प्रल्हाद दुधाळ


Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
1 वर्ष पूर्वी

दररोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी कोणी ना कोणी कळत न कळत काहीतरी नवे ज्ञान देत असतो अशा सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 वर्ष पूर्वी

#भ्रष्ट

वागण्यात बोलण्यात खोट, ज्यावर काडीचाही अधिकार नाही अशा गोष्टीचा अनैतिकरीत्या उपभोग म्हणजे भ्रष्ट आचार. फक्त वागणेच नाही तर बोलण्यातही भ्रष्ट आचरण असू शकते.
आपले नेमलेले काम प्रामाणिकपणे न करणे, वेळ न पाळणे, कर्तव्यातला चुकारपणा हे सुद्धा भ्रष्ट आचरण...
... प्रल्हाद दुधाळ

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

#आभारी
मिळाले जे जे जीवनी
आहे त्यास्तव आभारी

मिळू शकले जे नाहीच
त्यासाठीही मी आभारी

नियतीचे नियोजन छान
भल्याबुऱ्याचे दिले भान

अनुभव मिळालेले भारी
जीवनासाठी या आभारी

©प्रल्हाद दुधाळ 9423012029

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

#बोलणारे

असेही बोलतात
तसेही बोलतात
बोलणारे तसले
कसेही बोलतात

मनसोक्त खावे तो
खाऊ देत ते नाही
उपाशी रहावे तो
घडू देत ते नाही

रडू दे रडणारे
चालत तू रहावे
बोलू दे बोलणारे
आनंदात जगावे

©प्रल्हाद दुधाळ 9423012020

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

#मूर्ख

ज्ञानी-अज्ञानी.

कणभर ज्यास ज्ञान नाही
वास्तवाचे परी भान नाही
तया मूर्ख असे समजावे
हात चार लांबच राहावे !

फारसे जरी ज्ञान नाही
शिकण्यास नवे ना नाही
असंस्कारी तया समजावे
संस्कारांनी सुज्ञ करावे !

तसा तो अडाणी नाही
ज्ञानाचे त्यास भान नाही
निद्रेत मग्न समजावे
जागृतीचे यत्न करावे!

मुळी ज्यास ज्ञान नाही
स्वीकारा चे भान नाही
लबाड त्यास समजावे
ढोंग तयाचे उघड करावे !

सर्वज्ञानी परी गर्व नाही
ज्ञान दानास नां नाही
गुरुपदी योग्य समजावे
ज्ञानामृत ग्रहण करावे !  
       © प्रल्हाद दुधाळ 9423012020

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

#कटु
प्रत्येकाला हे समजायलाच हवे
कटू असले तरी कळायला हवे
एरवी हुशार असणारी माणसंच
वेड्यासम वागतात बोलाया हवे
कळतं पण वळत नाही हे कसे
शिस्तीकडे मूढांनी वळायला हवे
खेळ हा असे जीवांशी खेळण्याचा
पडणार महाग कळायला हवे
असले कटू तरी सत्य जीवघेणे
सामान्यांनी समजून घ्यायला हवे
©प्रल्हाद दुधाळ. 9423012020

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 वर्ष पूर्वी

https://youtu.be/eRTJ01UYL7I
नमस्कार,
आमच्या 'कुबेर फौंडेशन यू ट्यूब चॅनेल'वर दर बुधवारी माझे साप्ताहिक सदर
"जीवन एक आंनदयात्रा"
सादर केले जाते....
आज या सदरातील विषय आहे - "आयुष्यातली चिडचिड"
दैनंदिन मानवी जीवनात एरवी अगदी किरकोळ कारणाने केला जाणारा त्रागा व त्यातून होणारी चिडचिड, अशा त्राग्याने होणारा मनस्ताप, वागण्यात होणारा बदल व त्याचे परिणाम याची चर्चा यात आहे.
माणसाची अशी चिडचिड होण्यामागची कारणे काय आहेत, आणि असा होणारा त्रागा व चिडचिड आपण टाळू शकतो का? याबद्दल सोदाहरण उहापोह या
"आयुष्यातली चिडचिड" या व्हिडीओत केला आहे...
तेव्हा जरूर ऐका, लाईक करा, कॉमेंट करा...

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 वर्ष पूर्वी

#बंडखोर
कोण म्हणतोय चोर
कोण चोरावर मोर
पापभिरू मी हा असा
म्हणू नका बंडखोर

नाचवला जसा मोर
गळ्यात पडला दोर
गुलामीत असता मी
कसा होऊ बंडखोर

गर्दीत या घनघोर
निंदती लहानथोर
शमले ते आंदोलन
बदनाम बंडखोर
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020.

