ऋतू बदलत जाती... - भाग..3 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..3


ऋतू बदलत जाती....३

" तुम्हाला मी दिसते ..माझं बोलणं ऐकू जातं,...फक्त तुमच्या थ्रु मला माझ्या अनि शी बोलायचंय... त्याला सांगायचे की मी तुझ्या जवळच आहे.. बस माझ्या सावी ची काळजी घे ... एवढ्या साठी कराल ना माझी मदत तुम्ही ..."शांभवी

आता पुढे.....

" ओके...मग त्या पुढे काय करायचं ठरवलं आहे तूम्ही.."क्रिश

"पुढे काय करायचं ...त्याला माहिती राहील की मी त्याच्या आसपास आहे ...मी त्यांच्या दोघांचा आसपास राहील... राहू आम्ही असेच...."शांभवी

" तुम्हाला का मला... पूर्ण आयुष्यभर तुमचा ट्रान्सलेटर म्हणून जॉब वर ठेवायचा आहे की काय..."क्रिश जरा हसला.

"नाही ..नाही फक्त आता तुम्ही माझ्यासोबत चला... त्यांना सांगा की मी इथेच आहे बस... मग तुम्ही जाऊ शकतात..."शांभवी

"तुम्हाला नाही वाटत तुम्ही स्वार्थी बनत आहात..."क्रिश

"कसला स्वार्थ ..?मला नाही समजत आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते...?"शांभवी

"हे बघा... ते दोघेही जिवंत आहेत... आणि एका जिवंत माणसाच्या काही अपेक्षा असतात ...काही गरजा असतात ..ते तुझ्याशी बोलतील.. पण तुझ्याकडून त्याला उत्तर भेटेल का? ...ते जेव्हा टेन्शनमध्ये असतील तू असं काही करू शकशील का...?की.. त्यांचा त्रास ,त्रागा घालवता येईल.. जेव्हा ते आजारी असतील.... किंवा सावी आजारी असेल तेव्हा.. तू त्यांची काळजी घेऊ शकतील का?... आणि तुला तरी माहिती आहे का ह्या योनी तु किती दिवस राहशील ...किती वर्ष राहशील...?..सॉरी बोलण्याच्या ओघात मी तुम्ही वरून तु वर आलो...."क्रिश

"..ईटस् ओके....पण..काय म्हणायचं आहे तुम्हाला..."शांभवी.

"तू त्यांच्याजवळ राहशील पण त्यांना दिसणार नाही... ऐकू जाणार नाही... त्याला स्पर्श करता येणार नाही .....चल ठिक आहे.. तुझ्या ह्या अशा रूपा सोबत हि ते राहायला तयार झाले,... पण या योनीत तू किती काळ आहे... तुलाही माहीत नाही जर तुझा काळ जवळ आला.... तु ह्या योनीतून मुक्त झाली... तर मग त्याच्या नंतर त्यांच काय ? .... परत कोलमडणार नाही का ते...?खर तर तुझ्या असण्याने काय उपयोग त्याला...फक्त तूच त्यांना पाहू शकणार ऐकू शकणार हा तुझा स्वार्थच नाही का..?"क्रिश

"मग मी काय करायला पाहिजे..?"शांभवी जरा रागात होती.

"तुला ऐकायला थोडं जड जाईल... पण मला असं वाटतं ..की ..त्यांच्या आयुष्यामध्ये तुझी जागा भरून काढणारी ...अशी दुसरी कोणीतरी व्यक्ती यायला पाहिजे ..
किंवा तु..ती ..आणायला पाहिजे..."क्रिश

"वेडे आहात का तुम्ही ?...मी माझ्या डोळ्यांदेखत माझ्या अनि ..आणि सावीला दुसऱ्या कोणाकडे जाताना बघू...."शांभवी

"जर खरंच त्यांच्यावर जीव लावत असेल तर... करावच लागेल... त्यांच्यासाठी तेच योग्य राहील.... सत्य हेच आहे... तु जवळपास असल्याने त्यांना काही उपयोग नाही...."क्रिश

ती विचारात पडली.

