मुसाफिर हूं यारों ...... मुझे बस चलते जाना हैं....

Swapnil Tikhe तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धन्यवाद
1 वर्ष पूर्वी

सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे

तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः।

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा😊😊😊

अजून वाचा
Swapnil Tikhe तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी गाणे
3 वर्ष पूर्वी

तू रुसतेस तेव्हा, वाटते सगळे जगच चुकते,
खरेच का इथे कोणीच कुणाचे नसते?
असंख्य आठवणी, विविध भावना मनामध्ये कल्लोळ करतात,
मग काय?, मनाला आवरण्याचे सगळे प्रयत्न अपुरेच पडतात.
अशा वेळी आपलेही परकेच भासतात,
अगदी गुलाबाच्या फुलातही केवळ काटेच दिसतात.
ओळखीच्या रस्त्यावरही नेमकी वाट सापडत नसते,
उत्तर माहित असूनही, साधे गणित सुटत नसते.
मंद वाहणारा वाराही बोचरा वाटू लागतो,
हळूच डोकावणारा सूर्य प्रकाशही अंग भाजू लागतो.
मणा मणाने वाढत जाते मनावरचे ओझे,
क्षणा क्षणाने मंदावत जातात हृदयाचे ठोके.

अगदी चुकूनच, निमित्त होते तुझ्या हसण्याचे,
मनमोकळे हसतानाही अगदी गोड लाजण्याचे.

मग मात्र,
परत एकदा, सगळे ओझे घेऊन मन वेगात धावू लागते,
हृदयाची धडधडही कणा कणाने वाढू लागते
.
ओझे उतरते, मन आवरते, गणिते सुटतात आणि मार्गही सापडतो
राखराखते ऊन गारवाच देते आणि सोसाट्याचा वाराही आल्हाददायी वाटू लागतो,

चिखलातही कमळच दिसते,
जग परत एकदा बरोबरच भासते.

आपली माणसे आपलीच असतात,
परके तरी कुठे वाईट असतात?

एकंदरीत,
सगळे आहे तसेच चालू असते,
माझे मनच तुझ्या रुसण्या हसण्यावर नाचत असते,

तुझ्या सुखाशिवाय माझे सुख मिळत नसते,
तुझ्याच पाशी येऊन माझे जग संपते.

तूच माझी प्रतिभा, तूच प्रेरणा, तू सहचारिणी
तूच माझ्या शरीराची जीवनवाहिनी

आता तरी तुला पटले असेल,

तूच बळ आहेस लढण्याचे,
आणि निमित्त आहेस सुखाने जगण्याचे.

- Swapnil Tikhe

अजून वाचा

आणि... डॉक्टर काशिनाथ घाणेकर!!!


हा चित्रपट आतापर्यंत बहुतेकांनी सिनेमागृहामध्ये पहिला असेल अथवा त्यासंदर्भातील परीक्षणे वाचली असतील. सध्याच्या वेळी सर्वत्र चर्चेत असलेली ही कलाकृती आहे. त्यामुळेच त्याचे संपूर्ण परीक्षण करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही आहे.


अर्थात, तरीही हा लेख लिहिण्या मागचे कारण म्हणजे सर्व परीक्षणे वाचली, चर्चा ऐकल्या पण काही मुद्दे या सगळ्यातून सुटून गेल्यासारखे वाटतात आणि ते मांडण्याचा मोह आवरत नाही इतकेच...


हा सिनेमा एक उत्तम कलाकृती आहे हे आता सर्वश्रुत आहे, पहिल्या दृश्यापासूनच तो प्रेक्षकांवर एक पकड मिळवतो आणि ती कुठेही ढिली पडू न देता पुढे सरकतो.


मात्र या सिनेमातील जाणवलेले वेगळेपण म्हणजे कथेमधील प्रमणिकपणा. सिनेमाची पटकथा ही 'नाथ हा माझा' या पुस्तकावरून प्रेरित आहे असे समजले. कदाचित त्यामुळेच या सिनेमात काही मते परखड पणे मंडळी आहेत. 

डॉक्टरांच्याकडे एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून बघण्यात आले आहे. त्यांचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, किंवा सिनेमा तिकीटबारीवर चालण्यासाठी नायकामधील गुणदोष लपवण्याचे काम हा सिनेमा कुठे करत नाही किंवा केवळ समाजाला पटतील म्हणून काही वाक्ये नायकाच्या तोंडी देण्यात आलेली नाहीत. 

या सिनेमाचे हे वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही.

 

सिनेमाच्या माध्यमातून डॉक्टरांचा चरित्रपट आपल्यासमोर अलगदपणे उलगडत जातो. त्यांच्या आयुष्यातील, व्यक्तिरेखेतील विविध पैलू आपल्यासमोर उलगडत जातात.

