ऋतू बदलत जाती... - भाग..5 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..5

ऋतू बदलत जाती.....५

"तुमचं प्रारब्ध जुळलेलंय...एकाशीच....कधी सोबत .....कधी एक एक करून...."महेशी आठवत बोलली.

"आणि तेच साधू...काल घरी आले होते..."क्रिश शांभवीकडून बोलला.

***
आता पुढे.....

"हो काल तेच साधू आम्हाला भेटले होते.. भेटले होते म्हणण्यापेक्षा ..ते दारात अचानकच प्रगट झाले ... म्हणजे दरवाजातूनच आले ...पण अचानक .....आम्ही सुवर्णा विषयी बोलत होतो तेव्हा ..."शांभवी चे शब्द क्रिशच्या मुखातून निघत होते.एका अनुवादकाचे काम तो निट करत होता.

"कोण सुवर्णा...."महेशी

क्रिश ने एक दीर्घ श्वास सोडला आणि हळूहळू शांभवीच्या एक्सीडेंट ची आणि त्याच्यानंतर ची कहाणी महेशीला सांगितली.

"काय ...! माझ्या शांभवी सोबत एवढं सर्व घडून गेलं... आणि मला माहितीच नाही ..."परत महेशी रडायला लागली.

"हे बघा तुमच्या रडण्याने.. जे झाले ते बदलणार नाही..? आता तुम्हाला तुमच्या शांभवी ला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.. तिच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत..."क्रिश शांभवीकडे बघत बोलला.
शांभवीनेही त्याच्या होकारात हो भरली फक्त कुणाला दिसले नाही.

जड अंतकरणाने महेशीनेही होकार भरला.

त्यांची गाडी आता परत शांभवीच्या घराकडे निघाली होती.

शांभवीने क्रिशला महेशी बद्दल विचारायला सांगितले कूठे होती ,काय करत होती वगैरे वगैरे...त्यानेही शांभवीकडून विचारले तिला.

"मी....गोलवाडी गाव आहे..सह्याद्रीच्या कुशीत..तेथे एका छोट्याश्या रूग्णालयात सद्ध्या प्रँक्टिस करते...."महेशी अजूनही उदासच होती.

"तसेच वेळ मिळेल तसा आजूबाजूच्या आदिवासी भागात जावून आरोग्यविषयी जनजागृती करते......"अदीतीने अजून माहिती पुरवली.

"महेशी मी तुझ्यावर फार मोठी गोष्ट लादत तर नाहीना..?...म्हणजे तुझ्या आयुष्यात दुसरे कुणी नाही ना...""क्रिश शांभवीचे शब्द बणून बोलला.

शांभवीच्या डोळ्यासमोर अडीच वर्षापुर्वीचे दिवस आले... फेसबुकवर तासन तास वेगवेगळ्या विषयांवर त्याच्याशी मारलेल्या गप्पा आठवल्या...आणि तिचे डोळे परत भरून आले..

"मिस.महेशी...तुम्ही रडताय का..?..आहे का कुणी असं..?.."क्रिश

शांभवीही तिच्या उत्तराची वाट बघत होती.
तिने हुंदका दाबत मान नाही मध्ये हलवली.

"महेशी सांभाळ स्वतःला..."अदीतीने तिच्या हातावर थोपटले.

शांभवीही तिच्याजवळ मागे जावून बसली.
महेशी ...शांभवी तुमच्या शेजारी बसल्यात...तुमच्या खांद्यावर डोकं ठेवलयं तीने...त्याही रडत आहेत..तुम्ही शांत व्हा बघू..."क्रिश

महेशी शांत झाली,तिने हलकेच आपल्या खांद्यावर थोपटले.बिचारी अदीती..ती अजूनही विचित्र अवस्थेत होती...अजूनही तिचा क्रिशवर विश्वास बसत नव्हता,पण तरीही महेशी साठी ती शांत होती.

"शांभवी..एक विचारायचे होते...म्हणजे बघ ना...महेशी किती रडतेय...पण आजी..त्यांचाही तुझ्यावर जीव होता ना..?..मग त्या एवढ्या रडल्या का नाही...?.."क्रिशला केव्हाचा त्रास देत असलेला प्रश्न अखेर त्याने विचारला.

"अं...तुम्ही त्यांच्यावर संशय नका घेवू...आजींनी त्यांच्या आयुष्यात बरीच दुःखे बघितली आहेत.. इतरांची.. स्वतःची त्यामुळे त्यांचे अश्रू आटलेत म्हणा किंवा त्या कणखर झाल्या म्हणा. ..त्यामुळे त्या परिस्थितीमुळे खचत नाही...मार्ग काढण्याकडे जास्त लक्ष देतात..."शांभवी.

"शांभवीने काय उत्तर दिले..मि. क्रिश...?"शांभवी काय बोलली हे महेशीला जाणून घ्यायचे होते.
क्रिशनेही तिला सर्व सांगितले.
"हो...बरोबर..कणखर तर त्या आहेतच.."महेशी.

...

हा तुम्ही त्या साधू विषयी सांगत होते...अदीती चे साधुतले कुतूहल काही तिचा पिच्छा सोडत नव्हते, अखेर तिने विचारलेच.

क्रिशच्या डोळ्यासमोर तो कालचा प्रसंग आला.

"आजी तुम्ही असंच कस काय सोडता हिला... पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे ..तेच काय खरं-खोटं ते काढतील..."क्रिश.

पण आजींनी क्रिशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
क्रिश आणि शांभवी एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागेल.

"आणि हे बघ सुवर्णा ...तू आम्हाला हे सांगितला आहे ..हे कुणालाच कळता कामा नये... नाहीतर बघ त्या दिवसानंतर चा सूर्य तुला दिसणार नाही... लक्षात ठेव ..."आजीच्या बोलण्यात जरब होती.

"आजी तुम्ही असं तिला जाऊ द्यायला नको पाहिजे होतं.."क्रिश

"हे बघा, पोलिसांना तर मी कळवणार आहेच, आणि आताच्या तिच्या मोबाईल वरून घेतलेल्या डिटेल्स ही ...पोलिसांना देणार आहे.. पण सुवर्णाला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं ..तर ज्या व्यक्तीने हे केलं ..त्यालाही समजलं असतं ..हा तपास आपण गुपचुप करायला हवा... समोरच्याच्या लक्षात यायच्या आधी... तो आपल्या तावडीत सापडायला पाहिजे.. लवकरात लवकर....समजले...आणि हो...माझ्या ओळखीतला पोलीस ऑफिसर याचा तपास आधीपासूनच करत आहे...आता हे पुरावे मी देईल त्याला...."आजी सोफ्यावर बसल्या.

आजी म्हाताऱ्या जरी होत्या तरी त्यांचा मेंदू काम करत होता, कधी काळी त्या त्यांच्या गावच्या सरपंच बाई होत्या आणि गावचे तंटे त्याच सोडवत असत.. असो.

आजी आता पुढे काय.. क्रिश बोलतच होता, तेवढ्यात त्यांना दरवाजा वर बम बम भोले ची आरोळी एकू आली.
सर्वांनी वळून दरवाज्याकडे बघितले, तिथे एक प्रचंड जटांनी वेढलेला ,सर्व अंगावरती भस्म लेपलेला आणि कमरेला केसरी कपडा लपेटलेला, एक साधू उभा होता.

आजीने क्रिश कडे आश्चर्याने पाहिले.

"एवढे आश्चर्यचकीत होण्याची गरज नाही... माझी यायची ही वेळ ठरलेलीच होती.....शांभवी बाळा ..आठवते का तुला..? काही वर्षांपूर्वी आपण भेटलेलो ...."असे म्हणतच तो जटाधारी आत मध्ये आला.

शांभवीचे नाव ऐकताच क्रिश आणि आजी दोघेही चमकले.

"तुम्हाला माहित आहे शांभवी ईथे आहे ते.".क्रिश.

"हो मला माहित आहे... आणि पूर्वी ही माहीत होतं... सर्व नियतीच्या हातात आहे.. सर्व आधीच ठरलेले आहे.."साधू

आजीने पुढे जावून वाकुन त्यांना नमस्कार केला, आणि त्यांना बसायला आसन दिले . क्रिशनेही तसेच केले. शांभवी सुद्धा झुकली त्यांच्यापुढे तिला आठवलं हे साधू तिला एकदा त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवारी भेटले होते.

"हो बाबा मला आठवलं आपण भेटलो होतो त्र्यंबकेश्वरला.."शांभवी.

" हम्म...आठवले तर....बम बम भोले... तुम्ही याच विवंचनेत आहात ना की पुढे काय .."साधूबाबा.

क्रिशने आश्चर्याने शांभवी कडे बघितले, बाबा शांभवीला ऐकू शकत होते.

"हो बाबा.."शांभवी.

"तर ऐक तुझी मुक्ती ह्यासाठीच नाही झाली ,कारण तुला तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावायचे आहे..."बाबा परखडपणे बोलले.

"काय..!"शांभवी.

"हो हीच नियती आहे ...अनंत काळापासून जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तुमचे आत्मे फिरत आहेत.... आणि आता ह्या जन्मी तुला त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पूर्णतः मुक्ती मिळणार आहे... प्रभुचरणी तुला स्थान भेटणार आहे... पण त्यापूर्वी तुझ्या नवऱ्याला तुझ्या प्रियसखीच्या स्वाधीन करावे लागेल..."साधूबाबा.

"पण बाबा असे का..? माझी प्रिय सखी... म्हणजे महेशी.."शांभवी गोंधळली,लग्न तर तिला लावायचे होते,पण महेशीशी..?

"हो तीच ..तुमचे तिघांचे आत्मे जोडलेले आहेत... तुम्ही दोघीही अनंत काळापासून एकाच पुरुषाला वरून राहिल्या आहात. .... नियती...!! कर्म...!! तुमच्या शिवभक्तीमुळे ..ह्या जन्मानंतर तुम्हा तिघांना ही पूर्णतः प्रभूचरणी स्थान मिळणार आहे.."साधूबाबा.

"बाबा..अनंत काळापासून..?"शांभवी आश्चर्यचकीत झाली.

" ऐक...ही कदाचित महाभारताच्या काळा नंतरची गोष्ट असेल ..

