ऋतू बदलत जाती....२३.
तसा अनिकेत हे पुढे सरसावला, त्याने तिच्या हाताला पकडले. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानेनेच तिला नाही सांगितले.. त्याच्या डोळ्यातले अश्रु बघून शांभवी शांत झाली, हळूच ती खाली जमिनीवर उतरली...
"अनि... "त्याला बघून तिचेही डोळे भरून आले होते... तिने हाताने त्याच्या चेहऱ्यावर गोंजारले .. त्याने थोडे स्मित झळकवत मानेने होकार दिला... आणि दुसर्याच क्षणी ती त्याच्या मिठीत गेली.
*******
आता पुढे....
महेशीने खाली मान घातली आणि ती आत निघून गेली.
"अनिकेतssss.. शांभवी sss ! " क्रिश ने दोघांना आवाज देऊन भानावर आणलं.
शांभवीची नजर परत त्या दोघांवर गेली..
दोघं रक्ताने लटपट तिथेच जमिनीवर अंगाची वळकुटी करून बसले होते...शांभवीची नजर जशी त्यांच्यावर गेली, तसे ते थरथर कापायला लागले.
"आम्हाला माफ करा..! आम्हाला मारू नका..! आम्हाला माफ करा.." वरती हात जोडून ते तिची माफी मागत होते. अनिकेत पुढे गेला ,त्याने परत एक लाथ मानमोडेच्या तोंडावर घातली.
"सांग का मारलं तू तिला..?? का मारलस तु माझ्या बायकोला...??"अनिकेत लाथवर लाथ मारत होता.
"मारू नका सर..! सांगतो सर..! "मानमोडे गयावया करत होता..
"सांग लवकर सांग..! "अनिकेतने परत एक लाथ त्याच्या कमरेत घातली.
". सर ...पीटर भाई .....त्याचे ड्रग्स.. आम्ही कंपनी च्या प्रोडक्टस सोबत ट्रान्सपोर्ट करायचो...
बंदरापर्यंत.... तुमच्या गोडाउन मध्ये ..कंपनीच्या माला व्यतिरिक्त पीटर भाई चा माल पण असायचा....पण त्यावेळेला बंदरावर पोलिसांना कोणीतरी खबर दिली होती की ....की त्या बंदरावरून ड्रग्जचा ट्रान्सपोर्ट चालतो ...म्हणून पीटर भाईचा माल अजून काही ..जास्त दिवस गोडाऊनमध्ये पडणार होता... आणि त्यातच दर महिन्याला ...तुम्ही जे इन्स्पेक्शन करतात... ते... त्याची तारीख होती.... आम्हाला फक्त तुम्हाला गोडाऊन इन्स्पेक्शन करण्यापासून थांबावायचं होतं.... नेमकं तुम्ही दिल्लीला गेले... आणि ज्या दिवशी इन्स्पेक्शन होतं त्याच दिवशी येणार होते.... मी खूप प्रयत्न केला की ...तुम्हाला दिल्लीला अजून काही वेळ लागावा... पण तसे होत नव्हते... म्हणून दिल्लीवरून येतांना तुमच्या कारचा एक्सीडेंट चा प्लॅन बनवला होता ....पण जर इथं आल्यावर तो प्लान फेल झाला तर .. तर इन्स्पेक्शन नक्की होणार....आणि तुमच्या हातात तो माल लागला तर.... मग तुम्ही पोलिसांना कळवाल.. म्हणून आम्ही वेगळा प्लॅन बनवला ... तुमच्या बायकोचा एक्सीडेंट करायचा ...त्या जर हॉस्पिटल मध्ये असल्या.. तर तुम्ही फॅक्टरीत कस काय येणार..??..आणि हा प्लॅन फेल झाला.. तर तुमच्या अँक्सिडेंटचा प्लॅन कंटीन्यु करणार होतो.. खरं सांगतो सर आम्हाला त्यांना मारायचं नव्हतं ...फक्त.. फक्त .... जो पर्यंत तो माल येथून ट्रान्सपोर्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही गोडाऊन कडे येणार नाही.... एवढंच आम्हाला पाहिजे होतं..."मानमोडे कन्हत कन्हत बोलत होता.
"हरामखोरा ..!! तुझ्यामुळे माझी शांभवी गमावली मी ..माझ्या छोट्याश्या सावीला त्रास दिला..तु मर!..आज तुला मी जीवंत नाही ठेवणार..!! "अनिकेत त्याला लाथे लाथेने तुडवत होता. क्रिश त्याला आवरायचा प्रयत्न केला, पण तो कुणालाच आवरला जात नव्हता.
"सोड..!! मला सोड..!! याला आज मी जिवंत ठेवणार नाही...सोड मला क्रिश ..." त्याने क्रिशला मागे ढकलले.
"अनिकेत... सावरा स्वताला... त्यांना जी शिक्षा द्यायची.. ते कोर्ट देईलच.. तुम्ही नका त्यांच्या घाणेरड्या रक्ताने स्वतःचे हात माखवू ...."आजी मागून बोलल्या.
"नाही आजी ..!! नाही मी याला असं नाही सोडू शकत ...माझ्या शांभवी चा हकनाक जीव घेतला या स्वार्थी लोकांनी... "अजूनही अनिकेत कोणाने आवरला जात नव्हता, तो लाथांनी त्याला तुडवतच होता.
