मी..माझ्या भाषेत सांगतोय काही..नक्कीच आवडेल तुम्हाला...वाचायला हवे असे.

Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
8 तास पूर्वी

#पाऊल

यशाची लागता तुम्हाला चाहूल
आत्मविश्वासाचे उचला पाऊल
पुन्हा न व्हावी कसलीही चूकभूल
हातचे यश अन्यथा देईल हूल...

©®संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
2 दिवस पूर्वी

#भावुकता

"भावुकता" न समजावी कमजोरी
बुद्धीवर परी न होऊ द्यावी भारी..
अंतरीची हाक हीच भावनेची शिदोरी
कला जोडण्याची ह्रदयाची उदारी.

©® संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
4 दिवस पूर्वी

#गुणवत्ता

भोवती एकवटली सत्ता
घरी-दारी नांदो सुबत्ता
खाव्या लागतात तरी खस्ता
अंगी नसेल जर "गुणवत्ता".

©®संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
5 दिवस पूर्वी

#प्रश्न

पडावेत "प्रश्न"शोधात उत्तराच्या
ठरावी दिशा मागाने पायधुळीच्या

©® संजय स गुरव

Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 आठवडा पूर्वी

#निष्क्रिय

खजिना बुद्धीचा ओसंडतो जरी
वापरावीण गंज चढे पाहा त्यावरी
वाचाळवीर नव्हे असावे कर्मवीर
"निष्क्रिय" नसावा कमानीचा तीर.

©® संजय स गुरव.

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 आठवडा पूर्वी

#पासवर्ड

कडू अनुभव कालचा करुन डिलीट
धडा मनाच्या कप्प्यात करावा फिट्ट.
संदेश योग्य पुढे करुन नीट फॉरवर्ड
जपावा ह्रदयी यशाचा अचूक "पासवर्ड".

©© संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 आठवडा पूर्वी

#मागील

नेहमीच का जायचे सांगा
"मागील" पानावरून पुढे ?
पडावे नवे प्रश्न मनाला
गिरवावे कधीतरी नवे धडे.

©® संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
1 आठवडा पूर्वी

#चित्र

झोपेत पडती ती असंख्य स्वप्ने विचित्र
जागेपणी पाहावे मनाच्या तळाशी मात्र.
यशासाठी ठरवावे हुकमी एकच सूत्र
साकारेल डोळ्यांत खात्रीने सुंदर "चित्र".

©® संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
2 आठवडा पूर्वी

#पक्ष

अडथळे आले जरी राहावे सदा दक्ष
हसत राहा,जीवन होवो न कधी रुक्ष
चांगुलपणा भरभरून आसंडावा वक्ष
सत्याचा सोडू नका कधीही तुम्ही "पक्ष"

©® संजय स गुरव

अजून वाचा
Sanjay Gurav तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
2 आठवडा पूर्वी

#भटकणे

कार्यभार आपला चोख आटोपणे
मार्ग सत्याचा अविरत हो चालणे
खरे ऐकणे, बरे बोलणे,योग्य पाहणे
घडो न कधीही जीवनी व्यर्थ "भटकणे".

©® संजय स गुरव (सदासन)

अजून वाचा