ऋतू बदलत जाती... - भाग..6 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..6

ऋतू बदलत जाती...६

"जशी तुमची इच्छा...."म्हणत जानकी मात्र पुढे चालू लागली .आणि तो पाठीमागे वाघाला खेचत...आणि त्याच्या पाठी वैदेही...

*****

आता पुढे....

जंगलातून वाट काढत ते पुढे जात होते अजूनही पहाट व्हायला बराच वेळ होता.

"हे वीर... आम्हाला तुमच्याबद्दल बरेच कुतुहल जाणवत आहे... तुम्ही सांगू शकाल का तुमच्याबद्दल ..?.. वैदेही बोलली ती त्याच्या मागून चालत त्याच्या देहबोलीचे निरीक्षण करत होती.

"आम्ही राघवेंद्र.. सोनगडचे जेष्ठ राजपुत्र
तो पुढे बघतच बोलला.." जणू जानकिला त्याला त्याची ओळख सांगायची आहे.

"ओह तुम्ही ....!... शुरवीर राघवेंद्र ज्यांच्याबद्दल कुलगुरू आम्हाला नेहमी सांगतात..सोनगडचे भावी सम्राट...."वैदेही आश्चर्याने खूष होत बोलली.

"मला ज्ञात नाही ..कुलगुरूंनी तुम्हाला आमच्याविषयी काय सांगितले.. पण आम्हाला स्वतःची स्तुती ...स्वतःच्या मुखाने केलेली आवडत नाही ....." हे वाक्य तो जानकीच्या बाजुने चालत तीच्या पावलांशी पाऊल जुळवत तिच्याकडे बघत बोलला.

"आणि तुम्ही ...आम्हाला तुमचा परिचय नाही देणार सुंदरी..." तो जानकी कडे बघत बोलला.

"आम्ही सोमगड च्या कनिष्ठ राजकन्या... वैदेही आणि ह्या प्रधान कन्या जानकी... प्रधान कन्या एकताच राघवेंद्र चे पाय क्षणभर थांबले.. एका जागी स्थिर झाले... तेव्हाच जानकीने वळून त्याच्याकडे बघितले आणि एक गुढ स्मित दिले. तिला समजले होते ती प्रधान कन्या आहे म्हणून राजकुमार चे पाय का अडखळले ते..

वैदेही आता त्याच्या दुसऱ्या बाजूने चालायला लागली .ती त्याला युद्धामध्ये त्याने गाजवलेल्या पराक्रमा विषयी विचारत होती. आणि तो बोलत होता .जानकी मात्र पुढे बघून सरळ चालत होती.

पहाट होण्यात आलेली, ते जंगलाच्या बाहेर पडले.
बाहेर कुलगुरूंचे शिष्य घोडे घेवून त्यांची वाट बघत होते.

"युवराज तुमची काही हरकत नसेल तर ...जवळच आमचा आश्रम आहे.. तुम्ही तिकडे येऊन थोडा विश्राम आणि फलहार करू शकता. ..."राजकुमारी वैदेहीने राजकुमार राघवेंद्र ला आश्रमावर येण्याचे निमंत्रण दिले तोही थकला होता म्हणून त्यांच्यासोबत आश्रमामध्ये जाणे त्याने योग्य समजले.

सर्वजन घोड्यावर स्वार झाले .प्रधान कन्या जानकी सर्वात अग्रस्थानी होती. मागे राजकुमार राघवेंद्र आणि वैदेही आणि त्यांच्या मागे इतर विद्यार्थी वाघाला एका चाक असलेल्या वाहनावर घेऊन येत होते. त्या वाघाला घेऊन जाणाऱ्या त्या युवकांना बघून आजूबाजूच्या गावातले लोकं त्यांच्या नावाने जयघोष करत होते.

अखेर काही वेळानंतर ते आश्रमामध्ये पोहोचले. आश्रमामध्ये त्यांचे छान स्वागत झाले. त्यांच्या अंगावर फुले आणि सुगंधी द्रव उघडवण्यात आले.

