Malika... Aayushyatlya Anubhvanchi - 4 books and stories free download online pdf in Marathi

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 4

पानं ४ 

 

      काही दिवसांनी आमचे ट्युशन्स ( Classes ) सुरु झाले . त्यामुळे सकाळपासून आम्ही  Busy  झालो . आमच्या ट्युशन च्या ताई खूप भारी होत्या . आरती ताई असं आम्ही

त्यांना म्हणायचो . ५ वी ते ७ वी आम्ही सगळे त्यांच्याकडेच होतो क्लास ला . मला त्या deliberate असं बोलायच्या . deliberate म्हणजे मुद्दाम करणे . कारण , मला अभ्यासाच्या

बाबतीत ज्या शंका यायच्या त्या खूप साध्या आणि सोप्या असायच्या . म्हणून , त्यांना असं वाटायचं की , मी या सोप्या शंका त्यांना मुद्दाम विचारायला येते . पण , खरंच मला शंका

असायची . मी मुद्दाम कधीच केलं नव्हतं . आमचा Class सुरू होण्याच्या आधी आम्ही रोज आमच्या रेक्टर मॅडम च्या ऑफिस मध्ये अभ्यास करत बसायचो . काहीही झालं तरी रेक्टर

मॅडम आम्हाला रोज अभ्यास करायला बसवायच्याच . उलट , त्या सुद्धा आमच्यासोबत ऑफिस मध्ये बसायच्या . सुट्टीच्या च्या दिवशी , शनिवार - रविवार त्या आमच्या सोबत क्रिकेट

खेळायच्या , स्वतः टीम करायच्या आणि लगोरी सुद्धा त्यांनीच शिकवली आम्हाला . मधला कावळा , मधलं माकड हे खेळ त्यांच्यामुळेच माहिती झाले . त्यांच्यासोबत जगताप बाई पण

होत्या . त्या सकाळी सगळ्यांचा व्यायाम घ्यायच्या . योग , आसने , सूर्यनमस्कार सगळं आम्हाला शिकवायच्या आणि स्वतः करायच्या . अजून एक कुलकर्णी मॅडम म्हणून होत्या . त्या

हॉस्टेल मध्ये राहत नव्हत्या . रोज घरून येऊन - जाऊन करायच्या . मला कधीच नाही आवडल्या त्या .असं वाटायचं की , त्या मुलींमध्येच भेदभाव करत आहेत . खरंतर तसं नसेल

सुद्धा पण , मला तेव्हा तसंच वाटायचं .

 

     शाळेत आम्हाला पाचवीला इतिहास विषय शिकवायला पाथरकर बाई होत्या . इतिहास फार मस्त शिकवायच्या त्या . आणि तोंडी परीक्षेच्या वेळेला तर , जी मुलगी सगळ्या प्रश्नांची

बरोबर उत्तरे देईल तिला बाई काजुकतली द्यायच्या . त्या कधीच आम्हाला ओरडल्या नाहीत , रागावल्या नाहीत. आम्ही वर्गात कितीही गोंधळ केला तरी , बाई आम्हाला समजावून

सांगायच्या आणि वर्ग शांत करायच्या . खूप प्रेमळ होत्या बाई . आम्ही सहावीत गेल्यावर त्या रिटायर झाल्या . आम्ही पाचवीत असताना सात जणी होतोचं . नंतर सृष्टी, आरती ,सिद्धी ,

शिवानी , श्रावणी या मुली नवीन आल्या . नंतर लक्ष्मी पण आली होस्टेलला . आणि सगळ्यात उशिरा श्रुती आली होती , मुंबईची होती ती . एकदम शुद्ध बोलायची . मनमोकळी आणि

बिनधास्त होती . तिच्याकडे लाल रंगाचे ड्रेस खूप होते . म्हणून , मी तिला लालू म्हणायचे . ती फक्त एकच वर्ष Hostel ला राहिली . पुन्हा सहावीत आली नाही . श्रद्धा ही छत्रपती

संभाजीनगर (औरंगाबाद )वरून आलेली मुलगी होती. तिचा स्वभाव मला कधीच कळला नाही . कधी चांगला तर, कधी खूप भाव खायची . सगळ्यांमध्ये लिडरशिप करायची . आम्ही

खेळायला ग्राउंड वर गेलो की , ती नेहमी तिचं खरं करायची . नवीन असल्यामुळे आम्ही पहिल्यांदा खेळायचो तिच्याशी . पण , नंतर तिचं कुणी ऐकत नव्हतं .

 

        माझ्या मम्मीने माझ्या कपाटाची चावी माझ्याकडून हरवू नये म्हणून , माझ्या गळ्यातल्या काळ्या दोऱ्याला बांधली होती . म्हणजे ती हरवणार नाही . त्या दिवशी सकाळी मी

उठल्यावर कपाट उघडायला गेले तर , माझ्या गळ्यात चावी नव्हतीच . मी घाबरले . खरंतर रडायलाच येत होतं आणि कपाट तर उघडच होतं . मी माझं सगळं कपाट चेक केलं.

कपाटामध्ये सगळ्या सामानाचा पसारा झाला होता . माझा खाऊ सुद्धा चोरीला गेला होता . आता थोड्या वेळाने शाळा भरणार होती . मला तर काय करावं ? काहीच कळत नव्हतं.

मी सगळ्यांना माझी चावी पाहिली का ? विचारत होते . पण , कोणालाच  माहिती नव्हतं . मग शेवटी मी आमच्या रेक्टर मॅडम कडे गेले आणि त्यांच्याकडे Complaint केली . रेक्टर

मॅडम आमच्या रूम मध्ये आल्या आणि सगळ्यांची चेकिंग करायला सुरुवात केली.

 

 

पुढचं पान लवकरच.....

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED