कूस! - ०२.

  • 8.1k
  • 4.4k

आतापर्यंत आपण पाहिले, पाटलांच्या सुनेच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते! घटनेच्या तपासणीचे आदेश पोलीस उप निरीक्षक संजीव नाईक यांना देण्यात आले होते. आता पुढे! काही वर्षांपूर्वी चुकीच्या आरोपांखाली संजीव नाईक यांची बदली करवण्यात पटलांचाच हात होता. पाटलांच्या कार्यकाळात त्यांनी पाटलांना सळो की पळो करून सोडल्यामुळे नाईकांवर त्यांचा राग होता. पाटलांची दुसरी बाजू आयुक्तांना माहीत असल्याने त्यांच्यासाठी या घटनेचा न्यायपूर्वक तपास करणे, वर्दीला न्याय मिळवून देण्यासारखे होते. रुग्णालयातून ते थेट पोलीस ठाण्यात पोहचले. पाण्याचा ग्लास पूर्ण खाली करत त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि काळ्या रंगाचा पेन उचलून घेत काही तरी विचार करत ते पांढऱ्या रंगाच्या फळ्यापाशी जाऊन उभे राहिले. डॉक्टरांकडून