Rutu Badalat jaati - 2 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..2

ऋतू बदलत जाती.......२.

खूप सुखी होती ती ...,ति, तिची सावी आणि अनि सर्व काही क्षणार्धात बदलले..

आता पुढे...

परत थकून ती आजीच्या रुममध्ये आली..

"आजी.. आजी उठा माझ्या सावीला घ्या ...आजी" तिने तिचं डोकं त्यांच्या मांडीवर ठेवलं, तिकडे सावी अजूनही रडत होती..

आजीला काय झालं कुणास ठाऊक त्या उठल्या, टेबलावरचे त्यांचे ऐकण्याचा मशिन कानात घातले.. आणि.. त्या गेल्या.. सावीच्या रूम कडे गेल्या.. कदाचित.. तिचा आवाज त्यांच्या कानापर्यंत तर नाही पण मनापर्यंत नक्कीच पोहोचला असेल..

त्यांनी दरवाजा ठोठावला, अजून ठोठावला आता त्यांनाही आतून सावीच्या रडण्याचा आवाज येत होता.

"सुवर्णा ..सुवर्णाऽऽ.. लवकर दार उघड.."आजी

आजीचा आवाज ऐकून आतली ती मुलगी लगबगीने पळतच आली, तिला तिचा फोन बंद करायचेही भान राहिले नाही, समोरून कोणीतरी आवाज देत होते.

"सुवर्णा ..सुवर्णाऽऽ.. तू आहेस का तिकडे? आहेस का तू तिकडे सुवर्णा..?" पण बिचारी सुवर्णा काय बोलणार भीतीने तिच अंग थरथरत होतं.

आजीने तिच्या कडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि लगेच त्या सावीकडे गेल्या तिला उचलले, बॉटल घेवून तोंडाला लावली तीच्या, त्यांचेही अश्रू गळत होते, बिना मायचं लेकरू... दुध पिल्यावर सावी त्यांच्या हातातच झोपून गेली . रडून रडून थकली जी होती..

त्यांनी तिला नीट व्यवस्थित झोक्यात झोपवून दिले आता पाळी होती ती सुवर्णाची.. त्यांनी तिचा हात पकडला आणि खेचत हॉलमध्ये घेऊन आल्या.

"काय करत होतीस तू आत मध्ये.. ?"आजी गरजल्या जरी सत्तर-ऐंशी वर्षाच्या त्या होत्या ,तरी त्यांचा कणा अजूनही ताठ होता.. जुनं खोड ते..

"मॅडम मी... मी.. तो फोन होता.."सुवर्णा

"मी तुला फोनवर बोलायचे पैसे देते का ईथे...?"आजी

"सॉरी मॅडम.. थोडा महत्वाचा होता म्हणून मी उचलला ...आणि बाळ आत्ताच उठलं होतं...."धडाधड खोटं बोलली ती.

"हे बघ .हे शेवटचे असेल... याच्यानंतर मला असे बिलकुल नकोय..." बिचाऱ्या त्यांना काय माहिती , की बाळ केव्हाचेच रडत होते ते..

"आणि आता एक काम कर... तू सावी उठली कि तीला घेऊन माझ्या रूम मध्येच शिफ्ट हो.. म्हणजे तुम्ही दोघी माझ्या नजरेसमोरच रहाल.."आजी

सुवर्णाने फक्त मान डोलावली आणि ती बाळाच्या रूममध्ये निघून गेली .आजीही बाहेर सोफ्यावर बसल्या जेणेकरून सावी उठेल तेव्हा त्यांचं लक्ष राहील.

आणि ईकडे तिचा जीव भांड्यात पडला..आता सावी आजीच्या देखरेखीत राहील.

तेव्हाच डुलत डुलत एक एकोणतीस तीस वर्षाचा युवक घरात शिरला ,त्याच्या परिस्थितीवरून वाटत होते त्यांनी खूप सारी पिलेली आहे.

"अनि...तुम्ही कुठे गेला होतात...?आपली सावी रडत होती अनि...आणि हे काय...! तुम्ही ड्रिंक केलयं अनि.."म्हणतच ती त्याला बिलगली.एक क्षण तो थांबला.. आणि.. आणि तीला पार करून पुढे ही गेला.

"देवा...कसे विसरले मी माझ्या अनिलाही मी दिसत नाही... मी ऐकू येत नाही ..."ती परत व्याकूळ झाली आणि तशीच भरल्या डोळ्यांनी त्याला पाठमोरा बघत राहीली दुसरं काय होतं तिच्या हातात..

"अनिकेत काय सुरू आहे तुमचं हे ..रोज घरी असे येतात तुम्ही..रात्री कुठे होता..??"आजी .

"आजी घरी परत तरी येतोय मी ...पण परत यायची इच्छाच नसते आता.. माझी शांभवी कुठेए ईथे माझी वाट बघायला.." अनिकेत

"सावीचा तरी विचार करा जरा ....काय हाल केलेत स्वतःचे.."आजी

"माझी शांभवी सोडून गेली ...सर्व काही संपले.. जगायची पण ईच्छा नाही....उगाच सावी साठी स्वतःला फरफटत आणून राहिलोय इथपर्यंत.."अनिकेत तो बरळतच वर निघून गेला.


"शांभवी बाळा.... काय गरज होती एवढ्या लवकर जायची... बघ.. बघ तुझ्या मागे तुझा अनि आणि तुझी सावी... काय हाल झाले आहेत यांचे.. देवा कसं होणार आता पुढे..."आजींनी डोळ्याला पदर लावला.

एक क्षण तिला वाटले की आजी तिच्याशीच बोलत आहेत ,पण त्या स्वतःशीच बडबडत होत्या.

ती तशीच जिना चढून वर गेली, पण ती अनिकेत कडे न ..जाता, वर अजून वर गच्चीत गेली. तिची आवडती जागा होती ती .जेव्हा तीचे मन उदास व्हायचे, तेव्हा ती गच्चीवर जाऊन बसायची..आजही तीच जागा तिला जवळ करावीशी वाटली..दुरदुर दिसणारे ते डोंगर ,तो गार वारा तिच्या उदास मनाला एक शांतता द्यायचा..

गेल्या महीनाभरापासून ती त्या रस्त्यावर उभी होती .पण कोणालाही ती दिसली नव्हती,अगदी तिच्या अनि ला सुद्धा...बराच वेळा त्याची गाडीही तीने तेथे पाहीलेली..त्या जागेजवळ आला कि ती गाडी जरा हळू व्हायची आणि मग खिडकीतून तिचा अनि डोकवायचा...भरलेल्या डोळ्यांनी ..पण तिच्या जवळ न येता तिच्याशी न बोलता भरकन निघूनही जायचा...ती त्याच्या जवळ जाईल त्याला सांगेल कि अनि तुम्ही कुठे शोधताय मी ईथेय..पण...पण..तीला एक पाऊलही हलता येत नव्हते....आणि आज जेव्हा ती त्या जागेवरून मुक्त झाली, तेव्हा उडून तिला तिच्या अनि जवळ ,सावी जवळ यायचे होते पण ती शक्ती नव्हती तिच्यात..वेडी..चित्रपटात दाखवतात तसे..भुत..उडतात असं वाटलं असेल तिला... एवढं निरागस भुत ... कदाचित कुणी पाहीलही नसेल...भुत म्हणण्यापेक्षा एक आत्मा म्हटले तर जास्त छान राहील...आत्मा जो अंनंतात विलीन झाला नव्हता...जो तीच्या अनि आणि सावी भोवती रूंजी घालत होता...आनंद झाला होता तिला जेव्हा तिला कळले कि ती मरूनही जीवंत आहे बघून....कधीची तळमळत होती ती त्या दोघांना भेटायला...पण आज तिला वाईट वाटत होते..."किती बरे झाले असते जर आपण परतलो नसतो तर...माझ्या ,सावीला असे भुकेने रडतांना बघूनही मी काहीच करू शकत नव्हती...एका आईसाठी किती विदारक आहे हे...देवा ही तर नरका पेक्षा ही मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी...."सारखे अश्रू गळत होते तीचे ...पण पुसायला ना कुणाचे हात होते, ना खांदा...तेवढ्यात तिचे लक्ष गेटबाहेर उभ्या गाडीकडे गेले...आणि तिच्या डोळ्यात चमक आली.

हो तोच...तोच सकाळचा पाहूणा...तिच्या गावात आलेला तो पाहूणा..

भरभर जिना उतरून ती खाली आली ,पळतच ती गेट बाहेर गेली, तो तिथेच उभा होता, गाडीला टेकून , पण बंद गेटमधून तिला असं बाहेर निघताना त्याला काहीतरी वेगळच वाटलं .हा नक्कीच भास असेल ती अशी कशी निघेल बंद गेटमधून बाहेर ..त्याने डोळ्यांवर हात ठेवला .. मग परत तो हात काढला,डोळे उघडले गेट समोर कुणीच नव्हतं सुटकेचा निश्वास टाकला त्याने.

"हा भास होता माझा हो..हो..पण मी इथे का थांबलो आहे? का मला तुला एक नजर बघायची ओढ लागली आहे.?. हे आयुष्य संपवणार होतो मी, पण आत्ता का मला थांबावसं वाटतंय... "विचार करतच तो पाठी वळला. आणि गाडीत बसयला वाकला तर बघितले , शेजारच्या सीटवर ती बसली होती..

"तू तुम्ही कशी... गाडीत कश्या बसल्या..."तो

"तूम्ही डोळे बंद केले होते तेव्हाच.."ती

"पण असे अचानक...एकदम..."तो गाडीत ड्रायव्हर सीटवर बसला.

" ते सोडा ...तुम्ही इथं उभे राहून काय करत होतात..?"ती

" खरं सांगू... मी तुम्हालाच बघायला आलो होतो... इथं.."तो

" का..?"ती

" नाही माहिती... पण तुम्हाला भेटायची खूप खूप तीव्र इच्छा होत होती..."तो

" हम... तुम्ही गाडी सुरू करा..."ती

" पण तुम्हाला कुठे जायचे आहे...."तो

" तो समोर डोंगर दिसतोय ना तिथं जाऊ...."ती

" मलाही तिथंच जायचं आहे..."तो

त्याने गाडी सुरु केली, वर जायला चांगला रस्ता होता. जेव्हा ते त्या डोंगरावर पोहोचले त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला, ती बाहेर आली. राहून राहून त्याला आश्चर्य वाटत होते, एका अनोळखी इसमा सोबत ही एवढी निश्चिंत कसं काय राहू शकते...

ती त्याला एका उंच कठड्यावर घेवून गेली .दोघेही निवांत खाली दरीत पाय टाकून बसले .दोघांनाही त्या खोल दरीत पडून म्रुत्युला कवटाळायची भिती नव्हती.

"किती बिनधास्त आहे ही... हीला या खोल दरीची जराही भिती वाटत नाही.."त्याच्या मनात विचार आला.

"ह्याला मरणाची भिती नाही वाटत का? .."ती

"तुम्ही मला ईथे का घेवून आलात...म्हणजे आपण अनोळखी आहोत... तरी...."तो

"कदाचित आपल्यात काही कनेक्शन असेल...."ती

"हो..कदाचित..मलाही तसच वाटतयं...खर तर आज निरोप घ्यायचा होता...पण तुम्हाला बघीतल्यापासून इथ थांबावसं वाटतय..."तो

तिने त्याच्याकडे बघीतले चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते.

"मला तुम्हाला सांगायला हरकत नाही...मी ईथे सुसाईड अटेम्ट करायला आलो होतो...आपण बसलोए हीच जागा निवडली होती मी...या खोल खोल दरीत स्वतःला झोकून द्यायला....कंटाळा आलाय मला या जगाचा ,आजूबाजूच्या आपल्या म्हणवणाऱ्या लोकांचा.... तुम्ही अनोळखी असूनही आज मला तुम्हाला हे सांगावेसे वाटले...का?...माहीत नाही.."त्याने वळून तिच्या चेहऱ्याकडे पाहीले ,तिचे डोळे भरलेले होते.

"ज्याला जीवन भेटते त्याला जगावेसे वाटत नाही.आणि काहींना म्रुत्युनंतरही जगावेसे वाटते..."रडता रडता ती हसायला लागली.अगदी मोठमोठ्याने..

"अहो..जरा हळू..तोल जाईल तुमचा.."तो

आजू बाजूचे लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते.त्याला वाटले तिच्या हसण्यामुळे...पण त्या वेड्याला काय माहिती..कि त्याची एकट्याचीच बडबड लोकांपर्यंत जातेय ते..

"अहो..लोकं बघताय आपल्याकडे..."तो

"आपल्याकडे नाही..तुमच्याकडे...."ती

"म्हणजे..?"तो

"मी नाही दिसत त्यांना...."ती

"न दिसायला तुम्ही का मिस्टर ईन्डीया ..नाही नाही...मिस. ईन्डीया आहात का?..."तोही हसायला लागला.

"मी फक्त..तुम्हालाच दिसते..मिस्टर....."ती

"क्रिश...मि.क्रिश...आणि हा फालतू विनोद पुरे..."तो

"विनोद नाही..सत्यय हे.."ती

तो उठला.

."खरच वेडीच आहे ही.."क्रिश

"मि. क्रिश..कुठे निघालात तुम्ही...मला तुमची मदत हवीए..."तीही उठून त्याच्या पाठी गेली.

"हे बघा मिस... तुम्ही वेड्या आहात..उगाच मलाही वेड लावालं....मला एकटे सोडा..."क्रिश

"तुम्ही..ईथे कुणालाही विचारा मी दिसते का?..."ती

त्याने नकारात मान हलवली आणि परत तो पुढे निघाला.

"प्लीज एक मिनिट फक्त...."ती

तो थांबला.ती समोर आली.

"माझ्याकडे बघा फक्त.."असं म्हणून ती पळतच समोरच्या झाडाकडे गेली,आता हीचा कपाळमोक्ष होईल असच वाटलं होतं त्याला...पण...पण...ती त्या झाडाच्या आर पार गेली...हो..ती आर पार गेली..त्याने परत परत आपले डोळे चोळून बघीतले ....आता तर ती तशीच आरपार बाहेरही आली.

"काकु..तुम्हाला ती समोर गुलाबी ड्रेसमध्ये मुलगी दिसतेय ना...?"क्रिश

"कोण मुलगी..कुठली मुलगी..?."काकू

"ती त्या झाडाजवळ उभी आहे ती..."क्रिश

"वेडा..समजतोस का..?तीथे कुठे मुलगी आहे...?"त्या काकू

"अहो दादा..तुम्हाला.....?अहो भाऊ....तुम्हाला..?अहो..ताई...?"क्रिश वेड्यासारखा धावत, सर्वांना विचारत होता.

"झालं...?"ती त्याच्या जवळ आली आणि त्याला हाताला धरून बाजूला एका गुहेसारख्या भागात घेवून गेली.. आता मात्र त्याला भिती वाटत होती.

"घाबरू नका....मी तुम्हाला काहिही त्रास देणार नाही...मला तुमची मदत हवीए..बस्स...."ती

"कसली मदत....तुम्हाला बदला घ्यायचाय का..? ...मी..मी...कुणाचा मर्डर नाही करणार...."क्रिश

चित्रपटाचे दुष्परिणाम..दुसरे काय...

तिने त्याचे दोन्ही हात आपल्या दोन्ही हातात घेतले." हे बघा घाबरू नका.. मी तुम्हाला कुठलाच त्रास करणार नाही.... नाही की तुमच्याकडून काही चुकीची गोष्ट करून घेणार....."ती

त्याने तिच्या डोळ्यात बघितले ,खरं बोलत होती ती .तो शांत झाला.

"एक महिन्यापुर्वी माझा तिथे ...जिथे मी तुम्हाला भेटली होती तिथे एक्सीडेंट झाला होता."ती

त्याच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह होते ,त्याला जाणून घ्यायचं होतं कसा झाला ते.


"मी... शांभवी... मिसेस शांभवी अनिकेत पाटील.. त्याने तिच्याकडे बघितले ,त्याच्या डोळ्यात एक वेदनेची, निराशेची कळ उमटली होती.

" काय झाले ...?लूक ...नाऊ आय एम नॉट लिविंग थिंग.. सो कंट्रोल युवर इमोशन्स...."शांभवी

"मी तसा विचार नव्हतो करत..." त्याने नजर चोरली. तिने गालातल्या गालात स्मित केले आणि पुढे बोलू लागली.

"मी एक डॉक्टर आहे म्हणजे होती.. तर त्या दिवशी रात्री एक क्रिटिकल केस साठी हॉस्पिटल मध्ये आली होती... म्हणजे मला नंतर ती केस तेवढी क्रिटिकल नाही वाटली...असो... मी हॉस्पिटल ला जास्त जात नव्हते फक्त काही महत्त्वाच्या वेळेला जात होते,सावी मुळे...सावी माझे सात महीन्याचे बाळ...."ती

त्याने परत तिच्याकडे पाहीले..
"हो मला एक बाळही आहे.."तीने स्मित करतच सांगितले.तो उठून बाजुच्या दगडावर जावून बसला.

"हं.."क्रिश

"तर त्या दिवशी क्रिटिकल डिलिव्हरीसाठी मी हॉस्पिटल ला आली होती .ईतर डॉक्टर नव्हते म्हणून.. मी माझ्या बाळाला घरी ठेवून गेली होती..माझा नवरा ही नव्हता घरी, तो ही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.."ती

"हं.."तो

" मी डिलिव्हरी आटपून नुकतीच बाहेर आली .. तर मोबाईल वरती सुवर्णाचे चार-पाच मिस कॉल पाहिले.. मी तिला लगेच फोन केला .....तर तिने सांगितले मला... की सावी खुप रडतेय...तिला खूप ताप आलेला आहे ....आजी पण घरी नाही आहेत... आणि ती एकटीच घरी आहे.. मला सावीच्या रडण्याचा आवाज येत होता ...मी तशीच तडक गाडी घेऊन निघाले ..माझ्या गाडीचा स्पीड खूप जास्त होता ....आणि रस्ता वळणदार त्यामुळेच मला पुढच्या वळणावर समोरून येणारा ट्रक नाही दिसला..... आणि जेव्हा मला तो ट्रक दिसला ...तेव्हा मला माझी कार वळवता नाही आली, स्टेरींग काम करेनाशे झाले , ब्रेक चालत नव्हते .... संपलं... सगळं संपलं.. क्षणार्धात सगळं संपलं.... मी माझाच देह बघितला छिन्नविछीन्न अवस्थेत.... बरं झालं माझा अनि इथं नव्हता... नाहीतर... मला असं बघून काय केलं कसतं त्याने .... तुम्हाला सांगते स्वतःच्या मृत शरीराला बघून मला खूप दुःख होत होतं.. पण दुसऱ्याच क्षणी मला जाणवलं की मी माझं शरीर बघते आहे ...म्हणजे मी.. मी ..माझा आत्मा इथेच आहे.. मला खूप आनंद झाला.. म्हणजे मला माझ्या सावीला माझ्या अनिला बघता येईल... त्यांच्याशी बोलता येईल... आत्मा रुपाने त्यांच्या जवळ राहता येईल.. पण जेव्हा मी तेथून घरी जाण्याचा प्रयत्न केला ...मला त्या जागेतून हलताही येत नव्हते. ..मला त्या जागेने जणू साखळदंडात बंदिस्त करून ठेवले होते... त्या दिवसापासून मी सतत येणा-या जाणा-या लोकांना ओरडायचे... म्हणायचे मला सोडवा येथून.... सोडा मला ..मुक्त करा इथून.. मला माझ्या सावी जवळ जायचंय.. माझ्या अनि जवळ जायचंय.... पण कोणालाच मी ऐकू जात नव्हते... ना दिसत होते ...माझा अनि ही यायचा तिथं ....शोधायची त्याची नजर मला इकडे तिकडे ...पण त्यालाही मी दिसत नव्हती.... ना त्याला ऐकू जात होती... आज मात्र तुम्हाला मी दिसले... मी तुम्हाला ऐकू जात होते... ,तुम्ही मला स्पर्श केला आणि त्या क्षणाला मी तिथून मुक्त झाले. मला वाटले भूत उडतात.. मीहि उडून जाईल माझ्या अनि जवळ पण नाही... मी नाही उडू शकले ...म्हणून तुमच्याकडे लिफ्ट मागितली आणि घरी गेले."शांभवी

" हा सॉरी तेव्हा मी तुझ्याशी जरा रुड वागलो..."क्रिश

" सॉरी नकोय मला तुमची क्रिश ...मला मदत हवी आहे तुमची... माझं घर कोलमंडलय...मला ते परत उभं करायचंय ...माझा अनि जगणं विसरलाय.. माझ्या सावीचे खूप हाल आहेत हो....अनाथ होते मी अनाथाश्रमात वाढलेले अनिकेतच्या रूपाने मला माझी फॅमिली भेटली खूप प्रेम करतात ते माझ्यावर ..आणि मी त्यांच्यावर कोलमडले आहेत ते... खुप जास्त कोलमडले आहेत..."शांभवी चा कंठ दाटून आला.

"माझी काय मदत पाहिजे मग तुम्हाला..?" क्रिश

" तुम्हाला मी दिसते ..माझं बोलणं ऐकू जाते...फक्त तुमच्या थ्रु मला माझ्या अनि शी बोलायचंय... त्याला सांगायचे की मी तुझ्या जवळच आहे.. माझ्या सावी ची काळजी घ्या ... एवढ्या साठी कराल ना माझी मदत तुम्ही ..."शांभवी

..

ऋतू बदलत जाती...
जेव्हा वाटे संपले सगळे...
तेथे आशेचे किरण पसरवत जाती...
जगण्याला नवीन कारण देत रहाती...
ऋतू बदलत जाती....


क्रमक्षः

***

भेटुया पुढच्या भागात....

©® शुभा


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED