ऋतू बदलत जाती... - भाग..9 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..9







ऋतू बदलत जाती....९


क्रिश च्या तोंडून साधुनी सांगितलेली ही कथा ऐकून महेशी अदीती स्तंभित झाल्या.


महेशीने परत आपल्या खांद्यावर थोपटले ,जणू बाजूने शांभवी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली असेल या आशेने..


"शांभवी तु वैदेही असशील आणि मी जानकी असेल तर तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही.. धन्य आहेस वैदेही.. धन्य आहेस तू शांभवी.."महेशी.


"खरंतर धन्यवाद मी तुझेच मानले पाहिजे होते... कोण आपल्या प्रेमात दुसऱ्याला वाटेकरी करून घेते.. पण तू केलस.. मला माझे प्रेम मिळवून दिले जानकी... माझी महेशी.."शांभवी.


*******


आता पुढे...


महेशी ला ते ऐकू गेले नाही पण क्रिश ने तिला सांगितले ते...


"शांभवी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे... कदाचित आता ती मला सांगायला पाहिजे..." महेशी.


"तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते नंतर सांगा ,आता घर आले .....चला उतरा आजी वाट पाहत असतील.."क्रिश.


खरंच आजी सावीची प्रॅम घेऊन अंगणातच फिरत होत्या..


महेशी गाडीतून खाली उतरली ,आजीला बघताच तिला परत भरून आले, तिने पळत जाऊन आजीला मिठीच मारली .


"आजी आपली शांभवी ..बघा ना आपल्याला दिसतच नाही ती.."महेशी.


"रडू नको बाळा ...विधिलिखित आपण बदलू नाही शकत...पण तिचा विस्कटलेला संसार तुला सावरायचा आहे आता.."आजी.


तेव्हा तिचं लक्ष प्रॅम मधल्या बाळाकडे गेले.. सावी तिच्याकडे बघत होती , तिला वाटत असेल आपली आईच परत आली की काय..महेशीने तिला जवळ घेतले ,तिच्या पटापट खुप साऱ्या पाप्या घेतल्या, तीने तिला आपल्या उराशी कवटाळून घेतले.


ते दृश्य बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेले. शांभवीच्याही .....आता तिला सावीची चिंता नव्हती. आजी सर्वांना घेऊन घरात गेल्या. सर्वांना फ्रेश व्हायला सांगितलं.. महेशी आणि आदितीला एक रुम आणि क्रिश लासुद्धा तिथेच राहायला आजीने सांगितलं होतं तो आधीच त्याचं सामान घेवून आला होता.


महेशी आणि आदिती त्रंबकेश्वरवरून सरळ इकडे आल्या होत्या ,त्यामुळे त्यांच्याकडे कपडे नव्हते. आजीने त्यांना शांभवी चे काही कपडे घालायला दिले तूर्तास...अदीती संध्याकाळी बाहेर जाऊन त्यांच्यासाठी कपडे घेऊन येणार होती..


प्रवासाच्या थकव्यामुळे आदिती रूम मध्ये फ्रेश होऊन जेवण झाल्यावर झोपून राहिली .महेशी मात्र सावीकडे गेली.


सावी झोपलेली होती, ती तिथेच बसून राहिली.तीने मोबाईल सुरू केला, तिने तीचे फेसबुक अकाउंट उघडले.


तिने बरेच महीने झाले त्याचा एकही मेसेज उघडून बघितला नव्हता आता मात्र तिने ते उघडले..


सर्वात शेवटचा मेसेज ठीक शांभवीच्या ॲक्सिडेंट नंतर आठ दिवसांनी होता.


"कुठे आहेस.. तु...राधा...मला गरज आहे गं तुझी!" तो


"मी....आहे....इथेच... आहे... कसे आहात तुम्ही.?.."महेशीने एवढा मेसेज टाईप करून ते पेज बंद केले.


तिकडे शांभवी चालत-चालत तिच्या रूम मध्ये आली.


अनिकेत बेडवर अस्ताव्यस्त पडला होता . स्वतःची फार दुर्दशा करून घेतली होती त्याने.. खिडकीचे पडदे खाली ओढून पडलेले होते. कपाटातले तिचे कपडे तेही कपाटा बाहेर पडलेले होते..


"मी सोडून गेल्याचा एवढा राग अनि... की माझ्या वस्तूही तुम्ही फेकत आहात.."शांभवी.