"सावीच तर ठीक आहे ...पण अनि ते मला सोडून दुसऱ्या कोणाला त्यांच्या आयुष्यात येऊ देतील...?"शांभवी

"का नाही... कोण म्हणतं आयुष्यात प्रेम फक्त एकदाच होतं.... जी मुलगी तुझ्यासारखी असेल.. सावीला जीव लावत असेल ...का नाही ती मि. अनिकेत च्या मनात घर करणार.... फक्त अशी मुलगी शोधून सापडायला पाहिजे...."क्रिश

"मला ह्या बाबतीत आजींशी बोलावे लागेल ...तुम्ही कराल का मला त्यांच्याशी बोलायला मदत.."शांभवी

"हो ..का नाही करणार ...जाता जाता शेवटी एक .. चांगले काम केले तर मला हि चांगलेच वाटेल...."क्रिश

"मला वाटते.. तुम्ही ही तुमचा विचार बदलावा... जर तुम्हाला वाटते की ..अनिकेतच्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती येऊ शकते... तर तुमच्या आयुष्यात का नाही.... का तुम्ही वाट नाही बघत आहात ...का एवढ्या लवकर हरलात....?"शांभवी

"दुसऱ्यांना सल्ला देणं सोपं असतं... माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी ही...पण प्रत्यक्षात बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या असतात... की नाही आपल्याला विश्वास ठेवावासा वाटत..."क्रिश

"तुम्हाला काय वाटते मला जड नाही जाणार आहे.... अनिच्या आयुष्यात दुसऱ्या मुलीला बघून.... खूप खूप त्रास होणार आहे मला... पण मी माझ्या अनि साठी ..तो त्रास भोगायला तयार आहे....दिवस-रात्र ...महिनाभर मी एकाच जागेवर उभी होती.... या आशेवर कि कोणीतरी येईल... आणि मला त्यातून मुक्त करेल.. आणि बघा तुम्ही आलात ..मी मुक्त झाले... तुम्हीही होप्स सोडू नका ....सर्व ठीक होईल आयुष्यात ...फार मुश्कीलीने हे आयुष्य भेटते ...मला विचारा मी काय गमवलेय माझ्या आयुष्यात...."शांभवी

"बर ठीक आहे.. मी विचार करेल या गोष्टीवर.. पण आता आपण तुमचा मॅटर सॉल्व करू ...चला मग निघायचं तुमच्या घरी.?.."क्रिशने विषय टाळला.

ते दोघं निरामय बंगल्यावर आले, वॉचमन ने त्याला अडवलं, मग तिने सांगितल्याप्रमाणे मिराबाई पाटील यांना भेटायला आलो आहोत असं सांगा आत मध्ये.. त्याने तसेच सांगितले.

थोड्यावेळाने त्याला आत मध्ये जायची परवानगी भेटली.

"तुम्ही ..? मी ओळखलं नाही तुम्हाला.." आजी.

"मी क्रिश सोनवणे.... मुंबईहून आलोय फिरायला... मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं होतं... तुमच्या सुने विषयी....शांभवी विषयी..."क्रिश

"तुम्ही ओळखता का तिला.."आजी

"आधी नव्हतो ओळखत ...आजच ओळख झाली आमची सकाळी...."क्रिश

"तुम्ही काय बोलताय ..तुम्हाला तरी माहित आहे का ..?शांभवी ला जाऊन महिना झालाय आता ...ती तुम्हाला कशी भेटेल आज?..."आजी


"तुमचा विश्वास आहे का ...ह्या गोष्टीवर की लोक जाऊनही परत येतात आत्मा रुपाने..."क्रिश

"तुम्हाला असं म्हणायचे का... शांभवीची आत्मा भटकतेय म्हणून ..हे बघा ...सध्या आम्ही कुठल्या विचित्र परिस्थितीतून जातोय ,तुम्हाला नाही माहिती ....असल्या गोष्टी बोलून आमच्या भावनांशी खेळू नका ....आता आला आहात तर चहा घ्या... आणि निघा ..पाहुण्यांना आम्ही असं खाली हात पाठवत नाहीत ...नाहीतर मला सिक्युरिटीज ला बोलवावे लागेल...."आजी

"त्याने शाभवी कडे बघितले तीने त्याला काहीतरी सांगितले..

"तुम्हाला चहा नाही आवडत... तुम्हाला कॉफी आवडते अद्रक घातलेली ..."क्रिश

आजींनाही एका क्षणासाठी आश्चर्य वाटलं पण लगेच त्या सामान्य झाल्या.

" हे तर कुणीही सांगेल ...माझ्या घरातल्या कुकला विचारलं तर सहज समजेल कुणालाही..."आजी.

त्याने तिच्याकडे नैराश्याने बघितले, तिने फक्त डोळे मिचकावले आणि म्हटले थांब मी सांगते तुला.

"लाल कलरची.. तुमच्या भावाने दिलेले पैठणी तुमची सर्वात जास्त आवडती आहे...

