ऋतू बदलत जाती... - भाग..4 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..4







ऋतू बदलत जाती....४


शांभवी तिच्या जवळ जाऊन रडत होती.
"बाळा मी असं कोणाचं काय बिघडलं होतं की.. त्यांनी मला तुझ्यापासून दूर केलं..."तीचे हुंदके वाढतच होते.

आता पुढे....

नाशिक मधल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत एका छोट्याशा खेड्यात ती म्हणजे महेशी राहत होती.
आज ती श्रावण सोमवार निमित्त त्रंबकेश्वर येथे आलेली ,लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात भुरभुर पाऊसही पडत होता ,तरीही ती शिवभक्त तिथे उभी होती गेल्या चार तासांपासून..

"महेशी चार तास झाले ...माझे पाय दुखायला लागलेत.."अदिती

"परमेश्वराचे दर्शन घ्यायला.. एवढा त्रास तर आपण सहन करूच शकतो ना ...!"महेशची.

"हो पण सवय नाही यार..."अदीती.

"कित्येक महान साधू संतांनी.. कित्येक तपं केली तेही असं म्हणतात एका पायावर उभं राहून ...दिवस-रात्र भुकेलं राहून ....फक्त त्यांच्या भेटीसाठी...! आणि तु... एक दिवस रांगेत उभं राहून त्यांच्या दर्शनासाठी वाट नाही पाहू शकत ..?"महेशी

.." ज्यांनी तपं केली त्यांना परमेश्वराने प्रत्यक्ष दर्शन दिले.... आपल्याला रांगेत उभं राहून.. फक्त शिवलिंगाचे दर्शन घडणार आहे ...मी काय म्हणते फक्त.. की.. चल थोड्या ओळखीने... जॅक वगैरे लावून ... काही करता येत असेल तर... जाऊ लवकर......"अदीती

"नाही ...मला असं काहीच करायचं नाही..!... बघ किती भक्त रांगेत उभे आहेत...
तुला जायचं असेल .. तर तू जाऊ शकतेस... मी रात्रभरही अशीच वाट बघत उभी राहू शकते इथे.... " महेशी.

बिचारी आदितीही तिच्यासोबत तिथेच उभी राहिली .खाली बसूनच ती पुढे सरकत होती मोबाईल मध्ये टाईमपास करत.

पण तिला नव्हते माहिती तिच्यासोबत अजूनही कोणी होते तिथे उभे.

हर हर महादेवची गर्जना करत मुंगीच्या पावलाने ते भक्तजन पुढे पुढे सरकत होते. जवळच्या मोठ्या मोठ्या पडद्यांवर तेथे मंडपात महादेवाच्या पिंडीचा अभिषेक दाखवण्यात येत होता. आणि महेशी तो बघण्यात गुंग होती. तिला तहान-भूक काही जाणवत नव्हते, फक्त मनात एकच जयघोष सुरू होता" हर हर महादेव.. हर हर महादेव...!"

जवळपास सहा-सात तासानंतर तिचा नंबर आला. आज गाभाऱ्यात प्रवेश नव्हता,पुजारी त्यांच्या हातातली पत्रावळी पूजा घेऊन महादेवाला अर्पण करत होते. तिने डोळे भरून महादेवाला बघितले ,हात जोडले, एक मिनिटं शांत उभी राहिली. ते पुजारी सर्वांना पुढे जा पुढे जा म्हणून ओरडत होते, ती फक्त तेथून थोडी मागे सरकली सभामंडपात एका जागी जाऊन बसली.
तिच्याजवळ अदिती आणि अजून एक जण बसले होते पण महेशी तर शिवशंभूच्या भक्तीरसात रमली होती.

"देवा महादेवा ..माझी शांभवी जिथे असेल तिथे सुखात असू दे ...तिच्या आयुष्यातले सर्व दुःख दूर कर.. आणि त्यालाही सुखी ठेव...." तिच्या बंद डोळ्यातून काही टिपूर तिच्या गालावर ओघळले.
कदाचित तिला त्या दोघांची आठवण आली असेल.

"महेशी तू रडते आहेस.."अदीती

"नाही ग फक्त काही जुन्या आठवणी आठवल्या... किती केलं तरी पिच्छा सोडत नाहीत त्या..आधी शांभवी आणि मी नेहमी श्रावण सोमवारी इथे यायचो... आता फक्त मी एकटीच येते.."महेशी

" आज मी पण आली आहे महेशी...तुझी शांभवी आली आहे.. पण बघ नशीब ..! तुला मी दिसत नाही.."शांभवी.

" काय झाले महेशी तू इकडे तिकडे काय बघत आहेस...?"अदीती

" मला भास झाला कदाचित शांभवीही इथेच आहे.."महेशी.

" नाही ..तुला भास नाही झाला महेशी ...मी इथेच आहे..."शांभवी.

आता बाहेर जाऊन बसू इथे ईतर भाविकांना बसायला जागा पाहिजे .

"हम सगळ्या जगाची काळजी तुला..! "अदीती

त्या दोघी ब्रह्मगिरीच्या वाटेवर असणाऱ्या एका झाडाखाली बसल्या .

" मी आणि शांभवी आम्ही इथं बसून घरून आणलेली साबुदाणा खिचडी खायचो ...घरून म्हणजे आश्रमातून... तेच तर होतं घर आमचं.."महेशी.

" महेशी तुमच्या दोघींच्या नावाचाही अर्थ एकच आहे ना.. पार्वती..! " अदीती

" हो शिवाची पार्वती.."महेशी

" आणि अनिकेतच्या नावाचा अर्थ शिव होतो महेशी... ..."शांभवीने डोळे बंद केले.

"पण शिवाची पार्वती एकच होती ..."महेशी हताशपणे ओठातच पुटपुटली.

"तुझ्या लक्षात नसेल महेशी ..पण सती त्यांची प्रथम पत्‍नी तीसुद्धा पार्वतीच होती.... आणि आता ..मी ती सती झाले... महेशी... तुला माझ्या अनि ची पार्वती बनवायच आहे....बणशील ना तु..?."शांभवी.

आदिती आणि महेशी बोलत होत्या तेव्हा तिथे एक जण आला .

"हॅलो मी क्रिश सोनवणे .. मला महेशी ...तुमच्याशी थोडं बोलायचं होतं."क्रिश

"सॉरी.. पण आपण ओळखतो का एक-मेकांना..??"महेशी

"नाही ..पण मी शांभवीला ओळखतो..."क्रिश

शांभवीचं नाव ऐकताच महेशीने गरकन मान त्याच्याकडे वळवली... आणि त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघितले.

"शांभवी...!! काय बोलायचं आहे तुम्हाला तिच्याबद्दल.."महेशी

"मिस महेशी... शांभवी इथेच आहे तुमच्याजवळ .."क्रिश

महेशी लगेच इकडे तिकडे बघायला लागली ,पण तिला शांभवी कुठेच दिसली नाही .

"कुठे आहे शांभवी ..?समोर का नाही येते आहे ती माझ्या..?"महेशी

"ती आता कुणाच्याच समोर येऊ शकत नाही ....नाही दिसू शकत ती कुणालाच ..."क्रिश

" काय ....!! काय बोलताय तुम्ही...? ..."महेशी गोंधळली.

"शांभवी ह्या जगात नाही...!!"क्रिश

"ए मिस्टर कोण आहात तुम्ही ..?शांभवी बद्दल असं बोललेलं मी खपवून घेणार नाही ...चला चालते व्हा इथून..."महेशी चिडली.

"हे बघा मिस... खरंच असं झालेलं आहे.. शांभवीची आत्मा....! .. . तिला तुमची मदत पाहिजे आहे.."क्रिश

"हे बघा मिस्टर ...माझा हात उठायच्या आधी ..तुम्ही निघायचं इथून ..."महेशीचे डोळे भरून आले.

