ऋतू बदलत जाती... - भाग..14 शुभा. द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ऋतू बदलत जाती... - भाग..14




ऋतू बदलत जाती...१४.

त्याला आता स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती, एवढज बोलूनही महेशी किती प्रेमाने सावीला झोपवत आहे... नसेल कदाचित तिचा कुठला स्वार्थ ..चांगल्या असतील त्या कदाचित मनाने ... म्हणून माझ्या सावीची काळजी असतील... आणि मला दुःखात बघू शकत नसतील म्हणून माझी काळजी घेत असतील ..."सॉरी महेशी.. मी तुमच्याविषयी चुकीचा विचार केला.."
त्याने परत दरवाजा ओढून घेतला आणि वर निघून गेला. महेशीला कळलं होतं, की तो आला होता ते. पण तिने मागे वळून बघितलं नाही.

******

आता पुढे....

दुसऱ्या दिवशी सकाळी महेशीनेच मावशींच्या मदतीने नाश्ता बणवला.आज बटाट्याचे पराठे होते आणि गोड दही... पण आजचा नाश्ता ती वाढत नव्हती. ते सर्व टेबलवर ठेवून, ती सावी जवळ सोफ्यावर जाऊन बसली. अनिकेत तयार होऊन खाली आला ,मावशीने त्याला चहा, नाश्ता दिला. त्याने इकडे तिकडे पाहिलं ,ती त्याला सोफ्यावर बसलेली दिसली आणि तो थोडा निश्चिंत झाला. त्याला वाटत होतं की महेशी निघून गेली की काय..

"आजी सर्वांचा नाश्ता झाला का.. ??"अनिकेत.
माहेशीच नाव घेईल तो अनिकेत कसला, ईगो मध्ये येतो ना....
" सर्व तर बसले नाश्त्याला अजून कोण हवे तुला..??" आजी जरा रागात बोलल्या.

"हीचा झाला का नाश्ता.."
त्याने पाठी वळून महेशीकडे बघितले.

अनिकेतच्या बोलण्यावर क्रिश आणि अदितीने एकमेकांकडे भुवया उंचावून बघितले.
"उपवास आहे तिचा आज.. चतुर्थी चा.... 'आजी बोलल्या.

त्याने मग त्याच्या ताटाकडे बघितले ताटामध्ये बटाट्याचा पराठा आणि दही होते.. "अगेन माय फेवरेट... "परत त्याने मागे वळून महेशीकडे पाहीले, ती साविशी खेळण्यात मग्न होती.

"मावशी पराठे छान झालेत.. अगदी मला आवडतात तसेच ..."तो जरा मोठ्याने बोलला.

महेशीने त्याच्याकडे बघितले ,पण जरा रागातच ..आजी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागल्या. दोन दिवसापूर्वी चा तो.. तोच आहे का ..??जो नशेत तर्र रहायचा.. कोणाशी बोलायचा नाही ..रात्री अपरात्री बाहेर असायचा...??
पण आजीला थोडीच माहिती होते कि त्याची राधा त्याची मेंटाॅर परत आली आहे ते...

"मी नाही बनवले अनिकेत दादा .. ते महेशी ताईने बनवलेत.." बिचारे मावशी तिला कुठे माहित होते अनिकेत ला समजले ते...

आज जास्त कुणी कुणाशी बोलत नव्हतं. नाश्तापाणी झाल्यावर सर्वजण आपआपल्या रूम मध्ये निघून गेले. महेशीही सावीला घेऊन सावीच्या रूम मध्ये गेली, आजी तिकडेच गेल्या.

निघतांना अनिकेत सावीच्या रूम मध्ये आला.
"ये माझी बबडी.. बाबा ऑफिसला चाललेत ..तू छान छान रहा घरी.. कोणाला त्रास नको देऊस.." आणि हसून त्याने महेशी कडे बघितले, तीने त्यावर त्याला कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही..

"आजी तुमच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन देता का..?? मी येतांना घेऊन येईल.."अनिकेत.

"महेशी बाळा ..जरा माझ्या रूममध्ये जावून टेबलवर प्रिस्क्रिप्शन आहे.. ती देतेस का त्यांना आणून...??"आजी

ती बाहेर गेली बघाताच अनिकेतने आजीला हळूच विचारले.

"आजी मला पराठे आवडतात.. हेऽऽ .. तू महेशीला सांगितलेलं ..??"अनिकेत.

"नाही ती आली तेव्हापासून ती तिच्या मनानेच स्वयंपाक बनवतेय... आम्हाला पण थोडं आश्चर्य वाटतंय ..की तिला कसं माहिती तुमच्याबद्दल तुमच्या आवडीबद्दल एवढं.."आजी.