"तुमच्या पायासाठी लागणार आयुर्वेदिक तेल.. हिमाचल प्रदेश मधून एका आयुर्वेदिक सेंटर मधून येत......
तुम्हाला गोड मध्ये ओल्या नारळाच्या वड्या आवडतात.... पण तुम्हाला डायबिटीज असल्यामुळे ...तुम्हाला जास्त खाता येत नाहीत....
तुम्हाला अत्तरांची खूप हौस आहे ...तुमच्या जवळ वेगवेगळ्या प्रकारची अत्तरं अजूनही आहेत.......
तुम्ही उशाखाली नेहमी भगवद्गीतेचे छोटेसे पुस्तक ठेवतात........
आणि सर्वात महत्त्वाचा जे कुणालाही माहित नाही शिवाय शांभवी ......" क्रिश उठून आजी जवळ गेला. आणि त्यांच्या कानात

" तुमच्या रूम मधल्या अल्मीराच्या चोर कप्प्यामध्ये लाल कपड्यामध्ये... तुम्ही आजोबांची डायरी आणि फोटो अजूनही सांभाळून ठेवला आहे ...त्यात त्यांच्या कविता आहेत...."क्रिश

"बस बस .. एवढं पुरेसा आहे मला ... शांभवी इथेच आहे .?..."
क्रिशने मान डोलावली.

त्यांचे डोळे भरून आलेले ."..बाळ शांभवी...तु आहेस इथे आहेस...? जवळ ये माझ्या ....." आजी हवेत हात फिरवत होत्या जणू तिच्या डोक्यावरून फिरवत आहेत अश्या ..

"का सोडून गेलीस आम्हाला.....तुला माहितीये तुझ्या नंतर आम्ही कसं राहतोय इथं.."आजी

शांभवीचेही डोळे भरून आले होते. तिने आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं, आणि रडत होती.." नाही आजी ...नाही मलाही जायचं नव्हतं तुम्हा सर्वांना सोडून .....पण नियती काहीतरी वेगळेच करून गेली.. आपल्या सोबत...."शांभवी

"आजी ...ती तुमच्या मांडीवर डोकं ठेवून बसली आहे...ती सांगतेय की तिलाही जायचं नव्हतं तुम्हाला सोडून...."क्रिशने आजीला तीला चाचपडतांना बघून सांगितले.

आजींनी स्वतःच्या मांडीवर थोडे थापटले.
"मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं होतं... आता जे होऊन गेलं ...ते आपण परत बदलू नाही शकत ...पण मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं होतं.. "असं क्रिशने आजीला शांभवी कडून सांगितलं.

"काय बाळा काय बोलायचं आहे..?"आजी

"तीला अनिकेत ला... परत त्याच्या आयुष्यात सुखी झालेलं बघायचंय आहे... त्याचे दुःख शांभवीला सहन होत नाहीए.... तिला त्यांच दुसरं लग्न लावायचं आहे... "क्रिशने शांभवीकडून आजीला सांगितलं.

" नाहीस इथं तरी त्याची काळजी करतेस...म्हणूनच ...तु अशी या ....?"आजींचा उर भरून आला.

" आजी सावरा...धीराने घ्यावे लागेल आपल्याला....शांभवीला अशा मुलीसोबत क्रिशचं लग्न करायचंय जी सावीला आईचं प्रेम देवू शकेल आणि क्रिशला सांभाळून घेईल.. त्याला ह्या दुःखातून बाजूला काढेल.."क्रिश

"पण अशी मुलगी एवढ्या लवकर कुठे सापडेल...? आणि अनिकेत ही लगेच कसे तयार होतील...."आजींनी हुंदका आवरला.

"जसा आज मी तुमच्याशी शांभवीच्या वतीने बोलतोय तसा त्यांच्याशिही बोलेल...."क्रीश

" शांभवी...तो.. तुझा एक्सीडेंट कसा झाला....अशी कशी गाडी चालवत होती तु... ड्रायव्हर लागले सोबत का नाही नेलं..?"आजी

क्रिशने त्यांना सर्व सांगितले जे शांभवी ने त्याला सांगितलं होतं.

तू म्हणते तसं सुवर्णाने तुला फोन केला होता ...बाळ आजारी आहे... ते ..पण त्या दिवशी बाळाला काहीच नव्हतं झालं.. सावी आजारी नव्हती...हो रडत होती नक्कीच ...पण आजारी नव्हती सावी.......आणि आम्ही कुठे बाहेर नव्हते गेले.. इथेच देवघरामध्ये चिंतन करत बसले होते.. जवळपास दोन तास आम्ही देवघरात होतो... तूम्ही आणि अनिकेत घरी नसल्यावर मी कशाला साविला सोडून बाहेर कुठे जाऊ..?"आजी गोंधळल्या.