तेवढ्यात त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. त्या आवाजाने त्याची झोप चावळली तो उठला, मोबाईल हातात घेतला आणि बघितलं तर राधा चा मेसेज होता... त्याचा चेहरा थोडा आश्चर्यचकित झाला .त्याने लगेच तो मेसेज उघडला, बऱ्याच वर्षानंतर तिने त्याला मेसेज केला होता.


"मी आहे..इथेच आहे.."..


"तु सोडून गेली ...आता... माझी शांभवीही मला सोडून गेली.. मला तुझ्या शब्दांची गरज आहे राधा..." तिकडे महेशीच्या मोबाईल वर मेसेज टोन वाजली अनिकेत ने मेसेज केला होता.. हो तिचा तो अनिकेतच होता.


"अनिकेत सावरा स्वतःला .." महेशी.


"माझी मेंटॉर मला सोडून गेली... नंतर माझं प्रेम मला सोडून गेलं कसं सावरु मी..?"अनिकेत.


"तुमची मेंटॉर परत आली आहे ..आणि आता ती परत तुम्हाला सोडून जाणार नाही..."शांभवी.


"....." अनिकेत.


"बरं सोडा.. आत्ता तुम्ही काय करत आहात ते सांगा.."महेशी.


"मी आत्ताच झोपेतून उठलो ....."अनिकेत.


"ठीक आहे आता तुम्ही फ्रेश व्हा...आणि खाली जा आजीशी थोडं बोला.. आणि सावीला जवळ घ्या तिला कुरवाळा.. एवढं कराल माझ्यासाठी.."महेशी


"नाही जावसं वाटत मला सावी जवळ ..शांभवीची सारखी आठवण येते ..मला नाही बोलावसं वाटत कोणाशीच..." अनिकेत.


"हे बघा सावीला सध्या तुमची गरज आहे.... आता सावी तुमची जबाबदारी आहे... शांभवी जिथे कुठे असेल ती हाच विचार करत असेल की माझा अनिकेत ...त्याचं दुःख बाजूला ठेवून माझ्या सावीची काळजी घेत असेल.. तिचा विश्वास तुम्हाला सार्थ करावे लागेल अनिकेत.."महेशी


"हम तू बरोबर बोलते आहेस ...शांभवी चा माझ्यावर खूप विश्वास होता. ...थँक्स राधा मी आता जातो सावी कडे...."अनिकेत.


महेशीने ईकडे निश्वास टाकला.


"अजुनही तसेच आहात.....अजूनही माझं सगळं ऐकतात....एवढं महत्त्व ह्या राधाचं....पण तुम्हाला खरं कळलं तर....,?"महेशी विचार करत होती.


***


तो उठला बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाला ,कपडे घातले आणि खाली गेला.शांभवी तिथेच बसून त्याचं निरीक्षण करत होती ,तीही त्याच्या मागे खाली गेली.


तो सावीच्या रूममध्ये गेला .पण सावी तिथे नव्हती.


"आजी आजी.. सावी कुठे आहे आजी...."आवाज देत तो आजीच्या रूममध्ये गेला, तर सावीच्या झोक्याजवळ कोणीतरी उभं होतं .


"शांभवी ...!!" त्याने आवाज दिला, तेव्हा महेशीने वळून बघितलं.


"नाही महेशी....."महेशी.


तो हळूहळू पावले टाकत तिच्याजवळ गेला.


" कधी आलीस तू...?" अनिकेत.


"आत्ताच आले.." ती खाली मान घालून बोलली.


"सॉरी ...हा ड्रेस ...मला वाटले शांभवी परत आली की काय...?" परत त्याचे डोळे भरून आले.


"सॉरी... मी कपडे नव्हते आणले... तर आजींनीच दिला होता."महेशी.


"तू तिची बेस्ट फ्रेन्ड जरी असलीस... तरी..मला नाही आवडणार तिच्या वस्तूंना कोणी हात लावलेला. ..."अनिकेत रूक्षपणे बोलला.


"हम्म.." महेशी.


"पण मी माझी अनमोल वस्तू तर तिलाच देत आहे अनि...."शांभवी.


"मी सावीला घेऊ का ..?अनिकेतने हात पुढे केले.