समोर कुलगुरूंना बघून राजकुमार राघवेंद्राने घोड्यावरून खाली उतरून त्यांना वाकून वंदन केले ,जानकी आणि वैदेहीने सुद्धा त्यांना वंदन करुन ,त्यांचा आशीर्वाद घेतला.

कुलगुरूंनी राघवेंद्र यांना आपल्या कुटीत येण्यास सांगितले. बराच वेळ दोघेजण राजकारणावर चर्चा करत होते ,अखेर फलहारासाठी दोघांना बाहेर बोलविण्यात आले.
कुलगुरूंनी सर्व विद्यार्थ्यांना राघवेंद्र चा परिचय करून दिला. राघवेंद्र त्यांचाच शिष्य होता जो सर्व विद्यांत पारंगत, कुशल होता.

कुलगुरूंचा तोंडून परत राजकुमार राघवेंद्राचे कौतुक ऐकून वैदेही भारावून गेली होती, पण जानकीला तसूभरही फरक पडला नव्हता.ती अलिप्तच राहत होती, तिचे असे अलिप्त राहणे मात्र राघवेंद्र ला कुठेतरी खटकत होते.
जवळपास दोन दिवस राघवेंद्र चा आश्रमावर मुक्काम होता. आणि ह्या दोन दिवसात राजपुत्र राघवेंद्र सारखे सारखे जानकिशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण जानकी त्यांना सतत टाळत होती, ती जिथे जाईल राघवेंद्र तिथे जात होते. पण जानकी तिथून लगेच काढता पाय घ्यायची. ती त्यांच्याशी एक चकार शब्दही बोलत नव्हती, ना त्यांच्याशी नजर मिळवत होती. आणि राघवेद्रला तिच्याशी सर्वांसमक्ष नीट स्पष्ट बोलताही येत नव्हते.पण ह्या दोन दिवसांत राजकूमारी वैदेही त्यांना प्रत्येक ठिकाणी सोबत करत होती.

अखेर जाण्याची घटका समीप आली, राघवेंद्र आश्रमातून निघणार ...पण त्याचे पाऊल जाणास धजावत नव्हते. प्रधान कन्या त्यांना निरोप द्यायला आली नव्हती.. त्याने सर्व दूर नजर फिरवली पण ती त्याला कुठेच दिसली नाही .अखेर तो घोड्यावरून खाली उतरला.

"राजकुमारी वैदेही... प्रधान कन्या जानकी.. आम्हाला निरोप देण्यास नाही आल्या...."राघवेंद्र.

"माफ करा ..युवराज...जानकी मागील बाजूस वनात गेली आहे.....त्यामुळे ती नाही येवू शकली..."वैदेही.

"ठीक आहे..मग आम्ही आलोच त्यांची भेट घेऊन..."राघवेंद्र.

राजकुमारी वैदेहीला थोडे विचित्र वाटले एक भावी सम्राट एका छोट्याश्या राज्याच्या प्रधान कन्येची भेट घ्यायला, स्वतः चालून तिच्या कडे जात आहेत... थोडे समजण्यास अवघड होते.आजूबाजूचे सर्व विद्यार्थी विस्मयचकित झाले.पण त्याचापुढे कोण बोलणार..?

राजकुमार राघवेंद्र आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या वनात गेले.तेथे जानकी एका झाडाखाली पाठमोरी बसून अश्रू गाळत होती.

"कुमारी जांनकी... तुम्ही आम्हाला निरोप देण्यास नाही आल्या...."राघवेंद्र.

"युवराज...??"जानकी न वळताच दचकली.

"हो आम्हीच...!! आम्ही काहीतरी विचारले तुम्हाला....??"राघवेंद्र.

"क्षमा करा युवराज... पण एक प्रधान कन्या तुम्हाला निरोप देण्यास नाही आली ..... तर तिच्या हातून खूप मोठा प्रमाद घडला आहे का ..?ती प्रधान कन्या या शब्दांवर जोर देत न पाठमोरी थांबूनच बोलली.