अनिकेतचं शांभवी विषयीच प्रेम आणि त्यांच्या विषयीचा राग सर्व त्यातून निघत होता...
शांभवी कडे बघता विशाल आणि त्याच्या माणसांची मध्ये पडायची हिंमत होत नव्हती.
"विशाल.. ह्या दोघांना गाडीत टाक.. घेऊन जा लवकर ..नाहीतर त्यांचा जीव इथेच जाईल ..." अखेर क्रिशला एकट्याने अनिकेतला आवरले जात नसल्याने ,त्याने विशालला त्या दोघांना घेऊन जाण्यास सांगितले.
विशालाही तेथून लवकर निघण्याची घाई होती. नाही म्हटले तरी त्याला आणि त्याच्या माणसांना शांभवीची भीती वाटत होती ,कारण अजूनही तिचे डोळे रागाने लाल होते.
विशाल तिरकस नजरेने शांभवीकडे बघत, घाबरत घाबरत त्या दोघांच्या जवळ आला.. तो जवळ आला तसे त्याचे माणसंही पुढे सरसावले. दोघा तिघांनी मिळून त्या दोघांना गाडीत टाकले. आधीचा स्टोअर किपर तोही गाडीतच होता. विशाल त्या तिघांना घेऊन निघून गेला.
अनिकेत परत शांभवीकडे गेला ,त्याने तिचा हात हातात पकडला.
"शांभवी तू आली.. आपल्या सावीसाठी आली माझ्यासाठी आली.."अनिकेत.
शांभवीने डोकं वरखाली करत भरल्याडोळ्यांनी त्याला होकार दिला.
".. आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.... देव आहे!!..देव आहे..!!. तु माझ्या शांभवी ला परत पाठवलं...मला माफ कर मी तुझ्यावर अविश्वास दाखवला....शांभवी चल..सावी वाट बघत असेल आपली..ती तुला बघून खूप खूष होईल..." त्याचे मन आणि डोळे भरून आले होते.
शांभवीचेही डोळे त्याचं तिच्या विषयीचा प्रेम बघून वाहत होते ..पण त्याने सावीचा नाव घेतल्याबरोबर सर्वांना तिची आठवण झाली, सर्वजण धावतच घरात गेले. बघितलं तर महेशीने तिला मलमपट्टी करून झोपवून दिले होते.
शांभवी सावीच्या झोक्या जवळ गेली, तिने प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला .अजूनही शांभवीचे डोळे वाहत होते. पण आता एक समाधान तिच्या डोळ्यात झळकत होतं. महेशीही इथे शांभवी कडे बघुन गहीवरली .. तिचे डोळे भरले होते..
"शंभू.. sss"महेशी.
"महू..!!" शांभवी ने बाजूला उभ्या महेशी ला घट्ट मिठी मारली.... लगेच बाजूला उभ्या आजी दिसल्या, तिने आजीलाही मिठी मारली .तिथलं वातावरण बरच भाऊक झालं होतं. सर्वांचे डोळे वाहत होते पण त्यात एक आनंदही झळकत होता. शांभवी दिसल्याचा ..तिच्याशी बोलता येण्याचा....
एवढा गडबडीमध्ये क्रिशकडे कुणाचे लक्षच नव्हतं त्याच्या जखमेतुन अजुनही रक्त वाहत होतं..आणि तो तो हात पकडून तसाच उभा होता. त्याला आता थोडी भोवळ येत होती. अदीतीच लक्ष त्याच्याकडे गेलं..
"क्रिश डॉक्टर कडे जायला हवं...!!"अदीती.
तेव्हा आजी ,अनिकेत सर्वांचच लक्ष त्याच्याकडे गेलं. अनिकेत लगबग करून पुढे आला.
"हा क्रिश ...आपल्याला लवकरच डॉक्टरकडे जायला हवं.."अनिकेत.
जाता जाता त्याने परत मनभरुन शांभवीकडे बघितलं ,शांभवी सावीकडे प्रेमाने बघत होती..
पण ह्या बघण्याच्या खेळात अजून एक जण सामील होते.. महेशी.. ती अनिकेत कडे बघत होती, त्याच्या डोळ्यातलं शांभवीसाठीच प्रेम टिपत होती. नजर वळवतांना अनिकेतच लक्ष महेशीकडे गेलं ,तिने तर नजर वळवून घेतली पण अनिकेतच्या मनात कालवाकालव झाली. आतापर्यंत तो महेशीचं म्हणजेच त्याच्या राधाचं अस्तित्व विसरुनच गेला होता.
"मिस्टर अनिकेत ..तुम्ही थांबा .
मी क्रिशला डॉक्टर कडे घेऊन जाते ..."आदिती ने पुढाकार घेतला तिला क्रिशसोबत जायचे होते.
अनिकेतला शांभवीशी बरच काही बोलायचं होतं ..पण महेशी समोर त्याला थोडं ओशाळल्यासारखं वाटलं.महेशीला त्याची अवस्था कळत होती.
"मीही अदीती सोबत तिच्या मदतीला जाते.."ती उत्तराची वाट न बघता त्या दोघांसोबत डॉक्टरकडे निघून गेली .
आजींनाही वाटत होतं की अनिकेत आणि शांभवी ला जरा वेळ देऊ या... म्हणून त्याही त्यांच्या रुममध्ये निघुन गेल्या. रूम मध्ये शांभवी ,अनिकेत आणि झोपलेली सावीच होती.
©️®️शुभा.