महेशीला ते बघून जरा बरं वाटलं, अखेर अनिकेतने तीचं ऐकलं होतं .शांभवीलाही त्याला सावीला घेतांना बघून आनंद झाला .खरच महेशीने या घरात पाऊल ठेवलं आणि हळूहळू वातावरण बदलायला लागलं, तिचा विश्वास बसत चालला की, महेशी सर्व काही सांभाळून घेईल .सर्व काही आता सुरळीत होईल.


शांभवी तेथून निघून गेली.तीला वाटत होते ,आता महेशी आणि अनिकेत चा संवाद व्हायला पाहिजे. दिसत नव्हती तरीही, तिला वाटत होते की त्यांना एकांत द्यायला हवा.


अनिकेत सावीला घेऊन तिथेच बेडवर बसला. सावी त्याच्याकडे बघून हसत होती. त्याच्याही चेहऱ्यावर तिला बघून स्मित आले .त्याने लगेच तिला स्वत:च्या छातीशी कवटाळुन घेतले. खूप समाधान वाटत होते त्याला." थँक्स राधा.."


अनिकेतला तस व्याकूळ बघून महेशीचेही डोळे भरून आले. शांभवी दरवाजाच्या बाहेर उभी रडत होती .कितीही केलं तरी तो तिचा परिवार होता, आणि आज ती त्यांच्यापासून दूर आहे . खूप कठीण जाणार होतं तिला..


"नाही.. नाही सहन होणार मला..


लवकरात लवकर अनिला सर्व सांगाव लागेल... क्रिश... क्रिश ..."ती आवाज देत ,क्रिशला शोधायला गेली.


महेशी सुद्धा त्या दोघा बापलेकीला थोडा वेळ एकटे सोडून बाहेर आली.


"क्रिश.. क्रिश.." महेशीने ही आवाज दिला.


"हा तुम्ही दोघी मला का आवाज देत आहात.."क्रिश तयार होवून बाहेर आला.


"क्रिश मला लवकर मार्केटला जायचं आहे माझ्यासाठी कपडे घ्यायला.." महेशी.


"ते सोड क्रिश.. आपण अनिकेतला आधी सर्व सांगून टाकू ...म्हणजे तो महेशीशी लवकरात लवकर लग्न करेल...आणि मी मोकळी होईल.."शांभवी.


"हे बघा शांभवी.. महेशी...मी आणि आदिती आता मार्केटला जातो आहोत आम्ही दोघे आल्यावर आपण बोलू.." क्रिश.


"काश क्रिश.. शांभवीचे बोलणे तुझे ऐवजी मलाच ऐकू गेले असते ...तर किती बरं झालं असतं ...खूप गप्पा मारल्या असत्या मी तिच्याशी.."महेशी.


"काळजी करू नको... मी मार्केटमधून आला की मी फ्रि च आहे..मग मारा तुम्ही दोघी जणी गप्पा ठीक आहे .."क्रिश


महेशी आणि शांभवी दोघींनी मान डोलावली.


तेव्हाच महेशीचा मोबाईल परत वाजला.


"थँक्स राधा... खरंच सावीला जवळ घेऊन मला खूप बरं वाटत आहे.."अनिकेत.


तिने फक्त एक स्मायली पाठवली.


आजी सुद्धा संध्याकाळची देव पूजा करून त्यांच्या खोलीत गेल्या. बघितले तर अनिकेत सावीला घेऊन बसला होता, तिच्याशी खेळत होता. आजीला बघून खूप आनंद झाला.


"आजी ये ना आत मध्ये....."अनिकेत.


" नाही नको.. तुम्ही खेळा.. मी तुझी रुम गड्याला साफ करायला सांगते...."आजी.


"नाही नको सांगू... मी स्वतः करेल ति साफ तू काळजी नको करूस."अनिकेत.


कसं करू देईल तो इतरांना त्याची रूम साफ, शांभवीच्या वस्तूंना कुणी हात लावलेला त्याला आता आवडत नव्हता..


"महेशी किचन मध्ये गेली तिने सावीसाठी मुगडाळ चे सूप बनवले . आणि अनिकेत साठी कॉफी .


ती ते सुप ,काँफी आणि बिस्कीट घेऊन आली.


" सर..ही कॉफी तुमच्यासाठी.."महेशी.


"थँक्स.. पण मी आता सावी सोबत खेळत आहे.."अनिकेतने वर बघितलेही नाही.


"तुमची हरकत नसेल तर ...मी सावीसाठी सूप आणले आहे, तिलाही भूक लागली असेल... "महेशी.