"अजून काय माहिती आहे तिला... काल ती त्या महादुला घेऊन तुझी रूम साफ करत होती ना तेव्हा तुझे लहानपणीची खेळणी...जी तुझ्या आईने तुझ्यासाठी आणली होती ..ती तू समोर तुझ्या कपाटात ठेवायचा...ती बेडवर पसरलेली होती. महादू ते सर्व भरून बॉक्समध्ये ठेवत होता, पण तिने त्याला हटकले ... म्हटले ..ह्या त्यांच्या आईच्या आठवणी आहेत.. समोरच असू दे..सावीसाठी काढली असतील त्यांनी ती...तीने ती खेळणी समोरच ठेवली..मी तेव्हा ती काय करतेय ते बघायला आली तर हे ऐकू आले..."आजी.

अनिकेत ऐकूण आश्चर्यचकित झाला होता.

"बघा ना मलाही आश्चर्य वाटलं ..तिला कशी माहिती की खेळणी तुझ्या आईने तुझ्यासाठी आणली होती.."आजी.
तेवढ्यात महेशी तिथे आली ,तर दोघांचं संभाषण तिथेच बंद पडलं .महेशीने ती औषधांची चिठ्ठी त्याच्या समोर धरली .पण तो कुठल्या तरी तंद्रीत ती चिठ्ठी न घेताच पुढे निघाला... आजीने त्याला आवाज दिला "अनिकेत ही प्रिस्क्रिप्शन तर घेऊन जा.." परत शुद्धीवर आल्या सारखा त्याने तिच्या हातातून ती घेतली आणि महेशीकडे बघतच बाहेर निघून गेला..

" युनो व्हॉट राधा मी माझ्या आईच्या सर्व आठवणी जपून ठेवल्या आहेत... तिने माझ्यासाठी घेतलेले कपडे.. खेळणी..... जेव्हा माझं बाळ येईल ना.. मी माझ्या बाळाला ती खेळणी खेळायला देईल ..त्याच्या आजीची आठवण म्हणून... "अनिकेत.

"अनिकेत तुम्ही आईच्या आठवणी जपून ठेवल्या ठीक आहे ..पण एवढ्या लहानपणापासून तुम्ही तुमच्या बाळासाठी ते राखून ठेवलेत.. इंटरेस्टिंग... "इकडे राधाला थोडस हसू आलं होतं.

"तू हसतेस का राधा ??"अनिकेत.

"नाही.. नाही.. मी हसत नाही !पण.. बाळ ...? पाचवीला असतांना तुम्ही तुमच्या बाळाचाही विचार केला होता..??."राधाला परत हसायला आले.

"हो तर मग !..अशी हसशील ना.. तर मी तुझ्यासोबत काहीच शेअर नाही करणार हा.."अनिकेतचा लटका राग.

"अनिकेत तुम्हाला चॅट मधून पण मी हसतांना दिसते का..??"राधा खरच हसत होती.

" हो इतक्या वर्षाच्या आपल्या मैत्रीमध्ये आता मला एवढं कळायला नक्कीच लागलंय... तू कधी हसते कधी रडते ...आणि हो मला हेही माहिती असतं तू चॅट करता करता खाते ते... "आता अनिकेत ईकडे हसत होता.

"खरंच तुम्हाला समजते मी खाता-खाता तुमच्याशी चॅट करते .. ते.."राधा.
अनिकेतने तर तूक्का मारला होता ,पण तो बरोबर लागला. एवढ्या वर्षात, कधी ना कधी तीने खात खात चॅट नक्कीच केली असेल!

"हाहाहा ...".इकडे ड्रायव्हिंग करता करता अनिकेतला त्या गोष्टी आठवत होत्या.
"वेडी...!!खरं मानलं तिने....!! राधा....! महेशी तुम्हा दोघींचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे.." त्याच्या मनात जसा हा विचार आला ,थोडा आनंद झाला त्याला, कदाचित तो आता त्याच्या राधाला भेटू शकणार होता.

*****

"क्रिशने शांभवीला हॉस्पिटलला सोडले आणि तो तडक पोलिस स्टेशनला निघून आला.

"हॅलो मिस्टर विशाल..!! मग कळल का त्या ट्रक चालकाविषयी काही ..??कोणाचा होता तो ट्रक..??" क्रिशने विशालच्या केबिन मध्ये येताच त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला.

" हो.. त्या ट्रक ड्रायव्हरला मी पकडला आहे.. पण तो म्हणतो की तो एक्सीडेंट त्याच्याकडून चुकून झाला... वळणावर त्याला दिसले नाही..म्हणून... आणि घाबरून तो तेथून पळून गेला..." विशालने समोर असलेली फाईल बंद करत त्याला सांगितले.

"खोटं बोलतोय तो ट्रक चालक.." क्रिशला थोडा राग आला.

"आम्हालाही हा घातपात वाटतोय ..त्या ट्रक चालकाकडून आम्ही नक्कीच सर्व खरं काय ते काढून घेऊ .!".बिचारा विशाल.. एक भूत ह्या केसमध्ये गुंतलेलं ,त्यानेच घाबरलेला ,भुताला नाराज केलं ....आणि तो भुत नाही ती भुतनी त्याच्या मानगुटीवर बसली..! सध्या अशी भितीदायक स्वप्न पडत होती त्याला.. .म्हणून त्याने ह्या केसचा निकाल लवकरात लवकर लावायचा आणि शक्य तितक्या लवकर बाहेर पडायचं ठरवलेलं .