"हे बघा माझं ऐकून घ्या... मी खरं बोलतोय शांभवी फक्त मला दिसते ...ऐकू येते.. तीच सहा महिन्याचं बाळ तिची सावी आणि अनिकेत हे खूप त्रासात आहेत ..आणि म्हणून तिला तुमची गरज आहे...".क्रिश

महेशीचे डोळे भरून आले, तीने दोघं हातांनी चेहरा झाकला आणि ती रडायला लागली.

"नाही हे खरं नाही .. नाही..मुळीच नाही..."महेशी तिला रडताना बघून शांभवीचेही डोळे भरून आले, तिही रडत होती .आदिती महेशीला सांभाळत होती. महेशीने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

" हा माणूस खोटं बोलतोय याला जायला सांग ... माझी शांभवी ठीक आहे."महेशी

"ए मिस्टर जा इथून...आत्मा..काय.. काहीही बरडताय...!!चला उठा निघा....महेशी..रडू नको... त्याच्या बोलण्यावर नको विश्वास ठेवू...तुझी शांभवी ठीक असेल...."अदीती महेशीला दिलासा देत होती.

क्रिशने खिशातून मोबाईल काढला आणि त्याच्या वर अनिकेतच्या आजीला व्हिडिओ कॉल लावला.

"आजी तुम्ही ..मिस महेशी शी बोलता का? त्यांना माझ्यावर विश्वास बसत नाहीए..."क्रिश

असं बोलून त्याने तो फोन महेशी समोर पकडला.

" महेशी बेटा... मी आजी बोलतेय... ओळखलस ना मला..."आजी

"आजी बघाना ...हा माणूस काय बोलतोय..."महेशी

"महेशी तो खरं बोलतोय... खरंच आपल्या शांभवी सोबत असं झालंय बेटा... भटकतेय ती....!"

.आता महेशीचा बांध फुटला .ती हमसाहमशी रडायला लागली, आधी विश्वास बसत नव्हता तिला, पण आता आजी बोलल्यावर तिला तो बसला .आणि का नाही बसणार त्यांच्याच आश्रमामध्ये शांभवी आणि महेशी लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या .खूप जीव होता आजींचा त्यांच्यावर आणि त्यांचा आजींवर.. खूप रडत होती ती. खूप रडत होती. अखेर चक्कर येऊन बेशुद्ध पडली.


क्रिशने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतले आणि गाडीत टाकले . शांभवी पुढच्या सीटवर जाऊन बसली ,पण अदीती बाहेरच होती. तिला समजत नव्हते काय करावे ते...

"मिस तुम्ही मागे महेशी जवळ बसता का? पुढे शांभवी बसलेली आहे..."क्रिश.

बिचारी आदिती हे सर्व एकूण तिलाही बराच धक्का बसला होता.
तिला हे सर्व काहीतरी विचित्रच वाटत होते आणि थोडी भीतीही..पण तिचा नाईलाज होता ,ती जाऊन मागे महेशी जवळ बसली.

क्रिश ने गाडी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेली शांभवी आणि अदिती दोघीही चिंतेत होत्या.

तसाच उचलून तो तिला हॉस्पिटलच्या आतमध्ये घेऊन गेला ,डॉक्टरांनी चेक केले.

"काही नाही.. बस धक्का बसला आहे त्यांना कसला ... त्यामुळे बीपी लो झाला आहे.. मी औषध देतो थोड्यावेळाने येतील शुद्धीवर.."डॉक्टर

जवळपास दोन तासाने ती शुद्धीवर आली. शुद्धीत आल्यावर ती अदीतिच्या गळ्यात पडून रडत होती .सारखी रडत होती. ज्या शांभवीच्या सुखी आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी देवाकडे कामना करत होती ,ती तर केव्हाच हे जग सोडून गेलेली. खूप दुःखी झाली होती ती.