त्याने तो सुपचा ट्रे तिच्या हातून घेतला,आणि स्वतः भरवू पहात होता पण त्याला ते जमत नव्हते.


मी भरवले तर चालेल का?.."महेशी.


"हम चालेल .. "त्याने तिच्या हातातले कॉफी आणि बिस्किटांचा ट्रे घेतला,आणि तिथंच टेबल वर बसला.


महेशीने सावीला सुद्धा एका वेगळ्या खुर्चीवर बसवले, आणि बिब लावला. हळूहळू चमच्याने कोमट कोमट सूप ती सावीला पाजत होती. अनिकेत कॉफी घेत तिला न्याहाळत होता..


आजची कॉफी त्याला अगदी शांभवी बनवते तशीच वाटली.कॉफी झाल्यावर तो स्वतःच तो ट्रे ठेवायला किचनमध्ये गेला .


तोपर्यंत सावीचेही आटोपले होते,महेशीने तिला फ्रेश केलं आणि झोपवून दिलं.


"हे काय ..! तुम्ही तर तीला झोपवून राहीलात.... मला तिच्यासोबत अजून खेळायचं आहे...."अनिकेत रागवला.


"सॉरी सर.. पण सावी अजून सहा महिन्यांची आहे.. ती जास्त वेळ झोपलेलीच चांगली...आणि तिला असही झोप येत होती....."महेशी.


"ह..अच्छा मग ती उठली की मला सांगा.."अनिकेत.


"चालेल ..मी सांगेल तुम्हाला.. तुमचे काही काम असतील तेही आवरून होतील तेवढ्या वेळात.."महेशीने त्याला त्याच्या कामांची आठवण व्हावी एवढ्यासाठीच असं बोलली..


"हम.. "तो तिथून निघून गेला.


ऋतू बदलत जाती....


परंतु नाती ह्रदयाची...


फिरून परत जन्मती..


ऋतू बदलत जाती....




*******


"हॅलो आय ऍम क्रिश...."क्रिश बोलला .

"मी आधीच ओळखते तुम्हाला.. आदीती वैतागून बोलली.

"अहो मग पंधरा-वीस मिनिट झाले आपण सोबत गाडीत बसून ...एक ही शब्द बोलल्या नाही आहात तुम्ही..."क्रिश.

"मला फक्त तुमचं नाव माहिती आहे.. किती ओळखते मी तुम्हाला..? कशाला उगाच बडबड करायची ..?" अदीती रुक्षपणे बोलली.

"म्हणूनच तर मी ओळख करून देत होतो ना..
तर मी क्रिश.... क्रिश सोनवणे मुंबईमध्ये ते सोनवणे बिल्डर्स आहेत ना ...त्यांचा मी मुलगा"क्रिश

" अच्छा मग.."अदीती.

"तुम्हाला काहीच वाटलं नाही.."क्रिश

"त्यात काय वाटायचं.."अदीती खांदे उडवत बोलली.

"बरं सोडा तुमच्याबद्दल सांग आता काही.." क्रिश

"हे असं कंपल्सरी आहे का...? की सोबत चाललो आहोत गाडीत बसून तर बोललं गेलंच पाहिजे हा..??" अदीती.

"तुमची कंपनी फारच बोरिंग आहे ...त्यापेक्षा मी महेशीला तरी सोबत आणायला पाहिजे होतं.."क्रिश.

"ओ मिस्टर ..बोरिंग ..बोरिंग ..काय..! असं कुण्या अनोळखी व्यक्ती सोबत गप्पा करायच्या का ..हा.?"अदीती.

"अनोळखी कुठे आहोत आपण ...कालपासून तर सोबत आहोत.. "क्रिश.

"ओके...! मी आदिती.. आदिती पोद्दार ....पोद्दार ज्वेलर्स माहिती आहेत ना त्यांची मी नात.. ..! पण आता फक्त डॉक्टर अदीती.!!.झालं समाधान..."अदीती वैतागून बोलली.

"अहो पोद्दार ज्वेलर्स ..मग तूम्ही इथं काय करत आहात..महेशी सोबत त्या छोट्याशा खेड्यात काय करत होतास.."क्रिश.