काम मिळण्यासाठी झटणारा अभिनेता, वडिलांच्या तोंडून कौतुक ऐकण्यासाठी तळमणारा एक मुलगा आणि मग यशाच्या शिखरावर पोचलेला एक अभिनेता असा जीवन प्रवास प्रामाणिकपणे मांडण्यात आला आहे. इथपर्यंत प्रामाणिकपणा सगलीकडेकच असतो मात्र चित्रपटाचा प्रवास वेगळा ठरतो तो यापुढे.  

त्या शिखरावर पोचल्यावर समोर येणारी वादळे चाहत्यांच्या मनात टिकून राहण्याचा अट्टाहास, कौतुक ऐकून घेण्याची नशा, त्यामुळे वाढलेला अहंकार, तसेच व्यवसायात निर्माण होणारी स्पर्धा आणि मग ती जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न सगळेच परदर्शीपणे मांडले आहे. हे सगळे करत असताना नायकातील गुणदोष पारदर्शीपणे मांडले जातात, 'प्रेक्षकांचे नायकाविषयी काय मत होईल?' या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कथेची मांडणी केली असल्यामुळे कथेतील प्रामाणिकपणा मनास भिडतो.

अर्थात हे सगळे करत असताना चित्रपटातील रंजकता मुळीच कमी होत नाही, एकूणच डॉक्टरांच्या कथेने परत एकदा प्रेक्षकवर्गाला परत एकदा थिएटरवर खेचून आणले आहे. त्यांवही लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते -

"डॉक्टरांचे नाणे आजही एकदम खणखणीत वाजत आहे.... पिक्चर बनला आहे एकदम टॉप.... एकदम कडकssss....."

अजून वाचा
Swapnil Tikhe तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी गाणे
3 वर्ष पूर्वी

समाधान


आयुष्यात समाधान कमावण्याचा मी खूप प्रयत्न केला,
पण त्यानेच दरवेळी आमच्या भेटीचा खेळ-खंडोबा केला.

आता समोर दिसते आहे, हळूच जाऊन पकडावे,
त्याने मात्र अलगद सुटून दूर उभे राहून हसावे.


प्रयत्नांना शिस्तीची जोड देऊन आक्रमणाची मी वाढवली धार,
ते खुदकन हसले, म्हणले मनावर घेऊ नकोस फार.


समाधान सापडत नाही, मिळत नाही म्हणून केला होता मी त्रागा,
नकळतच हातातून सुटत चालला होता हातातील सुखाचा धागा

समाधानामागे मी धावत होतो जोरात,
ते मात्र माझ्याशी लपंडाव खेळत होते जोमात


शेवटी मी ही थकलो, जरा निवांत बसलो
ते मला खुणावत होते पण मी नाही धावलो

त्याच्या या चालाखीवर प्रथमच मन नाही भूलले,
आणि नकळतच या खेळाचे गुपित मला कळले

आता त्याच्या मागे धावत नाही, मोकाट सोडले आहे त्याला
तेच सारखे निमित्त शोधून भेटते आहे, भेटून खिजवते आहे मलाआता मी हसतो, सुखात असतो, सुटू देत नाही धागा
समाधान असते जवळच कुठेतरी, मला ठाऊक आहे त्याची जागा.


मला समजले तेच तुम्हालाही सांगतो,

जेव्हा मन मृगजळा मागे धावायचे थांबते,
त्याचवेळी आयुष्यात सुखही समाधानाने नांदते.


Swapnil

अजून वाचा
Swapnil Tikhe तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
3 वर्ष पूर्वी

Life is BUMPY RIDE at times, all we can do is drive as smoothly as we can and enjoy the ride (till it lasts)....
Swapnil Tikhe
Bumpy Ride

आनंद (1971)- 
Director - Hrishikesh Mukharji
Dialogues - Gulzar...
संवादातून तत्वज्ञान.....“बाबूमोशाय जिन्दगी और मौत तो उपरवाले के हाथ में हैं| उसे न तो आप बदल सकते हैं न में| हम सब तो रंगमंचकी कठपुतलियाँ हैं, जिसकी डौर उपरवाले की उँगलियों में बंधी हें|”

आनंद सिनेमातील हा डायलॉग सिनेसृष्टीतील अनेक डायलॉग पैकी एक आहे. हा डायलॉग इतका प्रभावी आहे की जणू अख्खा आनंद सिनेमाच या डायलॉग भोवती फिरतो. 

तसे पाहीले तर “आनंद” हा सिनेमा आताच्या व्यावसायिक सिनेमाच्या पठडीत मुळीच बसणार नाही. कारण सध्याच्या काळात चित्रपट हिट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या समि‍करणात कदाचित नीट बसणार नाही. तरीही मनावर प्रभाव टाकण्याच्या बाबतीत हा सिनेमा कुठेही तसू भर सुद्धा कमी पडत नाही.

