Mori helps her parents in their activities so that they can live in harmony with nature. फुसफुसनारे ताड दीपा गांगवाणी व टीना सुहानेक लिखित मोरी नावाची एक छोटी मुलगी होती तिचे डोळे मोठे तपकिरी होते. ती आईवडिलांसोबत छोटया निळ्या तलावाच्या जवळ एका सुंदर अशा नारळाच्या बागेत रहात होती. दररोज सकाळी एक खाली मोठी टोपली डोक्यावर घेऊन ती तलावाकडे जायची. तिची आई धुवायचे कपडे घेऊन आणि तिचे वडील मोठे मासे पकडायचं जाळं घेऊन तिच्या मागे मागे चालायचे. जेव्हा तिचे वडील मासे पकडायचे, तेव्हा तिची आई तलावा जवळी खडकावर कपडे धुवायची. त्यांनी पकडलेले मासे, किनारावर आणीत आणि ते एका मोठया टोपलीत ठेवत. काही वेळा तर त्या जाळ्यात कासवच अडकलेले सापडायचे, परंतु मोरी नेहमी त्यांना लवकर बाहेर काढून वाचवत असे. एकदा एका सकाळी ती तीच्या बाबां बरोबर होती जेव्हा ते मासे पकडत होते, “जर आपण रोज खूप मासे पकडले तर एक दिवस असा येईल की येथे काहीच शिल्लक उरणार नाही!” मोरी म्हणाली. आई हसली आणि तिने तिला शाळेत पाठवले. झाडाच्या सावली खाली मोरीच्या आईला गाढ झोप लागली. तलावात एकही मासा शिल्लक नाही असे तिला स्वप्न पडले. वाऱ्याने नारळाची पाने सळसळली आणि बोलू लागली: “पाणी आणि जमीन नेहमी तुझ्या परिवाराची काळजी घेतली आहे, म्हणून तू सुद्धा त्यांची काळजी घ्यायला हवी.” पाण्याने भरलेल्या डोळ्याने तिला जाग आली. कारण तिला काहीच कळत नव्हते. थोडे मासे विकून ते मोरीला कसे संभाळू शकतील. दुपारभर ती नारळाच्या झाडापासून चटया विणत होती आणि सारखी तिला पडलेल्या स्वप्नाच विचार करत होती. त्या रात्री मोरीने तिच्या आईबाबाचं हळू आवाजात बोलणं गुपचूपपणे ऐकल. तेलाचा दिवा रात्रभर जळत होता. दुसऱ्या दिवशी तिच्या बाबांनी तिला एक दुसरी छोटी टोपली दिली. “आपण सर्व मासे ह्या छोटयाशा टोपलीत कसे भरू शकतो?” मोरीने विचारले. त्यांनी उत्तर दिले, “आपण या छोटया टोपलीत बसतील एवढेच मासे पकडायचे.” मोरी कोडयात पडली. जेव्हा ती शाळेतून परत आली तेव्हा तिने आईला नारळापासून साबण आणि तेल बनवताना पाहून तिला खूप आनंद झाला. मोरी ताबडतोब आणखी नारळ काढण्यासाठी झाडावर चढली, पण तिच्या आईने ताकीद दिली, “त्यांना तोडू नकोस. आपण तेवढयाच गोष्टीचा वापर केला पाहिजे, ज्या आपल्याला झाडापासून मिळतात.” तिचे बाबा म्हणाले, “या सर्व वस्तू बनवण्यासाठी खाली पडलेल्या नारळाचा उपयोग केला आहे. हे बघ आपण मोगरयाच फुल वापरून साबण तयार केला आहे.” त्या दिवसा पासून ते ताडाच्या पानाचे झाडू बनू लागले आणि नारळाच्या काथ्यापासून चटया विनू लागले. आता ते साबण तेल आणि फक्त थोडेसेच मासे बाजारात विकायला नेत. जेव्हा मोरी मोठी झाली तेव्हा तिला नारळाच्या करवंटयापासून छोटे छोटे कासव बनवायला खूप आवडत असे आणि नेहमी एक कासव माने भोवती घालत असे. Illustrations: Emanuele Scanziani Music & Art Director: Holger Fetter Translator: Sameer Shankar Mhatre Narrator: Darshana Shirsagar Animation: Alfrin Multimedia
ह्याबरोबर सुरु ठेवा
लॉगिन करून आपण मातृभारतीच्या "वापरल्या गेलेल्या संज्ञा" आणि "गोपनीयता धोरण" यांना सहमती देता
वेरिफिकेशन
अप्प डाउनलोड करा.
अप्प डाउनलोड करायची लिंक
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.