"ओ गॉड.. हे बघा मी एक डॉक्टर आहे आणि मला मोठ्या मोठ्या शहरांपेक्षा ..छोट्या गावांमध्ये प्रॅक्टिस करायला आवडते. ...मला वाटते माझी गरज इथं जास्त आहे...कारण खेड्यात कोणी जात नाही.... शहरांमध्ये बरेच दवाखाने आणि डॉक्टर उपलब्ध आहेत....पण खेड्यांमध्ये चांगले डॉक्टर्स लवकर भेटत नाहीत..."अदीती.

"ओह अच्छा म्हणजे तुम्ही चांगल्या डॉक्टर आहात तर.."क्रिश मिश्कील हसला.

"मिस्टर क्रिश..!!" अदीती ओरडली.

"ओ हो रागवू नका ..मी तर जस्ट..असचं..!बर सोडा...हे सांगा ..तुमची आणि महेशी ची ओळख कशी झाली ?.."क्रिश.

"एका कॅम्प च्या निमित्ताने आम्ही दोघीजणी भेटलो... त्यानंतर विचार जुडले ...मग सोबत रूम शेअर करून राहायला लागलो ...बस झाल्या चांगला मैत्रिणी.."अदीती.

"ओ अच्छा.."क्रिश.

"आणि तुम्ही ...? इकडे कसे काय ?म्हणजे तुमचा एवढा मोठा व्याप सोडून, इथे आमच्या सोबत फिरून राहिले आहात! ....शांभवी सोबत फिरून राहिले आहात .....!"अदीती.

"सुसाईड अटेंम्ट करायला आलो होतो..."क्रिश समोर बघत बोलला.

"हाहाहा..." अदितीला हसू आले.
"फारच घाण जोक होता.."अदीती.

"अहो हसताय काय ....! खरं बोलतोय मी , मला कंटाळा आला होता ...।त्या सर्व लाईफचा..... इथे येऊन चार दिवस निवांत घालवू... आणि मग रामराम ठोकू या जगाला ....,हाच विचार केला होता.. मग शांभवी भेटली ... त्याच्या पुढचं तुम्हाला माहितीच आहे.."क्रिश.

" काय सोनवणे बिल्डर्स लॉस मध्ये गेले की काय... हा हा हा "अजूनही अदीतीला खरं वाटत नव्हतं.

"सो फनी ..! "त्याला तिचा राग आला .

"सॉरी सॉरी ... तुम्ही खरच सुसाईड करायला आले होता .....पण कुठल्या अंगाने तुम्ही फ्रस्ट्रेटेड दिसत नाही.."अदीती.

"हम्म..कदाचीत नाही आहे आता मी फ्रस्टेट.."क्रिश.

"हो.. हा म्हाणजे तुम्ही सुसाईटचा विचार टाळला तर..."अदीती.

"नाही तूर्तास लांबला आहे ....!आश्चर्य आहे..तुम्ही एवढ्या नॉर्मली माझ्याशी कसं बोलत आहात .....?? जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे की तुमच्या जवळ बसलेला मुलगा सुसाईडअल आहे.... तरीही..?"क्रिश.

"कारण मला खात्री आहे .....तुम्ही यातून नक्की बाहेर पडाणार.. मी ही दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होते ..पण आता नाही... मला जे आवडते ते मी करतेय ..घरच्यांचा.. स्टेटसचा ..विचार करत बसून राहिले असते.. तर आता मी स्वर्गात बसून गुलाब जामुन खात असते ..."अदीती मस्करीत बोलली.

"पहा तुम्हाला गुलाबजाम आवडतात तर ..."क्रिश.

"हो खूपच..."अदीती.

"हाहाहा...!"क्रिश.

"माझं तुम्हालाही तेच सांगण आहे ....आयुष्य खूप सुंदर आहे .. देव प्रत्येकाला एवढं सुंदर आयुष्य नाही देत... ते उगाच कुणासाठी वाया घालवू नका .... तुम्हाला जे आवडतं ते करा ...पण कुणालाही त्रास न देता...."अदीती.

"अहो असं कसं शक्य आहे ..??..म्हणजे हे बघा तुम्ही तुमच्या घरच्यांच्या विरोधात तिकडे खेड्यातून प्रॅक्टीस करत आहात ...तर त्यांना त्रास होतच असेल ना.."क्रिश.

