Ti Chan Aatmbhan book and story is written by Anuja in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ti Chan Aatmbhan is also popular in सामाजिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ती चं आत्मभान.. - कादंबरी
Anuja
द्वारा
मराठी सामाजिक कथा
"ती"च आत्मभान - आत्मभान म्हणजे काय तर स्वत्वाची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार!! जे केल्याशिवाय आयुष्य जगण्यातली मजा येतंच नाही. प्रत्येकालाच आत्मभान असण्याची नितांत गरज असते आणि स्त्री जी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे तिला तर आत्मभान असण अतिशय गरजेच आहे. स्त्रीला जेव्हा आत्मभान येत तेव्हा ती स्त्री खऱ्या अर्थाने तिचं आयुष्य जगायला लागते आणि स्त्री जगायला लागली की समाज सुद्धा बदलायला वेळ लागत नाही.
आत्मभान ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. आत्मभान ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल मॉडेल असतेच आणि तेच ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. ह्या पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टीतून वेगळाच पैलू मांडायचा प्रयत्न झाला आहे. स्त्री ही अगदी जन्मापासूनच लढा देत जगते, स्त्री कधी स्वतःशी लढत असते तर कधी समाजाशी! प्रत्येक क्षणी आयुष्यात काहीतरी नवीन शिकत असते आणि शेवटी ती जिंकतेच!! 'स्त्री जन्म भोगण्यासाठी आहे' ही विचारसरणी बदलायची गरज आहे. जुने दिवस गेले. आता नवीन वारे वाहू लागले आहे. स्त्रीच्या अस्तित्वाचा स्वीकार होतो आहे. आता स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. स्त्री अबला नाही हे ती जगाला दाखवते आहे. जेव्हा एक मुलगी, एक बाई स्वतः मधले गुण ओळखून तिची प्रगती करायला पुढे सरसावते तेव्हा तिच्या प्रगती सोबत समाजाला सुद्धा सशक्त बनवण्यास हातभार लावत असते. अश्या आपल्यातल्या प्रत्येक स्त्री ने आपल्यातले सुप्त गुण ओळखून अधिकाधिक प्रगती करावी आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्री ला खंबीर बनवण्यासाठी प्रेरणा घ्यावी हाच ह्या पुस्तक मागचा उद्देश आहे. जन्म घेणारा प्रत्येकजण खंबीर आहे आणि तो खंबीरपणा टिकवून ठेऊन आयुष्य उत्तम बनवावं म्हणून प्रत्येक स्त्री साठी आणि स्त्री ला साथ देणाऱ्या सगळ्या पुरुषांना हे पुस्तक समर्पित आहे.
ह्या पुस्तकात मी संपादकाच काम केलं आणि आणि प्रत्येकवेळी मी काहीतरी नवीन शिकत गेले. वेगळे विचार असलेल्या लेखकांचा सहभाग असलेले हे पुस्तक वाचकांसमोर ठेवतांना मला विशेष आनंद होत आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक वाचतांना तुमचे विचार, तुमचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल आणि स्वतःची क्षमता नव्याने कळेल.
जाता जाता, पुस्तक कसं वाटलं हे सांगायला विसरू नका. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा जरूर कळवा.
अनुजा कुलकर्णी.
प्रस्तावना- ती चं आत्मभान.... ह्या कथासंग्रहासाठी १४ वेगवेगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पुस्तक तयार झाले. आत्मभान ह्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरच्या १५ कथा आहेत. त्या साऱ्या कथा स्त्री च्या आयुष्याभोवती फिरतात. प्रत्येक स्त्री ही एक रोल ...अजून वाचाअसतेचं आणि ते ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे.
१. आव्हान- हे पहा वैशाली! आपल्या कॉलेजमध्ये नृत्यामध्ये पारंगत तू एकटीच आहेस, त्यामुळे कॉलेजतर्फे स्पर्धेसाठी मी तुलाच पाठवणार यात शंका नाही पण स्पर्धेत फक्त नृत्याविष्कार पाहिला जात नाही तर एकूण व्यक्तिमत्वही पाहिले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये तू स्वतःची काळजी घेतलेली दिसत नाही. वजन खूप वाढलेलं दिसतंय! नृत्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे नाहीतर हालचाली बेढब दिसतात. तू पुढच्या दीड महिन्यात स्वतःला फिट बनवू शकशील का तेवढं केलंस तर नृत्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही याची मला खात्री आहे.
२. एक कमाल मुलगी- राधिका! सुंदर आणि बुद्धिमान मुलगी! तिला विद्वत्तेचे वरदानही तसेच मिळालेले! शिवाय academics मध्ये कायम topper आलेली. कारण विषयाचे पाठांतर न करता कन्सेप्ट आधी समजाऊन घ्यायचे ही तिची खोड. त्यामुळे अवघड प्रश्नही तिला फारसे ...अजून वाचाजायचे नाहीत. ह्याच सवयीचा तिला खूप फायदा होत होता.
३. राणी माशीचा विजय- गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवीत येई
कड्यावरुनी घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या
घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभवती,
जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत,
मस्त आयुष्य झोमू आणि पीहू माश्या जगत होत्या. कोणतीच बंधने त्यांना अडवू शकत न्हवती. गाण ...अजून वाचाझोमू आणि पीहू माश्या महालात शिरल्या. त्या दोघी महालात शिरल्या खऱ्या पण त्या स्वतःच्या धुंदीतच होत्या. आपण पोळ्यात आलो आहोत ह्याच भानही त्यांना न्हवत.
४. नित्या- विश्व हिंदू विद्यालयाच्या गेट मधून गाडी आत गेली. पार्किंग मध्ये त्यावेळी तशी फारशी वर्दळ नव्हती नित्याने गाडी पार्क केली आणि ती तशीच बसून राहिली. तिची नजर काहीतरी शोधत होती आणि छातीत कमालीची धडधड होत होती. ...अजून वाचावाढलं की नखांच्या बाजूला असणारी क्युटिकल्स कुरतडण्याची तिला वाईट सवय होती नकळत आताही ती तेच करत होती. गाडीत पुन्हा एकदा मागे वळून तिने खात्री करून घेतली की, सोबत आणलेल्या साऱ्या वस्तू नीट मागच्यासीट वर तर आहेत ना.. हंम्म...! सारे व्यवस्थित होते.
५. परिवर्तन घडतांना- प्रत्येक मुलगी काही स्वप्न उराशी बाळगून जगत असते. कधी झटत असते कधी समाजाशी लढा देत असते. अनिशा सुद्धा बरीच स्वप्न उराशी बाळगून जगत होती. अनिशा दिसायला तशी रूपवान. कोणावरही सुंदर छाप पडेल अस वागण बोलण अनिशाच ...अजून वाचाअनिशाचं कॉलेज पूर्ण झाल ते अगदी आरामात. आणि तिला मनासारखा जॉब लगेचच मिळाला. अनिशा खुश होती. मनासारखं शिक्षण पूर्ण झाल्यावर मनासारखा काम करता येणार ह्या गोष्टीचा अनिशाला आनंद झाला होता. जॉब चालू होऊन थोडे दिवस झाले. काही दिवसातच तिला प्रमोशन मिळाल.