"शांभवी तुला काही कळतंय का ?...म्हणजे तुझा एक्सीडेंट हा निव्वळ एक्सीडेंट नव्हता..."क्रिश

"काय...! "आजी आणि शांभवी दोघीही एकदाच ओरडल्या.

"हम्म.."क्रिशने मान डोलावली.

तीने आजीकडे पाहीले.

"काहीतरी फिशी नक्कीच आहे ..."क्रिश.

"कुणी केलं असेल हे ..."आजी.

"सुवर्णा सुवर्णा ...तिला माहिती असेल कोण आहे याच्या मागे तर... तिनेच केला होता ना फोन..."क्रिश

" क्रिश ती माझ्या मुलीच्या रूममध्ये आहे ... तिला बाहेर काढा लवकर..."शांभवी सावीच्या रूमकडे पळाली.

आजीलाही त्यावेळेला थोडसे लक्षात आले, त्या लवकरच उठल्या आणि सावीच्या रुममधे गेल्या. त्यांच्या मागे क्रिशही गेला.

सावी झोपली होती आणि सुवर्णा मोबाईल मध्ये काहीतरी करत होती. तिला त्रास होऊ नये म्हणून आजीने सुवर्णा ला बाहेर बोलावले.

ती बाहेर आली ,तिला कल्पनाच नव्हती आता बाहेर काय होणार आहे ते...

आजीने आधी एक सनकन तीच्या कानाखाली लगावून दिली.

" शांभवीचा एक्सीडेंट झाला होता त्या दिवशी तू तिला फोन केला होतास का?.. बाळ आजारी असल्याचा...?"आजी

सुवर्णा घाबरली आता आपले पितळ उघडे पडेल.." पण यांना कसं कळलं हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी त्या कुणालाच बोलून गेल्या नव्हत्या.. असं मला त्या माणसाने सांगितलं होतं..."ती विचारात हरवली.

" आजी नाही... मी असं काही फोन नव्हता केला... " सुवर्णा
क्रिशने लगेच तिचा मोबाइल हिसकावून घेतला.
कॉल हिस्टरी चेक केली, त्यात शांभवी ला बरोबर याच तारखेला म्हणजे एकवीस जुलै ला कॉल केला होता, रात्री आठ च्या जवळपास...

" हे काय आहे मग..."क्रिशने तिच्यासमोर फोन पकडला.

" आजी मला माफ करा... मला फक्त फोन करायला सांगितलं होतं... त्यासाठी मला दहा हजार भेटणार होते.. मला नव्हतं माहिती की असं काही होईल ..आजी मला माफ करा ...मला त्यांना असं काही करायचा बिलकुल हेतू नव्हता....."सुवर्णा

" कुणी सांगितलं तुला असा फोन करायला...."आजी

" मला नाही माहिती ...मला त्याचं नाव नाही माहिती. त्याने फक्त माझ्या पत्यावर दहा हजार रुपये कुरिअर केलेले... आणि एवढं सांगितलं..."सुवर्णा

" बरं बोलाने खरं सांग ...नाहीतर बघ पोलिसांच्या ताब्यात देऊ तुला... आणि अनिकेतला जर समजलं तर ...तर तो तुला जिवंत सोडणार नाही..."आजी.

तिने फोन उघडला आणि त्यातला एक नंबर दाखवला.
"मला ह्या नंबर वरून फोन आला होता. खरंच माझी काही चुकी नाही..."सुवर्णा.

" आज पासून तू माझ्या सावी जवळ मला दिसायला पण नको पाहिजे ....आणि हे गाव सोडून जाण्याचा प्रयत्न पण करू नको... जोपर्यंत काही सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत...."आजी

"क्रिशने तिच्या हातातून तो फोन हिसकावून घेतला आणि त्या नंबरची सर्व कॉल हिस्ट्री त्याने चेक केली. सर्व मेसेजेस, फोन त्याने चेक केले आणि आपल्या मोबाईल मध्ये सेव करून घेतले.

शांभवी तिच्या जवळ जाऊन रडत होती.
"बाळा मी असं कोणाचं काय बिघडवलं होतं की.. त्यांनी मला तुझ्यापासून दूर केलं..."तीचे हुंदके वाढतच होते.


ऋतू बदलत जाती...
अगणित वळणे घेवून येती..
काल बहरलेली फुले ,
आज कदाचित सुकनही जाती...
ऋतू बदलत जाती.....

क्रमक्षः..

****
भेटूया पुढच्या भागात...

©®शुभा.