'प्रमाद तर तुमच्या हातून घडला आहे ....आम्हाला दुर्लक्षित करण्याचा... आमच्यापासून नजर चोरण्याचा..."राघवेंद्र तिच्या समोर जात बोलला.
तीने त्याच्याकडे आश्चर्याने बघीतले.तेव्हाच त्याला तिच्या डोळ्यात अश्रु जानवले.

" मग हे तरी सांगा जानकी ...कि इथे बसून तुम्ही अश्रू का गाळत होतात.?."त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला.

"क्षमा करा युवराज ..पण हा एका प्रधान कन्येचा खासगी प्रश्न आहे..."जानकी.

"हे अश्रू...आमच्यासाठी नाही का?..."तो येवून तिच्या शेजारी बसला.ती तडक उठून उभी राहीली.

" क्षमा करा....आपल्या मर्यादेतच रहावे.. असे आम्हाला आमच्या पिताश्री कडून शिकवण्यात आले आहे....."जानकी.

"तरीही..तुम्ही अश्रू का गाळत होतात...कुणासाठी..गाळत होतातं..नाही सांगितले..." हट्टी नसेल तो राजपुत्र कुठला.

"प्रधान कन्या असले म्हणजे आम्हाला मन नाही का युवराज..."जानकी.

"आम्हीही तेच म्हणतोय....तुमच्या मनाचे ऐका...जानकी.."राघवेंद्रने उठून तीला खांद्याला पकडून स्वतःकडे वळवले.

तीने फक्त नाहीत मान हलवली.

"तुमचे मन रडत होते,आमच्या दूर जाण्याने त्याला दुःख होत आहे..."राघवेंद्र.

तीने परत नाहीत मान हलवली.

"असत्य...असत्य....वचन...! तुमचे सतत वाहणारे डोळे...मला सत्य सांगत आहेत...जानकी.....आम्ही तुमच्या मोहात अडकलो आहोत...आम्हाला असे पिडू नका....." त्याने तिला जवळ केले.

"भावी सम्राटांना असले वर्तन शोभत नाही..."ती बाजूला झाली.

"आम्हाला आमचे प्रेम व्यक्त करू द्या जानकी....तुमच्या फक्त एकाच दृष्टीक्षेपात आम्हाला आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध गवसले जानकी...आम्हाला दूर करू नका...."राघवेंद्र.

"युवराज...हे नाते क्षणभंगुर असेल....तुम्ही भावी सम्राट आहात...तुमची राणी ही एक राजकन्याच पाहिजे...नियम नाही मोडता येणार..."जानकी अजून दुर गेली.

"आणि...मन मोडले तर चालतील..?.."राघवेंद्र.

"त्यादिवशी..आम्ही प्रधानकन्या आहोत कळल्यावर..तुमचेही पाय क्षणभर अडखळले होते युवराज...मग आज हे सर्व कशासाठी...?"जानकी.

तो तिच्या जवळ आला त्याने तिचा हात हातात घेतला पण जानकीने लगेच हात मागे घेचून घेतला आणि दोन पावलं मागे सरली .

"या प्रधान कन्येला माफ करा युवराज..."जानकी.

"हो आम्हाला मान्य आहे ,आमचे पाय अडखळले होते त्यादिवशी ..आम्हाला हे ज्ञात आहे की सम्राटांची पत्नी ही राजकुमारीच असावी... पण आमचे हे हृदय भृंगा होवून तुमच्या भोवतीच रुंजी घालते आहे ...त्याला आम्ही काय करावे..?
प्रथमदर्शनीच तुम्ही आमच्या मनात घर केले जानकी ..आता आम्ही ते घर उद्ध्वस्त नाही करू शकत.."राघवेंद् व्याकूळ झाला.

"युवराज...!.." परत तीने हुंदका दाबत तोंडावर हात ठेवला,आणि त्याला पाठमोरी झाली..

