नमस्कार वाचकहो शाळेत असल्यापासून काव्यलेखनाची आवड आहे. मात्र गेल्या 5 वर्षापासून blogs, कथा सुद्धा लिहित आहे. मायबोली, storymirror.com, facebook, instagram, Pratilipi वर लिहित आहे. मराठी,हिन्दी, English,गुजराती भाषेत लिहित आहे. आईने लावलेली वाचनाची आवड, पत्नीची प्रेरणा, मित्रांचे कौतुक आणि वाचकांचा सुयोग्य आशिर्वाद यामुळे पुनश्चा जोमाने Matrubharati वर लिहित आहे. लक्ष असू द्या. आपला नम्र सूर्यांश (suryakant majalkar)


Suryakant Majalkar तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रणय
5 महिना पूर्वी

रुपयौवनाचे काय गुण गाऊ
शब्दांत तुला कुठे स्थान देऊ।
चिंब भिजल्या देहाचे, तारुण्य किती पाहू
तुझ्या मोदांनदाचे, कोणते गीत गाऊ।
देहभान विसरुन बेफाम होऊनी नाचू
कितीदा तुला कितीवेळ पाहू।
मनातली तळमळ तुला कशी सांगू
प्रेमपरमेश्वराकडे आणखी काय मागू।
नग्न पावलांचे ठसे सांगून जातील
खुल्या अंगणात तुला शोधतील।
आणिक सोबतीला पावले शोधतील
कोणासवे होती आपसात चर्चतील।
सख्या विचारतील तुला वेठीस धरुन
कोण होता तो तरुण सांग म्हणतील।
निमित्त पावसाचे मनसोक्त भिजायचे
काही नाही बोलायचे,गुपित मनात ठेवायचे।
ओळखतील चतुर त्या रहस्य सारे काही
भेटला कोणी मनभावी पावसात की।
हसशील लाजून मला माहीत आहे
तु माझ्या खात्रीने प्रेमात आहे।

अजून वाचा

रात्रीच्या समया


नखरेल तुझी ही चाल

बोलणे तुझे मधाळ

डोळे इष्काचा प्याल

केलेस मजला घायाळ ||


मजला सांग नवतरुणी

कशी अवतरली अगंणी (१)


तु रंगात येना जराशी

अधर जुळती अधराशी (२)


लाज तुझी मला गमली

ह्रदय तार तु छेडली (३)


नको दवडूस वेळ आता

होईल पहाट आता (४)


गोरी तुझी ग काया

काय करशी रात्रीच्या समया (५)


मुक्त उधळ तुझे हास्य

उलगड प्रेमाचं रहस्य (६)


काय उपमा देऊ तुजला

चांद नभी खुद्कन हसला (७)


तु परी तु अप्सरा

कोण असशी सांग मजला (८)

अजून वाचा
Suryakant Majalkar तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
6 महिना पूर्वी

हरवलेले गीत

हरवलेले गीत भेटेल का गं
प्रथम नेत्रीची प्रीत भेटेल का गं
बघ भावनांचा कल्लोळ झाला
आज तरी वेळ भेटेल का गं ।।

व्यवहारी विचारी पेलून सारी
ह्रद्याशी ह्रद्य खेटेल का गं ।।

तु ग्रृहलक्ष्मी मी अन्नदाता
तु मायाममता मी इःकर्तव्यता
मेळ दोघांचा होईल का गं ।।

गलित तन झाले मन न झाले
आज तरी चांद उगवेल का गं ।।

अजून वाचा
Suryakant Majalkar तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
6 महिना पूर्वी

#KAVYOTSAV -2

चंचल (कविता)

 चंचल अवखळ तरी लाजरी

सुशील सुंदर आणि हसरी

फुंका कोणी स्वानंदे तुतारी

छेडा कोणी मधुर बासरी (1)


होई तिचा क्षण न क्षण सखा

होई तिची पूर्ण  प्रत्येक इच्छा

असो तो सागर ती मग सरिता

आम्ही बिंदू ती जीवन रेखा (2)
 

उदंड लाभो आयुष्य तुजला

साथ सदैव मित्र परिवाराला

बाल्य तुझ्यातले मन स्पर्शते

बोलणे तुझे ह्रिदयास  भिडते  (3)

 

प्रयत्न तोकडा तुझ्यासाठी

लिहिता झालो प्रेमापोटी

शब्दांची केली ऐशी दैना

कविता केली मोद मना  (4)

अजून वाचा