शालिनीचं काय चुकलं ? भाग १ मार्च महिन्यातले दिवस. सर्व साधारण पणे वार्षिक परीक्षेचे दिवस. आज रवीशंकर शाळेमध्ये वार्षिक पारीक्षेचा शेवटचा दिवस होता. ९ वी च्या वर्गात फिज़िक्स चा पेपर चालू होता. शालिनी मॅडम वर्गावर होत्या. वर्गावर त्यांची बारीक नजर होती. तिसऱ्या रांगेतल्या निलेश कडे त्यांची नजर गेली आणि त्यांना काही तरी जाणवलं. त्या उठून निलेशच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. निलेश चपापला, लिहिणं थांबवून उगाचच विचार करतो आहे असा चेहरा करून बसला. मॅडम तिथेच उभ्या होत्या आणि निलेशला काय लिहावं हे सुचत नव्हतं. थोडा वेळ तसाच गेला. निलेश नुसताच बसून होता. अजून पांच मिनिटं झाली आणि शालिनी मॅडम नी निलेशला