ऋतू बदलत जाती... - भाग..13 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..13

"ठीक आहे ..मी बोलतो विशालशी..."क्रिश.

" त्या पेक्षा एक करशील का..?? उद्या तू मला हॉस्पिटलमध्ये सोड.. मी तिथं सर्वांना आँब्जर्व करते ..काही ना काही तर ते एकमेकांशी बोलतीलच..."शांभवी.

"हम हे ठीक राहील..."क्रिश.

*****

आता पुढे....

सर आज सावीला मी तिच्या रूम मध्ये झोपवू का..?? मी ही तिच्याजवळच थांबेल रात्रभर.."
अनिकेत हॉलमध्ये रात्री न्यूज पेपर चाळत होता, तर महेशी त्याला विचारायला आली.

"तुम्हाला असं वाटतं का आजही मी ड्रिंक वगैरे करेल ते..." अनिकेतने पेपर घडी करून टीपॉयवर ठेवला.

"नाही तुम्ही करूच नाही शकणार ..!! तुमच्या बेडरूममध्ये बॉटलच नाहीत..." महेशी थोडी ठसक्यात म्हणाली.

"कोणी हटवल्या त्या बॉटल्स...??"अनिकेतच्या भुवया गोळा झाल्या.

"मी.."महेशी.

" ... महेशी तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या रूम मध्ये काय करत होतास..?? कुठं टाकल्या तुम्ही त्या बॉटल्स..." तो सोफ्यावरून उठला.

" तुम्हाला डस्टबिन मध्ये रिकाम्या बॉटल दिसतील फक्त.." महेशी आज थोडा धीर एकवटून त्याच्याशी बोलत होती.

" तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या वस्तू सोबत हेड सांड करायचा ..??हा हे बघा तुम्ही.. सावीची काळजी घेत आहात म्हणून मी तुमच्याशी थोडं नीट बोललो तर ....तुम्ही तर डोक्यावर बसल्यात... मला माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये कुणाचा इंटर फेयर नकोय..."अनिकेत खुप चिडला होता.

" मी तुमच्या पर्सनल गोष्टीत ईन्टरफेअर करतच नाही.... हे मी फक्त सावीसाठी करत आहे ...हे असं ड्रिंक करून ..नशेत धूत राहून तुम्ही तिचं पुढचं भविष्य रेखाटणार आहात का..??"महेशी.

" हे बघा ..ती माझी मुलगी आहे मी बघून घेईल...आणि हो मला कळतय महेशी तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करत आहात... माझ्या शांभवीची जागा घेण्याचा प्रयत्न करू नका...." त्याने तिला दंडाला जोरात पकडून परत मागे ढकलले.

"अनिकेत काय करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही तिच्यासोबत..."आजी मागून ओरडल्या.

आतापर्यंत या दोघांच्या आवाजाने घरातले बाकीचे हॉलमध्ये गोळा झाले होते.

"आजी त्या काय करत आहेत तुम्ही बघत नाही आहात का..??"अनिकेत.

"हा सांगा ना काय करतेय ती.... तुमच्या रूम मधल्या दारूच्या बॉटल्स फेकल्या ...ती तुमच्यासाठी आवडीचं जेवायला बनवते.. सावीला सांभाळतेय.. काय चुकीचं करतेय ती..?आजी.

"तुम्हाला त्यांचा ह्या मागचा हेतू नाही कळत का आजी..??...तिला शांभवीची जागा घ्यायची ह्या घरात...??"अनिकेत.

"माझी तर तिच इच्छा आहे..."आजी.

त्याने आजीकडे रागाने पाहीले आणि तो वर निघून गेला.

महेशीही कुणाशीच न बोलता सावीच्या रूममध्ये निघून गेली .मागून आजी क्रिश तिला आवाज देत होते पण तिच्या कानांवर त्यांचा आवाज पडत नव्हता.

ती रूममध्ये आली,तिच्या डोक्यात काही वर्षापूर्वी त्याच्याशी झालेलं फेसबुकवरच बोलणं फिरत होतं.
***

"...सगळ्याच गोष्टींच कसं सोलूशन असत गं तुझ्याकडे...??"अनिकेत.

"हाहा.."राधा.

"जर तु माझ्या आयुष्यात आली तर किती छान होईल ना..? माझे सगळे प्रॉब्लेम तुला घाबरून पळून जातील..."अनिकेत.

"आताही मी आहेच ना तुमच्या आयुष्यात..."राधा.

"तसं नाही गं.. जर तुझं माझं लग्न झालं तर...?"अनिकेत.

त्याच्या ह्या वाक्यावर महेशीला धडधडायला लागंल .तो जरी तिला ओळखत नव्हता तरी ती त्याला ओळखत होती..जेव्हा आश्रमात तो यायचा ती चोरून चोरून त्याच्याकडे बघायची.

"राधा..बोल करशील माझ्याशी लग्न...??"अनिकेत.

"पण तुम्ही मला ओळखत नाही...मी कशी दिसते तुम्हाला माहीतही नाही..??"राधा.

"तुला कितीवेळा म्हटलं मी ..आपण भेटू पण तूच तयार होत नाही ...तुला विश्वासच नाही माझ्यावर .. आणि हो, तु न आवडण्याचा प्रश्नच नाही... तू कशीही दिसत असली तरी मला तू आवडतेस... "अनिकेत.

तु आवडतेस ह्या वाक्यावर तिच्या पोटात गुदगुल्या व्हायला लागल्या तरी तिने सावरलं.

"अरे पण लग्न होण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये प्रेम असावं लागतं..." महेशी.
उगाच त्याच्याकडून काढून घेत होती का ती...?,स्वतःच्याच प्रश्नावर तिला वेगळं वाटलं.

"राधा आता मी सेकंड इयरला आहे ...पण अजूनही प्रेम काय असतं मला माहित नाही ...पण एक गोष्ट नक्की आहे ...मी पाचवीला होतो तेव्हा माझी आई मला सोडून गेली... त्यानंतर आजीने माझा सांभाळ केला ...आजी व्यतिरिक्त फक्त तूच आहेस जी माझ्या खूप जवळची आहेस..."अनिकेत.

"एवढं काय केलं मी तुमच्यासाठी अनिकेत.."राधा.

"तु माझ्यासाठी काय आहे हे फक्त मलाच माहिती आहे राधा... जेव्हा मला कुठलेच मार्ग सापडत नाहीत... तेव्हा तू मला मार्ग दाखवतेस ..जेव्हा मी दुःखात असतो तू माझ्यासाठी सुख शोधतेस ..! इथे कितीतरी जण आहेत जे माझं मन दुखवतात ..तू त्या दुखऱ्या मनावर फुंकर घालतेस ...! तुझे शब्द.. माझे मार्गदर्शक आहेत...माझा मोरल सपोर्ट आहेस तू राधा.. !म्हणून तुझे प्रत्येक शब्द ..प्रत्येक गोष्ट मी ऐकतो आणि यापुढेही ऐकेल... आणि तू जर माझ्या आयुष्यात आलीस तर... तर.. या जगात सर्वात सुखी असेल ग मी !!."अनिकेत.

तिकडे महेशीचे डोळे भरून आले, तिने खूप काही केलं नव्हतं त्याच्यासाठी, फक्त जेव्हा जेव्हा त्याला काही मार्गदर्शन लागत होतं, तिने तिच्या परीने तिला जे योग्य वाटत होतं ते त्याला सांगितलं होतं. त्याचे वडील गेले होते तेव्हा तो कॉलेजच्या पहिल्या वर्षात होता ,तेव्हाही तिच्या शब्दांनी त्याला सावरायचा प्रयत्न केला होता. ती फक्त एका चांगल्या मैत्रिणी सारखी त्याला योग्य ते मार्गदर्शन करत होती, पण कदाचित त्याच्या आयुष्यात तशी माणसं जास्त आली नसतील म्हणून ,की काय त्याने तिला बरच उच्चपदावर नेऊन ठेवलं होतं..

"पुरे तुमची चेष्टा.. एकदा तूम्ही मला भेटले की मला बघूनच पळून जाल.. "ती त्याला भेटणं टाळत होती .कारण तिलाही समजत नव्हते...कदाचित तिचा स्वाभिमान.!!...ती त्यांच्याच आश्रमात..एक आश्रीत होती ती.
अनिकेतला इतके तर समजले होते की तिने उत्तर देणे टाळले ,मग त्यानेही नंतर कधीच हा विषय नाही काढला .पुढे मग त्याने शांभवीला आश्रमात बघितलं आणि त्याला ती आवडली. नेमकी तेव्हा महेशी आश्रमात नव्हती ,तिच्या मेडिकल इंटर्नशिप साठी दुसरीकडे गेली होती. शांभवी मात्र इथेच अनिकेतच्या हॉस्पिटलमध्ये इंटरंशिप करत होती.तेव्हाच अनिकेतने महेशीला विचारले होते, तिला प्रपोज करण्याबद्दल. शांभवी सुद्धा तिला त्याच्याविषयी बोलली होती ,तो छान आहे ,हँडसम आहे.. वगैरे वगैरे पण तेव्हा महेशीने तिचं एवढं मनावर घेतलं नव्हतं.. अनिकेतने सांगितल्यावर शांभवी त्याला आवडते तेव्हा .... महेशीने मनावर दगड ठेवून त्याला शांभवीला 'हो' सांगायला सांगितले होते.. महेशी इंटर्नशिप संपल्यावर परत आश्रमात राहायला आली तेव्हा बराच वेळा अनिकेत शांभवीला भेटायला तिथं यायचा... तेव्हा दोघांना एकत्र बघून महेशीला मनात काहीतरी तुटल्यासारखा वाटायचं ,फार उशिरा कळले तिला की ती अनिकेत प्रेम करायला लागली आहे. पण वेळ निघून गेलेली होती..
तो समोर असल्यावर ती त्याच्याशी नजर मिळवायला टाळायची, कदाचित तिच्या नजरेत त्याला काही दिसलं तर... त्या दोघांच जस लग्न ठरलं तसंच लग्नाच्या काही दिवस आधीच महेशी आश्रम सोडून निघून गेली कुणालाच न सांगता.. मैत्रीणच सुख तर तिला बघायचं होतं, पण अनिकेत कोणा दुसरी सोबत आहे हे तिच्याने बघितलं गेलं नसतं म्हणून...

महेशीला आता ते सर्व आठवत होतं .
"मी नाही घेत आहे ..अनिकेत, शांभवीची जागा... पण ह्या मनात अजूनही तुझ्याविषयी काळजी प्रेम आहे त्याचं मी काय करू..."महेशीने स्वतःशीच बोलत बॅग बाहेर काढली.

ती थोडी भानावर आली, बघितले तर कोणीतरी दरवाजा ठोकत होतं, तिने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला.

"काय करत होतीस..??. केव्हा चा दरवाजा वाजतोय आम्ही ....शांभवी ला तुझ्याशी बोलायचं होतं.."क्रिश.

ते दोघे आत आले ,क्रिश ने दरवाजा लावून घेतला.

"मला माफ करा.. पण मी ईथं आता नाही राहू शकत..."महेशी.

"महेशी त्यांची मनस्थिती सध्या ठीक नाही आहे ग समजून घे प्लीज.."शांभवीचे शब्द क्रिशच्या मुखातून निघाले.

"नाही ..पण मला नाही राहायचं .."ती बॅग मध्ये तिचे कपडे भरत होती..

"एवढं कमकुवत आहे का तुझं प्रेम ...की त्यांच्या एवढ्याशा बोलण्याने तू लगेच त्यांना सोडून निघालीस.."शांभवी क्रिश मुखातून.

"त्याला नाही आवडत मी शांभवी..."महेशी.

"तू त्याला सांगत का नाहीस.. तूच त्याची राधा आहेस म्हणून...?"क्रिश.

"का विचित्र हट्ट आहे तुझा हा ...??..आधी ही नाही सांगितलं त्याला.. तुच राधा आहे ते .. नाहीतर मी मध्ये आलेच नसते.. आज तू आणि अनिकेत दोघे सोबत असते..."शांभवी क्रिश मुखातून बोलली.

"नियती ठरवते सर्व शांभवी.. हे आपलं विधिलिखित होतं ..आपण ठरवून काहीच करू शकत नाही...."महेशी.

"हे माहित आहे ना तुलाही... मग कशाला जायचा हट्ट करतेस ईथून... विधिलिखित आहे सर्व.. तर या पुढील आयुष्याशी तु जोडलेली आहेस त्याच्या... माहित आहे ना तुला... मग का सर्व कॉम्प्लिकेटेड बनवते आहेस.. ??? सांग त्याला तूच राधा आहेस म्हणून..."शांभवी.