दोन प्रिय सख्या कुलगुरु यांच्या आश्रमामध्ये विद्याभ्यास घेत होत्या वैदेही आणि जानकी. वैदेही राजकुमारी होती तर जानकी प्रधान कन्या.. दोघीही दिसायला अगदी सुस्वरूप, देखण्या ,सुंदर अगदी कुणालाही एका नजरेत भरतील अशाच.शस्त्र चालवण्यात पारंगत होत्याच ,पण विद्या अभ्यासातही त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते, .. एकदा आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरात गावात एका वाघाने फार हैदोस माजवला होता . तेव्हा त्यांच्या कुलगुरूंकडून त्यांना त्याची शिकार करायचा आदेश भेटला .त्या दोघी आणि त्यांच्यामागे अजून दुसरे विद्यार्थी निघालेत त्या वाघाच्या शिकारीवर.. दिवसभर वाट बघूनही त्या वाघाचा पत्ता लागत नव्हता ,म्हणून त्यांनी रात्री तिथेच मुक्काम करायचा ठरवला. त्यांच्या सोबत असणारे बाकीचे युवक त्यांना विरोध करत होते ,पण ह्या दोघीही मानायला तयार नव्हत्या. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर दोघीजणी तिथेच थांबल्या आणि बाकीचे जण माघारी परतले पण ते फक्त जंगलाच्या बाहेर जाऊन थांबणार होते .
त्याच रात्री त्या जंगलामध्ये त्याच वाघाची शिकार करायला नदीजवळ अजून एक जण आला होता. राजकुमार राघवेंद्र... ह्या दोघीही तिथेच नदीजवळच्या झाडावर बसलेल्या होत्या..
वाघाच्या प्रतीक्षेत ...कदाचित रात्री वाघ तिथे पाणी पिण्यास येईल म्हणून ...आणि झाले तसेच रात्री वाघ पाणी पिण्यासाठी तेथे आला.. तिघांनीही आपले धनुष्य सज्ज ठेवले होते ..जसा तो वाघ पाणी पिण्यासाठी पाण्यात वाकला तसे सप..सप..सप.. करत तीन बाण त्याच्या दिशेने आले आणि त्याची छाती चिरडून आरपार निघून गेले. तिघांनाही माहिती नव्हते ,की अजून कोणी त्यांच्या व्यतिरिक्त तेथे आहे म्हणून ,बाणांचा आवाज ऐकल्यावर मात्र त्यांना समजले, ते तिघे खाली उतरले ज्या दिशेने वाघ होता त्या दिशेने चालत गेले ...तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वाघ मृत पडला आहे... तेव्हा ते त्याच्या जवळ आले. ह्या दोघींची नजर त्याच्यावर आणि त्याची नजर त्या दोघींन वर पडली पौर्णिमेच्या पुर्ण चंद्राच्या प्रकाशात त्यांचे चेहरे उजळून निघाले होते...
भारदस्त छाती,रुबाबदार चेहरा आणि...राजकुमार असल्याचे तेज...पाहताच क्षणी त्या दोघींच्या मनात भरला तो.... राजकुमारने त्या वाघाला हात लावला आणि आपल्या दिशेने त्याला ओढण्याचा प्रयत्न करु लागला... तेवढ्यात राजकुमारी वैदेही त्याच्यावर ओरडली," तुम्ही काय करत आहात हे... ही आमची शिकार आहे....आम्ही शिकार केली आहे ह्या वाघाची सोडा त्याला..."

"तुम्ही बघितले नसेल आमचा ही बाण त्याच्या छातीच्या आरपार निघाला आहे ,म्हणजे आम्हीही वाघाची शिकार केली आहे..."राघवेंद्र

"पण आमचे दोन बाण होते... तुमचा एक बाण म्हणून ह्या वाघवर आमचा अधिकार आहे. ...जानकी बोलली.

ती बोलली त्याच वेळेला राजकुमार राघवेंद्रने तिच्याकडे बघितले, तिचे डोळे प्रचंड आवडले त्याला,तो काहीच बोलला नाही एकटक तिच्याकडे बघत होता..तीने लाजून मान खाली घातली.राजकुमार काही बोलत नाही बघून वैदेहीने परीस्थितीचा फायदा उचलत वाघाची शेपटी पकडली आणि त्याला आपल्याकडे घेचण्याचा प्रयत्न करत होती.

"कुमारी तुमच्या कोमल बाजूंना एवढा त्रास नका देवू ...हा सेवक आपल्या आज्ञेत आहे..."राजकुमार राघवेंद्र जानकीच्या डोळ्यात बघत बोलला...पण त्याचे ते मधूर शब्द ऐकून वाघाकडे बघत असलेल्या वैदेही मात्र शहारली.त्याचे शब्द तिचे काळीज चिरून गेले ,तीने ती वाघाची शेपूट सोडून दिली.

"जशी तुमची इच्छा...."म्हणत जानकी मात्र पुढे चालू लागली .आणि तो पाठीमागे वाघाला खेचत...आणि त्याच्या पाठी वैदेही...

ऋतू बदलत जाती...
कधी ऋतू वसंत प्रेमाची...
बहार घेवून येती....
ऋतू बदलत जाती...

क्रमक्षः

***
भेटूया पुढच्या भागात....