Hey, I am on Matrubharti!


Sandhya Bhagat तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
11 महिना पूर्वी

मला वेळ नाही दिला

प्रियंवदा लहानपणाासूनच खूप हुशार...
आई बाबा सिल्वा सा ला राहत ... त्यामुळे तिला आज्जी आजोबा कडे राहत होती... पूर्वी खूप लवकर लग्न व्हायची तर जर कुणी दाम्पत्य घरापासून नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी राहत असेल तर आज्जी आजोबा त्यांची नातवंड मोठ्या आनंदाने सांभाळायचे.. कारण त्यांच्या मुलीची काळजी असायची की तिला झेपेल का... म्हणून...

लहानपणा पासूनच आज्जी आजोबा च तीच जग होते... आई वडीलांना खूप कमी वेळ भेटलेली... तिच्या पाठी तिला आणखी दोन भावंड झाली.. एक बहिण आणि एक भाऊ... बहिण जोपर्यंत शाळेत होती तोपर्यंत आई बाबा सोबत राहिली नंतर कॉलेज मात्र तिने तिच्या ताईच्या कॉलेजलाच पूर्ण केलं...
प्रियंवदा शाळेत अभ्यासात ही खूप हुशार होती... त्यानंतर कॉलेज ला... आणि तिची आज्जी सगळ्यात जिव्हाळ्याची तिच्यासाठी... हे दोघेच तीच सगळं काही... तिने इंजिनिअरिंग केलं... त्यानंतर चांगली नोकरी देखील मिळाली...
आता आई बाबा मात्र गावी येऊन राहिले.. वडिलांनी रिटायरमेंट घेतली म्हणून... पण तीच बंध मात्र आज्जी आजोबा सोबतच होते.. ती कधीही आई बाबा कडे राहायला आली नाही... बहिण मात्र पुन्हा आई बाबा कडे येऊन राहिली... आईला वाटायचं तिच्या पियु ने तिच्या सोबत वेळ घालवावा.. शॉपिंग ला यावं.. पण ती कधीही आईला वेळ नाही द्यायची... सुट्टीच्या दिवशी दोघी बहिणी खूप फिरायच्या... मुवि .. शॉपिंग.. सगळं काही... शीतल नेहमी तिला सांगायची की आई ला पण तुझी सतत आठवण येते पण तू येत नाही... तिला  वेळ देत नाही...
तिने तिला एकच उत्तर दिले... " तुला तिने वेळ दिला.. तू दे तिला.. पण मला मात्र लांब ठेवलं तर मी कधीही तिला वेळ नाही देणार ... जन्म दिला तर त्या उपकाराची जाणीव नेहमी ठेवेल... कारण त्याची परतफेड कधी होत नाही... आणि तुला माहितीये आज्जी अजूनही माझ्यासाठी राबते... तसा आई ने कधी तुझ्याकडे किवा विवेक कडे माझ्यासाठी काही तरी पाठवलंय का... तीच प्रेम म्हणून.. मग मी कसं वेळ देऊ..."

नंतर आजोबांच्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न झालं...तिचा नवरा खूप चांगला मिळाला... त्याला आई वडील आणि एक बहिण आहे..  एका नामांकित कंपनीत ती नोकरीला आहे... . तिला छान मुलगा आहे.. तिची फॅमिली सुद्धा खूप छान आहे... तिच्या सासूचे सगळे नखरे सहन करते फक्त तिच्या मुलासाठी.... कारण त्या दिवसभर आदी ला सांभाळतात त्यामुळे तिला सकाळ आणि सायंकाळ तिच्या मुलासोबात घालवता येते... कारण तिला आज जे तिच्या आई बाबा बद्दल वाटत ते तिच्या मुलाला नको वाटायला... की मला वेळ नाही दिला..


#विश्व

अजून वाचा