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
1 वर्ष पूर्वी

#पात्र
मराठी भाषा आहे ही, एकाच शब्दाचे कितीतरी अर्थ असणारी ही समृद्ध अशी भाषा आहे! आता हाच शब्द घ्या की पात्र, या एका शब्दाच्या उच्चाराने वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात वेगवेगळा अर्थ येऊ शकतो म्हणजेच मराठीत फक्त तो शब्द उपयोगाचा नाही तर तो शब्द कोणत्या संदर्भात आलेला आहे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.
उदाहरण म्हणून खालील वर्णन वाचा...
"पात्रता असूनही त्याला डावलले गेल्याने तो विरक्त होऊन गंगा किनारी गेली कित्येक दिवस रहात होता. आता गंगा नदीच्या त्या विशाल पात्राकडे पाहून त्याला आपण किती शूद्र आहोत याची प्रथमच जाणीव झाली. त्याने तिथेच किनाऱ्यावर बैठक ठोकली आणि हातातले भिक्षापात्र समोर ठेवले. समोरच्या बाजूला विद्यार्थ्यांचे एक पथनाट्य चालू होते. गंगा नदीच्या प्रदूषणावर आधारित त्या पथनाट्यातले प्रत्येक पात्र जीव तोडून गंगामय्याच्या स्वच्छतेचा संदेश देत होते.थोडे पलीकडे एक युवक आपल्या प्रेमपात्राला बाहुपाशात घेऊन तिच्याशी लगट करत बसला होता.बाजूने जाणारे येणारे त्यांच्या त्या उघड्यावरच्या शृंगाराचे नयनसुख घेत होते... '
बघा इथे 'पात्र' हा एकच शब्द; पण किती वेगवेगळ्या संदर्भात वापरला गेला आहे...
अशी माझी मराठी भाषा, एक समृद्ध बोली!
©प्रल्हाद दुधाळ, पुणे 9423012020.

अजून वाचा
Pralhad K Dudhal तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 वर्ष पूर्वी

#द्रुत
शहरांची बेसुमार वाढ झाली.आस्तित्वात असलेल्या रस्त्यावर गर्दी मावेनाशी झाली.रस्त्यावर वाहने सोडा चालणेही मुश्किल झाले.गरज ही शोधांची जननी असते असे म्हणतात त्याप्रमाणे काही नव्या रस्त्यांची आणि महामार्गाची निर्मिती झाली या रस्त्यांवरून फक्त वेगवान वाहने जाऊ शकत होती.आधी असलेल्या वेगवान गतीला अती वेगवान अर्थात द्रुतगती बनवून दोन शहरातील प्रवासाचा वेग वाढला आणि अर्थातच वेळ कमी झाला.हे द्रुतगती मार्ग देशातील दळणवळण यंत्रणेचा महत्वाचा भाग झाले.अतिजलद महामार्गामुळे मालवाहतुकीला द्रुतगती आली.एरवी प्रचंड गर्दी असलेले हे महामार्ग महामारीच्या पार्शवभूमीवर बंद झाले आणि ओस पडले.
कधी कल्पना केली होती का की द्रुतगती मार्गही कधी थांबेल? एका अदृश्य विषाणूने हे करून दाखवले आहे. गती ते द्रुतगती आणि अचानक सद्गती मिळाल्यासारखे हे मार्ग ठप्प झाले. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाला दिलेले आव्हान एका क्षणात संपले.
याचाच दुसरा अर्थ आहे की कोणतीही गोष्ट द्रुत करू शकतो या माणसाच्या गर्वाचे घर निसर्गाच्या इशाऱ्यासरशी खाली झाले आहे.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट नैसर्गिक गतीने होणे कधीही चांगले;पण माणसाला प्रत्येक गोष्ट द्रुत अर्थात घाईने हवी असते. नैसर्गिक वेगाने मिळालेल्या गोष्टींचा आनंद काही और असतो;पण मानवी वृत्तीने प्रत्येक क्षेत्रात वेग आणला गेला आगे. हा द्रुतचा हव्यास एक दिवस त्याला अडचणीत आणणार हे निश्चितच होते आणि ती वेळ आली आहे....
द्रुतगती स्तब्ध झाली आहे...
कोरोनामुळे!
.... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

अजून वाचा