"अहो मी या त्रासाबद्दल नाही बोलत आहे... बर असो तुम्ही विचारता म्हणून सांगते... दोन वर्ष मी त्यांना चांगलं वाटावं म्हणून ...तिथे थांबले खूप प्रयत्न केला मी ...तिथं सामावून घेण्याचा स्वतःला ... पण नाही जमलं मला ...डिप्रेशन मध्ये गेले मी... सुसाईडल झाले होते... माझ्या घरच्यांना नाही दिसला माझा त्रास ...तरीही ते जबरदस्ती मला तिथेच थांबवून ठेवत होते... मग मी का करावा त्यांचा विचार...जर ते माझा विचार करत नसतील तर.."अदीती.

"अहो पण तुम्ही एवढ्या श्रीमंतीत वाढलेल्या... इथं खेड्यात तुमची गैरसोय होईल ..त्यांना काळजी असेल तुमची कदाचित..."क्रिश.

"पण मला एकदा ट्राय तर करू द्यायला पाहिजे की नाही ....त्यांनी मला ही संधी द्यायला पाहिजे ना... माझ्या मतानुसार जगायची.... पक्षी सुद्धा त्यांच्या पिल्लांना पंख फुटले कि मोकळे सोडतात त्यांना उडू देतात...मग आपल्याला का नाही..!"अदीती.

बोलणे अर्धवटच होते कि मार्केट आले.

"चला आले मार्केट..महेशी ला फोन करून काय हव नको ते विचारून घ्या ..बाकी रात्री बोलू..."क्रिश.

"तुम्ही सोबत नाही येणार का..?"अदीती.

" तुम्हाला आवडत असेल.. तर नक्की येईल.. पण लेडीज शॉपिंग आहे चालेल ना तुम्हाला.."क्रिश मिश्कील हसत बोलला.

" हम चालेल काही ठिकाणी... चला.."अदीती.

दोघेही त्या मार्केटमध्ये गेले.

**********

आदिती आणि क्रिश मार्केट मधून आले ,तोपर्यंत जेवणाची वेळ झालेली होती .आजी आणि महेशी टेबलवर जेवणासाठी बसल्या होत्या. शांभवी सावी जवळ सोफ्यावर बसली होती.
अनिकेत अजूनही आला नव्हता ,महेशीने मोबाईल घेतला आणि त्याला एक मेसेज टाईप केला.

"हा काय करत आहात अनिकेत...? झाले का जेवण ..?? सावी सोबत खेळले का आज.?"महेशी.

"थोडे काम करत होतो.... महिनाभर काहीच बघितले नव्हते... बरेच प्रॉब्लेम झाले आहेत.. फॅक्टरीत.."अनिकेत.

"अच्छा... पण एक काम करा ते सर्व सोडा... जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवायला जा.." महेशी.

"नाही मला भूक नाही.. मला नाही जेवायचे.."अनिकेत त्याच्या मेंटाँरशी खोटं बोलत नव्हता.

"हे बघा ...तुम्हाला भूक नसली ..आजी साठी तरी जा...आजी तुमच्या कडे बघूनच तर जिवंत आहेत ... कदाचित त्यांनाही दोन घास जास्त जातील..जाच तुम्ही... ! आणि तुम्ही नाही ऐकलं तर मी परत बोलणं बंद करेल हं...! "महेशी.

"तु परत आलीस राधा.. माझ्या या अंधाऱ्या आयुष्यात आशेचा किरण आला अस वाटतयं मला.. शांभवी शिवाय एकटी पडलो होतो गं मी..!.पण तु आली ना आता..!तु नाही जाणार नाही परत....! मी तुझं म्हणणं नेहमीच ऐकलय.. आताही ऐकेल..पण परत जावू नको.....प्लीज..."अनिकेत.

एवढं बोलून तो खाली आला, त्याला जिन्यावरून खाली उतरताना बघून महेशी आणि शांभवी दोघींनाही आनंद झाला.
तो येऊन आजीच्या शेजारी बसला. महेशी दोघांना वाढतच होती की आदिती आणि क्रिशही येऊन बसले..
अनिकेत प्रश्नचिन्ह घेऊन आजीकडे बघत होता, जणू समोर बसलेले कोण आहेत ते..?

"हा अनिकेत ...हा क्रिश आणि.. हि अदिती ..मी ओळखते यांना ..माझ्या मैत्रिणीचा नातू आहे हा क्रिश.."आजी.

"आणि अदिती माझ्यासोबत आली आहे... काही दिवस...." महेशी त्याला वाढता वाढता बोलली.

