Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 7

पीर बाबाची कृपा भाग ३



दर्शनला काडीचीही कल्पना नव्हती- की समोर दिसणार हे दृष्य सामान्य नव्हत-

नजरेस दिसणारा छलावा होता - एका अमानुष,हिंस्त्र, अमनाविय शक्तिच्या सापळ्यात दर्शन फसला होता.

दोन मिनिटे झाली होती - पन पुन्हा काही केल्या ती म्हातारीच काय, तर एक गाडी सुद्धा त्याला समोरून जातांना दिसली नव्हती ! पन ती म्हातारी पुन्हा दिसली नाही , हा विचार करूनच त्याला जरास हाईस वाटल होत .

पन जशी त्याची नजर समोर गेली - त्याचे डोळे विस्फारले , घशात श्वास अडकला -

कोणीतरी नसांवरून थंडगार पातीचा धारधार
टोकदार सुरा फिरवल्यासारखी जाणिव झाली- बसल्या अवस्थेतच पाठीच्या मणक्यातून थंडगार लाट पसरली .

अंगावर सरसरून काटा आला,सर्व शरीर
विंचवाच डंख बसल्यासारख ठणकून उठल.


गाडीच्या पिवळ्या हेडलाईटचा प्रकाश लांबच्या लांब पसरला होता - आणी त्याच पिवळसर प्रकाशात कालशार रस्ता ,व पन्नास मीटर दूर रस्त्याच्या डाव्या बाजुला तोच भगव्या रंगाचा लुगडा, दिसला आणी ती पाठमोरी लुकड्या देहाची म्हातारी जागेवरच उभी राहिलेली दिसत होती.
जणू ते ध्यान दर्शनच्या गाडीच्या येण्याची वाटच पाहत असाव!

गाडीच्या व्हीलज गरागरा फिरत होत्या- काळ्याशार भुईसपाट रस्त्यावरून गाडी हपापल्या सारखी वेगान मृत्युच्या जबड्यात जात होती.

जस जस गाडीच अंतर पार होत होत.
दहा मीटर , वीस मीटर, तस त्या ध्यानाची एक मंद गतीने हालचाल होत होती.

त्या म्हातारीच पिंजारलेल्या पांढरट केसांच डोक हळुहळू मागे वळत होत.

दर्शनच्या मनाला धाकधूक लागून राहिली होती.
त्या ध्यानाने मागे वळुन पाहिल्यावर त्याच रुप आपल्याला कस दिसेल ? आणि आपण ते अभद्र ,विदृपरुप पाहू तरी शकू का? मनात भयंकरविचार आले!

त्याने कधीतरी लहानपनी भुताखेतांचे चित्रपट पाहिले होते. तेच कल्पनेत चित्रपटातले रंगरंगोटी केलेले भूतांचे विविध रूप त्या म्हातारीच्या रूपाशी जोडले जाऊ लागले...


आकळनापलिकडच्या, अकल्पनिय शक्तीचा खेळ सुरु झाला होता . ज्या खेळात दर्शन पुर्णत फसला होता.

हळू हळू तीची मान मागे वळत होती , एकदाच तीने वळून गर्रकन दर्शनकडे पाहिल.

त्या म्हातारीच ते हीडीस,तामसी, अघोरी , अकल्पनिय रूप दर्शन कधीच विसरणार नव्हता.

पुर्णत चेह-यावरची त्वचा कालिशार सुरकूतलेली होती, नाक घुबडेसारख नप्ट होत, गालांची हाड वर आलेली दिसत होती- डोळ्यांतली बुभळे चंदेरी रंगाने हिंस्त्र श्वापदासारखी चकाकत होती, हनुवटी जराशी पुढे आलेली, तोंडातले ते काळेशार दात दाखवत ती हसत होती. पिंजारळेले पांढरेशार केस दोन्ही खांद्यावर अस्वस्थपणे लोंबत होते. कपाळावरचा तो मळवट भरलेला लालसर रक्तासारखा कूंकू गाडीच्या उजेडात ठलक दिसत होता.


तीच रे रूप पाहून दर्शनच्या मनाला जाणिव झाली होती- समोर असलेली ती म्हातारी काहीतरी वेगळंच आहे , त्या अंधा-या मितीतल अंश आहे,
कालोखात वावरणार मृत्यू आहे.

दर्शनची वाचा बसली होती, तोंडाचा आ- वासला होता. हा धक्का पचवणे त्याच्यासाठी सोप्प नव्हतं, मुळीच सोप्प नव्हत!
गाडीत एसीची थंड हवा घुमत होती - पन
त्या एसीत सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला होता.

दर्शन आणि ती जखीण,हडल, कैदाशीण,की चेटकीन ते जे काही दुस-या मितीतल तिथे उपस्थीत होत..- त्याची ती चांदीसारखी लुकलुकणारी नजर दर्शनच्या डोळ्यांवर पडली..

ह्या झालेल्या सेकंदाभराच्या क्रीयेने दर्शनच्या डोळ्यांची दोन्ही पापण्या जड झाल्या- दर्शनच्या मनातले अवांतर विचार पार गळून पडले , मनाची एकग्रता निघुन गेली- मेंदूवर कोणीतरी दुस-याचंच
ताबा असल्यासारख जाणवू लागल..-

त्याच्या डोळ्यांना सुस्थि जाणवू लागली- पापण्या जड झाल्या आणि हळकेच मिटल्या..- बंद डोळ्यांआड काळ्याशार पडद्यांवर झटकन एक स्त्रीचा आकार उमटला. मित्रांनो ती स्त्री म्हंणजे दर्शनची वर्षभरापुर्वी मेलेली मृत आई होय.आपल्या मुलाला संकटात पाहूण त्या आईची आत्मा त्याला वाचवण्यासाठी आली होती.

दर्शनच्या मृत आईच्या आत्म्याभोवताली
लखलखता पांढ़राशुभ्र डोळे दिपवणारा प्रकाश होता .


" दर्शन , बाळा दर्शन उठ, डोळे उघड..! डोळे उघड , तिच्याकडे पाहू नकोस ..उठ..! " दर्शनच्या आईचा आत्मा त्याला त्या संमोहिंत आम्लातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता.

पण अमानवीय शक्तिचा उच्चांक , चांगल्या शक्तिंच्या कित्येकतरी पटीने जास्त असतो, कारण त्या हिंस्त्र, अमानुष,हिंसक, असतात त्यांच्यात दया- माया , प्रेम, आपुलकी ह्या भावनेना थरा नसतो.

दर्शनच्या आईच्या मृत आत्म्याने सर्व प्रयत्न करून पाहिले - पन यश मिळाल नाही - शेवटी ती वेगधारी गाडी जाऊन थेट रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर आदळली -

एक मोठा आवाज झाला , गाडीची बोनेट चक्काचूर झाली - हेडलाईट, पुढची काच फुटली होती. विविध पार्टस खाली जमिनीवर अस्तव्यस्तपणे विखुरले गेले होते..- गाडीचा अपघात झाला होता.