Malika...... Aayushyatlya Anubhvanchi - 1 books and stories free download online pdf in Marathi

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 1

पान १

 

      माझी  चौथीची  वार्षिक  परीक्षा  संपली आणि  मी  आता  पाचवी  इयत्तेत  जाणार  म्हणून ,  मी  खूप  आनंदी  होते . मला  पप्पांनी  आधी  सांगितल्याप्रमाणे  मी  यावर्षी  म्हणजे

  पाचवीला  नवीन  शाळेत  जाणार  आहे ,  हे  मला  आधीच  माहित  होते .  पप्पांनी  सांगितल्याप्रमाणे  आणि  तसेच  ठरल्याप्रमाणे  माझे  Admission  त्या  नवीन  शाळेत  केले

      आणि  ती  शाळा  म्हणजे    पुण्यातील  लक्ष्मी  रोड  वरील  Huzurpaga ( हुजूरपागा ) .  ही  पुण्यातील  मोठी  नामांकित  मुलींची  शाळा  आहे .  त्यामुळे ,  आपण  पुण्यात

  मोठ्या शाळेत  शिकणार  आहोत  या   आनंदाला  काही  सीमाच  उरलेली  नव्हती  आणि  Hostel  म्हणल्यावर  तर  मला  एवढच  माहित  होत  की ,  तिथं  आपली  सगळी  काम

  आपल्यालाच  करावी  लागतात .  म्हणजे  अगदी   आपल्या  जेवणाचं  ताट  ते  आपले  कपडे  पण  आपल्यालाच  धुवावे  लागतात  असं  काही . पण ,  मी  ते  मनावर  घेतलं  नाही .

आता  मात्र  सुट्टी  संपत  आली  होती .  माझी  नव्या  शाळेत   जाण्याची  तयारी  सुरु  झाली  होती .  मला  पप्पांनी  सर्व  वस्तू  आणि  शाळेचं  साहित्य  नवीन  घेतलं  होत .  घरात

  बाकी  किरकोळ  तयारी  चालू  होतीच , उलट  जसे  जसे  दिवस  जवळ     येत  होते  तशी  कामाची  तयारी  पण  वेगात  वाट  बघत  होते , तो  Hostel  ला  जाण्याचा  दिवस आला  .

    

      आम्ही  सर्वजण  माझ्या  शाळेत ४-४.३० ( चार-साडेचार )  च्या  दरम्यान  पोहोचलो  होतो .  मम्मीने  मला  सगळं  आवरून  दिलं .  सर्वजण  आता  मला  Hostel  वर  सोडून

पुन्हा  घरी  निघण्याच्या  तयारीत  होते .  मम्मी  मात्र ,  मला  सूचना  देत  होती , "  भांडू  नको , नीट  राहा , रडू  नकोस , अभ्यास  कर "  आणि  ती  निघून  गेली . मुलींच

Hostel  असल्यामुळे  फक्त  मुली  आणि  त्यांची  आई  यांनाच  तिथे  परवानगी  होती  म्हणून,  माझे  पप्पा  बाहेरच  थांबले  होते .  मला  अजून  पण  आठवतंय ,  मम्मी  निघून

गेल्यावर  मी  माझ्या  बेडवर  बसले  होते .  कदाचित  माझी  मम्मी  मला  सोडून  गेलीये  हे  मला  जाणवलं  नव्हतं . पण  एकं  पाच  मिनिटांनी  माझी  मावशी  परत  माझ्याकडे

आली  आणि  मला  घट्ट  मिठी  मारली  आणि  निघून  गेली . पण ,  मला  तेव्हाही  काही  समजलं  नाही .  आजूबाजूला  सर्व  मुलींचे  पालक  त्यांना  आवरून  देत  होते , माझ्या

मम्मी  सारख्याच  त्यांनाही  सूचना  देत  होते .  नंतर  नंतर  सगळ्यांचे  पालक  निघून  गेले .  मला  अचानक  माझ्या  मम्मी  पप्पांची  आठवण  झाली .  Hostel  ची  इमारत

माझ्यासाठी  नवीन  असल्यामुळे  मला  ते  लवकर  सापडतही  नव्हते .  शेवटी  मला  एक  जिना  दिसला  आणि  मी  त्या  जिन्याने  खाली  गेले .  बाकीच्या  खूप  पालकांच्या

  गाड्या  समोरच्या  Graund  वर  होत्या  आणि  तिथेच  खूप  मुलींचे  पालक  असल्यामुळे  मी  माझ्या  मम्मी  पप्पांना  पण  तिथेच  शोधत  होते .  पण , ते  कुठेच  दिसत  नव्हते .

मी  खूप  शोधलं  नंतर  माझ्या  लक्षात  आलं  की ,  इतर  मुलींच्या  पालकांप्रमाणे  तेही  मला  सोडून  निघून  गेले .  मी  तेव्हा  खूप  रडले  होते .  आपल्या  जवळची 

आपली  माणसं  आपल्याला  अचानक  जेव्हा  सोडून  जातात .  तेव्हा ,  जे  वाटत  ते  खूप  वाईट  असत .

 

 

   आता माझ्या मनाला मीच समजवत होते , " इथून पुढे तुझ्याजवळ मम्मी - पप्पा नाहीत . आता सगळं तुझं तुलाच करायचं आहे . " मला सगळ्यांची खूप आठवण येत होती .

मी आता  एकटीच आहे असं मला सारखं वाटत होत . मी खूप रडत होते असं वाटत होत की ,आता लगेच घरी जावं . मी माझ्या बेडवर बसले होते . आता या नवीन ठिकाणी आपण

कोणासोबत तरी ओळख केली पाहिजे असं मला वाटलं कारणं आता मला इथंच राहायचं होतं . म्हणून मी माझ्या रूम मधल्या मुलींसोबत ओळख करून घेतली . त्या पहिल्या दिवशी

आम्ही सात जणी होतो . मी , सई , श्रद्धा , श्वेता , धनश्री , अंकिता आणि साक्षी .

 

पुढचं पान लवकरच...

इतर रसदार पर्याय