" अच्छा ...." त्याने निमुटपणे आपले ताट जवळ केले. मधूनमधून तो सावी कडे बघत होता सावी पाळण्यात बसून खेळत होती.

"महेशी तुम्ही बसून घ्या जेवायला ...मावशी वाढतील आपल्याला.. तुम्हीही गेस्टच आहात या घरच्या.."अनिकेत.

"सावी रडली तर ..तिला घ्यायला कुणी नको का? म्हणून मी थांबले होते.."महेशी.

"अच्छा ..! तसं तुम्ही किती दिवस थांबणार आहात इथं.."अनिकेत रागाने बोलला.

"अनिकेत ..! असं कुणी विचारतं का ?..आणि ती नेहमी साठी इथे राहायला आली आहे ..." आजी त्याला रागवल्या.

"का इथं का थांबणार आहे त्या नेहमीसाठी....सुवर्णा कुठे गेली...." अनिकेतने भुवया आकसल्या त्याला वाटत होतं महेशी सावीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आहे आणि ते त्याला खपत नव्हतं..

"हे बघा... उगाच माझ्या सावी साठी तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाही.."अनिकेत.

"अरे असं काय बोलतो तिला.. तिच्या मैत्रिणीची मुलगी आहे ती .....तिला ही काहीतरी वाटणारच ना.. नाही म्हटले तरी ती मावशी आहे तिची..."आजी.

"मग त्यांना सांग ...फक्त मावशी बणूनच रहायला .." तो पटकन उठून वर निघून गेला..त्याला वाटत होते महेशी शांभवीची जागा घेण्याचा प्रयत्न करतेय....

महेशी ला वाईट वाटले, तिला ताटातलं जेवण खावसं वाटत नव्हतं.पण समोर सर्व जण बसले असल्यामुळे ती कसेबसे घास तोंडात टाकत होती..
"बाळ महेशी तू त्याच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस.तो तेवढा वाईट नाही आहे ..पण सध्या त्याची मनस्थिती तेवढी चांगली नाही.."आजी.

"महेशी प्लीज ...खरंच तू त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस.. हा सुरुवातीला तुला आणि त्यालाही त्रासच होईल कदाचित.. " क्रिशने शांभवी चे बोलणे सांगितले.

"हम .." तिने ताटे उचलली,आणि ती किचनमध्ये निघून गेली.

सर्वांना समजत होते हे हे सर्व सर्वांनाच खूप जड जाणार आहे ते..
हॉल मध्ये सर्वजण बसले होते.. सावीला महेशीने रात्रीचे थोडे खाऊ घातले आणि फ्रेश करून झोपून दिले.सावी आजीच्या रूम मध्ये पाळण्यात झोपली होती.पण अनिकेतने तिचा पाळणा त्याच्या रूम मध्ये हलवला .शांभवी च्या मागे त्याला सावीची काळजी घ्यायची होती.

आजींनीही त्याला नाही अडवले.

अनिकेतला असं सावीला त्याच्या रूम मध्ये घेऊन जाताना बघून महेशी हिरमुसली.

" ..महेशी ...शांभवी ..तुम्हा दोघींना गप्पा मारायच्या होत्या ना .. चला तर मग माझ्या रूम मध्ये बसू...आदीती तुम्ही ही चला... क्रिश नाराज महेशीचा मुड बदलवायला बोलला.

"बोला मॅडम तुम्हाला काय आणि किती गप्पा मारायच्या ...मारून घ्या....मी इथेच आहे .."तो. बेडवर पालखन मांडून बसला.

कुठून सुरुवात करावी दोघींनाही समजत नव्हतं बोलायचं तर बरंच होतं पण..

"हा महेशी ...तुम्ही घर आलं तेव्हा काहीतरी सांगणार होत्या ...तर काय सांगणार होत्या ??" क्रिश ने मध्यस्ती केली.

"ऍक्च्युली शांभवी.. ते मी अनिकेतला..."महेशी अडखळत होती.

सर्वांचे कान टवकारले, काहीतरी वेगळच ऐकायला भेटणार असं वाटत होतं.