"मिस महेशी शांभवी इथेच आहे तुम्हाला असं रडताना बघून त्यांना खूप त्रास होतोय.. तुम्ही प्लीज रडणे थांबवा..."क्रिश

" शांभवी काय झाले .. अशी कशी तू मला सोडून गेलीस...?"महेशी

" माझ्याही हातात थोडी होतं.ते...पण मला विचारतेस ?तू का सोडून गेली मला?..माझ्या सर्वात सुखाच्या क्षणी.. माझ्या लग्नात.. तू नव्हतीस महेशी ..का सोडून गेली होतीस मला.. सांग ना का सोडून गेली होतीस..?
किती दिवस झाले मी आणि अनि तुला शोधत होते ..तुझा पत्ता शोधतोय कुठेच भेटली नाही...लग्नानंतर पहील्या श्रावणात आम्ही युकेला होतो..आणि मागच्या श्रावणात मी प्रेग्नंट होते तर अनि आले होते ईथे तुला शोधायला.. पण त्यांना तु भेटलीच नाही... पण आता वाटलं .. ह्या श्रावण सोमवारी तु इथं नक्की येशील...आणि बघ तु मला ईथेच भेटली.. सकाळपासुन मीही रांगेत उभी होती ...आज तुझ्यासोबत शिवशंभुचे दर्शन घेतले मी महेशी.."क्रिश अगदी तिचे शब्द नि शब्द जसेच्या तसे सांगत होता, जणू शांभवीच बोलत आहे.

महेशी ईकडे तिकडे बघायला लागली.

"मिस.महेशी शांभवी तुमच्या समोरच उभ्या आहेत."क्रिश

परत हतबल महेशी रडायला लागली...पण बिचाऱ्या अदीतीची हालत खराब झाली होती..हे सर्व ऐकून तिला प्रचंड भिती वाटत होती.

"महेशी रडू..नका..शांभवीही रडतेय..."क्रिश

शांभवी तु नको रडू..बघ मी डोळे पुसले...पण तु नको रडू.... तुला...मदत हवी ना माझ्या कडून..बोल..बोल..काय मदत पाहिजे....मी हा जीवही ओवाळून टाकेल तुझ्या वर..."महेशी

"मिस.महेशी... मदत म्हणजे ...शांभवी ची इच्छा आहे कि...तुम्ही सावीची आई बणावं...?... अनिकेत शी लग्न करून....."क्रिश

" काय..!!"महेशी

"मिस...!" क्रिश.

" कसं..शक्यय हे...मला नाही जमणार..."महेशी

"हे बघा शांभवीच्या आत्म्याला शांती तेव्हाच भेटेल...जेव्हा....सावी चांगल्या हातात असेल...!!"क्रिश.

"नाही.. नाही...मला..हे शक्य नाही... शांभवी.. मावशी म्हणून मी तिला आई सारखे सांभाळेल...पण लग्न .. नाही...!!"महेशची.

"हे बघ महेशी...हीच नियती आहे....विधिलिखित आहे सर्व...अगदी...अनंत जन्मांपासून आपण एकाच पुरुषाला वरतोय...आणि तो अनि आहे....आपलं प्रारब्धच तसं आहे....आणि माझी मुक्ती पण ह्याच मुळे नाही झाली...."क्रिशच्या तोंडून जणू शांभवीच बोलत होती.

महेशी हे सर्व ऐकून स्थब्ध झाली.
"असही काहीतरी ...आपल्या सोबत होवू शकते?"

"पण तुला हे सर्व कसं..कसं माहिती...?"महेशी

"तुला आठवतं..ईथेच एक साधू भेटले होते आपल्याला...काय बोलले होते ते..."शांभवी.

"तुमचं प्रारब्ध जुळलेलंय...एकाशीच....कधी सोबत .....कधी एक एक करून...."महेशी आठवत बोलली.

"आणि तेच साधू...काल घरी आले होते..."क्रिश शांभवीकडून बोलला.

ऋतू बदलत जाती...
नाती जुनीचं...
नव्याने जुळत जाती....
ऋतू बदलत जाती....

****

क्रमक्षः

भेटुया पुढच्या भागात....