंबरी भाग 9 आबादी जवळच दोन मैलावर तालुक्याचा रस्ता होता. येणारी जाणारी वाहणं वाढू लागली. आसपास दोन तीन खेडी होती. तालुक्याला जायचं झाल्यास तिथच मोटारगाडयांची वाट पाहावी लागे. तालुक्याला कोळश्याची खाण लागली. ट्रक गाड्या भरधाव वेगानं धावू लागल्या. ...अजून वाचातेवढ्या अंतरावर कुणाचही दुकान नव्हतं. रामाच्या मनात हॉटेल टाकायचं सुचलं. राम्याने हातभट्टीची दारू विकून खूप पैसा गोळा केला. तालुक्याच्या पोलिसाशी त्याचं घरगुती नातच निर्माण झालं. राम्याला आबाचा अर्धवट झालेला वाडा दिसू लागला. आपणही असाच वाडा तयार करावा. राम्यानं मनातही विचारही केला. पण पैसा अपुरा पडला असता. धंद्या ची जेमतेम सुरवात झाली होती. राम्या सारखा विचार करू लागला. आबा प्रमाणं मोठं कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 10 (3) 524 127 "बयरी" कादंबरी भाग 10 एक वर्ष उलटलं होतं. आबादीत आबाचा टोलेजंग वाडा उभा झाला होता. संपूर्ण गावभोजन दिलं होतं. गावोगावचे लोक वास्तुपूजेला आले होते. समधी आबादी आनंदानं माखली होती. आबादीच्या नदीला मागल्या वर्षी आलेल्या पुराप्रमाणं सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहत ...अजून वाचाआबादीला काम मिळालं होतं. मंदिराचही काम केव्हाच पूर्ण झालं होतं. बयरी सारं काही विसरून नव्या जीवनाच्या वाटेवर, नशीबाच्या लाटेवर नव्या जोमानं, नव्या उत्साहानं खंबीरपणे उभी राहिली. आधार देणारा आबाही भावाच्या रूपानं परमेश्वर बनून तिच्या जीवनात आला होता. बहिन भावाचं प्रेम असच फुलत राहणार होतं. अखेरच्या क्षणापर्यंत. बयरीचा चुलता शिवा वास्तुपूजेला आला होता. आबाच्या आग्रहाखातर दोन चार दिवसापासून तिथच होता. कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 11 (1) 555 153 "बयरी" कादंबरी भाग 11 दोनतीन वर्ष उलटली. समधी आबादी आबाच्या कृपेनं आनंदी होती. दोन तीन वर्षात पीक पाणीही चांगलं आलं होतं. आबा स्वतःच्या कामात नेहमी गुंग असायचा. गावाच्या भल्यासाठी लढणारा हा देवमाणूस. आबादीत रस्ते, नाल्या बांधण्याचं ...अजून वाचाकरू लागला. आबादीचा खामदाही टुमदार दिसू लागला. दिवसभर आबादीची मुले तिथं मनोरंजन करीत आबाला पूर्वीइतकाच मान अजूनही मिळत असे. आबाचा शब्द आबादीसाठी प्राण होता. सुरेखा शाळेत जावू लागली. रूपानं सुंदर गोरीगोमटी, बुद्धीनं चतुर असलेली सुरेखा... आबानं रवीशी लग्न करायचं असही निर्णय अगोदरच घेतला होता. नुकताच आबादीत ढेकल्याचा मुलगा मास्तर बनून आला होता. सुशिल नाव होतं. नावाप्रमाणं गुणवान निघाला होता. कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 12 (2) 455 77 "बयरी" कादंबरी भाग 12 आबानी बांधलेल्या वाड्यानं आबादी नव्या नवरीप्रमाणं सजलेली वाटायची. शाळेचं बांधकामही केलं होतं. रस्ते, नाल्या, वट्टा, मंदिर, आबानी खूप काही केलं आबादीकरीता. दरवर्षी शाळेतील मुलांना कपडेही घेवून द्या यचे. आतातर ढेकल्याचा सुशिलच तिथं मास्तर होता. सर्वांचं ...अजून वाचाबरं व्हायचं. आबादीला नवीन वळण लागलं होतं. आबा आबादीसाठी सतत झुंजत राहिला पण आबाचं धिप्पाड शरीर थकत चाललं होतं. तीन चार दिवसापासून आबाला ताप येत होता. शाळेतल्या मुलांना कपडे वाटपाचा कार्यक्रम होता. पण आबाची तब्येत बरोबर नसल्यानं सुशिलने कार्यक्रम पुढं ढकलावं असा बेत आखला. आबा तयार नव्हता. कार्यक्रम ठरल्याप्रमाणचं होणार होता. सगळी तयारी झाली होती. पाटलीनबाई, बनी शाळेतल्या मुलांना कपडे कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 13 (2) 515 85 "बयरी" कादंबरी भाग 13 आबादीचं हिरवगार शेत हवेत तरंगत होतं. आबादीवरून वाहणारी नदी नागमोडी वळण घेत दूरवर कुठंतरी जात होती. आबादीत आज राम्या मायबापाची भेट घेण्यास आला होता. आबाच्या वाड्यासमोरच राम्याची जुनी जागा होती. राम्यानं तिथं वाडा बांधायचं ठरवलं. ...अजून वाचाती जागा माखली होती. राम्या जागा पाहून गेला. जातांना आबाच्या वाड्याकडे पाहिलं. आबाशी भेटावं असा विचारही न आणता जुन्या आठवणी मनात साकारत तसाच निघून गेला. महाग्याला मुलास बघून बरं वाटलं. राम्यानं महाग्यास सांगितलं. “बावा, वाड्याचं काम सुरू करायचं हाय. “ “कवा करतस रं. “ “दोन चार दिवसात सुरू करेन, कामावर माणसं मिळतील व्हयं. “ “आबादीत माणसाची काय कमी हाय रं कमी वाचा Listen आता वाचा बयरी कादंबरी भाग 14 (2) 419 101 "बयरी" कादंबरी भाग 14 आबादी अंधुकशा प्रकाशात कोंबड्याच्या आरवण्यानं जागी झाली. होळीवर आबादीच्या स्त्रियांनी पाणी तापवण्यास भांडं ठेवलं होतं. होळीच्या गरम पाण्यानं अंग धुण्याची प्रथा आबादीत पूर्वीपासून चालत होती. सूर्याची किरणं आबादीवर पडली. आबादी खूप वेगळीच भासत होती. ...अजून वाचाचिमण्यांच्या आवाजाप्रमाणं आबादीत उत्साह संचारला होता. लहान मुलबाळं एकमेकाच्या अंगावर सकाळपासून रंग उधळू लागले. आबादीच्या स्त्रिया आपआपली काम आटोपत होती. सकाळीच ‘गायी सोडा’ हंबरडा फोडीत गुराखी रानात गायी हाकलून आला होता. आबा पहाटेलाच उठला. नव्या जोमानं, नव्या उत्साहानं आबा आबादीशी रंगपंचमीचं रंग उधळणार होता. सकाळीच गावातील लोक आबास रंग लावण्यास आले होते. आबाचे कपडे रंगानं भरून गेले. आबानंही त्यांच्यावरती कमी वाचा Listen आता वाचा इतर रसदार पर्याय लघुकथा आध्यात्मिक कथा कादंबरी भाग प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भयपट गोष्टी मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने Sanjay Yerne फॉलो करा