Engineer | Writer | Thinker


Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 आठवडा पूर्वी

ओढ..!


ओढ तुझ्या भेटीची
लागली रे मनाला
परतुनी ये लवकर
हा जीव वेडापिसा झाला

रात्रंदिवस वाट पाहते
तरी दिवस सरता सेरेना
तू येशील मजला भेटाया
ही आस काही संपेना

तुझ्या काळजीने
हुरहुर मनाला लागली
प्रत्येक क्षणी केवळ
तुझीच आठवण आली

आठवणीत तुझ्या 
कंठ दाटून आले
डोळ्यांवाटे अश्रूही
नभ बनुनी बरसले
नभ बनुनी बरसले...

प्रियांका कुंभार
(8/10/2021)


(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )

अजून वाचा
Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
7 महिना पूर्वी

फक्त तू... !!!


श्वास तू, ध्यास तू, विश्वास तू
माझ्या प्रिया, माझे प्राण तू ।।१।।

मनात तू, देहात तू, रोमरोमात तू
माझ्या प्रिया, माझे सर्वस्व तू ।।२।।

सखा तू, जीवलग तू, सहजीवन तू
माझ्या प्रिया, माझा आधार तू ।।३।।

माझे हसणे तू, लाजने तू, बहरणे तू
माझ्या प्रिया, माझा परमानंद तू ।।४।।

माझे सजणे तू, गालावरची खळी तू
माझ्या प्रिया, माझा साजशृंगार तू ।।५।।

माझी व्याकुळता तू, अधीर मन तू
माझ्या प्रिया, माझा विसावा तू ।।६।।

भास तू, आभास तू, स्वप्न तू
माझ्या प्रिया, जीवनाचे सत्य तू ।।७।।

दिवस तू, रात्र तू, चराचरात तू
माझ्या प्रिया, माझे विश्व तू ।।८।।

माझी पूजा तू, भक्ती तू, श्रद्धा तू,
माझ्या प्रिया, माझे पुण्य तू ।।९।।

माझे प्रेम तू, प्रीत तू, मनमीत तू
माझ्या प्रिया, मी तुझी अन् माझा फक्त तू ।।१०।। 

-प्रियांका कुंभार(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )

अजून वाचा
Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
8 महिना पूर्वी

कातरवेळ 🍃


या कातरवेळी सख्या ये तू जवळी
अधीर मनाला जणू तुझीच आस लागली

बघ दिवस सरता सरेना, सूर्य ही बुडेना
रात्र जणू पेंगाळतेय अन् चंद्र ही काही दिसेना

दिवस-रात्रीच्या कात्रीत अशी कशी मी अडकली
अशा या अधांतरी मनाला हुरहूर तुझीच  लागली

तुझ्या परतीची आपसूक चाहूल मनाला झाली
मग तुला पाहण्यासाठी ही वेडी व्याकुळ झाली

ह्या क्षणी केवळ तुझाच विचार मनी
डोळे दूरवर लावूनी वाट पाहे तुझी सखी...
वाट पाहे तुझी सखी....

- प्रियांका कुंभार
23/02/2021


(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )

अजून वाचा
Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
9 महिना पूर्वी

"मैं बन जाऊं तेरी जिंदगी..." by Priyanka Kumbhar read free on Matrubharti

Visit my profile to Read Full Poetry.


https://www.matrubharti.com/book/19905727/mai-ban-jau-teri-zindagi

Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
9 महिना पूर्वी

तुझा स्पर्श..! 💝

Visit my profile to Read Full Poetry.https://www.matrubharti.com/book/19905589/tuza-sparsh

Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धन्यवाद
9 महिना पूर्वी

Hello Everyone, Please Support me for better reach❤

https://www.matrubharti.com/priyankakumbhar1102


#story #writer #lovestories #poems #letter

Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रणय
9 महिना पूर्वी

Love letter to my first love ❤


"To My Love..!" by Priyanka Kumbhar read free on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19904339/to-my-love.

Please support me for better reach 🤗

Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
10 महिना पूर्वी

Happy New Year

-Priyanka Kumbhar

Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
10 महिना पूर्वी
Priyanka Kumbhar मातृभारती सत्यापित तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी
10 महिना पूर्वी