"आम्हाला तुमच्यासाठी सर्व नियम मोडायचे आहेत जानकी.."राघवेंद्र

"युवराज असे काही करु नका ...हे शक्य नाही तुमचं पदही जाऊ शकते.."जानकी.

"आम्हाला पदाची अभिलाषा कधी नव्हतीच.... आणि तुमचे हे अश्रू सांगतात की तुमच्याही ह्रदयात आमच्यासाठी स्थान आहे... आम्हाला कडेलोट नका करू जानकी...."राघवेंद्र भाऊक झाला.

"आम्ही तुम्हाला ..आमच्या हृदयातून कधीच कडेलोट करणार नाही युवराज.. तुम्ही प्रथम पुरुष आहात ज्यांनी आमच्या हृदयात स्थान मिळवलंय...आणि हे आतापासून नाही युवराज..बालपणीपासून.... जेव्हा तुम्ही इथेच हो ईथेच शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेत होतात, तेव्हा चोरून त्या झाडाच्या आडोशाने आम्ही तुम्हाला बघत असायचो तेव्हापासून ....तेव्हापासून युवराज तुम्ही आमच्या हृदयात स्थान मिळवले आहे.... पूर्ण दश वर्ष झाली युवराज ..आम्ही वाट बघत होतो ,तुम्हाला एक नजर बघण्यासाठी.. फक्त बघण्यासाठी.. आणि त्या रात्री तुम्ही दिसलात क्षणासाठी हृदयाचा ठोका चुकला आमच्या .....तुम्ही आमच्याकडे बघत होतात तुमच्याही नजरेत आमच्यासाठी मला ओढ जाणवली... आणि आमच्यासाठी बस तेवढ पुरेसे आहे युवराज... प्रधान कन्येला कसलीच अभिलाषा नाही... तुमच्या हृदयात आम्हाला स्थान आहे... एवढेच आमच्यासाठी पुरेसे आहे युवराज...."अखेर जानकी बोलली.

पण आमचे काय ..?आमच्या इच्छांचे काय ..?तुम्ही निर्णय घेऊन मोकळे झालात... पण आम्ही आमच्या मनाला कसं समजू ..?आम्ही नाही राहु शकत तुमच्याशिवाय जानकी..."राघवेंद्र.

"हा पोरखेळ आहे युवराज ...तुम्ही भावी सम्राट आहात ...तुम्हाला असे भावूक होऊन निर्णय घेणे चालणार नाही... तुमचे शत्रू तुमच्या ह्या स्वभावाचा फायदा घेतील... तुम्हाला ही सत्ता हे ऐश्वर्य स़ाभाळायचे आहे ...तुम्हाला तुमच्या प्रजेचा विश्वास सार्थकी लावायचा आहे ...युवराज तुम्ही तुमच्या प्रजेला असे पोरके नाही करू शकत ...सत्ता इतर कोणाच्या हातात गेली तर कदाचित ते तुमच्याऐवढे चांगले राजे नाही होऊ शकणार ...मला विश्वास आहे...."जानकी.

" हा तुमचा हट्ट आहे तर... पण लक्षात ठेवा जानकी... आता आम्ही तुमचे ऐकतो आहे.... पण जेव्हा तुम्हाला आमच्या आयुष्यात आणायची संधी चालून येईल... तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्यापासून दूर नाही राहू देणार... आणि आम्ही आशा करतो तुम्ही आमची वाट बघाल.." आणि तो मोठे मोठे पाऊल टाकत तेथून निघून गेला .पण झाडाच्या आडोशाला उभे राहून त्याच्या पाठीमागे आलेल्या वैदेहीने हे सर्व ऐकले होते....

ऋतू बदलत जाती...
रात्री पडलेले स्वप्नं...
दिवस उजळता...
क्षणात विरूनही जाती...
ऋतू बदलत जाती.....

क्रमक्षः...

***
भेटूया पुढच्या भागात...

©® शुभा.