" हा बोला.. बोला .."क्रिश एकदम उत्सुकतेने म्हटला.
""शांभवी तुला आठवते का ..नववीला असताना आपण एका नेट कॅफे मध्ये गेलो होतो.... दोघींनी एक एक फेसबुक अकाउंट ओपन केलं होतं ..गंमत गंमत म्हणून.. वेगळ्या नावाने....काही दिवसानंतर तुने तुझे अकाउंट बंद केले ...पण मी तसेच राहू दिले..आणि नंतर मी एका नेटकॅफेत रिसेप्शनिस्ट म्हणून पार्ट टाईम जॉब करत होती..तुला तर माहितीच आहे...तेव्हा मी ते चेक करायची... माझ्या त्याच अकाउंट ला अनिकेत ची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती ...आणि मीही नवशिक्या सारखी ती एक्सेप्ट केली... तेव्हा तोही नवशिक्याच होता.. .जस्ट टाईमपास म्हणून तो फेसबुक वरती फ्रेंड्स बनवत होता.

त्याची दहावी झालेली होती ,घरून सगळे त्याला सायन्सला जायचं म्हणत होते, पण त्याला डॉक्टर ,इंजिनियर होण्यात काहीच रस नव्हता. तसंच.. त्याला काय करायचे हेही तो घरच्यांना सांगू शकत नव्हता ...मग त्याने मला विचारले काय करावे.....मी त्याला त्याच्या फॅमिली बॅकग्राउंड विषयी विचारले.. त्यात त्याने सांगितले की त्याच्या वडिलांचा फुडस् प्रोसेसिंगचा बिझनेस आहे आणि शेतीही बरीच आहे... तो एकटा.. असल्याने पुढे त्यालाच तो सांभाळायचं..
आहे ते

"... कदाचित मला सांभाळावे लागेल पण आता मी काय करू मला समजत नाही आहे....? अनिकेत.

" मी सांगितले तर ऐकाल ..?"राधा म्हणजे महेशी.

"हो तू सांगून बघ.... पटलं तर नक्की ऐकेल तूझ.."अनिकेत.

" ॲग्री कर ...आणि त्यानंतर मॅनेजमेंट मध्ये जा..
तुमच्या घरच्या बिझनेससाठी कदाचित तुम्हाला हे कामात येईल.."राधा.

कदाचित त्याला माझं बोलणं पटलं की काय ...त्याने खरंच ऍग्री केलं आणि नंतर एमबीए केलं ... ह्या मधल्या काळात आम्ही एकमेकांशी चॅटवरून बोलत होतो.... तो त्याच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मला सोल्युशन विचारायचा ...मी माझ्या परीने त्याला मार्ग सांगायची.....
ह्या सर्वांमध्ये मला कळलं होतं की... तो आपण ज्या आश्रमात राहतो... त्या आश्रमाचा ओनर आहे ...पण मी त्याला हे कळू दिलं नाही की मीही त्या आश्रमात राहते ....मी महेशी आहे हे..
असचं एका दिवशी त्याने तुला आश्रमात पाहिले शांभवी.... आणि त्याला तू आवडली ...तुझा स्वभाव आवडला ...त्या दिवशीही त्याने मला विचारले होते 'तु त्याला आवडते हे तुला सांगू का म्हणून..'...... तुला तर आधीच आवडत होता तो.... मला तुम्हा दोघांच माहिती होतं.. त्यामुळे मी त्याला पुढे जायला सांगितलं... तुला प्रपोज करायला सांगितलं.... मात्र त्या आधी घरून आजीची परमिशन काढने किती गरजेचा आहे हेही सांगितलं..."महेशी.

शांभवी चे डोळे भरून आले ,तिला काय बोलाव ते सुचत नव्हतं .आज परत तिला तिचा अनि महेशी मुळेच भेटला होता .जसा वैदेहीला जानकी मुळे भेटला..

"त्यांची ती मेंटाँर तू होतीस तर...." क्रिश शांभवी बोलली तसाच बोलला.

"हम्म..."महेशीने मान डोलावली.

"एवढ्या दिवसांमध्ये तुला नाही आवडला का तो..??" शांभवी.
त्या वाक्य सरशी महेशीची नजर खाली झुकली.

"अच्छा.. म्हणून तू माझ्या लग्नाच्या आधीच निघून गेली होती का?.." शांभवीचे शब्द क्रिश बोलत होता पण आता जणू त्या दोघींच बोलत आहेत असे वाटत होते.

ऋतू बदलत जाती....
कोरड्या धरेवर कधीकाळी...
बरसल्या होत्या सरी....
हे सांगून जाती.....
ऋतू बदलत जाती.....

क्रमक्षः...

********

भेटूया पुढच्या भागात....

©️®️शुभा.