Featured Books
श्रेणी
शेयर करा

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 7

पान ७

     आता आमची सातवी सुरू झाली होती . पण ,आम्ही काय हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये राहायला नव्हतो. तर , शाळेच्या Computer लॅबच्या वरच्या Room मध्ये राहायचो . त्या वर्षी होस्टेलमध्ये

जास्त ऍडमिशन झाल्यामुळे आम्हाला राहायला जागा नव्हती . त्यामुळे,आम्हाला शाळेच्या Computer लॅब च्या वरच्या मजल्या वरील Room दिली होती .त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी

नव्हत. याचा सगळा फायदा आम्ही त्यावर्षी करून घेतला होता .वर्गातल्या मैत्रिणींना Hostel च्या रूमवर न्यायला परवानगी नव्हती . पण ,आम्ही तेव्हा मैत्रिणींना घेऊन यायचो. मी सातवीत असताना

आम्हाला राजश्री नाईक या बाई वर्ग शिक्षिका  होत्या आणि  मराठी हा विषय त्या आम्हाला शिकवायच्या . एकदा चाचणी परीक्षेत ' किंमत कळणे ' या वाक्प्रचार वर वाक्य तयार करा .असा प्रश्न आला

होता . किंमत कळणे यावर मी ' माझी आई वारल्यानंतर मला किंमत कळाली ' असं वाक्य लिहिलं . तेव्हा , बाई मला खूप ओरडल्या होत्या आणि माझे पप्पा मला भेटायला आल्यावर त्यांनाही बाईंनी

सांगितल. पप्पा पण मला खूप ओरडले होते . 

 

   मी सांगितलं ना ,आम्ही कंप्यूटर लॅबच्या वर राहायला  होतो . त्यामुळे आम्ही आमच्या बिल्डिंग बंगला म्हणायचो . एके दिवशी कोणीतरी ग्राउंड वरचे खडे वेचून आणले खेळायला . आणि मग काय

सगळ्यांनी खडे खेळणं सुरू केलं .आमचा एक डाव सहा सात जणीत रंगायचा . रात्रंदिवस खडेच खेळायचो . विशेषतः त्या खड्यांना आम्ही रंग सुद्धा दिला होता. त्यावरून कोणाचे कोणते खडे

आहेत हे लक्षात यायचं . रंगीत खडे खेळताना खूप मज्जा यायची .आमची सकाळी ७ वाजता ट्युशन असायची . ताई यायची , वर्गात आमची वाट पाहायची . पण , आम्ही बंगल्याच्या

Passage मध्ये खडे खेळायचो . उलट खडे खेळण्यासाठी लवकर उठायचो . शेवटी आम्हाला  ट्युशन ची ताई किंवा आमच्या रेक्टर मॅडम सांगायला यायच्या की , तुमच्या ट्युशन चा टाइम झालाय.

ताई तुमची वाट बघतीये . या आमच्या खडे खेळण्याला रेक्टर मॅडम एवढ्या वैतागल्या  होत्या की बास .

 

  एकदा त्या दुपारी राऊंड ला आल्या होत्या रूम मध्ये . जेव्हा त्या आल्या तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आमचं कोणाचही लक्ष नव्हतं . आणि आम्ही सगळ्या जणी खडे खेळत होतो . ओरडत होतो ,

हसत होतो , फरशीवर लोळत होतो . तेव्हा बाई एवढ्या चिडल्या होत्या की विचारायलाच नको . आल्या आणि आमचे सगळे खडे घेऊन गेल्या . तरी पण आम्ही पुन्हा दुसरे खडे आणले , त्याला रंग

दिला आणि खेळायला सुरुवात केली .

 

    कोणत्याही गोष्टीची एका ठराविक काळात Craze असते . नंतर ती गोष्ट आपोआप नाहीशी होत जाते , आपल्याही नकळत . अगदी तसच थोड्या दिवसांनी आमच खडे  खेळण बंद झाल . आणि

  Racket खेळणं सुरु झाल . त्याच पण वेड सेम खड्यांसारखच लागलं होत , माझा आणि आरती चा डाव खूप रंगायचा . आम्ही दोघीही  continue फार  वेळ खेळायचो त्यामुळे बाकीचे कंटाळून

जायचे . शाळेतून आलो की , दप्तर टाकून लगेच कपडे बदलायचो आणि खेळायला नंबर लावायचो. सकाळी शाळेत जाण्याची घंटा होईपर्यंत आम्ही खेळायचो. शाळा सुटल्यावर आणखी एक

काम म्हणजे वर्गातल्या मुलींना कुरकुरे , तिखट बॉबी , पनीर रोल आणायला पैसे द्यायचो . मग त्या पटकन बाहेर जाऊन आम्हाला हे सगळं आणून द्यायच्या .त्या येईपर्यंत तिथेच गेट जवळ त्यांची वाट

पाहायचो . त्या आल्या की , कोणी आम्हाला पाहायच्या आत  सगळं पार्सल बॅग मध्ये टाकून पटकन रूम मध्ये जायचो . मग सगळ्यांनी एकच मोठा गोल करायचा आणि काय लगेच सगळं

आणलेलं संपायच सुद्धा. आम्ही सगळ्याच जणी बाहेरून खाऊ मागवायचो . त्यामुळे रेक्टर ला कोणीच सांगितलं नाही .  

 

   रात्री किंवा सुट्टी असल्यावर आम्ही अभिलाषाची कॉट passage मध्ये आणि तिथेच खायचो , बसायचो . सगळ्याजणी वरती बसून गम्मत बघायचो . तिची कॉट दाराजवळ असायची म्हणून तिची

कॉट बाहेर न्यायला सोपी होती . आमच्या रूम मध्ये यायला एक मोठा जिना होता . सरळ नव्हता असा गोल आकाराचा होता . त्याच्या शेजारीच भिंतीमध्ये तीन मोठ्या खिडक्या होत्या . त्या आम्ही

वाटून घेतल्या होत्या . त्यामुळे आम्ही तिथं अभ्यासाला बसायचो . वरती ट्युबललाईट असल्यामुळे उजेड भरपूर यायचा . त्यामुळे मज्जा यायची . बाईंनी आम्हाला तिथे बसू नका अस सांगून पण आम्ही

तिथेच बसायचो .

 

 पुढचं पान लवकरच.......