पीर बाबाची कृपा भाग ३ दर्शनला काडीचीही कल्पना नव्हती- की समोर दिसणार हे दृष्य सामान्य नव्हत- नजरेस दिसणारा छलावा होता - एका अमानुष,हिंस्त्र, अमनाविय शक्तिच्या सापळ्यात दर्शन फसला होता. दोन मिनिटे झाली होती - पन पुन्हा काही केल्या ती म्हातारीच काय, तर एक गाडी सुद्धा त्याला समोरून जातांना दिसली नव्हती ! पन ती म्हातारी पुन्हा दिसली नाही , हा विचार करूनच त्याला जरास हाईस वाटल होत . पन जशी त्याची नजर समोर गेली - त्याचे डोळे विस्फारले , घशात श्वास अडकला - कोणीतरी नसांवरून थंडगार पातीचा धारधार टोकदार सुरा फिरवल्यासारखी जाणिव झाली- बसल्या अवस्थेतच पाठीच्या मणक्यातून थंडगार लाट पसरली .