I love to write


Yogita vital Takatrao तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
1 महिना पूर्वी

ज्वालामुखी झाली अशी
माझी तुझी ही भावना ,
रौद्र रूपे उसळते 
मनालाही ती ऐकेना !

किती कोंडमारा असा  
एकटीने सोसायचा,
परतावे मागे सदा
भाग हा परंपरेचा !

कन्या आहे म्हणोनी मी 
कानी हेच आदळले,
थोडं सोसायचं पोरी
जगी हेच आढळले !

थोडी उंच उडालेली
आपटते कोसळून,
दिल्ली ते हिंगणघाट
पंख टाकले छाटून !

अशी कशी मी सबला
आवरेना हा आक्रोश,
घनघोर आता युद्ध 
सारे तोडून हे कोष !

होत स्वयं सिध्द नारी
काली,दुर्गा मी होईन,
एक एका नराधमा
धडा सुध्दा मी देईन !

एक एका नराधमा
धडा सुध्दा मी देईन !

-योगिता

अजून वाचा