पीर बाबाची कृपा भाग४
गाडीचा अपघात झाला होता.
गाडीत असलेले मागचे तीन जण जखमी झाले होते.! दर्शनच्या बाजुला बसलेला सुजय त्याच हात फ्रेक्चर झाल होत - आणी ड्राईव्हिंग सीटवर बसलेला
दर्शन त्याच पाय फ्रेक्चर झाल होत.
अपघातस्थळावर मदतीसाठी काही लोक जमली आणि त्यांनी ह्या सर्वाँना हॉस्पिटल मध्ये एडमिट केल.
अस म्हंणतात की फळावर जेव्हा कीड लागते, तेव्हा ती किड फळाला हळू हळू नासवते ..!
दर्शनला हॉस्पिटलमध्ये महिनाभर एडमिट केल होत - महिन्याभरा नंतर त्याला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल, पण पाय अद्याप बरा झाला नव्हता .. चालताना लंगडत चालाव लागायचं.
महिन्याभरा नंतर दर्शनला घरी आणल गेल, घरातली सर्वजन खुश होती..
कारण दर्शन सहिसलामत घरी आला होता.
पण सर्वजन पुढील भयानक थरार नाट्यापासून पुर्णत अजाण होते.
दर्शनच्या घरातल्यांना दर्शनला जेव्हा घरी आणल, तेव्हा त्याच दिवसापासून घरात काही काही विचीत्र घटनाक्रम घडू लागले..
रात्री - अपरात्री दर्शनच्या खोलीतून हसण्याचा, तर कधी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला..
कोणीतरी कालोखात हळक्या स्वरात बोलत असल्याची कुजबूज ऐकू येऊ लागली.
आणी भीतीदायक गोष्ट अशी की तो आवाज दोन दोन जणांचा असायचा , एक पुरुषी आणी दुसरा म्हातारलेला खर्जातला घोगरा आवाज..
रात्री - अपरात्री किचनमध्ये भांडी पडली जायची, रात्री फ्रीज मध्ये ठेवलेल दुध नासल जायचं,
देवांच्या फोटोंवर काळी काजळी पसरायची, देव नाखूश दिसायचे, घरात नकारत्मक उर्जेचा प्रभाव जाणवायचा.
घराबाहेर गल्लीतली मोकाट सुटलेली कुत्री, उभी राहून घराकडे पाहूब भुंकायची - तर बारा वाजता कोणीतरी मरणार आहे की काय अशी घसाफाडून भेसुर आवाजात विव्हळायची, हेळ काढुन रड़ायची.
शेवटी कधी ना कधी हे सत्य
समोर येणार होतच , की दर्शनला त्या म्हातारीने झपाटल होत.
दर्शनच्या घरात त्याचे वडील,एक मोठा भौ आणी त्याची बायको अस तो धरून एकूण चारजण राहत होते.
एके दिवशी घरातली सर्वजन हॉलमध्ये जेवायला बसली होती - रविवार असल्याने घरात चिकन बनवल होत.
दर्शनला सुद्धा त्याच ताठ वाढुन दिलेल...
दोन मिनिटे दर्शन अगदी सामान्यपणे जेवत होता..
तोच अचानक त्याला न जाणे काय झाल? कोणास ठावूक !
तो चिकनचे तुकडे आणी भात बका बका तोंडात कोंबू लागला..-
मोठ मोठे घास खाल्ल्याने त्याच तोंड
फुगल होत.
तोंडातून भाताचे कण खाली जमीनीवर पडत होते.
" दर्शन अरे असा काय करतोयेस बाळा निट जेव!" दर्शनचे वडील म्हंणाले.
पण दर्शन मात्र दर्शन राहीला नव्हता -
त्या हाडा मांसाच्या देहावर कोणीतरी दुसरच स्वार झाल होत.
" ...मटान , मटाण, दे मला ..मटाण दे.! "
दर्शनच्या तोंडातून घोगरा आवाज बाहेर पडला.
जागेवरच तो आपल- डोक- आणी शरीर मागे पुढे हलवू लागला.. !
मध्येच दोन- तीनदा हॉलमधली लाईट जराशी
चरचरली होती- अस म्हंणतात नकारत्मक शक्ति आसपास असेल तर लाईटच्या लहरींवर त्यांचा गहिरा परिणाम जानवतो- लाईट हळू हळू चरचरते..
कधी कधी स्मशानात लावलेली ट्यूबलाईट सुद्धा रात्री चरचरते , त्यामागच कारण हेच की त्या जागेत नकारत्मक शक्तिच्या लहरी अगदी लाखोपटीने सक्रिय
असतात.
" भ..भ..भाऊजी चिकन स्ंपलय ! मी उद्या करते ना!"
दर्शनची वहिनी काफ-या स्वरात म्हंणाली.
" उद्या नाय उद्या नाय.. मला रोजंच मांस पाहिजे..आणी आताच्या आता मला एक अक्खी कोंबडी शिजवून पाहिजे, नाहीतर कच्ची तरी आणून द्या, हिहिहिहिहिह!" दर्शन भयावह आवाजात हसला.
" दर्शन अरे काय होतय तुला , बर वाटत नाहीये का?" दर्शनचे वडिल काळजीच्या सुरात म्हंणाले.
" ए म्हाता-या , कोण दर्शन, मी दर्शन नाही..मी झपाटलाय तुझ्या पोराला..- माझ्या फे-यात फसलाय तुझा पोर..हिहिहिहिही!" दर्शनच्या तोंडून आलेला हा आवाज तालस्वरातला स्त्री- पुरुश मिश्रित होता.
जो ऐकून तिथे उपस्थीत सर्वाँच्या अंगावर भीतीने निवडुंगाचे काटे फुटले..-
हे प्रकरण आपल्या हातातल नाही, दर्शनच्या अंगात काहीतरी विळक्षण असं अकलनीय तामसी, अमानुष शक्तिचा अंश शिरला आहे- हे समजायला त्या सर्वाँना अजुन काय हव होत.
शेवटी दर्शनला त्या शक्तिने काही करायला नको ह्या हेतूने घरातल्यांनी कोंबडी आणली..
ती कापली व शिजवली..- तासाभराने एक ताटभरून वाफाळत चिकन दर्शनच्या समोर ठेवल ..
दर्शन भस्म्या झाल्यासारखा बका बका मांस तोंडात कोंबत होता..अस वाटत होत की तो कित्येकतरी वर्षाचा भुकेला आहे..!
हैवानासारख ते मांस खाऊन झाल्यावर दर्शनच सर्व शरीर जमिनीवर कोसळल तो बेशुद्ध झाला होता.
दर्शनला भुताने झपाटलंय ही वार्ता हवेसारखी गावात पसरली होती..
शेवटी कोणितरी दर्शनला दरग्यात घेऊन जाण्यास सुचवल - जिथे ह्या अमानवीय शक्तिंना ,
बाधा झालेल्या मानवापासून विळग केल जात...
अशी खुपसारी पवित्र ठिकाणी आहेत
जिथे पवित्र शक्तिंचा वास आहे , त्या पवित्र शक्तिंची सीमा असीम आहे -
ज्या ठिकाणी ह्या अमानुष, हिंसक,कृल्पती शक्तिंची - माया , ताकद,कमी होते.
क्रमशः