"सर मला वाटते आता सुवर्णालाही जेलची हवा दाखवा..ॲक्सिडेंट करणारा हातात लागला आहे तर...तिला आत घ्यायला हरकत नाही...कदाचित तिच्याकडे असेल अजून माहिती..."क्रिश.
"हो तुम्ही म्हटले होते तसे त्या नर्सचाही तपास सुरू आहे....ती ईथे नवीनच होती..आणि तिचा हास्पिटलला जो अ‍ॅड्रेस होता.. तेथे कुणीच भेटले नाही.."विशाल.

******
कुठेतरी एका घरात...

" अरे मी ऐकलं की तो ट्रक ड्रायव्हर पकडला गेला आहे ..."एक जण म्हणाला.

" काय सांगतोस....!! आता तो त्यांच्यापुढे काही ओकला म्हणजे... तुला मी सांगत होतो.. हे सर्व करायची काय गरज होती..." दुसरा जन थोडा घाबरत बोलला.

" अरे मला काही तिला मारायचा प्लान नव्हता... थोडासा एक्सीडेंट करून.. फक्त ह्या अनिकेतला डिस्टर्ब करायचं होतं.. त्याचं थोडस दुर्लक्ष झालं की आपल्याला सर्व गोष्टींची विल्हेवाट लावायला वेळ भेटला असता.. बसस्ऽऽ... पण झालं भलतंच..." एक जण बोलला.

" सुवर्णा च काय ..?तिच्या बद्दल काही माहिती कळली का..??

" त्या सुवर्णाने वाटत तिथली नोकरी सोडली.. सध्या मला ती घरीच दिसते.."एक जण.

" म्हणजे अजून पोलीस तिच्या पर्यंत पोहोचले नाहीत.. चला ठीक आहे ..पण तू तिच्याशी भेटण्याचा आगाऊपणा करू नकोस..."दुसरा.

******

" शांभवी हॉस्पिटल मध्ये फिरत होती. नर्स, डॉक्टर त्यांचे काम करत होते.

ति जी नर्स होती ती त्या दिवसापासून कामावर आलीच नव्हती. तिने हा जॉब सोडला होता. तिला तिथं फिरता-फिरता समजलं.

दोन डॉक्टर आपसांत बोलत होते.

"अरे मी ऐकले हेमाने हे शहर सोडलं ती नाशिक मध्ये लाईफ हॉस्पिटल ला जॉईन झाली आहे..."एक डॉक्टर.

"तुला कसं कळलं...."दुसरा.

"त्या सुमनला फोन होता तिचा तेव्हा ऐकलं लाईफ नाव..."पहीला.

" तुला नाही वाटत का हेमाने काही केले असेल ते..???कारण ती आणि दोन वार्डबाॅयच होते त्यादिवशी हॉस्पिटल मध्ये ...आणि मॅडम आल्या होत्या त्या नंतर हेमाने लगेच दुसऱ्या दिवशी जॉब सोडला... काहीतरी गडबड आहे ... पोलीस करत आहेत तिचा तपास.."दुसरा डॉक्टर.

" मग आपण सांगायचं का पोलिसांना.. कि..ती नाशिक मध्ये जॉईन झाली आहे म्हणून..."पहीला डॉक्टर.

" नको ..उगाच कटकट नको डोक्याला ...पोलीस काय ते बघून घेतील.. आपण कुठे होतो त्या दिवशी.. हॉस्पिटलमध्ये फक्त एकच पेशंट आहे बघून पार्टी करायला निघून नव्हतो गेलेलो..? .."दुसरा डाँक्टर.
.
" मला खरंच हेमावर संशय येतोय ..मी तिला बोललो होतो .. .काही इमर्जन्सी असली तर मला कॉल कर .....पण तिने मला कॉल नाही केला ...तिने शांभवी मॅडमला कॉल केला ...नक्कीच काहीतरी काळंगोरं आहे याच्यात.."पहीला.

" जाऊदे ..कुठे बोलू नकोस.. नाहीतर उगाच पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील.."दुसरा.
पण त्या डॉक्टरांना कुठे माहिती होतं त्यांचं हे सर्व बोलणं शांभवीने ऐकलं होतं ...तिला त्या नाशिकच्या हॉस्पिटलचं नाव कळलं होतं.. आता बस तिला असे झाले होते की केव्हा क्रिश तिला घ्यायला येतो आणि केव्हा ती त्याला हे सर्व सांगते.

ऋतू बदलत जाती....
ढगांच्या पाठीमागून..
रवीची नजर चोरून..
नटखट किरणे डोकावती...
ऋतू बदलत जाती.......

क्रमक्षः...

**********
भेटूया पुढच्या भागात...


आवडत असल्यास फाॅलो करा.

कमेंट करा.

© शुभा.