आनंद हा सिनेमा सर्वात प्रथम मी दूरदर्शन वर पहिला.  “आनंद” हा सिनेमा आज इतक्या वर्षा नंतरही केवळ स्मरणात राहतो इतकेच नाही तर आयुष्यातील काही निर्णयांवर प्रभावही टाकतो.

अगदी साध्या पद्धतीने सुरु होणारा हा सिनेमा अत्यंत साध्या पद्धतीनेच पुढे सरकतो. दिल्लीवरून मुंबईच्या एका डॉक्टरकडे उपचारासाठी येणार्‍या एका व्यक्तीची ही कहाणी आहे. ही व्यक्ती मुंबईत उपचारासाठी जरी येत असली तरी ती केवळ एक औपचारिकताच आहे. त्याच्या दोन्ही डॉक्टरांना माहित आहे की या आजारावर करण्यासारखे त्यांच्या कडे उपचारच नाहीत. पेशंटने उरलेला वेळ आनंदात घालवावा म्हणून केलेली ही एक सोय आहे. सिनेमा हा या व्यक्तीच्या मुंबईतील आगमनापासून सुरु होतो, आणि रोजनिशीच्या प्रसंगातूनच पुढे जातो.

यातील वेगळेपण जे मनाला ठसते ते म्हणजे या सर्वच प्रसंगातूनच काही ना काही तत्त्वज्ञान पुढे येत राहते. हा चित्रपट तुम्हाला खुर्चीवर कदाचित खिळवून ठेवणार नाही, पुढे काय होणार असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होणार नाही, तरीही समोर जे चालले आहे ते इतके प्रभावीपणे पुढे सरकते की माणूस विचारात अडकल्या शिवाय राहात नाही.

“जिंदगी बड़ी होनी चाहिए, लम्बी नहीं|”,

“जब तक जिन्दा हूँ मरा नहीं| जब मर गया साला मैं ही नहीं|” असे विविध डायलॉग नक्कीच विचार करायला भाग पाडतात.

मुंबईत येणार्‍या व्यक्तीचे नाव, जे या चित्रपटाचेही नाव आहे “आनंद” हे सुद्धा अत्यंत सूचकपणे वापरले आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा आनंद येत असतो. तो जेव्हा येतो तेव्हाच खरे तर प्रत्येकाला माहित असते की हा चिरकाल टिकणार नाही, फार तर आपल्या बरोबर काही क्षणांचाच सोबती आहे. ही सर्व परिस्थिती माहित असून सुद्धा त्याचे (आनंदाचे) स्वागत करणे, त्याच्याबरोबर वेळ घालवणे आणि आठवणी तयार करणे हे कोणीच टाळू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचे कर्तव्य निभावत असतो. परंतु हे सगळे करत असताना नकळतच आपण त्याच्या (आनंदाच्या) संमोहनात अडकत असतो. तो आपल्याला सोडून जाणार हे वास्तव आपल्या मनाच्या एका कोपर्‍यात असले तरीही ते आपण जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्षित करतो. त्याचा सहवास आपल्याला हवा हवासा वाटू लागतो, किंबहुना त्याने आपल्याला कधीच सोडून जाऊ नये ही भावना आपल्या मनात दृढ होत असते तो मात्र वेळोवेळी निर्विकार पणे आपल्याला एकच सत्य सांगत असतो –

“बाबूमोशाय जिन्दगी और मौत तो उपरवाले के हाथ में हैं| उसे न तो आप बदल सकते हैं न मैं| हम सब तो रंगमंचकी कठपुतलियाँ हैं जिसकी डौर उपरवाले की उँगलियों में बंधी है|

कब? कौन? कैसे उठेगा? ये कोई नहीं बदल सकता............”

अजून वाचा
Swapnil Tikhe तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
3 वर्ष पूर्वी

तुम्हारी बिती यादों मी इस कदर खो जाते है हम,

कभी कभी, 'आज' को जिनाही भूल जाते है हम।फिर भी यादों से कोई शिकवा नही हमें,

बस उन्हें दुबारा जी नहीं सकते, यही गम है हमें।काश तुम अब भी साथ होती तो थोडी गुस्ताखी करता,

कुछ कडवी यादों को, सुधारके दुबारा लिखने की कोशिश करता।अफसोस की हम जानते है, साथ आना अब मुमकीन नहीं,

इन गुजरी हुई यादों के अलावा, जिंदगी में अब कुछ हसीन नहीं।इन्हीं यादों के सहारे अब जी लेंगे हम,

बुरा न मनो, जिंदगी के सारे सितम सह लेंगे हम।

अजून वाचा