"नाही त्याची मनस्थिती फार वेगळी आहे सध्या.. तो सावरतोय... मला परत त्याला डिस्टर्ब नाही करायचंय...."महेशी.

"तुझ्यामुळे सावरतोय तो... तुझ्यामुळेच तो डिस्टर्ब कसा होईल मग..."शांभवी.

"महेशी मलाही वाटतं तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस....."क्रिश.

"माझ्या सावीकडे बघ तिला तुझी गरज आहे महेशी... "शांभवी.
महेशीने पलंगावर खेळत पडलेल्या सावीकडे बघितले.

"ठीक आहे.? फक्त आणि फक्त माझ्या सावीसाठी मी थांबेल ...पण मी त्याला.. मी राधा आहे असं सांगणार नाही.. आज त्याने माझा ईगो हर्ट केला आहे.. आता त्यालाच ओळखावे लागेल मी राधा आहे ते ..."शांभवी ने डोक्याला हात मारला तिचा मूळ स्वभाव आता डोकावला होता हे जाणून..

पण तरीही क्रिश आणि शांभवीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. क्रिश बाहेर निघून आला ,आजी कडे बघून त्याने हसून मान डोलावली.

****

"मी महेशीला जरा जास्तच बोललो का..?? आजही मला त्यांच्या डोळ्यात तेच दिसतं... जे मी शांभवीला भेटायला जायचो आश्रमात तेव्हा दिसायचं ...त्या नजर चुकवत होत्या माझ्यापासून... पण तरीही मी जाणलं होतं... आताही मला जाणवत ते.. त्यांना मी आवडतो... पण आजच दुपारचं जेवण, संध्याकाळची मेथीची भाजी ..त्यांना कसं कळलं मला आवडते अशी... पाचवीला होतो मी.. आई गेली तेव्हा ..आणि ती गेल्यानंतर ..मी ती भाजी.. सुरवातीचे एक दोन वेळा सोडली तर नंतर खाल्लीच नाही... आणि या भाजीची चव फक्त मी राधा सोबत डिस्कस केली होती... मग महेशीला कसं कळलं... हा फक्त योगायोग होता का...?? महेशी आणि राधा एकमेकांना ओळखतात. .का?? का राधाच्या सांगण्यावरून महेशी माझी काळजी तर घेत नसतील ना ..?? विचारू का महेशीला.... ? नाही त्या नाही बोलणार आता माझ्याशी.. खूप रागवल्या असतील... बरंच काही बोललो मी... "अनिकेत विचार करत होता.

तो उठून खाली गेला. खाली आता सर्व पांगले होते, ज्याच्या त्याच्या रूम मध्ये होते. तो सावीच्या खोली जवळ आला... त्याने दरवाजा किलकिला करून बघितले.. आत मध्ये सावी अजूनही जागी होती ..आणि महेशी तीला गाणं म्हणून थोपटून झोपवत होती.

त्याला आता स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती, एवढं बोलूनही महेशी किती प्रेमाने सावीला झोपवत आहे... नसेल कदाचित तिचा कुठला स्वार्थ ..चांगल्या असतील त्या कदाचित मनाने ... म्हणून माझ्या सावीची काळजी घेत असतील... आणि मला दुःखात बघू शकत नसतील म्हणून माझी काळजी घेत असतील ..."सॉरी महेशी.. मी तुमच्याविषयी चुकीचा विचार केला.."
त्याने परत दरवाजा ओढून घेतला आणि वर निघून गेला. महशीला कळलं होतं, की तो आला होता ते. पण तिने मागे वळून बघितलं नाही.

ऋतू बदलत जाती..
मंद हवेची झुळूकही...
कधी कधी वार्‍याचे...
रुप घेवून येती..
ऋतू बदलत जाती...

क्रमक्षः...

भेटूया पुढच्या भागात....


कथा आवडत असल्यास फाॅलो करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भागाचे नोटीफिकेशन भेटेल, आणि कमेंटही करा, स्टोरी कशी वाटते ते...

तुमच्या अभिप्रायच्या प्रतिक्षेत .

©® शुभा.